Incredible Marathi Prem Kavita 2023 | मराठी प्रेम कविता

Rate this post

Marathi prem kavita |मराठी प्रेमकविता बहुतेक लोक प्रेमात असताना वाचतात आणि एकमेकांना पाठवतात. खाली जोडपे, पती-पत्नी, मित्र आणि कुटुंबासाठी काही मराठी प्रेम कविता आहेत.

Marathi prem Kavita are as follows

Marathi prem kavita title:-“जाणतो न मी तुला”

अजूनही मुळी जाणतो न मी तुला,
अजूनही जरी भेटलो न मी तुला,
तरी का वाटते आतून या मनाला,
प्रभू तूच माझा जो भेटतो युगाला.

देह जन्म जरी कुठे वाहून गेला
आतल्या खुणात जीव ओढावला

तू तो तसाच मी मनात पाहिला
प्रेममय स्नेहमय ह्रदयात जपला

तू जरी मुक पाषाण अबोल कोरला
गुणगंध रुपरंग सारे मीच सजविला

असो छंद काही वा आधार जीवा
परी अंत माझा तुझ्यातच व्हावा.


Marathi Prem Kavita Title:- “स्वप्नातली ती परी”

स्वप्नात रोज आजकल, येते कोणी अशी
काय सांगू ती परी दिसते तरी कशी ?

मोत्यांसारख्या नजरेने तिने वळून काय पाहिले
मन माझे त्याच क्षणी तिच्या प्रेमात हरवले

हसताना ती वाटतं, फक्त पाहतच रहावं
बोलताना ती वाटतं, फक्त ऐकतच रहावं

तिचाशी बोलताना कळतच नाही, वेळ कसा निघून जातो
क्षण तो तिथेच थांबावा, मनोमन हेच वाटत राहतं

जगाचं भान राहत नाही, आता तिच्या विचारात गुंतताना
माझा मी राहत नाही, आता तिच्या आठवणीत हरवून जाताना

जग वेगळे तिचे माझे, ती खरचं मला कधी भेटेल का ?
विचारावेसे वाटते तिला, किमान स्वप्नात माझी होशील का ?


Marathi Prem Kavita Title:- “तू आणि मी”

पहिल्यांदा जेव्हा पाहिलं मी तुला,
माझ्या मनाचं पाखरू लागलं होत उडायला
बाकी कशाचाचं नव्हतं रे मला भान,
काय करु, तुझ्यावरुन हटतचं नव्हतं माझं ध्यान
बोलायला तुझ्याशी मला शब्दांची गरज वाटत नव्हती,
कारण त्यासाठी तुझी एक नजरच पुरेशी होती
गंमत वाटत होती मला चोरून पाहताना तुझ्याकडे,
मन चिंब झालं होत,जेव्हा तू हसला होता पाहून माझ्याकडे
आपली ही पहिली भेट माझ्यासाठी खूप खास होती,
कारण या भेटीनेच कदाचित पण आपली मनं जुळली होती
माझ्या मनात फक्त तुला आणि तुलाच होती जागा,
माहित नव्हतं तरिही काय होता आपल्याला जोडणारा धागा
तुझ्याच विचारांत असायची मी नेहमीच दंग,
कारण तूच भरला होता ना माझ्या आयुष्याला रंग
समजायला लागलं होतं आता मलाही थोडं थोडं,
का झालं होत माझ मन तुझ्यात एवढं वेडं
गुंतला होता तुझ्यात जीव,माझं हृदयही तुझ्याचसाठी धडधडत होतं,
आता मात्र हे वेडं मन,तुझ्याच सोबतीची स्वप्न पाहत होतं
अन तुझ्याचसाठी जगतं होतं……


Marathi Prem kavita :-“प्रेम भावना”

माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
जीवनाच्या वाटेवर जीवनभर साथ देशील का?

माझ्या मनाच्या कोपऱ्यात
नयनांच्या माझ्या पापण्यात
थोडा वेळ विसावशील का ?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?

तुझ्या एका नजरे साठी
असतो सदा तुजपाठी
मज भरकटलेल्या
जीवन मार्गावर आणशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?

एकच ध्येय माझ्या जगण्याचे
तुला माझी झालेली बघण्याचे
करण्या मज इच्छापूर्ती
तू पुढे येशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?

तुझ्यात असतो मी गंभीर
करतेस मज तू अधीर
शेवटचे मागणे ..
हाती हात देशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना तू समजून घेशील का ?


Marathi Prem Kavita:-“वेड्या मनास माझ्या”

वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही
ये ना प्रिये समोरी जगण्यास मान नाही
वेड्या मनास माझ्या ………….

