ज्योतिबा फुले संपूर्ण भाषण 2023 | Jyotiba Phule Speech In Marathi

5/5 - (1 vote)

Jyotiba Phule Speech In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या ब्लॉग मध्ये महात्मा जोतिबा फुले यांच्या बदल थोडक्यात माहिती देणार आहोत.तुम्ही ही माहिती Jyotiba Phule Speech In Marathi ह्यासाठी वापरू शकता

महात्मा फुले | Mahatma Phule-

आदरणीस प्राचार्य , शिक्षक व सन्माननीय मान्यवर प्रमुख अतिथी व येथे जमलेल्या माझ्या मित्रांनो आज महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी ह्या निमित्ताने आज मी महात्मा जोतिबा फुले यांचा बदल भाषण देणार आहे.

विद्येविना गती गेली, गती विना मती गेली,
मती विना निती गेली, निती विना शुद्र खचले,
एवढे अनर्थ सगळे एका, अविद्येने केले।।

हे संपूर्ण समाजातल्या सर्वसमान्य लोकांना ज्यांनी पटवून सांगितले त्या महापुरुषाचे नाव आहे महात्मा जोतिबा फुले. महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी सासवडजवळ खेडेगावात झाला . जोतिबा फुले यांचे मूळ गोरे आडनाव होते.पण आपल्या फुलाच्या व्यवसायामुळे हे कुटुंब फुले या आडनावाने ओळखू लागले.

जोतिबा फुले यांच्या आईचे नाव चिमणाबाई आणि गोविंद वडिलांचे नाव असे आहे. जोतिबा हे नाव प्रकाश देणाऱ्या ज्योतीवरून ठेवले गेले होते . लहानपणीच त्यांचा आईचे निधन झाले होते . त्यांच्या आत्याने त्यांचा सांभाळ केला. लहानपणी शिक्षण संपल्यावर जोतिबा शेतात जाऊन काम करू लागले. त्यानंतर जोतिबा यांच्या वडिलांनी त्यांना इंग्रजी शाळेत शिक्षणास पाठविले.

तत्कालीन रूढीनुसार त्यांचा विवाह सातारा जिल्ह्यातील खंडाच्या तालुक्यातील खंडूजी पाटील यांच्या ‘सावित्री’ नावाच्या कन्येशी झाला. त्या खऱ्या अर्थाने जोतिबांची सहधर्मचारिणी बनली.

सामाजिक कार्य | Jyotiba Phule Speech In Marathi

शिक्षण मुळे समाज मध्ये परिवर्तन होऊ शकते हे त्यांना माहिती होते. हे महात्मा फुलेंनी ओळखलं होतं. अशिक्षित मागास समाजाचा विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे जाणलं. ज्याठिकाणी माणसाला पशुत्वाची वागणूक मिळत होती. त्या मनुष्याच्या घरापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं काम केलं तर तो माणूस स्वाभिमानाने जगू शकतो. हे महात्मा फुलेंनी जाणले होते.

१८४८ मध्ये महात्मा फुलेंनी पुण्यातल्या भिडेवाडा या ठिकाणी पहिल्यांदा मुलींची शाळा सुरू केली. या कार्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी मदत केली. निरक्षर असणाऱ्या पत्नीस पहिल्यांदा साक्षर केले आपल्या पत्नीस त्या शाळेची शिक्षिका केले.काही कर्मठ सनातनी विचारांच्या लोकांनी जोतिबा याना भरपूर विरोध केला. कर्मठांना त्यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिले. मुलींची पहिली शाळा १ जानेवारी १८४८ ला सुरू केली.

महात्मा फुले यांनी महाराष्ट्रातील एकमेव शाळा अशी चालू केली की ज्या शाळेमध्ये वेगवेगळ्या जाती धर्मातील मुलींना प्रवेश देण्यात आला. सर्व धर्म समभाव व वंचितांचा विकास व्हावा हीच भूमिका डोळ्यासमोर ठेवून या शाळेची सुरुवात केली. १८५५ साली प्रौढांच्यासाठी रात्रशाळेची सुरुवात केली महात्मा फुले यांनी. १८६४ साली विधवा पुनर्विवाह संस्था केली. समाज हा जातीबंधनात न अडकता तो सत्याच्या याची सुरुवात दिशेने यावा, एकसंध राहावा याच उदात्त दृष्टिकोणातून सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

सत्यशोधक समाज | Mahatma Jyotiba

जोतिबा फुले यांनी १८९३ साली मध्ये सत्यशोधक समाजा ची स्थापना केली . त्यात शूद्र व अतिशूद्र यांना आणून संघटित केले.

