Mahatma Gandhi Speech In Marathi | महात्मा गांधी भाषण मराठीत

5/5 - (3 votes)

Mahatma Gandhi Speech In Marathi– आज या ब्लॉग पोस्ट Mahatma Gandhi Speech In Marathi, Mahatma Gandhi Bhashan Marathi, Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi, Mahatma Gandhi Speech Marathi मध्ये विषयी केली जाणारे भाषण याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. आपण या भाषणाचा वापर पहिलीपासून दहावीपर्यंत करू शकता.

Mahatma Gandhi Speech In Marathi

नमस्कार येथे जमलेल्या आदरणीय प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य शिक्षक आणि मित्र मित्रांनो आज आपण महात्मा गांधीजी जयंती साजरी करण्यासाठी आपण येथे जमलो आहे. आज मी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल भाषण देणार आहे.

जगाला व राष्ट्राला शांततेचा संदेश ज्यांनी दिला. आपल्या कृतीतून व विचारातून सत्याचा मार्ग दाखवला, सत्यातून परिवर्तन होऊन देश स्वतंत्र होऊ शकतो. हे दाखवण्याचे पवित्र कार्य महात्मा गांधींजी यांनीकेले.


महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. गांधीजींचा जन्म पोरबंदर (गुजरात) या गावामध्ये २ ऑक्टोबर १८६९ साली गांधीजी यांचा जन्म झाला होता सामान्य कुटुंबात जन्माला आलेले गांधीजी दहावीच्या शिक्षणानंतर विदेशामध्ये शिक्षणासाठी गेले. प्रचंड अभ्यास व आत्मविश्वासाच्या बळावरती बॅरिस्टर ही पदवी संपादन केली. पाश्चिमात्य राष्ट्रात ज्यावेळी गांधीजी गेले, त्यावेळी असमतोल पाहावयास मिळाला. ज्यावेळी आफ्रिकेत होते त्यावेळी काळे गोरे या भेदभावाला त्यांना सामोरे जावे लागले. त्याचवेळी गांधीजींच्या हळव्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला. ज्या ठिकाणी मनुष्याला पशूसारखी वागणूक मिळत असेल तर त्या वेळी त्या ठिकाणी लोकांचे आयुष्य कसे असेल ह्याचा प्रश्न त्यांचा समोर उद्भवला .त्याचवेळी गांधीजींनी आफ्रिकेमध्ये परिवर्तनाच्या लढाईस सुरुवात केली.


काही कालखंडांनंतर भारतामध्ये आल्यानंतर एका नवीन लढ्याला सुरुवात करावी अशीच मानसिकता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली तेव्हाच परकीय सत्तेविरुद्ध संयम, त्याग शांतता यांच्या माध्यमातून एका नव्या लढाईस सुरुवात केली. गांधीजींनी १९२० च्या कालखंडामध्ये असहकार चळवळीची सुरुवात केली. या देशातल्या साध्य जनतेला इंग्रज या देशाचे प्रशासक नसून ते या जनतेचे शोषक आहेत. जे इंग्रज व्यापारी म्हणून आले होते ते देशाचे राज्यकर्ते बनले ह इथल्या भारतीयांना खूप समजावूनदेण्याचा प्रयत्न केला.


१९१५ मध्ये गांधी भारतात परत आले. १९२० साली चंपारण्य या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले. खिलाफत चळवळ यामध्ये सहभाग घेतला. इंग्रजांशी असहकार पद्धतीने वागलो तर इंग्रज एक दिवस स्वतःचा कारभार सोडून विदेशात निघून जातील असहकार चळवळीचा स्वीकार केला. अशा पद्धतीने गांधीजींनी ही असहकार चळवळ मोठी करण्याचा प्रयत्न केला. पण ब्रिटिशांनी आपल्या फोडा आणि झोडा याच नीतीचा उपयोग केला. यास गांधीजींनी विरोध केला. सर्वसामान्य जनतेचे शोषण हे मोठ्या प्रमाणात होत होते. इंग्रजांनी मिठावरती कर लावून मिठासाठी कायदा तयार केला होता. या अत्याचाराविरोधात गांधीजींनी आंदोलन छेडले आणि इंग्रजांच्या दडपशाही धोरणाचा निषेध केला.


