लोकमान्य टिळक माहिती |Lokmanya Tilak information in Marathi 2023

4.8/5 - (6 votes)

स्वराज्य हा माझा जन्म सिद्द हक्क आहे हा उपदेश आपल्याला आधुनिक जीवनात आपल्याला खूप उपयोगी आहे. आज आपण Lokmanya Tilak information in Marathi, Lokmanya tilak mahiti पाहणार आहोत. आपल्याला लोकमान्य टिळक याचे सामाजिक, राजकीय आणि त्यांचे वैयत्तिक जीवन समजावून घेणे तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी या लेखामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक याचा जीवन प्रवास सांगितला आहे.

अनुक्रमणिका

टिळकांचे सुरवातीचे जीवन | Childhood

संपूर्ण नाव केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक
टोपणनावलोकमान्य टिळक
जन्म दिनांक२३ जुलै १८५६.
जन्म ठिकाणचिखलगाव, रत्नागिरी, महाराष्ट्र.
धर्महिंदू
शिक्षण१८७६ मध्ये बी.ए. गणित मध्ये आणि १८७९ मध्ये एल.एल.बी प्रथम श्रेणी
डेक्कन कॉलेज पुणे आणि गव्हर्मेंट लॉ कॉलेज मुंबई
वडिलांचे नाव गंगाधर रामचंद्र टिळक
आईचे नावपार्वतीबाई गंगाधर टिळक
बायकोचे नावसत्यभामाबाई
मुलांची नावेरमाबाई वैद्य, पार्वतीबाई केळकर, विश्वनाथ बळवंत टिळक, रामभाऊ बळवंत टिळक, श्रीधर बळवंत टिळक आणि रमाबाई साने
विचारधाराराष्ट्रवादी आणि जहाल
निधन१ ऑगस्ट १९२०
Image CreditsWikimedia Commons

Lokmanya Tilak information in Marathi२३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथील अगदी गरीब आणि लहानश्या ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म झाला. केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक यांचे मूळ गाव चिखलगाव. त्यांचे वडिलांचे नाव गंगाधर टिळक आणि आईचे नाव पार्वतीबाई गंगाधर टिळक असे होते.
त्यांचे वडील गावामधील एका शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक होते. त्याच्या अतिशय शांत आणि दिलेल्या चांगल्या संस्कारामुळे लोकमान्य टिळक हे लहान पणापासून अतिशय हुशार होते. परंतु लोकमान्य टिळक यांच्या वयाच्या १६ वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
वडील शिक्षकी पेशामुळे त्यांची बदली पुण्याला झाली. त्यामुळे सुरवातीचे शिक्षण हे गावी झाले आणि त्यांनतर त्यांचे शिक्षण पुण्याच्या ठिकाणी झाले. थोड्या दिवसांनी त्यांचा विवाह तापीबाई यांच्या शी १८७१ साली झाला. लग्नांनंतर त्यांना सत्यभामा असे ओळखले जाऊ लागले.

टिळकांचे शिक्षण | Tilak’s Education

बाळ गंगाधर टिळक हे लहानपणापासून खुप हुशार आणि चलाख होते.

  • वडील शिक्षण असल्याने प्राथमिक शिक्षण त्याच्या कडून च घेतले.
  • त्यांनतर चे शिक्षण त्यांनी पुण्यामधील अँग्लो – वर्ण्यकुलर स्कूल मध्ये झाले.
  • वडिलांचे निधन झाल्यावर त्यांनी डेक्कन कॉलेज मध्ये पुढील शिक्षणासाठी ऍडमिशन घेतले
  • १८७६ मध्ये बी.ए. गणित मध्ये उत्तीर्ण झाले.
  • १८७९ मध्ये उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुढे मुंबई येथे गव्हर्मेंट लॉ कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतले.

टिळकांचे सामाजिक कार्य | Social Work

Lokmanya Tilak information in Marathi – लोकमान्य टिळक यांनी समाजासाठी काम करण्यास अगदी लहानपासून सुरवात केली. सामाजिक कार्याची ओढ खूप होती. शिक्षण संस्थेची स्थापना करणे, इंग्रज सरकारचा विरोध करणे, केसरी आणि मराठा सारखे वृत्तपत्राची सुरवात करणे. यासारखी भरपूर लोककल्याणाची कामे त्यांनी केले आहेत.त्यापैकी काही मह्त्वाची कामे आणि त्याची थोडक्यात माहिती काही दिली गेली आहे.