सत्यशोधक समाज व त्याच नावाचे वर्तमानपत्र ब्राह्मणांविरुद्ध आहे, अशी त्यांच्यावर टीका झाली, पण या समाजाचे उद्दिष्ट भटभिक्षुकाच्या गरीब व अज्ञ लोकांच्या शोषण करण्याच्या प्रवृत्तीवर टीका करण्याचे होते. परंतु जोतिबांना ब्राह्मणांची चीड येऊन, त्यांनी सुशिक्षित ब्राह्मणेतरांना लोकांची महत्त्वाची धार्मिक कृत्ये करण्यास तयार केले.

१८८३ साली त्यांनी ‘शेतकऱ्याचा आसूड‘ हे पुस्तक लिहिले. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला ब्रिटिशांची संपूर्ण नोकरयंत्रणा, काळे-गोरे, भट-सावकार-कुलकर्णी जबाबदार असतात, असे त्यांनी म्हटले आहे.

धर्मबद्दल विचार

त्यांना सर्व व्यक्तींचा एकाच वेळी विकास हवा होता. सर्वधर्मसमावेशक अशा सत्यधर्माचा स्वीकार त्यांनी केला. ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचा आसूड’, ‘सत्सार’, ‘इशारा’, ‘सार्वजनिक सत्यधर्म’, ‘अखंडादि काव्यरचना’, ‘तृतीय रत्न’ इ. त्यांचे वाङ्मय प्रसिद्ध आहे. धार्मिक गुलामगिरीविरुद्ध बंडाचे निशाण फडकाविणाऱ्या फुल्यांनी वेद, मूर्तिपूजा, चातुर्वर्ण्यव्यवस्था, पौरोहित्य या धार्मिक बाबींवर वैचारिक पातळीवर हल्ला चढविला.त्यांनी विचारांना कृतिशीलतेची साथ दिली.

जातीभेदांचे निर्मूलन, सामाजिक समतेवरील भर, अस्पृश्यता निर्मूलन व बहुजनोद्धार या सत्यशोधक समाजाच्या तत्त्वावरूनच त्यांच्या कार्याची भव्यता पटते. यासाठी त्यांनी दाखविलेली निर्भीडता, नि:स्वार्थीपणा, सहनशीलता, बंधुताही वाखण्यासारखी आहे.

समाजाच्या तत्त्वावरूनच त्यांच्या कार्याची भव्यता पटते. यासाठी त्यांनी दाखविलेली निर्भीडता, नि:स्वार्थीपणा, सहनशीलता, बंधुताही वाखण्यासारखी आहे. बहुजन समाजातील जागृती, स्त्रीउन्नती, अस्पृश्यांचा झालेला कायापालट ही त्यांच्या सामाजिक कार्याची फलश्रुती म्हंटले तरी हर्कत नाही.

समाजसुधारणेचे कार्य अखंडपणे करत असताना आशा या महान व्यक्तीचे २८ नोव्हेंबर १८९० रोजी दु:खद निधन झाले. महापुरुषाच्या निधनानंतर संपूर्ण देश हळहळत होता.

गुलामगिरी याच्याविरुद्ध बंड करणारे, शिक्षणाचा ध्यास धरून उपेक्षितांचा विकास करणारे, जातीय विषमतेविरुद्ध प्रखर लढा देणारे, सत्याचा शोध घेऊन संशोधन करणारे, अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करणारे, अशिक्षित, अज्ञानी, लोकांना संघटित करून त्यांच्या मनामध्ये एक जागृती करणारे, मानवी हक्काचं समर्थन करणारे, नीतिमूल्यांचं पालन करणारे एक समाजसुधारक म्हणून आपल्याला पाहावयास मिळतात.

जय हिंद, जय भारत !

निष्कर्ष | Conclusion

आम्ही दिलेली ब्लॉग ची माहिती तुम्ही खालील विषय साठी वापरू शकता

  • Jyotiba Phule Speech In Marathi.
  • Mahatma Jyotiba Phule Bhashan.
  • Mahatma Jyotiba Phule Speech.
  • 11 april mahatma phule jayanti
  • mahatma phule punyatithi

Jyotiba Phule Speech In Marathi अन्य लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकावरून घेतली गेली आहे. वरील ब्लॉग मधील माहिती फक्त भाषण आणि शिक्षण उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिल्या गेलेल्या माहिती बद्दल काही अडचण असेल आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.

Sharing Is Caring:

Leave a Comment