डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची संपूर्ण माहिती | Apj Abdul kalam Information In Marathi

5/5 - (3 votes)

Apj Abdul Kalam Information In Marathi– महान व्यक्तिमत्त्वे दररोज जन्माला येत नाहीत; ते शतकात एकदाच जन्माला येतात अशेच एका महान व्यक्तिमहत्व म्हणजे डॉ. ए पीजे अब्दुल कलाम (The Missile Man of India) यांच्या बदल संपूर्ण माहिती खालील ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.

Apj Abdul kalam Information In Marathi

प्रमुख विवरणतपशील
नावअवुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम (डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम)
टोपण नावमिसाइल मॅन
व्यवसायअभियंता, वैज्ञानिक, लेखक, प्राध्यापक, राजकारणी
जन्म15 ऑक्टोबर 1931
जन्म ठिकाणधनुषकोडी, रामेश्वरम, तामिळनाडू, भारत
मृत्यू27 जुलै 2015
मृत्यूचे ठिकाणशिलाँग, मेघालय, भारत

बालपण | dr apj abdul kalam Early life

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ मे १९३१ रोजी रामेश्वरम, तामिळनाडू येथे झाला. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दीन व आईचे नाव आशिअम्मा असे होते. त्यांचे वडिल बोटीचे मालक आणि स्थानिक मशिदीचे इमाम होते व आई गृहिणी होती.अब्दुल कलाम हे पाच भावंडांपैकी सर्वात धाकटे होते. १९२० साली वडिलांचे निधन झाल्यानंतर व गरीब परिस्तिथीमुळे त्यांनी लहान वयातच वर्तमानपत्र विकायला सुरुवात केली.

शैक्षणिक कारकीर्द | dr apj abdul kalam Education Career

 • डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी श्वार्ट्झ हायर सेकेंडरी स्कूल, रामनाथपुरम येथून मॅट्रिक पूर्ण केली.
 • डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी सेंटजोसेफ कॉलेज मध्ये भौतिकशास्त्रया विषयावर पदवीधर पूर्ण केली.
 • डॉ. एपीजे अब्दुल कलाम १९५५ मध्ये, मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एरोस्पेस अभियांत्रिकी शिकण्यासाठी मद्रासला गेले.
 • डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी १९५७ मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली.

वैज्ञानिक कार्य | Career as Scientist

 • डॉ. एपीजे अब्दुल कलाम फायबरग्लास तंत्रज्ञान मध्ये अग्रणी होते आणि त्यांनी ISRO मध्ये डिझाइन, विकास यापासून कंपोझिट रॉकेट मोटर केसेसचे उत्पादन करण्यासाठी एक तरुण संघाचे नेतृत्व केले.
 • उपग्रह प्रक्षेपण वाहन (SLV-3):डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी भारताचे पहिले स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण वाहन (SLV-3) विकसित करण्यासाठी प्रकल्प संचालक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले होते त्यामुळे जुलै १९८० मध्ये रोहिणी उपग्रहाला पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत यशस्वीरित्या इंजेक्ट केले त्यामुळे भारत स्पेस क्लब मध्ये विशेष सदस्य बनले.
 • डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी इस्रोमध्ये दोन दशके काम केल्यानंतर आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानामध्ये प्रभुत्व मिळवल्यानंतर, त्यांनी DRDO येथे स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्रे विकसित करण्याची जबाबदारी स्वीकारली.
 • १९८२ साली डी. आर. डी. च्या प्रमुख संचालकपदी डी. कलाम यांचीनेमणूक झाली. तेथे त्यांनी क्षेपणास्त्रे विकास कार्यक्रमाची आखणी केली. तेथे’पृथ्वी’ हे जमिनीवरून मारा करणारे क्षेपणास्त्र तर युद्धात डावपेचासाठीवापरले जाणारे ‘त्रिशूल’ हे क्षेपणास्त्र, जमिनीवरून अवकाशात मारा करणारे ‘आकाश’ हे क्षेपणास्त्र, रणगाडाभेदी ‘नाग’ हे क्षेपणास्त्र, आरएक्स तंत्रज्ञान वापरून बनविलेले ‘अग्नि’ हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले. क्षेपणास्त्रतंत्रज्ञान विकसित झाले. प्रकल्पातील साऱ्या घटनांचा एकत्रित विचार करून,ते त्यांनी यशस्वी करून दाखविले.
 • एकात्मिक लक्ष्यवेधी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाच्या यशानंतर डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम काही काळी सुरक्षा खात्याचे वैज्ञानिक सल्लागारआणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे प्रमुख म्हणून कार्यरत राहिले.
 • मे १९९८ मध्ये अणुऊर्जा विभागाच्या सहयोगाने केलेल्या पोखरणच्या अणुचाचण्या शक्ती कार्यक्रमात ते गुंतले होते. पोखरणच्या दुसऱ्या अणुचाचण्यांच्या यशानंतर डॉ. कलाम अनेक भारतीयांचा कंठमणी बनले
 • नोव्हेंबर १९९९ ते २००१ नोव्हेंबरपर्यंत त्यांनी भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम पाहिले. हे पद कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांच्या स्तरावरचे होते. देशाच्या विकासासाठी धोरणे, पद्धती व कार्यक्रम राबविणे ही त्यांची जबाबदारी होती.
 • २०२० सालापर्यंत विज्ञान-तंत्रज्ञान दृष्टिकोन त्यांनी विकसित केला. भारताला सध्याच्या विकसनशील राष्ट्रापासून ते विकसित राष्ट्र म्हणून दर्जा प्राप्त करून देत भारत एक महान् सत्ता बनण्याचा आराखडा त्यांनी तयार केला.
 • डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे ११ वे राष्ट्रपती झाले . 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 पर्यंत त्यांनी राष्ट्रपती पदाची कार्यकाळ सांभाळा.
apj abdul kalam information in marathi

