“वाचाल तर वाचाल” निबंध 2023 | Vachal tar Vachal Marathi Nibandh

Rate this post

Vachal tar Vachal Marathi Nibandh-नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या ब्लॉग मध्ये वाचाल तर वाचाल यांच्या बदल थोडक्यात माहिती देणार आहोत.तुम्ही ही माहिती वाचाल तर वाचाल निबंध,वाचनाचे महत्व ह्यासाठी वापरू शकता.

परिचय | Vachal tar Vachal Marathi Nibandh

आपले संपूर्ण शरीर समृद्ध आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला जीवनात व्यायामाची गरज आहे. तसे आपले व्यक्तिमत्त्व फुलवण्यासाठी पुस्तके वाचनाची अत्यंत गरज आहे. आज आधुनिक जगात आपण वावरत असताना नवनव्या संकल्पना आणि जीवन पद्धतीचा अवलंब आपण करत आहे.

आधुनिक जीवनशैलीशी स्पर्धा करताना जगण्याच्या धावपळीत स्वतःचे स्वातंत्र्य हिरावून बसलो आहे. एवढेच नाही तर मोबाईल, इंटरनेट, टी. व्ही. च्या वाढत्या वापराने माणसातील संवाद विसरत चालला आहे. सगळी जीवन पद्धतीच फास्टफूडप्रमाणे फास्ट झाली आहे.

रामायण, महाभारत, संत साहित्य या सर्वांचा विसर पडल्याने सुसंस्कारीतपिढी घडणे दुरापास्त होवू लागले आहे. विभक्त कुटुंबपद्धती आणि वाढते वृद्धाश्रमयामुळे घरातील नंदादीपच हरवला असल्याने प्रत्येक व्यक्ती ताण-तणावाखालीवावरत आहे.

हे सुद्धा वाचा – माझी आई निबंध

तणावमुक्त जीवन जगण्यासाठी संस्कारक्षम मुले घडवण्यासाठीज्याप्रमाणे आजी-आजोबांची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे आधुनिक जगातील स्वयंविकासाचे एक महत्त्वाचे साधन म्हणजे पुस्तकाचे वाचन आहे. विचारांच्या समृद्धीसाठी आणि प्रगल्भतेसाठी वाचनाचं महत्त्व अनन्य साधारण आहे.

बदलत्या जमान्यामध्ये तंत्रज्ञानाचा झपाट्याने प्रसार होत असताना पुस्तकप्रेम, खरंच कमी होत आहे का? वाचकांची अभिरुची कमी आहे का? का ती अभिरुची बदलली आहे? हे आज न उलगडणार कोडं आहे. पूर्वी एखादे पुस्तक उपलब्ध करण्यासाठी लोक मैलो दर जायचे त्या पुस्तकावर वादविवाद व्हायचे चर्चा घडवून आणली जायची. पण आज पुस्तकाचे अखंड ग्रंथालय एका क्लिकवर आपल्या खिशात आले असून देखील वाचनाची गोडी कमी झाली आहे.

वैचारिक क्षमता कमी होवून भाषिक कौशल्याचा -हास होत आहे. गाव तिथे ग्रंथालय ही संकल्पना शासनाने राबविली आणि गावोगावी ग्रंथालय सुरु झाली. पण त्याच वेळी हातात पुस्तक ऐवजी रिमोट आणि मोबाईल आला. त्यामुळे ग्रंथालयात पुस्तके आहेत पण वाचक नाही.

हे सुद्धा वाचा- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी भाषण

खरंच आपले जीवन समृद्ध करायचे असले आणि भावी पिढी संस्कारक्षम बनवायची असेल तर वाचन संस्कृतीच्या
संवर्धनासाठी सर्वांनी पुढे येणे आज काळाची गरज आहे. माणसाला माणूस बनवायचे असेल आणि वैचारिक -हास थांबवायचा असेल तर पुस्तकाला मित्र केले पाहिजे.

पुस्तक जगण्यासाठी आणि जगणं समृद्धीसाठी झाले पाहिजे. कारण पुस्तक वाचनाने मस्तक सुधारते आणि मस्तक सुधारले तर तुमचे व्यक्तीमत्त्व फुलते. वाचनामुळे अजरामर झालेल्या थोर विभूतीचा इतिहास पहा. त्याच्या विचारांनाजगमान्यता मिळाली आहे.

उदा. स्वामी विवेकानंद, रविंद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, डॉ. ए. पी जे, अब्दूल कलाम, इत्यादी. गोपाळ गणेश आगरकर पुस्तक वाचनाचे महत्त्व सांगताना म्हणतात.

पुस्तकाच्या वाचनानेही विरंगुळा मिळतोय. त्यासाठी पुस्तके वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे. कारण जिथे आवड तिथेच सवड निर्माण होते. आणि एकदा का तुम्हाला पुस्तकाची गोडी निर्माण झाली. तर कोणत्याही क्षेत्रातील यश तुम्हाला हुलकावणी दाखवणार नाही. पुस्तकामुळे नवनवीन अद्यावत कौशल्ये आत्मसात झालेली असतात. यासाठी लहानपणापासून वाचनाची सवय लावणे आवश्यक आहे.

तुम्हाला तुमच्या क्षेत्रात प्रभुत्व संपादन करायचे असेल तर तुमच्याकडे अद्यावत ज्ञानाचे भांडार आवश्यक आहे. आपल्या बौद्धिक विकासाची झलक ही वाचनानेच प्रगल्भ होते. विष्णू शास्त्री चिपळूणकर म्हणतात, “अन्नाने जसे आपल्या शरीराचे पोषण होते. तसेच पुस्तकाचे वाचनाने मनाचे पोषण होते.”
पुस्तकाचे स्पर्शाने अविचार मनी झडो,
विषय सर्वया नावडो |
सदा मनी सुविचार आठवो,
चित्त रंजूनी देश विकसित घडो ||

Vachanache Mahatva | Importance Of Reading

  • वाचनामुळे ज्ञान वाढते.
  • वाचनामुळे आपले मन विकसित होते व जीवनचे चांगले धडे शिकतो.
  • वाचनामुळे संवाद कौशल्य विकसित होते.
  • वेगवेगळी पुस्तक वाचनामुळे संस्कृती, परंपरा, कला, इतिहास, भूगोल, आरोग्य, मानसशास्त्र आणि इतर अनेक विषय माहिती व ज्ञान मिळते.
  • पुस्तक वाचनामुळे कल्पनाशक्तीच्या जगात घेऊन जाते आणि सर्जनशीलता वाढवते.
  • वाचनामुळे आपले प्रत्येक प्रश्नाची उत्तरे सुटू शकतात.
  • एक पुस्तक १०० मित्रासारखा असतो.

निष्कर्ष | Conclusion –

Vachal tar Vachal Marathi Nibandh माहिती अन्य लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकावरून घेतली गेली आहे. वरील ब्लॉग मधील माहिती फक्त शिक्षण उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिल्या गेलेल्या माहिती बद्दल काही अडचण असेल आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.

आम्ही दिलेली माहितीचा वापर तुम्ही खालील विषय साठी वापरू शकता

  • Vachanache Mahatva .
  • Vachanache Mahatva In Marathi.
  • Vachal tar Vachal Nibandh.
Sharing Is Caring:

Leave a Comment