Best Ukhane 100+ {2023} | उखाणे

Rate this post

Ukhane-ह्या ब्लॉग मध्ये आपण उखाणे लिहलेले आहेत. उखाणे हे ग्रहप्रवेश करताना नवरा-बायकोला म्हणावे लागतात .त्यामुळे ह्या ब्लॉग मध्ये अतिशय उत्तम उखाणे आम्ही लिहलेले आहेत.

उखाणे | Ukhane

गजाननाची कृपा, गुरूंचा आशीर्वाद, ….. रावांचे नांव घ्यायला आज करते सुरूवात.

आई-वडिल सोडताना, पाऊल होतात कष्टी….. रावांच्या संसारात करीन मी सुखाची सृष्टी.

सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी…. .रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी.

सुवर्णची अंगठी, रूप्याचे पैंजण….. रावांचे नाव घेते ऐका सारेजण.

सासरचे निरांजन माहेरची फुलवात ….. रावांचे नांव घेण्यास करते सुरूवात.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने ….. रावांचे नांव घेते पत्नी या नात्याने.

रूक्मिणीने पण केला, कृष्णालाच वरीन….. रावांच्या साथीनं, आदर्श संसार करीन.


हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी….. रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी.

सत्य पृथ्वीचा आधार, सूर्य स्वर्गाचा आधारयज्ञ देवतांचा आधार …… राव माझे आधार.

माहेर जणू गंगा, सासर जणू सागर ….. रावांचे सुख निर्झर.


उखाणे | Ukhane

मंदिरात वाहाते, फुल आणि पान, … रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान.

छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन, … रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.

गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशा, .. रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवसी.

माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने, .. रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे.


कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा, … रावांचे नांव घेते, सारे जण बसा.

रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा, … रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.

खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध, … रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.

पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे, … रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.


उखाणे | Ukhane

मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती, … रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती.

सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात, … रावांचे नांव घेते, …च्या घरात.

कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती, …रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, … रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.


संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला, … रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला.

अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस, … रावांच नांव घेतांना, कसला आला आळस.

पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते, … रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.

लावित होते कुंकु, त्यात पडला मोती, …रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती.


Marathi Ukhane | मराठी उखाणे

ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल, … रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल.

कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर, … रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर.

शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन, … रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुन.

श्री विष्णुचा मस्तकावर सदैव असतो शेष, … रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.


हे सुद्धा वाचा – Marathi Poem


Marathi Ukhane उखाणे | मराठी उखाणे

यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली, … रावांची जन्मदाती, धन्य ती माऊली.

अभिमान नाही संपत्तीचा, सर्व नाही रुपाचा, … रावाना घास घालते वरण-भात-तुपाचा.

लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा, … रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा.

पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … रावांच्या नावाने घालते मंगल सुत्रांचा हार.

आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे, … राव हेच माझे अलंकार खरे.


Marathi Ukhane | मराठी उखाणे

पजेच्या साहीत्यात, उदबत्तीचा पुडा, … रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा.

सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान, … रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.

राज हंस पक्षी शोभा देतो वनाला, … रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला.

श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन, … रावांच्या जिवनात आदर्श संसार करीन.


Marathi Ukhane | मराठी उखाणे

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, … रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने.

वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल, … रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.

घातली मी वरमाला हसले… राव गाली, थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.

जेव्हा मी ह्यांना पाहते चोरुन विचार करते मुक होऊन, घडविले देवानी… रावांना जीव लावून
.


धरला यांनी हात, वाटली मला भिती, हळूच म्हणाले… राव अशीच असते प्रिती.

नववधु आले मी घरी, जीव माझा गेला बावरुन, …रावांनी मारली हाक, शिणच गेला निघुन.

हृदयात दिले स्थान, तेव्हा दिळा हातात हात, … रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात.

नव्हती कधी गाठ मेट, एकदाचं झाली नजरा नजर, आई-वडी विसरले…रावांसाठी सुटला प्रितीचा पाझर.


राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार, … रावनी घातला मला मंगळ सुत्राचा हार.

पोर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा, … रावांनी आणला मला मोग-याचा गजरा.

चांदीचे जोडवे पतीची खुन, .. रावांचे नांव घेते,… ची सुन.