१९४२ साली मुंबईच्या गवालीया टँकवरून भाषण करताना महात्मा गांधींनी सांगितले होते, ‘करेंगे या मरेंगे हा मंत्र दिला आणि लाखो माणसे मुंबईच्या गवालिया टँकवर गोळा केली. इंग्रजांना चालते व्हा असा सल्ला दिला.
‘साधी राहणी उच्च विचारसरणी‘ आत्मसात करणारे महामानव म्हणून महात्मा गांधीजींच्याकडे पाहिले जाते. भारतीय स्वातंत्र्य लढा एका निर्णायक वळणावरती घेऊन जाणारे महापुरुष म्हणून वर्णन केले जाते. स्वातंत्र्य लढ्याबरोबरच ‘रामराज्य’ निर्माण व्हावे यासाठीही प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते. स्वतःच्या लज्जा रक्षणापुरतेच वस्त्रे वापरणारा हा महापुरुष असंख्य, करोडो बांधवांचा अश्रयदाते प्रेरणास्थान होते. स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबर मूलोद्गामी शिक्षणाची संकल्पना मांडण्याचे काम महात्मा गांधीजींनी केले.

हे सुद्धा वाचाSavitribai Phule Speech In Marathi


या देशामध्ये समता प्रस्थापित व्हायची असेल तर देश एकसंघ असावा तरच जातीयता नष्ट होईल. हे महात्मा गांधीजींचे प्रखर विचार होते. याच कल्पनेतून महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकत्र येऊन जाती निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केले.
या देशामध्ये क्रांती करायचीच असेल तर ती शस्त्रास्त्राच्या जोरावरती न करता ती संयमाच्या, शांततेच्या मार्गाने करता येते. हे विचार आमच्या समोर ठेवण्याचे पवित्र कार्य महात्मा गांधीजींनी केलेले पाहावयासमिळते. अशा या महापुरुषांच्या प्रेरणेतून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले.


महात्मा गांधी यांचे काम पाहून महात्मा ही उपाधी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना दिली. खरंच हा माणूस आपल्या नावाप्रमाणे तितकाच महान होता हे त्यांच्या कार्यातून पहावयास मिळते. १५ ऑगस्ट १९४७ ला या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी हिंदू आणि मुस्लीम यांच्यामध्ये भारत पाकिस्तान यांच्या फाळणीवरून धार्मिक तेढ निर्माण झाला होता. त्यावेळी असंख्य लोक जातीय दंगली निर्माण करण्यात मग्न असताना गांधीजी मात्र दुःखितांचे अश्रू पुसण्यासाठी दंगलीमध्ये होरपळलेल्यांची
घरे सावरण्यासाठी महात्मा गांधीजी प्रयत्न करत होते. देश एका वेगळ्या वळणावरती जात असताना हरितक्रांतीला सुरुवात होत असताना परदेशी संस्कृती झुगारून १५० वर्षांनंतर आमची भारतभूमी,स्वातंत्र्याचे गीत गात होती. स्वतंत्र, समता, बंधुता या नीतिमूल्यांचा आदर्श जपत असता ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या झाली. ‘जगेन तर देशासाठी, मरेन तर मातृभूमीसाठी‘ असं म्हणणाऱ्या महात्म्याचं दुःखद निधन झालं.


काळाबरोबर वेळेला स्वातंत्र्याबरोबर क्रांतीला गवसणी घालणारे महापुरुष होते. अखंड विश्वासाठी एक प्रेरणास्रोत होते. त्याच महापुरुषाचा आपण आदर्श घेऊन त्यांच्या स्वप्नातील आपण भारतमातेचे सुपुत्र देश साकार करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जय हिंद! जय भारत!!

हे सुद्धा वाचाMahatma Gandhi Information In Marathi

निष्कर्ष | Conclusion

आम्ही दिलेल्या माहितीचा उपयोग ,Mahatma Gandhi Speech In Marathi, Mahatma Gandhi Bhashan Marathi, Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi, Mahatma Gandhi Speech Marathi या भाषणसाठी उपयोग करू शकता. वरील भाषण एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे. .वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काही कॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.


Sharing Is Caring:

2 thoughts on “Mahatma Gandhi Speech In Marathi | महात्मा गांधी भाषण मराठीत”

Leave a Comment