Pandit Jawaharlal Nehru Speech In Marathi – नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या ब्लॉग मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बदल थोडक्यात माहिती देणार आहोत.तुम्ही ही माहिती Pandit Jawaharlal Nehru Speech In Marathi, Pandit Jawaharlal Nehru speech Marathi ह्यासाठी वापरू शकता.
Pandit Jawaharlal Nehru Speech In Marathi
आदरणीस प्राचार्य , शिक्षक ,मॅडम व सन्माननीय मान्यवर प्रमुख अतिथी व येथे जमलेल्या माझ्या मित्रांनो आज १४ नोव्हेंबर बालदिन व भारतीय महापुरुष पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस ह्या निमित्ताने आज मी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा बदल भाषण देणार आहे.
प्रगल्भ बुद्धिमत्ता, प्रचंड श्रीमंती, ऐश्वर्यसंपन्न असणाऱ्या घरामध्ये त्यांचा जन्म झाला, महात्मा गांधींनी ज्यांचा उल्लेख माझ्या विचारांचा वारसदार म्हणून केला, ज्यांना संपूर्ण जगाने शांतिदूत ही पदवी बहाल केली, पंचशील तत्त्वाचे खंदे समर्थक, अलिप्तावादी चळवळीचे प्रणेते ज्यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो त्या महापुरुषाचे नावआहे पंडित जवाहरलाल नेहरू.
१४ नोव्हेंबर १८८९ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद या ठिकाणी झाला. पंडित नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू हे निष्णांत कायदेपंडित म्हणून ओळख होती . भारतातील उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपले उच्च शिक्षण लंडन मध्ये राहून पूर्ण केले . १९१२ साली बॅरिस्टर पदवी प्राप्त करून भारतात आगमन केले. १९१६ साली कमलाजी यांच्याशी विवाह केला.
हे सुद्धा – सावित्रीबाई फुले याच्या विषयी संपूर्ण भाषण मराठी मध्ये
परकीय सत्तेचा कडाडून विरोध करत होता. अशाच कालखंडात ब्रिटिशांच्या विरोधात देशात एक वातावरण निर्माण होत होते. या कालखंडात पंडित जवाहरलाल नेहरूंनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळीत सहभाग घेतला . प्रिन्स ऑफ वेल्स १९२१ साली जेव्हा भारतात येणार होते तेव्हा प्रिन्स ऑफ वेल्स वर बहिष्कार टाकण्यात आला होता . तेव्हा त्यांना ६ महिने शिक्षा भोगावी लागली. १९३० साली गांधीजींसमवेत मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाले. १९३६, १९३७ च्या या दोन्ही काँग्रेसच्या,अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले.
१९४२ साली देशात “चले जाव चा नारा” मोठ्या प्रमाणात दिला. देशातून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. तेव्हा नेहरू व त्यांच्या सहकाऱ्यांना अहमदनगरच्या किल्ल्यात कैदेत ठेवले. तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्यांनी “डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ नावाचा ग्रंथ लिहिला. १९४५ साली त्या ग्रंथाचे प्रकाशन केले. १९४७ साली देशात चळवळीचे वारे वाहत होते. अशाच कालखंडात ब्रिटिशांनी भारतीय सत्ता भारतीयांना दिली. १५ ऑगस्ट १९४७ पहाट उगवली. सर्व महापुरुषाच्या प्रयत्नाने मुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले.
हे सुद्धा – महात्मा गांधी भाषण मराठीत
१५ ऑगस्ट १९४७ ला पंडित नेहरूंनी भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राष्ट्राला अभिप्रेत असणारे भाषण करताना पंडित नेहरू म्हणाले मला हा देश शेतकरी, कष्टकरी, श्रमिक यांच्या प्रयत्नातून व बुद्धिजीवी लोकांच्या कल्पनेतून साकार करायचा आहे. त्यासाठी मला आपल्या सर्वांची साथ हवी आहे. नेहरूंचे हे भाषण सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारे होते. पुढे नेहरू असे म्हणाले, या देशामध्ये हरितक्रांती करून भारतीय शेती, शेतकऱ्याचा विकास करायचा आहे आणि शेतकऱ्याचा विकास करून मला भारताला सक्षम देश बनवायचा आहे.
१९५५ साली रशियाचा दौरा केला. भारतरत्न हा किताब देशवासीयांनी अर्पण केला. १९५७ दुसऱ्यांदा पंतप्रधान, १९६९ साली स्टडी ऑफ द नेहरूज हा रफिक झकेरिया यांनी ग्रंथ संपादित केला. १९६० च्या महाराष्ट्र राज्य स्थापनेतही नेहरूंचे योगदान आहे.तिसऱ्या जगाचा शोध घेणारे नेहरू होते. जगामध्ये युद्धजन्य त्यांनी अलिप्ततावाद चळवळीची स्थापना केली. बेलग्रेड या ठिकाणी परिस्थितीत राष्ट्राचे नुकसान होते. यासाठी विघटनवाद संपवण्यासाठी. १९६१ साली सहभाग घेतला.
१९६२ साली पुनश्च पंतप्रधानपदी पंडित पंडित जवाहरलाल नेहरूजींची निवड झाली देशाला हरित क्रांतीच्या दिशेने नेण्यासाठी वेगवेगळ्या जागतिक पातळीवरची योजना अमलात आणल्यामुळे माणुसकी व मानवतेचा स्वीकार करणारा आधुनिक शातीदूत म्हणून नेहरूंचा उल्लेख केला जातो. पंडित जवाहरलाल नेहरू हे जितके हळवे आणि संयमी होते तितकेच ते स्पष्टवक्तेही होते.
हे सुद्धा – स्वामी विवेकानंदांचे मराठीत भाषण
भारतीय लोकशाहीचे नेतृत्व करताना. देशातील सर्वोच्च पदी असताना देशात शांतता प्रस्थापित करताना सनदशीर मार्गानी वल्लभभाई पटेल तत्कालीन गृहमंत्र्यांच्या आणि संरक्षण मंत्र्यांच्या मदतीने सर्व संस्थानांचे विलीनीकरण योग्य पद्धतीने करून घेतले. देशातील अराजकता, फुटिरता नष्ट करण्यासाठी शांतता हेच एकमेव माध्यम आहे हे जनतेच्या आणि संस्थानिकांच्या लक्षात आणून दिले.
१९३०-१९५५ या कालखंडात आपल्या बहिणीला लिहिलेली पत्रे त्याचबरोबर तुरुंगातच असताना आपल्या मुलीला लिहिलेली पत्रे आजही एक आदर्श पत्र म्हणून ती आपणास पाहावयास मिळतात. प्रतिभासंपन्न नेहरूंचे दर्शन या पत्रातून पाहावयास मिळते. सार्वजनिक जीवनात लढा देणारे आणि तुरुंगवासाची शिक्षा सहन करणारे माणूस हळव्या मनाचाही असतो याचे दर्शन त्यांच्या पत्रातून दर्शन होते.
पंडित जवाहरलाल नेहरू सतत म्हणत माझ्या विचारांची माणसे या राष्ट्रात निर्माण व्हावीत. त्यातून एक राष्ट्रप्रेमी विचाराची तरुणांची निर्मिती होईल असे नेहरूंना वाटत होते.१९६४ च्या भुवनेश्वरच्या अधिवेशनात नेहरूंना पक्षघाताचा झटकाnआला आणि पंडित नेहरू यांचा २७ मे १९६४ रोजी मृत्यू झाला.
हे सुद्धा – लोकमान्य टिळक मराठी भाषा
आजही पंडित जवाहरलाल नेहरूजी मनमिळावू म्हणून आपणास त्यांच्या विचारांची प्रचिती पाहावयास मिळते. महालामध्ये रममाण होण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेत सामील होऊन स्वातंत्र्याची पताका खांद्यावरती घेणारे एक झंजावात तरुण म्हणजे नेहरू.
देशातील निरक्षरता, अज्ञान, परंपरा, रूढी नष्ट करून वैज्ञानिक दृष्टिकोणाला साध घालणारे, विज्ञानाची गीतं गाणारे महामानव खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे शिल्पकारच आहेत. त्यांचाच जन्मदिन १४ नोव्हेंबर ह्या दिवशी आपण नेहमी बालदिन म्हणून साजरा करतो.
Conclusion
ब्लॉग मध्ये दिलेली माहिती चा वापर खालील मुद्देसाठी वापरू शकता.
- Pandit Jawaharlal Nehru Speech In Marathi.
- Pandit Jawaharlal Nehru Speech Marathi .
- Chacha Nehru Speech In Marathi.
- Pandit Jawaharlal Nehru Bhashan Marathi.
Pandit Jawaharlal Nehru Speech In Marathi अन्य लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकावरून घेतली गेली आहे. वरील ब्लॉग मधील माहिती फक्त भाषण आणि शिक्षण उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिल्या गेलेल्या माहिती बद्दल काही अडचण असेल आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.
2 thoughts on “चाचा नेहरू विषयी भाषण | Pandit Jawaharlal Nehru Speech In Marathi”