हे सुद्धा वाचाMahatma Gandhi Information In Marathi

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार |Awards Received By dr apj abdul kalam

पुरस्कारवर्षसंस्था
पद्म भूषण 1981 भारत सरकार
पद्म विभूषण 1990 भारत सरकार
भारत रत्न 1997भारत सरकार
इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार 1997भारत सरकार
वीर सावरकर पुरस्कार 1998भारत सरकार
सस्त्र रामानुजन पुरस्कार 2000 शन्मुघ आर्ट्स, विज्ञान, तंतु, आणि संशोधन अकॅडेमी, भारत
वॉन ब्राउन पुरस्कार 2013 राष्ट्रीय अंतरिक्ष सोसायटी
apj abdul kalam information in marathi

डॉ. एपीजे अब्दुल यांनी लिहिलेली पुस्तके | Books Written By dr apj abdul kalam

1) इंडिया 2020: नवे सहस्त्रक्षेत्रासाठी एक दृष्टिकोन
2) विंग्स ऑफ फायर: आत्मकथा
3) इग्नाइटेड मायंड्स: भारतीयांच्या आत्मविश्वासाचे विकास
4)द ल्युमिनस स्पार्क्स: एक काव्यग्रंथ आणि रंगांची जीवंत कथा
5)गाईडिंग सोल्स: जीवनाची उद्दीपने संवाद
6)मिशन ऑफ इंडिया: भारतीय युवांचे एक दृष्टिकोन
7)इंस्पायरिंग थॉट्स: कोटेशन सीरीज
8)यू आर बॉर्न टू ब्लॉसम: माझे प्रवास केवळ आणि परंतु
9)द सायंटिफिक इंडिया: ए ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी गाईड टू द वर्ल्ड अराउंड अस
10 )फेल्योर टू सक्सेस: लेजेंडरी लाइव्ह्स

मृत्यू | Death

२७ जुलै २०१५ रोजी, डॉ. अब्दुल कलाम आयआयएम शिलाँग येथे व्याख्यान देत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्रकृती गंभीर झाली , त्यानंतर डॉ. अब्दुल कलाम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

हे सुद्धा Youtube वर बघा – डॉ. एपीजे अब्दुल कलाम माहिती मराठीत.

डॉ. अब्दुल कलाम यांच्यावरील चित्रपट | Movies On Dr. Abdul Kalam

 • I Am Kalam.
 • My Hero Kalam.

निष्कर्ष | Conclusion

Information about apj Abdul Kalam in Marathi, Abdul kalam information in Marathi, dr apj abdul kalam information in Marathi माहिती लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकावरून घेतली गेली आहे. वरील ब्लॉग मधील माहिती फक्त शिक्षण उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिलेली माहिती बद्दल काही अडचण असेल तर आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून कळवू शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.

Sharing Is Caring:

Leave a Comment