Best Modern Marathi Ukhane for female 2023 | आधुनिक मराठी उखाणे वधूसाठी

Rate this post

Modern Marathi Ukhane for female-आपल्याकडे महाराष्ट्रीयन लग्ना मध्ये वधु वारांना उखाणे घेण्यास सांगितले जाते तर आज आम्ही तुमच्यासाठी ह्या ब्लॉग मध्ये घेऊन आलो आहे Best Modern Marathi Ukhane for female २०२३ म्हणजेच स्त्रियांकरिता अगदी छान छान उखाणे एकदा तुम्ही पहा आपल्याला नक्कीच आवडतील.

मराठी उखाणे वधूसाठी | Modern Marathi Ukhane for female

ओssम या शब्दात आहे दिव्य शक्ती,…… रावांवर करते मी अमर प्रीती.

मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर,…… रावांनी दिला सौभाग्याचा आहेर.

श्रीकृष्णाने भगवतगीतेतून जगाला केला उपदेश,…… नी माझ्या जीवनात केला २७ मे ला प्रवेश.

मुर्तीकाराने घडवली सुंदर मुर्ती,….. रावांची वाढो सर्वदूर किर्ती.

अत्रावळीवर पत्रावळि, पत्रावळिवर भात,भातावर वरण, वरणवर तुप,तुपसारखे रुप, रुपसारखा जोडा,
…… चे नाव घेते वाट माझी सोडा.

रोज रोज दिवस नवा व अनुभवही नवा,…… ना अन् मला येणारया बाळराजांकरिता तुमचा आशीर्वाद हवा.

प्रत्येक क्षण येतो अनुभव घेऊन आगळा, …… नी लाडु खावा एक सोबत सगळा.

मुबईची महालक्ष्मी, कलकत्याची कालिका,…… चे नाव घेते …… चि बालिका.


मराठी उखाणे वधूसाठी | Modern Marathi Ukhane for female

भल्या पहाटे करावी देवाची पुजा,…… च्या जीवावर करते मी मजा.

कुंकु लावत ठसठशीत, ह्ळ्द लावते किंचित,….. आहेत माझे पूर्व संचित.

वर्षाकाठचे महिने बारा,…… या नावात सामवलाय आनंद सारा.

हिरवा श्रावण बहरलाय दरवळली माती,….. च्या जीवनात सदैव मिळो शांती.

अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला,…… चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला.

अबोलिच्या फुलाचा गंध् काहि कळेना,…… चे नाव घेण्यास शब्द काहि जुळेना.

हे सुद्धा वाचा – उखाणे मराठी वधूंसाठी


मराठी उखाणे वधूसाठी | Modern Marathi Ukhane for female

जाऊनिया काश्मिरला साजरे केले हनिमुन,…… चे नाव घेते …… ची सुन.

कलीयुगात घडलाय यांच्या रुपाने चमत्कार, …… रावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार!!!

तु्ळजा भवानीचि क्रुपा आणि तिरुपतीचा आशिर्वाद,माहेरचे निरान्जन आणि सासरची फूलवात,
…… रावांचं नाव घेउन करते संसाराला सूरूवात.

चंदनासारखे झिजून करावी सर्वांची सेवा,…… म्हणतात करु नको कधी दुसर्याचा हेवा.

श्रावणात बरसतात धुंद जलधारा, …… च्या नावात फुलावा माझा सौभाग्याचा फुलोरा.

नाव घ्या नाव घ्या करु नका गजर, …… रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर.

गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट, …… नाव घेते सोडा माझी वाट.


मराठी उखाणे वधूसाठी | Modern Marathi Ukhane for female

सांगीतलेल्या कामात मी सदैव राहीन दक्ष, …… ना भरवीते गोड घास, तुम्ही भरा साक्ष.

प्राजक्ताच्या फुलानि भरले अंगण,…… रावांचे नाव घेवुन सोडले क़ंकण.

श्रावणात पडतात सरीवर सरी,…… रावा्ंचे नाव घेते …… हि बावरी.