गणेशउत्सव आणि शिवजंयती सुरवात –

बाळ गंगाधर टिळक हे सर्व हिंदू लोकांनी एकत्र यावे आणि संघातील राहावे म्हणून त्यांनी शिवजयंती आणि गणेशोउत्सव ची सुरवात केली. १८९३ मध्ये गणेशोउत्सव ची सुरवात केली. म्हणून आपण दोन्ही सण मोठ्या थाटामाटात साजरे करतो.हिंदू सण एकत्र येऊन साजरे करण्यामागे सर्व लोकांनी एकत्र राहण्याची भावना राहावी आणि इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी लोकांमध्ये एकोपा राहावा हा उद्देश त्याच्या डोळ्यासमोर होता.

परदेशी वस्तुवरती बहिष्कार –

स्वदेशी / भारतीय वस्तू वापरण्यावरती टिळकांचा जोर असत. ते म्हणत असत आपला पैसे आपल्याच देशात राहिला पाहिजे. म्हणून विदेशी वस्तू चा बहिष्कार त्यांनी केला. त्याचबरोबर विदेशी कपड्यांची होळी त्यांनी केली. जेणे करून आपल्या देशातील लोक आपल्या देशातील च वस्तू आणि कपड्यांचा वापर करतील.

इंग्लिश स्कूल ची स्थापना –

आपल्या देशातील सर्व मुलांना स्वस्तात आणि चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी शिक्षण समिती ची स्थापना केली. १ जानेवारी १८८० रोजी आपल्या महाविद्यालयीन मित्रांसमवेत त्यांनी पुणे येथे इंग्लिश स्कूल ची स्थापना केली. विष्णुशास्त्री चिपळूणकर, वामन शिवराम आपटे, गोपाळ गणेश आगरकर इत्यादी चा समावेश या स्थापनेमध्ये होता.

“केसरी” आणि “मराठा” वृत्तपत्र | “Kesari” & “Maratha”

१८८१ मध्ये विष्णुशात्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, वामन शिवराम आपटे, डॉ. गद्रे आणि आगरकर याच्या सहमतीने एक पत्रक सुरु केले. त्याला नंतर “केसरी” असे नाव दिले. केसरी या वृत्तपत्राने राज्यकर्त्यांवर जहरी टीका करत असत. त्या काळात भरपूर वृत्तपत्रे प्रसारित होत असत पण त्याच्या समोर ध्येय न्हवते.

केसरी हे मराठी वृत्तपत्र आणि पुढे जाऊन मराठा हे वृत्तपत्र इंग्लिश मध्ये प्रसारित करण्यात आले. मराठा हे वृत्तपत्र हे सुसुक्षित वर्गासाठी होते. मराठा या वृत्तपत्रांमधून महाराष्ट्राबाहेरील लोकांनां आणि तरुणांना प्रभावित करण्याचे काम करत असत. दोन्ही वर्तमानपत्रणातून राजकीय आणि सामाजिक घडामोडी प्रखर पाने मांडत असत.

दुष्काळ आणि प्लेग

१८८६ साली लोकमान्य टिळक यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात संघर्ष सुरु होता. अश्यावेळी त्यांचे अनेक सहकाऱ्यांचा मृत्यू झाला आणि अनेक सहकारी नवीन सुद्धा भेटले. त्यांनतर लोकमान्य टिळक सामाजिक कामात खूप मग्न झाले त्यांनतर घराची जबाबदारी आणि कौटुंबिक व्यवहार त्यांनी आपल्या बहिणीच्या मुलाकडे दिले.
लोकमान्य हे मुंबई कायदेमंडळ मध्ये होते. ते असतानाच दुष्काळ आणि प्लेग चा महारष्ट्रावरती होता. सतत दुष्काळ पडत असल्याने लोकांच्या मृत्यू चे प्रमाण वाढत चालले होते. १८७६ पेक्षा १८९६ चा दुष्काळ खूप भयानक होता. सामान्य लोकांपर्यंत अधिका अधिक सुविधा पोहचण्याची जबाबदारी त्यावेळच्या सरकार ने घेतली. सरकार ने ” फॅमिन रिलीफ कोड “ अंमलात आणला. हा ” फॅमिन रिलीफ कोड ” लोकांना समजावा म्हणून या कोड चे भाषांतर करून दिले. हे भाषांतर त्यांनी केसरी वृत्तपत्रकात केले. लोकांनी “कर्ज काढून कर भरू नये ” असे आवाहन लोकांना केले. अश्या प्रकारे दुष्काळाशी मत करण्यासाठी टिळकांनी खूप संघर्ष केला. टिळकांनी केलेल्या या संघर्षाचे चांगले परिणाम दिसून आले.

