महाराष्ट्र दिनानिमित्त एकदम नवीन भाषण | Best Maharashtra Din speech in Marathi 2024

5/5 - (2 votes)

Maharashtra Din speech in Marathi – नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या ब्लॉग मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बदल थोडक्यात माहिती देणार आहोत.तुम्ही ही माहिती Maharashtra day speech in Marathi, Maharashtra day speech in Marathi, Maharashtra din bhashan ह्यासाठी वापरू शकता.

Maharashtra Din speech in Marathi | महाराष्ट्र दिन भाषण मराठीत

माझ्या महाराष्ट्राकडे पाहिलं की आजही पराक्रमाची, शौर्याची गाथा पाहावयास मिळते. १ मे म्हटलं की सर्वांनाच आठवण होते ती महाराष्ट्र दिनाची. देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेक चळवळी, सभा, आंदोलने झाली. अशाच चळवळी, आंदोलने, सभा होऊन १०५ हून अधिक हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करून महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या मराठी राज्यासाठी अफाट संघर्ष करावा लागला. यातूनच १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी यासाठी पूर्वीपासूनच आंदोलने निर्माण होत होती. १९३८ साली ज्यावेळी वेगळ्या विदर्भ प्रांताची निर्मिती व्हावी यासाठी आंदोलने सुरू होती. त्याचवेळी मराठी भाषिक माणसांच्यामध्ये एक चळवळीचे वारे वाहत होते. ज्यावेळी ब्रिटिश निघून गेले त्यावेळी वेगवेगळ्या संस्थानांचे विलीनीकरण झाले. मुंबई प्रांताची निर्मिती झाली. यामध्ये मराठी, गुजराती, कन्नड व हिंदी भाषिक विभागांचा समावेश मुंबई प्रांतामध्ये झाला. यामुळे मराठी भाषिकांची घुसमट सुरू झाली.

Samyukta Maharashtra Movement

हे सुद्धा – महात्मा गांधी भाषण मराठीत

महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक मराठी भाषिकाला आपल्या हक्काचे राज्य निर्माण व्हावे असे वाटत होते. यासाठी प्रत्येक मराठी माणूस वेगळ्या पद्धतीने आंदोलन करत होता. १९४८ साली बेळगाव येथे झालेल्या साहित्यसंमेलनामध्ये ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव, कारवार, धारवाड बिदर भालकी सहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असा एक ठराव झाला व येथूनच संयुक्त महाराष्ट्र चळवळीला सुरुवात झाली.

मराठी भाषिकांच्या राज्याला काही विघ्नसंतोषी लोकांचा विरोध होता पण या प्रश्नासाठी मुंबईतील हजारो गिरणी कामगार, श्रमिक वर्ग
एकत्र आले व प्रखर असा लढा दिला. आंदोलनाला प्रचंड विरोध झाला. गिरण्या बंद ठेवल्या, मुंबईच्या आझाद मैदानावरील मोर्चा
काढलेल्या लोकांवर गोळीबार, लाठीहल्ला झाला. मराठी माणूस भडकला वही चळवळ अधिक जोमाने पुढे आली यासाठी यशवंतराव चव्हाण,
कर्मवीर हिरे, एस. एम. जोशी, श्री. प्रबोधनकार ठाकरे, ना. ग. गोरे आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे यांच्यासारखे नेतृत्व पुढे आले.

हे सुद्धा – स्वामी विवेकानंदांचे मराठीत भाषण

पहिल्या महाराष्ट्राच्या निर्मितीचे शिल्पकार म्हणून यशवंतरावजी चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते. याच महाराष्ट्राला विकासाच्या उंचीवरती
नेण्याचे काम चव्हाणसाहेबांनी केले. हीच गाथा गौरवशाली महाराष्ट्राची आपणास पाहावयास मिळते. वेगळ्या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी व
त्याचा सर्वतोपरी अभ्यास करण्यासाठी १९५६ साली एका कमिटीची स्थापना झाली. त्यानंतर दार आयोगाची निर्मिती झाली. पण या समित्या
यातून जनतेच्या प्रश्नाचे व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांचे या समितीवरती पूर्ण विश्वास नव्हता. महाराष्ट्रातील सर्व मराठी भाषिक
नेत्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आमचा आणि आपला महाराष्ट्र एकसंध राहिलाच पाहिजे.

यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर पदयात्रा, निषेध मोर्चे काढले व आम्ही एकसंध आहोत याचेच दर्शन दिल्लीतील नेतृत्वाला दाखवून दिले.संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या चळवळीला एक वेगळे स्वरूप प्राप्त होत असताना, दिल्लीतून या चळवळीला प्रखर असा विरोध होत होता, देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या सभेत त्यांचे भाषण चालू असताना एकच घोषणा दिल्या जात होत्या.

हे सुद्धा Youtube वर बघा – महाराष्ट्र दिन भाषण

मराठी माणसाचं राज्य, महाराष्ट्र राज्य” त्याचवेळी नेहरूंनी आश्वासन दिले. नेहरूंना महाराष्ट्राची ताकद कळाली. महाराष्ट्राच्या एकीचे दर्शन घडले आणि त्याच्यावरती आयोग नेमला. त्याच्यावरती निष्कर्ष काढला. महाराष्ट्रातील काही भाग कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश यामध्ये विभागला गेला व महाराष्ट्र राज्याची संकल्पना पुढे आली व १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्रातील सर्व नेते व मान्यवर मंडळी यांनी आपली ताकद
दाखवून दिली. पद, पक्ष यापेक्षा मराठी माणसाचा सन्मान मोठा आहे हेच या महाराष्ट्र निर्मितीच्या माध्यमातून दाखवून दिले.

आज १ मे हा महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणूनसुद्धा साजरा करतो. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी शाहिरांनी डफावरती थाप मारली.
कामगारांनी काम बंद केले. वक्त्यांनी सभा घेतल्या. प्रसारमाध्यमांनी व वर्तमानपत्रांनी मार्मिक पद्धतीने लिखाण केले. मराठी माणसाच्या व्यथेची
वस्तुस्थिती समोर मांडली. धनिकांनी चळवळीस मदत केली तर बुद्धिजीवी वर्गानी तरुणांना एकत्र केले व यातूनच महाराष्ट्राच्या महान अशा
भूमीची निर्मिती झाली.

आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करताना महाराष्ट्राची जडण- घडण करण्यासाठी व महाराष्ट्राच्या मातीला समृद्ध करण्यासाठी, सक्षम
बनवण्यासाठी प्रयत्न करूया व आपल्या महाराष्ट्राबरोबरच देशालाही बलशाली बनवूया!

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

Conclusion | Maharashtra day speech in Marathi

Maharashtra day speech in Marathi, Maharashtra din bhashan अन्य लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकावरून घेतली गेली आहे. वरील ब्लॉग मधील माहिती फक्त भाषण आणि शिक्षण उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिलेली माहिती बद्दल काही अडचण असेल तर आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून कळवू शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.

१ मे ला महाराष्ट्रात काय म्हणून साजरी केली जाते ?

महाराष्ट्रात १ मे हा “महाराष्ट्र दिन ” म्हणून साजरा केला जातो.

१ मे महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा होतो?

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.

Sharing Is Caring:

Leave a Comment