ग़ूलाबाचे फुल दिसायला ताजे,…… नाव घेते सौभाग्य माझे.

तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल,…… ना आवडते गावठी गुलाबाचे फुल.

मंथरेमूळे घडले रामायण,…… चे नाव घेते आज आहे सत्यनारायण.

जन्म दिला मातेने,पालन केले पित्याने,…… चे नाव घेते पत्नि या नात्याने.


मराठी उखाणे वरसाठी | Marathi Ukhane Male

जाईजुईचा वेल पस्ररला दाट,…… बरोबर बान्धलि जिवनाचि गाठ.

मनी असे ते स्वप्नी दिस ओठी मी हे आणू कसे,…… माझी नववधू शब्दात मी हे सांगू कसे.

पुरनपोलि वरण साजुक तूप भातात,…… च्या आवडिचे पदार्थ वाढ़ले चान्दिच्या ताटात.

शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले,…… च्या प्राप्तीने मम भाग्य उदयाला आले.

संतांचे वाङमय म्हणजे ‘सारस्वताचा सागर,…… आहेत प्रेमाचा आगर.

दोन जीवांचे मिलन जणु शतजन्माच्या रेशिमगाठी,……. चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.

चिमुकल्या ओढ्याची झाली विशाल नदी,….. च्या बरोबर केली सप्तपदी.


मराठी उखाणे वरसाठी | Marathi Ukhane Male

पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,…….. ची व माझी जडली प्रिती.

साथीने रंगते गाणे, गाण्याने रंगते मैफल,सखींनो ….. च्या संगतीनं संसार करीन सफल.

विवाह म्हणजे सुरुवात एका नव-जीवनाची,….. चे नाव घेउन जाणीव ठेवीन स्त्री कर्तव्याची.

सोन्याचे मंगळ्सुत्र सोनाराने घडविले,….. रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी अडविले.

भगवदगीतेने जगाला दिला जीवन जगण्याचा महान अर्थ…… रावांशिवाय माझे जीवन व्यर्थ.

अजिंठा-वेरुळ्ची जगप्रसिद्ध आहे कोरीव लेणी,….. नी आणलीये सुगंधी वेणी.

कपात दुध दुधावर साय…… च नाव घेते …… ची माय.


मराठी उखाणे वरसाठी |Marathi Ukhane Male

लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा,…. च्या जीवावर कर्ते मी मजा.

भाऊबहिणीच्या प्रेमाचे प्रतिक आहे रक्षाबंधन,….ना करीते मी रोजच वंदन.

उखाणा घेउन भगिनिंच्या सुप्तगुणांना मिळतो वाव,आज आहे मंगळागॉरी ….. चे घेते मी नाव.

रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात,….. चे नाव घेते असु द्या लक्षात.

वाल्मिकी ऋषीने रचले रामायण,….. चे नाव घेते आज आहे सत्यनारायण.

मनोकामना झाल्या सफल, आकांक्षांची होईल पूर्ती,…… रावांना मिळो तुमच्या आशीर्वादाने कीर्ती.

सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,…… नी लावला गुलाबांचा मळा.

हे सुद्धा बघा- Traditional Marathi Ukhane


मराठी उखाणे वरसाठी | Marathi Ukhane Male

अत्रावळ पत्रावळ,पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड,…… हसतात गोड,पण डोळे वटारायची भारीच खोड्.

नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा,…..च नाव आहे लाख रुपये तोळा.

पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय मोरुची मावशी,….. चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

गावठी गुलाबाला सुगंधी सुवास,…… ना भरवते मी श्रिखंड-पुरीचा घास.

झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी, आयुष्यभर सोबत राहो …… – …… ची जोडी.

देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे, …. चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.

अत्तराचा सुगंध दरवऴ्ला चहुकडे,…… रावांच्या नावाचा लौकिक होउ दे सगळिकडे.


उखाणे | Ukhane

हिरव्या हिरव्या मेंदिचा रंग चढलाय लाल लाल, आज आहे धुलिवंदन …… उडवतात रंग नि गुलाल.