दारी होता टेबल, त्यावर होता फोन, … रावांनी पिक्चर दाखवला हम आपके हैं। कौन?


मराठी उखाणे बायकोसाठी | Marathi Ukhane For Female

अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी, आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी.

गुलाबाचे फुल दिसायला ताजे, … रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.

डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले, … रावांचे नांव घेतांना, आनंदी मला वाटले.

ओल्याचींब केसांना, टावेल द्यां पुसायला, … रावांचे नाव घेते शालु द्या नेसायला.


डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल, .. रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.

अंगणात होती मेथी, पाणी घालु किती, … रावांच्या हातात सत्यनारायनाची पोथी.

हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी. … रावांचे नांव घेते… च्या दिवशी.

वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस, …रावांचे नांव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस,
शरदाचे संपले अस्तीत्व, वसंताची लागली चाहूल, …रावांच्या संसारात टाकते पहीले पाऊल.


मराठी उखाणे बायकोसाठी | Marathi Ukhane For Female

गृह कामाचे शिक्षण देते माता, …रावांचे नांव घेते तुमच्या आग्रहाकरीता.

गृह कामाचे शिक्षण देते माता, …रावांचे नांव घेते तुमच्या आग्रहाकरीता.

दीन दुबळ्यांचे गाहाने परमेश्वरानी ऐकावे, … रावा सारखे पत्ती मिळाले आणखी काय मागावे.

पषातील धुंद वारा छेडीतो, माझ्या अंगाला, … रावांचे नांव घेते सुर्यनारायनाच्या साझीला.



चंदेरी सागरात, रुपेरी लाटा, … रांवाच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.

नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे, …रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.

स्वातंत्र्याच्या होमकुंडात विरांनी घेतली उडी, …रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सुत्राची जोडी.

…रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा, त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा.



पोर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल, …रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.

तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेल ही शिंपडले, …रावांचे मन, मी केव्हाच जिंकले.

केसात माळते रोज, मी गुलाबाचे फुल, … राव माफ करतात माझी प्रत्येक भुल.

मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले, … रावांचे हेच रुप मला फार आवडले.


आज सारे सुख माझ्या दारी दाटले, …रावांचा प्रेम अजुन तरी नाही आटले.

मला गुणवान पती मिळाले, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा, …राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा.

सासरी आहे माझ्या सुंदर हिरवा मळा, …रावामुळेच लागला मला त्याचा लळा.

शिक्षणाने विकसीत होते, संस्कारीत जीवन, …रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन.


हे सुद्धा Youtube तुम्ही वर बघाMarathi Ukhane


मराठी उखाणे बायकोसाठी | Marathi Ukhane For Female

इंद्र धनुष्यात असतात सप्तरंग, …रावांच्या संसारात मी आहे हंग.

निळ्या नभात चंद्राचा प्रकाश, …रावांवर आहे माझा विश्वास.

प्रेमाचे कच्चे धागे खेचती मागे पुढे, …रावांच्या साथी साठी माहेर सोडावे लागे.

प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची, …रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची.



चंद्राचा झाला उद्य अन् समुद्राला आली भरती, …रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती.

नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार, … रावांचा स्वभाव आहे फारच उदार.

करवंदाची साल चंदनाचे खोड, … रावांचे बोलने अमृतापेक्षा गोड.

सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले, … रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले.

वसंतातली डाळ पन्ह, देती थंडावा …रावांसह मला आपला आशीर्वाद हवा.


सुशिक्षीत धराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले, रावांशी लग्न करुन सौभाग्यवती झाले.

प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतिची वात, …रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात.

नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी, …रावां सोबत आली मी सासरी.

गुलाबाच्या झाडाला फूल येतात दाट, …रावांचे नाव घेते सोड़ा माझी वाट.


मराठी उखाणे बायकोसाठी | Marathi Ukhane For Female

शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी, आता ….राव माझे जीवनसाथी.

आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हा विष्णु आणि महेश, …रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश.

मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर, …रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.

गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी, …रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.


पार्वती ने पन केला महादेवालाच वरीन, …रावांच्या साथीन, आदर्श संसार करीन.

नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद , …रावांचे नाव घेते दया सत्यनारायणाचा प्रसाद!”

“दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी, …चे नाव घेते तुमच्या साठी!”


Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली उखाणे एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काहीकॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic