शिक्षक दिन भाषण २०२३ | Teachers Day Speech In Marathi

4.3/5 - (3 votes)

Teachers Day Speech In Marathi -आमच्या ब्लॉग मध्ये आज आम्ही शिक्षक दिन ह्या विषयवार 5th September Teachers Day Speech In Marathi, Teachers Day Speech In Marathi माहिती देणार आहोत.तुम्ही ही माहिती चा वापर ह्या साठी करू शकता.

5th September Teachers Day Speech In Marathi

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः ॥

आज ५ सप्टेंबर शिक्षक दिन. या दिनानिमित्त सर्व गुरुजनाना वंदन करतो.आजचा दिवस संपूर्ण भारतात थोर धर्म वतत्त्वज्ञानाचे उपासक एक आदर्शशिक्षक माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो.या महान तत्त्ववेत्याचे विचार एक व्यक्ती आणि एक शिक्षक म्हणून सर्वांसी चिंतनीय आहेत. शिक्षकाचे महत्त्व सांगताना ते म्हणतात, “कितीही सुसज्ज इमारती आणि साधने आली तरी आदर्श शिक्षकांची जागा ती घेऊ शकणार नाहीत.’

प्राचीन काळापासून गुरु-शिष्याचं नातं अतूट आहे. शिष्य नसेल तर गुरूला अस्तित्वच राहणार नाही पण गुरू विना शिष्याचे जीवन हे अधुरे असेल म्हणूनच म्हटले जाते. की ‘आचार्य देवो भव’ गुरू म्हणजे ‘साक्षांत परब्रह्म’ एवढी गुरूंवर लोकांची श्रद्धा होती. तर ज्ञानदानाचे विद्यादानाचे कार्य ते निष्काम बुद्धीने करत.

गुरू हा दिव्यासारखाच असतो त्यांच्या प्रकाशात मुले शिकतात. त्यामुळे त्यांच्याकडून परतफेडीची अपेक्षा करु नका. शिक्षक हा यंत्रवत नसावा तर तो ज्ञानवंत असावा.आई वडिलांनंतर गुरूचे स्थान महत्त्वाचे असल्याने गुरू शिष्य संबंध माता पित्याप्रमाणे होते.

हे पण वाचा – स्वामी विवेकानंदांचे मराठीत भाषण

शिक्षक म्हणजे नेमके काय ?

शिक्षक म्हणजे नेमके काय ? तर शि- शिलवान, क्ष- क्षमाशील, क-कर्तृत्ववान ज्यांच्याकडे शिल, क्षमा, आणि कला, कर्तृत्व याचा त्रिवेणी संगम आहे ते म्हणजे शिक्षक. कुंभार जसा फिरत्या चाकावर मातीला आकार देऊन मडके बनवत असतात तेच काम शिक्षक विद्यार्थी घडवण्याचे काम करत असतात.

प्राचीन कालखंडापासून आपल्या देशामध्ये गुरुपरंपरेला फार महत्त्व आहे. प्राचीनकाली देशामध्ये गुरूच्या कुलात जाऊन विद्यार्थी ज्ञानाचे शिकवण घेत होते. त्या पद्धतीला गुरुकुल शिक्षण पद्धती असे आपण म्हणतो. पूर्वी शिक्षण हे वनामध्ये दिले जायचे. आज शिक्षण हे शाळेमध्ये दिले जाते.विद्यार्थ्याच्या यश अपयश मध्ये त्यांचा गुरुजनांचे योगदान महत्त्वाचे असते.

आज शिक्षक दिन साजरा करत असताना आपण आपल्याला ज्ञानाचे, जीवनाचे, आयुष्याचे, कला, क्रीडा, साहित्य यासारख्या क्षेत्रामध्ये आपणास घडवणाऱ्या शिक्षकांचायथोचित सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा करत असतो.

शिक्षक हे विश्वास आणि प्रगतीच्या दोन स्तंभांपैकी एक आहे. आपण विद्यार्थ्यांना सापडवलेल्या ज्ञानदानाने त्यांचे भविष्य स्थापित केले आहे.आपण शिक्षकांनी अशा समाजाचे आधार दिले आहे ज्याचा यशस्वी कायदेशीर, नैतिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकास करणारा आहे. आपणांनी शिक्षणाचे मार्ग दाखवले आहे, परंतु आपल्या अतुलनीय व्यक्तिमत्व ने आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा, आत्मविश्वास आणि स्वाधीनतेची शक्ती दिली आहे.

शिक्षक हे समाजाचा आरसा असतात. अज्ञांनी मुलाला ज्ञानी बनवतात. विद्यार्थ्यातील दुर्गुण बाजूला काढून त्याच्या सद्गुणांना वाव देतात. शिक्षक आपला प्रत्येक विद्यार्थीं खूप यशस्वी होऊ यासाठी त्यांचे १००% त्यांचा शिक्षणाच्या मागे म्हणेत घेत असतात . समाजाला अशा शिक्षकांची गरज असते.

हे पण वाचा – सावित्रीबाई फुले याच्या विषयी संपूर्ण भाषण मराठी मध्ये

आज जगभरात शिक्षकांच्याकडे पाहिले तर हे शिक्षक विद्यार्थ्यांच्यावरती चांगले संस्कार करत असतात. शिक्षकांना सर्वात जास्त आनंद केव्हा मिळत असतो जेव्हा आपला एखादा विद्यार्थी सामान्य असेल, पण तो जेव्हा त्यांच्या हाताखाली घडतो व उत्तम व्यक्ती म्हणून ज्यावेळी समाजात वावरत असतो. त्यावेळी शिक्षकांना आनंद होत असतो.

या थोर विचारवंत व आदर्श शिक्षकाबद्दल शेवटी मी एवढंच म्हणेन !

“काळ ही थांबून मागे वळून पाहिल जरा..
तो ही लावून करेल तुमच्या कार्याला मुजरा’
तुमच्या कार्याला मुजरा !
धन्यवाद
!

10 lines On Teachers Day Speech In Marathi

 • शिक्षकांनी ज्ञानाच्या प्रकाश विद्यार्थ्यांच्या मनात ठसवले .
 • शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भावनांचे नवे रंग भरले.
 • शिक्षक म्हणजे प्रेरणा ज्याच्या स्पंदनाने विद्यार्थ्यांचे जीवन सुंदर झाले.
 • शिक्षकांचे देणगी सदैव अमर राहणारे आहे.
 • शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याचे आणि देशाचे निर्माण केले.
 • शिक्षक म्हणजे आदर्श ज्ञानगुरू, आध्यात्मिक मार्गदर्शक.
 • शिक्षकांच्या आचरणाने विद्यार्थ्यांना संयम आणि नैतिकतेची शिक्षा मिळते.
 • शिक्षकांच्या आदर्शांमुळे समाजातील सुसंस्कृतीची वाढ होते.
 • शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जीवनाच्या विविधतेने सामृद्ध केले आहे.

Conclusion

आमच्या ब्लॉग मधील माहिती तुम्ही खालील विषयांसाठी वापरू शकता

 • Teachers day speech in marathi by student.
 • Shishak din speech in marathi.
 • 5 september speech in marathi.

Teachers Day Speech In Marathi अन्य लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकावरून घेतली गेली आहे. वरील ब्लॉग मधील माहिती फक्त भाषण आणि शिक्षण उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिल्या गेलेल्या माहिती बद्दल काही अडचण असेल आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.

Sharing Is Caring:

1 thought on “शिक्षक दिन भाषण २०२३ | Teachers Day Speech In Marathi”

Leave a Comment