बघता तुझी सावली जचली या मनाला
हरवून भान सारे मी शोधतो कुणाला
वाटेवरी उभा त्या मी रोजचाच होतो
घेतांना थांग तुझा विचारतो कुणाला
वेड्या मनास माझ्या …………

वाटे हवा हवा का हा जीवनी किनारा
बघ वाहूनिया आला बेधुंद गार वारा
प्रेमाची साथ अपुली जोडू ये सांजवेळी
पाहू नकोस मागे समजून घे इशारा
वेड्या मनास माझ्या ………….

येतील चांद तारे देतील साक्ष तुजला
प्रेमात खोट नाही विचार या नभाला
आलीस तू जीवनी होऊन आशा नवी
दे अर्थ तू साजणी बेअर्थी जगण्याला

वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही
ये ना प्रिये समोरी जगण्यास मान नाही
वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही


Love poem In Marathi are below

Love poem in Marathi Title:-“प्रेम”

असं फक्त प्रेम असंत
त्याला हृदयातचं जपायचं
असतं प्रेमात अधिकार असतो
पण गाजवायचा नसतो प्रेमात
गुलाम असतो …
पण राबवायचा नसतो
प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं पण स्वतःला स्वातंत्र्य नसतं
नेहमीच एकट्याचं
असतं पण दुसऱ्याशिवाय
शक्य नसतं कळत नकळत
कसं होतं ते मात्र कधीच
कळत नसतं…
असं फक्त प्रेमच असतं


Love poem in Marathi title:-“खरे प्रेम”

खरे प्रेम असावे…..
कमळासारखे, जे पाण्याची
साथ कधीच सोडत नाही,
त्याच्याशि वाय ते कधीच
उगवत नाही….
खरे प्रेम असावे…..
गुलाबासारखे, जे कोमल
आणि सुगंधी जरी असले,
तरी काटयाची साथ कधीच
सोडत नाही….
खरे प्रेम असावे…..
आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण. .
कुठेही गेले तरी न संपणारे,
सदैव आपल्या बरोबर असणार
कारण…..
प्रेम हा काही खेळ नाही,
टाइम-पास करण्याचा तो
वेळ नाही


Love poem in Marathi:-“प्रेम म्हणजे काय” ?

प्रेम म्हणजे ?

प्रेम म्हणजे तुला मिठीत घेण्यासाठी धावलेल्या त्या गार सरी आणि माझ्या मिठीत येण्यासाठी धावलेली तूऽऽ

प्रेम म्हणजे ?

प्रेम म्हणजे अथांग सागराच्या किनारयावर तुझ्या सोबत चालण्याचे पाहिलेले ते स्वप्न आणि त्या स्वप्नाला प्रत्यक्षाचे स्वरूप देणारी तू

प्रेम म्हणजे ?

प्रेम म्हणजे तुझ नाव वाचल्यावर माझ्या ओठांवर नकळत येणारे हसू आणि ते हसू येण्याचे मुख्य कारण म्हणजे तू.

प्रेम म्हणजे ?

प्रेम म्हणजे माझ्या मोबाईवर दररोज सकाळी येणारा पहिला गुडमोर्निंगचा तुझा मेसेज आणि दररोज शेवटचा गुडनाईट मेसेज पाठवणारी तू”

प्रेम म्हणजे ?

प्रेम म्हणजे माझ्या डायरीच्या पहिल्या पाना पासून ते शेवटच्या पाना पर्यंत असलेला तुझा ऊल्लेख आणि त्या डायरीचे कारण आणि ओळख हि तू.


Love poem in Marathi title :-“तू आणि मी”

तू आणि मी,अशी फक्त
कल्पना असावी
सोनेरी त्या क्षणाला,
एकांताची साथ असावी
गुलमोहराचा बहर,आणि तिथेच
आपली भेट असावी
जसे एखाद्या पाखराची,गोड
ड्रीम डेट असावी

तू मात्र
आवडत्या,आकाशी रंगाच्या पोशाखात
असावी
आकाशालाही हेवा वाटावा ,इतकी तू
सुंदर दिसावी
रंगलेल्या त्या गप्पांमध्ये,प्र
ेमाची पण ओढ असावी
एकमेकात गुंतून
जाताना,परतीची मात्र
तमा नसावी
निरोप
घेताना डोळ्यां मध्ये,अश्रुची एक
झलक दिसावी
डोळ्यां मधले भाव
जाणुनी,नाजुकशी ती मिठी असावी
जीवओतला तुझिया पाई,आशा तुझीही हीच
असावी
एकांताची साथ अशी हि,
दरवेळी रम्य असावी.