मंथरेमूळे घडले रामायण, ….. चे नाव घेते आज आहे सत्यनारायण.

ग़ूलाबाचे फुल दिसायला ताजे, …… नाव घेते सौभाग्य माझे.

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, …… चे नाव घेते राखते तुमचा मान.

पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक, …. आहेत आमचे फार नाजुक.

रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित, मागते आयु्ष्य …… च्या सहीत.

नव्या घरी उधळीत राहीन मराठमोळी संस्कृती, …… ची झाले आज मी सौभाग्यवती.

सासरची निरांजन्, माहेरची फुलवात, …… चे नाव घ्यायला आज पासुन सुरवात.


उखाणे | Ukhane

फुल आहे गंध भाव आहे अंतरी,…… सह चालले सातपावलांवरी.

संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती,देवा सुखी ठेव …… ची जोडी.

माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा, …… नी त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा.

काचेच्या बशित बदामचा हलवा, ……. रावाचे नाव घेते सासुबाईंना बोलवा.

सुखद वाटते हिवाऴ्यातले ऊन, …… रावाचे नाव घेते …… ची सुन.

पुण्यकर्म केले असता राहतात जन्मोजन्मीच्या गाठी, …… चे नाव घेऊन जाते मी ग़ौरीहर पुजनासाठी.

दौलत होति तुळस माहेरच्या अंगणात,…… साथि फुलेल आता सासरच्या व्रुन्दवनात.

मोह नसावा पैशाचा,गर्व नसावा रुपाचा,…… ना घास घालते श्रीखंडपुरीचा.

कोणत्याही रुढी परंपरेत आहे विद्यानाचे धागेदोरे, …… सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.

माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले, म्हणून …….. रावांची मी सॉभाग्यवती झाले
.


उखाणे | Ukhane

आंब्यात आंबा हापुस आंबा,…… चे नाव घेते तुम्हि थोड थांबा.

अर्धनारी नटेश्वराच्या मुर्तीप्रमाणे पति पत्नीच्या,एकरुपतेने बनत असतो संसार,….. चे नाव घेते आज आहे श्रावणी सोमवार.

मंगळसुत्राच्या दोन वाट्या,एक माहेरची एक सासरची खूण,…… ची अर्धांगिनी जाहले, भाग्य कुठले याहुन.

रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन,…. च्या साथीने आदर्श संसार करीन.

आग्रहाखातर नाव घेते, आशिर्वाद द्यावा…. रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा.

सासरचे निरांजण, माहेरची फुलवात,…… रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरवात.

सुखी संसाराची स्वप्ने पहाते रावांच्या डोळ्यात,…… रावांचा हार शेवटी माझ्याच गळ्यात.

हिरव्या साडीचा, पिवळा काठ भरजरी,…… रावांचे नाव घेतल्यावर, चेहऱ्यावर येते तरतरी.

सासरची छाया, माहरेची माया,…… राव आहेत, माझे सगळे हट्ट पुरवाया.


उखाणे | Ukhane

ईश्वराच्या चरणी फुले वाहते श्रद्धेने,…… रावां बरोबर लग्न जमले पांडुरंगाच्या कृपेने.

रास माझी कुंभ,…… रावांचे नाव घेण्यास आजपासून केला आरंभ.

लाल मणी काढले काळे मणी जोडले,…… रावांसाठी आईवडील सोडले.

पायात पैजण, नाकात नथ,…… रावांनी घरी न्यायला आणला मला रथ.

चांदीच्या ताटात मिठाईचा पुडा,…… रावांच्या नावाने भरला सौभाग्याचा चुडा.

थंडीच्या दिवसात वारा लागे गार,….रावांची नजर म्हणजे काळजावर वार.

कोल्हापूरची देवी नवसाला पावते,…… रावांच्या नावाच, कुंकू मी लावते.

यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब,…. चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,…… रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.


Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली उखाणे एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काहीकॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

Leave a Comment