Lokmanya Tilak Speech In Marathi– नमस्कार मित्रानो आज आपण आमच्या ब्लॉग मध्ये लोकमान्य टिळक यांच्या बदल थोडक्यात माहिती देणार आहोत.तुम्हाला ही माहिती lokmanya Tilak Speech In Marathi, Lokmanya tilak bhashan marathi ह्यासाठी नक्की उपयोगी ठरेल.
अनुक्रमणिका
लोकमान्य टिळक भाषण | Lokmanya Tilak Speech In Marathi
आदरणीस प्राचार्य , दिलदार शिक्षक ,मॅडम व सन्माननीय मान्यवर प्रमुख अतिथी व येथे जमलेल्या माझ्या मित्रांनो आज १ ऑगस्ट लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी ! आज मी लोकमान्य टिळक यांचा बदल भाषण देणार आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे घोषणा वाक्य ऐकताच आपलेला सर्वाना आठवतात ते म्हणजे बाळ गंगाधर टिळक उर्फ लोकमान्य टिळक.
लोकमान्य ऊर्फ बाळ गंगाधर टिळक, या महापुरुषाचा जन्म २३ ऑगस्ट १८५६ रोजी चिखलगाव जि. रत्नागिरी
येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत तर आईचे नाव पार्वतीबाई.अत्यंत तीव्र बुद्धिमत्ता, कणखरपणा, निर्भयता या गुणांमुळे ते सर्वच भारतीयांच्या गळ्यातील कंठमणी बनले. लहांपणीपासूनच टिळकांचा गणित व संस्कृत या विषयांचा अभ्यास चांगला होता. त्यावेळचे सुप्रसिद्ध गणितज्ज्ञ केरूनाना छत्रे ह्यांचे टिळक हे आवडते विद्यार्थी होते. टिळकांनी १८७३ साली पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला.
हे सुद्धा वाचा – स्वतंत्रदिनी दिवशी विद्यार्थ्यांसाठी मराठी मध्ये भाषण
पहिल्या वर्षाच्या कॉलेजच्या परीक्षेत त्यांना अपयश आले म्हणून एक वर्ष त्यांनी शरीरस्वास्थ्य चांगले राहण्यासाठी घालविले. पौष्टिक आहार आणि खूप व्यायाम करून शरीर सुदृढ केले. शिक्षण संपल्यावर देशसेवा करायचे ठरविले. वयाच्या १५ व्या वर्षी म्हणजे १८७१ साली त्यांचा विवाह सत्यभामाबाईंशी झाला.पुढे ते गणित विषय घेऊन बी. ए. झाले.१८७९ साली लोकमान्य टिळक यांनी एल. एल. बी. ची पदवी घेतली. तीन मुले व तीन मुली झाल्या.
शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करताना, तरुणांमध्ये देशाचे प्रेम निर्माण व्हावे म्हणून राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी त्यांनी प्रथम शाळा काढण्याचा निर्णय घेतला.
१ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा सुरू केली.२४ ऑक्टोबर १८८४ रोजी डेक्कन एडुकेशन सोसायटी स्थापन केली. २ जानेवारी ला १८८५ रोजी फर्ग्युसन कॉलेज काढले.ह्यासाठी त्यांना विष्णुशास्त्री चिपळूणकर, आगरकर यांनी साहाय्य केले.टिळक-आगरकरांनी, लोकशिक्षण आणि जनजागृतीसाठी वृत्तपत्र सुरू करण्याचा बेत निश्चित केला.२ जानेवारी १८८१ रोजी ‘मराठा’ आणि ४ जानेवरी १८८१ रोजी लोकमान्य टिळक यांनी ‘केसरी’चा अंक प्रसिद्ध केला .
हे सुद्धा वाचा – जागतिक महिला दिन भाषण मराठी
केसरीतून लोकमान्य टिळक आपले विचार निर्भयपणे व नि:पक्षपातीपणे सांगत असे . त्याकाळात इंग्रज देशाची लूटमार करीत होते. राजकीय स्वातंत्र्य आपल्याला नाही, याची जाणीवभरपूर लोकांना झाली नव्हती. सामाजिकदृष्ट्या देश मागासलेला होता. अस्पृश्यता कठोरपणे पाळली जात होती. स्त्री गुलामगिरीत वावरत होती. अशा परिस्थितीतटिळक व आगरकरांनी ‘केसरी’ व ‘मराठा’ या वर्तमानपत्रांद्वारा जनतेत जागृती निर्माण केली.इ.स. १९९६ साली डॉ. अॅनी बेझंट यांच्या सहकार्याने त्यांनी ‘होमरूल लीग’ हा ‘हिंदस्वराज्य संघ’ स्थापन केला.होमरूल लीगच्या प्रसारासाठी टिळकांनी देशभर दौरा काढला. हजारो व्याख्याने दिली. लेख लिहिले.
या चळवळींसंबंधी केलेल्या एका भाषणाबद्दल सरकारने टिळकांकडून चाळीस हजार रुपयांचा जामीन मागितला. पण त्यावेळी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ असे तेजस्वी उद्गार त्यांनी काढले.आपल्या विचारसरणीच्या प्रसारासाठी टिळकांनी ‘राष्ट्रमत’ नावाचे दैनिक मुंबईला सुरू केला.समाजात जागृती व्हावी आणि परदास्याची जाणीव लोकांना व्हावी म्हणून गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव टिळकांनी सुरू केले. हे दोन्ही उत्सव अल्पावधीत लोकप्रिय झाले. ते आजपर्यंत चालू आहेत. ब्रिटिशांच्या नीतीविरुद्ध त्यांनी भारतात आंदोलन सुरू केले.
टिळकांची वृत्ती स्थितप्रज्ञासारखी होती. ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हणून लोकमान्य टिळकांना लोक म्हणू लागले. १८९६ मालच्या प्लेगच्या साथीमध्ये, ब्रिटिश शासनाने केलेले अनन्वित अत्याचार, लोकांचे छळ हे पाहून त्यांनी “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” असा अग्रलेख लिहिला.
हे सुद्धा वाचा – स्वामी विवेकानंदांचे मराठीत भाषण
अस्पृश्यता निवारणासाठी प्रयत्न करणारे प्रखर स्वातंत्र्याची स्वराज्याची संकल्पना मांडणारे म्हणून या महामानवाकडे पहिले जाते.त्यांनी जगप्रसिद्ध असा ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला. प्रखर राष्ट्रभक्ती जोपासून राष्ट्रीय चळवळ निर्माण करून अखंडपणे निःस्वार्थी सेवा करणाऱ्या या मानवास लोकांनी ‘लोकमान्य‘ ही पदवी बहाल केली.अशा या महान व्यक्तीचे निधन १ ऑगस्ट १९२० साली मुंबई येथे झाले.
जय हिंद ! जय भारत ! जय महाराष्ट्र !
लोकमान्य टिळक यांच्या विषयी १० वाक्य | Speech In Marathi 10 lines
लोकमान्य टिळक यांनी १९०५ मध्ये पुण्यातील राष्ट्रीय गणतंत्र आंदोलनाचा संचालन केले होते . हे आंदोलन भारतातील पहिलं गणतंत्र आंदोलन होते . |
लोकमान्य टिळक यांचे २०० पेक्षा अधिक लेखने प्रकाशित झालेली आहेत. |
लोकमान्य टिळक यांनी ‘केसरी’ ह्या मराठी दैनिकपत्राची संपादन केले होते . केसरी मुंबईतील प्रथम मराठी दैनिकपत्र होते. |
लोकमान्य टिळक यांनी गणेश मुर्ती निर्माणाची प्रथा सुरू केली, ज्यामुळे गणेशोत्सवभारतात जास्तीत जास्त साजरा करण्यासाठी प्रसार मिळाले. |
लोकमान्य टिळक यांनी १९०४ मध्ये नाशिक ‘दक्षिणे एशियाचे शिक्षण’ ह्या शाळेची सुरवात केली. |
लोकमान्य टिळक यांनी जगप्रसिद्ध असा ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ त्यांनी लिहला आहे. |
लोकमान्य टिळक यांनी आयटीआर (Indian National Congress) च्या आठवड्यात दोन वेळा राष्ट्रीय अध्यक्ष झाले पहिलं वेळ हे १८९३ मध्ये आणि दुसरं वेळ हे १९०८ मध्ये झालं. |
निष्कर्ष | Conclusion :-
ब्लॉग मध्ये दिलेली माहिती चा वापर खालील मुद्देसाठी वापरू शकता
- Lokmanya Tilak Speech In Marathi
- Lokmanya Tilak Bhashan Marathi.
- Lokmanya Tilak Marathi Speech.
- Lokmanya Tilak Punyatithi Bhashan.
- Lokmanya Tilak Jayanti Bhashan.
- Lokmanya Tilak Speech In Marathi For Child.
- Lokmanya Tilak Bhashan.
- Lokmanya Tilak Marathi Speech.
Lokmanya Tilak Speech In Marathi अन्य लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकावरून घेतली गेली आहे. वरील ब्लॉग मधील माहिती फक्त भाषण आणि शिक्षण उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिल्या गेलेल्या माहिती बद्दल काही अडचण असेल आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.
लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला होता ?
लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्य’ लिहिला होता.
लोकमान्य टिळक यांचा मृत्यू कधी झाला ?
लोकमान्य टिळक यांचा मृत्यू १ ऑगस्ट १९२० साली मुंबई येथे झाले.
2 thoughts on “लोकमान्य टिळक मराठी भाषा २०२३ | Lokmanya Tilak Speech In Marathi”