याचदरम्यान मुंबई आणि पुणे येथे प्लेग ची साथ खूप भयानक साथ आली. प्लेग हा साथीचा रोग असल्याने तो खूप वेगाने पसरत चालला होता. सरकारने दिलेल्या औषदाचा परिमाण त्या रोगापेक्षा जास्त भयंकर होत चालला होता.साथीच्या रोगामुळे सामान्य लोकांना दूर केलं जात असे आणि तेथील इस्पितळामध्ये इलाज देखील सरळ केला जात नसे. या त्रासाला कंटाळून टिळकांनी जनतेची मदत घेऊन एक इस्पितळाची स्थापना केली. इथे लोकांशी वागणूक देखील चांगली देत असल्याने जनता देखील तिथेच जाऊ लागली. टिळक स्वतः सगळ्या इस्पितळ कडे लक्ष देत असत. त्या इस्पितळाचे पुढे नाव ” हिंदू प्लेग हॉस्पिटल “ असे ठेवण्यात आले. टिळकांनी दुःख निवारण समिती ची स्थापना केली. रुग्णांनी पळून जाऊ नये म्हणून लष्करी ठेवण्यात आले

लोकमान्य टिळक यांच्या वर राज्यद्रोहाचा खटला

Lokmanya tilak information in Marathi -२७ जून, १८९८ रोजी प्लेग समिती चे अध्यक्ष रॅट आणि लेफ्टनंट आर्यन्त याचा पुणे येथे खून झाला. याचा निषेद म्हणून लोकमान्य टिळक यांनी अतिशय प्रखर शब्दामध्ये आपल्या वृत्तपत्रामध्ये लिहिले गेले. लोकमान्य टिळक यांनी सुरु केलेल्या शिवजयंती आणि गणेश उत्सव यामुळे तरुण बाहेर असतात. आणि या तरुणांचा अश्या प्रकारच्या गुंडगिरी शी काहीही संबंध नाही. लोकमान्य टिळक यांनी ते तरुण वर्ग नसून ते सराईत गुंड च आहेत असे सांगितले.अश्या शब्दामध्ये लिहिले गेले. आणि त्यावेळी ब्राह्मण समाज इंग्रज सरकार च्या विरोध करत असत. “राज्य चालवणे म्हणजे सूद घेणे नाही ” अश्या शब्दामध्ये वृत्तपत्रामध्ये मजकूर प्रसारित केला. या सर्व गुन्ह्यांची चौकशी व्हावी आणि त्याच्यावर कठोर कायदा केला पाहिजे अशी लोकमान्य यांची मागणी होती.लोकमान्य टिळक यांनी जनतेला संयम पाळण्याचे आव्हान केले.

लोकमान्य टिळक यांनी केलेल्या त्या वेळचे अग्रलेख आणि लोकसभेमधील भाषण यांचा विचार करून लोकसभा सद्यस्य यांनी लोकमान्य यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी सगळ्यांनी विनंती केली.लोकमान्य यांनी आपल्या लेखामध्ये प्रखर शब्दामध्ये विरोध केला आणि याचा प्रभाव तरुण पिढीवर होऊ लागला. त्याचे तीव्र प्रतिसाद उमटू लागले.

निर्याणयासाठी न्यायालयाने ज्युरी ची स्थापना केली. ज्युरी मध्ये ९ सदस्य होते. त्यामध्ये निकाल वेळी टिळकांच्या विरुद्ध ९ पैकी ६ जणांनी निर्यण दिला गेला. न्यायालयाने त्याच्या विरुद्ध निर्यण दिल्यानंतर टिळक म्हणाले “न्यायालयाचा निर्यण काहीही असो, मी अपराधी नाही.” असे विधान केले.अश्या प्रकारे लोकमान्य टिळक यांच्या वरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. लोकमान्य टिळक यांनी हा खटला न्यायालयामध्ये हरला. त्यामुळे त्यांना या खटला विरुद्ध ६ वर्षाची शिक्षा देण्यात आली.

टिळकांचे लेखन

लोकमान्य टिळक यांनी लिहिलेले पंचांग पद्धती हे आता सुद्धा महाराष्ट्रामधील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाण या पंचांग चा वापर केला जातो.

  • श्रीमद भगवतगीता गीतेचे रहस्य – कर्म योग्य शास्त्र
  • आर्टिक होम ऑफ वेदाज
  • ओरायन
  • टिळक पंचांग पद्धती
  • वेदांचा काळ आणि वेदांचे ज्योतिष्य

महत्वाचे साल | Important Dates

महत्वाच्या घटनासाल
लोकमान्य टिळक यांचा जन्म२३ जुलै १८५६
केसरी वृत्तपत्र प्रथम प्रकाशित१८८१
सत्यशोधक समाजाची स्थापना१८७३
पत्नी सत्यभामा यांचे निधन७ जून १९९२
प्रथम हिंदू मुस्लिम दंगल१८९३
राज्यद्रोह चा गुन्हा, टिळक यांना ६ वर्षाची शिक्षा१८९८
गणेश उत्सवाची सुरवात१८९३

टिळकांचा मृत्यू | Death

१ ऑगस्ट १९२० या दिवशी लोकमान्य टिळक याना मधुमेह चा त्रास होत असल्याने त्याच्या शारीरिक प्रकृती खराब होत चालली आणि त्याचवेळी देशात चढत चालेल्या परिस्थिती चा परिमाण त्याच्या वर होऊ लागला. यासगळ्यांचा त्याच्या वर खूप परिणाम झाला. आणि त्यांची प्राणज्योत मालवली

लोकमान्य टिळक त्यांचे स्मरण –

लोकमान्य टिळक यांच्या मृत्युंनतर त्यांचे स्मरण करताना महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांनी असे लिहिले आहे कि, मुंबई मधील अथांग समुद्राकडे पाहताना निराशेचे वादळ मनात घोंगावत, एक अथांग असे वादळ अखेर शमले.

‘ ती कणखर मूर्ती धीट मराठी थाट
आदळतो जीवावर तो पश्चिम वाट
ती अजिंक्य छाती ताठर आणि रणशील
जी पाहून सागर थबके, परते आत ‘

निष्कर्ष | Conclusion

Lokmanya tilak information in Marathi, Lokmanya tilak mahiti वर दिलेली लोकमान्य टिळक यांची माहिती त्यांच्या जीवन चरित्र आणि काही अन्य लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकावरून घेतली गेली आहे. वरील माहिती फक्त शैक्षणिक उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिल्या गेलेल्या माहिती बद्दल काही अडचण असेल आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.

लोकमान्य टिळक यांचा जन्म कधी आणि कुठे झाला ?

२३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथील अगदी गरीब आणि लहानश्या ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म झाला.

” सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? ” हे वाक्य कुणाचे आहे?

” सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? ” हे वाक्य बाळ गंगाधर टिळक (लोकमान्य टिळक) यांचे आहे.

बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या शिक्षण संस्थेची स्थापना केली ?

१८८० मध्ये त्यांच्या महाविद्यालयीन मित्रांसोबत प्राथमिक शिक्षण साठी इंग्लिश स्कूल ची स्थापना केली

लोकमान्य टिळक यांनी शिवजयंती ची सुरवात कधी केली ?

१८९६ मध्ये लोकमान्य टिळक यांनी शिवजयंती ची सुरवात केली

Sharing Is Caring:

Professional content writer and SEO Expert

3 thoughts on “लोकमान्य टिळक माहिती |Lokmanya Tilak information in Marathi 2023”

Leave a Comment