Love poem in marathi title :-“प्रेम करतो तुझ्यावर”

तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार,
प्रेम करतो तुझ्यावर त्याला
मी काय करणार,
पण काय आहे तुझ्यावर
मला कळत नाही
तुला पाहिल्या शिवाय
माझा दिवस जात नाही.


Heart touching love poem in marathi are below

Heart touching love poem in Marathi title:-“प्रेम असतं एक”

प्रेम असते एक भावना
किशोर मनातील प्रोढ याचना
प्रेम असते मनांचा हव्यास
त्यात असतो आनंदाचा निवास..

प्रेम असते एक लाट
भावनांचं सागर जे उफाळती
प्रेम असते दोन मनांचा मिलाप
गात असतो आपलाच अलाप

प्रेम असते एक बंधन
हृदयाचे सौंदर्य वाढवणारे चंदन
प्रेम असतं मनातील अदृश्य गोंदणं
उगवतं सहजीवनी नात्यांचं चांदणं


heart touching love poem in Marathi title:-“प्रेम करावं वाटतं”

खरंच प्रेम करावं वाटतं
एखाद्या सोबत आयुष्य जगावं वाटतं
खरंच प्रेम करावं वाटतं
प्रेम रंगात चिंब रंगून जावं वाटतं
उगाच ऐकले असुनी वाटतं
स्वीकारून एखाद्याला जीवनाशी लढावं वाटतं
खरंच प्रेम करावं वाटतं
अनोळखी ह्या ना त्या दुःखांशी जुडावं वाटतं..
खरंच प्रेम करावं वाटतं
मिठ्ठीत कोणाच्या तरी रडावं वाटतं…
खरंच प्रेम करावं वाटतं
काळजाशी एखाद्याचा काळीज भिडावं वाटतं…


Heart touching love poem in Marathi title:-“प्रेमाची भाषा “

आश्रू हि प्रेमाची मौन
भाषा आहे,
काही कारणामुळे आश्रू
डोळ्यातून बाहेर येतात ….
ह्याचा अर्थ
तुम्ही अडचणीत आहात
पण कारण
नसतानाही जेव्हा आश्रू
येतात ………. ह्याचा अर्थ
तुम्ही प्रेमात आहात.

हे सुद्धा वाचा –Bhaubeej Wishes In Marathi 


Heart touching love poem in Marathi title:-“मन”

कशाला हे मन कुणाच्या प्रेमात पडतं,
तू प्रेमात पडलास आपल्याला का सांगत,
कशाला कुणाच्या आठवणीन रात्र रात्र जागत,
कुणी भेटलं नाही तर अश्रू का गाळत,
कशाला कुणाला भेटायला मन इतकं तडफडत,
भेटून गेल्यावरही भेटीसाठी का तळमळत,
कशाला कुणासाठी मन क्षण क्षण झुरत,
रात्रंदिवस विचार करून या जीवाला छळत,
कां इतकं कुणी मनास आवडून जात,
रंगेबिरंगी स्वप्नांना मनात पेरून जात,
हे माझं प्रेम मनाला कसं कळत,
कां आतला आवाज ऐकून मन वेड होत,
काही कां असे नां काहीतरी असं घडतं,
हेचं आपलं प्रेम आपल्याला कळून जात…


Heart touching love poem in Marathi title:-“खरं प्रेम”

खरं प्रेम म्हणजेतडजोड
करण्याची तयारी असणं.
खरं प्रेम म्हणजे
एकमेकांच्या गुणांना जपणे.
खरं प्रेम म्हणजे दुखावलेली
मने परत जोडणे.
खरं प्रेम म्हणजे भांडण

करुन परत जवळयेणे.
खरं प्रेम म्हणजे एकही शब्द
न उच्चारता भावना पोहोचणं.
खरं प्रेम म्हणजे डोळ्यात
फक्त आनंदाश्रु असणं

मराठी कविता पहायचा असतील तर Youtube लिंक वर क्लिक करा :-  Marathi Prem Kavita


Heart touching love poem in Marathi title:-“तुला पाहताना”

तुला पाहताना फक्त
पाहतच राहावस वाटत…
तुझ्या डोळ्यात स्वतःला
सामावुन घ्यावावसे वाटते..
खरच..
किती सुंदर कल्पना
असते ना प्रेमाची..
ज्याच्यावर आपण प्रेम करतो
त्याच्यासाठीच
आयुष्य जगावेसे
वाटते..
आणि त्याच्याच मिठीत
आयुष्य सरावेसे वाटते…


Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली कविता एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काहीकॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

1 thought on “Incredible Marathi Prem Kavita 2023 | मराठी प्रेम कविता”

Leave a Comment