Savitribai Phule Speech In Marathi 2023 | सावित्रीबाई फुले भाषण

5/5 - (3 votes)

Savitribai Phule Speech In Marathi | आज या ब्लॉग पोस्ट Savitribai Speech In Marathi, Savitribai Phule Marathi Bhashan, Savitribai Phule Speech Marathi मध्ये विषयी केली जाणारे भाषण याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. पण या भाषणाचा वापर पहिलीपासून दहावीपर्यंत करू शकता.

Savitribai Phule Speech In Marathi | सावित्रीबाई फुले भाषण

आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, समारंभाचे प्रमुख अतिशी, सर्व मित्र मैत्रिणी सर्वप्रथम मी क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा करुन आपणासमोर विषय मांडत आहे. “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देण्याचे सदभाग्य मिळालेबद्दल संयोजकाचे आभार मानतो.
ठाम असावा मार्ग आपुला / दिशा दिशातून दाही
स्मरण करावे क्रांतीज्योतीचे / वाचुनी इतिहास सर्वांनी पाही

स्वातंत्र्याचा अर्थ खरा मग कळेल आपुल्या अक्षराला.
सातारा जिल्ह्यातील नायगाव यागावी जानेवारी ३ इ. स. १८३१ रोजी सावित्रीबाईंचा जन्म झाला. माता चे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या बाबा चे नाव खंडोजी नेवसे पाटील. महिला स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. पण बंधनांचा अर्थच ज्या वयात कळला नाही, त्यावयापासूनच त्यांनी आपल्या कार्याला नकळत सुरुवात केली. एका दुबळ्या मुलाचे फुल हिसकावून घेणाऱ्या धटिंगणाला त्यांनी चांगली शिक्षा दिली. पक्ष्यांची अंडी खाणाऱ्या नागाला त्यांनी मारले. फाल्गुन कृष्ण पंचमी, शालिवाहन शक १७६५ (इ. स. १८४०) रोजी ज्योतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्न करत असताना सावित्रीबाईंचे वय नऊ तर ज्योतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मूळेच फुरसुंगीचे क्षीरसागर. परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरुन त्यांना फुले हे आडनाव मिळाले. सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना लहापणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सुगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केलेला. सुगणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचं व बोलताही यायचं. सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. ज्योतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंचा खिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यांनी केलं ते पुण्य आणि आपण शिकलो ते पाप हा ज्योतिरावांनी वडिलांना विचारलेला प्रश्न सावित्रीला पतीच्या ध्येयाची जाणीव देऊन गेला. सेठजी, टाकलं पाऊल मागं घेऊ नका. तुमी शिकावं असं मलाबी वाटतं… या शब्दात त्यांनी पतीला ताकीद दिली. ज्योतिरावांना एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तरसोबत होतीच. दोघींनी रितसर शिक्षण घेतले. सावित्रीबाईंनी १ मे १८४७ साली सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्सहाने शिकवू लागल्या. भिड्यांच्या वाड्यात शाळा सुरू झाल्यानंतर सगुणाऊंना तिकडे शिक्षण घेण्यास गेले . ही पहिला शाळा मध्येच बंद पडली. त्या काळात लोक म्हणत जो शिकले, त्याच्या सात पिढ्या नरकात जातील. त्यावर पर्याय म्हणून त्यांना सांगण्यात आलं की “जो शकत नाही त्याच्या १३ पेक्षा जास्त पिढ्या नरकत जातील” भीतीने लोक शिक्षणाला जाऊ लागली.

हे सुद्धा वाचास्वामी विवेकानंदांचे मराठीत भाषण


१ जानेवारी १८४८ साली भिडे वाड्यात सावित्रीबाई ने पहिली मुलींची शाळा काढली. तत्कालीन ब्रिटिश भारतातील एतद्देशीन व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. इंग्रजांच्या काळात पुण्यातील इतर भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरु केल्या व काही काळ यशस्वीपणे चालवल्या. सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या. १८४८ साल संपेपर्यंत मुलींची संख्या ४०-४५ पर्यंत झाली. या यशस्वी शाळेचे विरोधक सनातनी उच्च वर्णीयांनी धर्म बुडाला… जग बुडणार… कली आला. ” असं सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उतन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. सावित्रीबाई फुले जाणीव झाली की शिक्षणाच्या महिलांचा आत्मविश्वास वाढवण्याचे गरजेचे आहे त्यासाठी शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रासाठी कामे केली पाहिजे. रूढी परंपरांनाही त्यांनी आळा घातला. बालपणीच लग्न झालेल्या भरपूर मुली 13/14 वर्षाच्या विधवा होत होत्या. पतीच्या निधन समाज त्यांना फार त्रास देत होता. त्यांना समाजात कोणतेही स्थान दिले जात नव्हती यामुळे त्या मुली एक तर आत्महत्या किंवा भ्रूणहत्या करत.
मुलींची आत्महत्या कमी होण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक चालू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. सावित्रीबाई फुले ग्रहातील सर्व अनाथ मुलांना मुलं मानत असे. ग्रहातील ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करेण व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाच कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक सामाजिक कार्ये सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्सशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे.
महात्मा फुले यांच्या निधनानंतरही (इ. स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातूनही केला. ‘काव्यफुले‘ व ‘बाननकशी सुबोध रत्नाकर‘ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांनी १८९६ साली दुष्काळात समजला शेतकऱ्याचं आदर्श दाखवून दिला.१८९६-९७ साली दरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने गोंधळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरीत करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्धभवणारे हाल ओळखून त्यांनी प्लेग पिडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आसरा व मदत देऊ लागल्या. प्लेगाच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून मार्च १० इ. स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले. अशा या क्रांतीज्योतीस कोटी कोटी प्रणाम. एवढं बोलून मी माझं भाषण इथेच थांबवतो. धन्यवाद!

जय हिंद ! जय भारत ! जय महाराष्ट्र !

!

Savitribai Phule Marathi Bhashan, Savitribai Phule Speech In Marathi


हे सुद्धा वाचा१५ ऑगस्ट भाषण मराठी / 15 August speech in Marathi


[PDF] Savitribai Phule Speech In Marathi

Savitribai Phule Speech In Marathi -Savitribai Phule Marathi bhashan, Savitribai Phule speech Marathi वरील संपूर्ण भाषण PDF च्या रूपाने डाउनलोड करून घेऊ शकता.

Savitribai Phule Speech Marathi !

निष्कर्ष | Conclusion

Savitrabai Phule Speech in Marathi, Savitrabai Phule Marathi Bhashan, Savitribai Phule Speech Marathi वरील भाषण तुम्ही सावित्रीबाई फुले भाषण मराठी | Savitribai Phule Speech Marathi यावर देऊ शकता. वरील भाषण एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे. या भाषणाचे सर्व मुले व शिक्षक घेऊ शकतात. वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काही कॉपरेटच्या अडचण असल्यास तर तुम्ही [email protected]. या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 तासांमध्ये उत्तर दिले जाईल.

भारताची पहिली महिला शिक्षिका कोण ?

सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या.

सावित्रीबाई फुले यांचा विवाह कधी झाला ?

सावित्रीबाई फुले यांचा इ. स.१८४० साली ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला.

समाजसुधारक आणि पहिली महिला भारतीय शिक्षिका म्हणून कोणाला ओळखले जाते ?

सावित्रीबाई फुले यांना समाज सुधारक आणि पहिला महिला भारतीय शिक्षका म्हणून ओळखले जाते

Sharing Is Caring: