विवेकानंदांचे भाषण|Best Swami Vivekananda Speech In Marathi

5/5 - (9 votes)

Swami Vivekananda Speech In Marathi“माझ्या अमेरिकन बंधू भगिनींनो” हे वाक्य आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला तरुणाचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जाणारे स्वामी विवेकानंद यांचे स्मरण होते.आज आपण ह्या ब्लॉग मध्ये Swami Vivekananda Speech In Marathi, Swami Vivekananda Bhashan, Swami Vivekananda Marathi Bhashan माहिती बघणार आहोत.

Swami Vivekananda Speech In Marathi –

आदरणीय व्यासपीठ, शिक्षाक, , समारंभाचे प्रमुख अतिथी, सर्व मित्र मैत्रिणी ! आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती! श्री रामकृष्ण परमहंसांचे पट्टशिष्य होण्याचा सन्मान मिळवणारे व स्वतःघडा व दुसऱ्यांना ही घडवा’ असा स्वतःच्या आचरणाने संदेश देणारे, हिंदू धर्माची माहिती साऱ्या जगाला पटविणारे भारतमातेचे सुपुत्र स्वामी विवेकानंद यांचा बदल आज मी भाषण देणार आहे.

स्वामी विवेकानंद यांचा जन्म कलकत्ता जवळील शिमुलिया खेड्यात १२ जानेवारी १८६३ मध्ये झाला.स्वामी विवेकानंद यांचा
वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी असे होते. स्वामी विवेकानंद यांचे पाळण्यातील नाव वीरेश्वर असे होते.बालपणी त्यांची वृत्ती खोडकर होती. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती. लहानपणीपासून त्यांचे चित्त एकाग्र होत असे.लहानपणीपासून कोणतीही गोष्ट ते पारखून घेत असे.

भगवान् श्रीकृष्ण आणि हनुमंत हे स्वामी विवेकानंद चे आदर्श होते. स्वामी विवेकानंद शाळेत असतानाच त्यांचे वडील अभ्यासाबरोबर साहित्य, व इतर विषयांचा अभ्यास स्वामी विवेकानंद याना करायला सांगत असे. महाविद्यालयीन शिक्षण स्वामी विवेकानंद यांनी कलकत्ता येथे घेतले . कॉलेजमध्ये गेल्यावरही इतिहास, समाजाशास्त्र, तत्वज्ञान, खगोलशास्त्र,साहित्य इ. विषयात नरेंद्रने प्राविण्य मिळविले. १८८१ साली ते जनरल असेंब्ली या कॉलेजातून तत्त्वज्ञानहा विषय घेऊन ते बी.ए. झाले. प्राचार्य हेस्ट्री हे इंग्रजी शिकवीत असताना Ecstasy ह्या शब्दाचा उच्चार स्वामी विवेकानंद कडून झाला . त्याचा अर्थ समाधी.

स्वामी विवेकानंद याना परमेश्वर प्राप्तीची ओढ अधिक होती. त्यामुळे देव आहे का? त्यांना कोणी पाहिला आहे का? या विचाराने ते अस्वस्थ होत, अनेक विद्वान पंडितांनापरमेश्वराबद्दल विचारत होते. दक्षिणेश्वरीस रामकृष्ण परमहंस व नरेंद्रनाथ या गुरुशिष्यांची भेट झाली.

रामकृष्ण परमहंसांकडे आल्यावर त्यांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणीमिळाली. आपण ईश्वर पाहिला आहे काय? अशा अनेक प्रश्न स्वामी विवेकानंद विचारताच रामकृष्णांना त्यांनी ‘हो’ उत्तर दिले . मलाही ईश्वर पाहायचा आहे, ही तळमळ नरेंद्राला लागली .नरेंद्र चिंतन, मनन, ध्यान-धारणा करू लागले . स्वामी विवेकानंद हे नरऋषीचा अवतार असून ते आपले कार्य पुर्ण करण्यासाठीच आले आहेत .हे रामकृष्णांना दिसून येताच रामकृष्णांनी त्यांना आपले आध्यात्मिक धन संक्रमित केले. “मानव सेवा हीच ईश्वरसेवा” हे रामकृष्णांचे शब्द स्वामी विवेकानंद यांचा कानात येऊ लागले आणि मनुष्य सेवा करण्यासाठी संपूर्ण भारतभर फिरायचे त्यांनी ठरवले.लोकांचे दु:ख, दैन्य, अज्ञान,रोगराई, उपासमार, इ. निरीक्षण केले.

देशाची सर्व दृष्टीने सुधारणा करण्याच्या प्रगतीच्या दृष्टीने निःस्वार्थ भावनेने वाहून घेणारे नवे संन्यासी तयार व्हावयास हवे असे त्यांना वाटले. स्वामी विवेकानंदानी संन्यास ग्रहणानंतर सहा वर्षे संपूर्ण हिंदूस्थानातून प्रवासकेला. भारतीय ऋषी मुनींनी दिलेला थोर सेवाधर्माचा संदेश त्यांनी जगभर पसरविला.अंगावरती भगवी वस्त्रं, डोक्यावरती फेटा घालूनस्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृती आणि भारतीय तत्त्वज्ञानलोकांच्यासमोर मांडण्यासाठी जगभ्रमंती केली.

शिकागोतील धर्मपरिषदेमध्ये ११ सप्टेंबरला १८९३ स्वामीजी ज्यावेळी,शिकागो येथे धर्मपरिषदेसाठी गेले होते. त्यावेळी स्वामीजींचा वेशपाहून सर्व लोक अचंबित झाले होते. हा संन्याशी माणूस काय बोलणारअसा सर्व लोकांना प्रश्न पडला होता. स्वामीजी ज्यावेळी बोलायलाउभे राहिले. सभागृहावरती चौफेर नजर फिरवल्यानंतर स्वामीजींनी आपल्याभाषणाची सुरुवात “माझ्या अमेरिकन बंधू भगिनींनो या एकाच वाक्याने केली आणि सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.अवध्या पाच मिनिटांच्या भाषणात त्यांनी सर्व सभा जिंकली.स्वामीजीचे वक्तृत्व प्रभावी होते.त्यांच्या शब्दांनी ते सर्वांची हृदय जिंकून घेत.

सर्वधर्मसमभाव, संयम आणि शांततेचा मार्ग पत्करणारा महापुरुष,महान त्यागी, देशभक्त महान तत्त्वज्ञ बुद्धिजीवी व्यक्तिमत्त्व, प्रतिभासंपन प्रमती असा वक्ता म्हणून स्वामीजच्याकडे पाहिले जाते. जगभराची भ्रमंतीकरणाऱ्या या महामानवाने वेगवेगळ्या देशामध्ये फ्रान्स, जर्मन, अमेरिकाव इंग्लंड या ठिकाणी गाजलेली त्यांची अनेक भाषणे आजही प्रसिद्ध आहेत.

हे सुद्धा वाचाSavitribai Phule speech In Marathi

विदेशतून भारतात परत आल्यावर १८९८ मध्ये स्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मठ’ स्थापना केली . नंतर रामकृष्ण मिशनची स्थापना केली.. त्यांच्यामते, पश्चिमेने बाह्य जग तर पूर्वेने आंतरिक जग जिंकण्याचे प्रयत्न केले होते.पण दोघांनी हातात हात घालून एकमेकांचे भले करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भविष्यकाळाला नवे वळण दिले पाहिजे. म्हणजे पूर्व-पश्चिम हा भेट राहणार नाही. विज्ञानाच्या साहाय्याने सर्व गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत. धर्म हा भारताचा केंद्रबिंदू आहे, गाभा आहे पण धर्मामुळे मानवाच्या चित्ताचे शुद्धीकर्म झाले पाहिजे व धर्माने संकुचित दृष्टिकोनातून बाहेर काढून उदार वव्यापक दृष्टिकोन बनविण्यास मानवाला मदत केली पाहिजे असे ते म्हणत.

स्वामीजी संपूर्ण मानवजातीच्या आध्यात्मिक उद्धाराचे कार्य करणारेमार्गदर्शक स्तंभ होते. वेदान्त हा प्रत्यक्ष मानवाच्या ऐहिक जीवनात कसासुखकारक, समृद्ध व उन्नत असू शकतो, हे त्यांनी आपल्या विचारांनी वकार्याने दाखवून दिले.स्वामी विवेकानंद म्हणतात की वेदान्ताला ‘व्यावहारिक वेदान्त’ म्हणतात.“जेव्हा तुम्ही सर्वांकडे आत्मौपम्य दृष्टीने पाहाल, तेव्हा ही स्त्री, हा पुरुष असाभेद तुमच्यात राहणार नाही”

१२ जानेवारी “युवक दिन” म्हणून साजरा केला जातो कारण त्या दिवशी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन असतो. तारुण्याचा उपयोग हा जनसामान्यांसाठी करायचा असतो.देशप्रेमाने व संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रसार करणाऱ्या विभूतीमध्येस्वामीजींचा समावेश होतो. आजच्या युवा पिढीने याच गोष्टीचा आदर्शघेण्याचे कार्य जर केले तर स्वामीजींच्या स्वप्नातील हा देश साकारहोईल असे वाटते.कर्मकांडांना विरोध करून मानवतावादी विचार मांडणारे समतेचासंदेश देणारे राष्ट्रप्रेमाची पताका खांद्यावरती घेऊन धर्मप्रसार करणारा एक महान विभूती म्हणून स्वामी विवेकानंद यांच्याकडे पाहिले जातेयाच तपस्वी, त्यागी वृत्तीचा, प्रगल्भ बुद्धिमत्ता असणाऱ्या युवकांचा आदर्श आजच्या युवा पिढीने त्यांची जयंती युवक दिन म्हणून साजरी करत असताना घेणे गरजेचे आहे.

४ जुलै १९०२ रोजी स्वामी विवेकानंद यांचे निधन झाले. अशाया हिंदूधर्माचा विदेशात प्रचार प्रसार करणाऱ्या पहिल्या संन्शाशी स्वामींना माझा कोटी कोटी प्रणाम !

PDF Swami Vivekanand speech Download | स्वामी विवेकानंद भाषण

तुम्ही वर दिलेल्या Download वर क्लिक करून संपूर्ण भाषण डाउनलोड करून घेऊ शकता.

निष्कर्ष | Conclusion

Swami Vivekananda Speech In Marathi! Swami Vivekananda Marathi Bhashan!Swami Vivekananda Bhashan! या वर तुम्ही वरील दिलेले माहिती घेऊन भाषण करू शकता.वरील Swami Vivekananda Speech In Marathi! Swami Vivekananda Marathi Bhashan! भाषण एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे. या भाषणाचे सर्व मुले व शिक्षक लाभ घेऊ शकतात. वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काही कॉपरेटच्या अडचण असल्यास तर तुम्ही [email protected]. या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 तासांमध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic