Marathi Poem 2023 | मराठी कविता

Rate this post

Marathi Poem आज आम्ही ह्या ब्लॉग मध्ये लिहलेले आहेत.कविता अतिशय सुंदर आहेत तुम्ही एकदा वाचा तुम्हाला नक्की आवडेल.

Marathi Poem | मराठी कविता प्रेमाच्या आठवणी शीर्षक :-“मन आठवणी”

आठवणीत कधी जेव्हा मन
वेड हरवते
कोसळणाऱ्या पावसात मग
आसवांना लावपते
लपलेच प्रेम आणि न
विसरलेल्या आठवणी
ढगालेल तेच वातावर पण
कोसळत नाहीत
आता पुन्हा त्याच टपोर्या
थेंबाच्यासरी

वाहत राहता आता फक्त
त्याच वेड्या आठवणीच्या लहरी..!!


Marathi Poem | मराठी कविता प्रेमाच्या आठवणी शीर्षक :-“आठवणींना”

आठवणींतल्या आठवणींना
हळुच आठवायचं असतं.
डोळे पान्हावलेले असले तरी
मंद गालातल्या गालात हसायचं असतं.

मराठी कविता प्रेमाच्या आठवणी शीर्षक :-“आठवणींचा गुच्छ”

आठवणींचा हा गुच्छ,
कोप-यात मनाच्या साठवण्यासाठी.
सोंग करुन विसरल्याचं,
पुन्हा एकदा आठवण्यासाठी


Marathi Poem | मराठी कविता प्रेमाच्या आठवणी शीर्षक :-“आठवणी माझ्या”

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील
जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन…
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन…
तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा…
माझ्यासाठी अश्रू दाटतील….
माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील.


मराठी कविता प्रेमाच्या आठवणी शीर्षक :-“आठवणी”

आठवणीच्या हिंदोळ्यावर
तुझे माझे भेटणे
एकांती पावूल वाटेवर
तुझ्या आठवणीतच माझे चालणे


Love poem In Marathi शीर्षक :-” तू कोण ?”

आहेस तरी तू कोण?
काळजाचा प्रत्येक ठोकाही
तुझेच नाव सांगून जातो,
तुझ्या आठवणीत दिवस
संपून जातो,
ओठांपर्यंत येते तुझे नाव,
स्वप्नांच् याच जगात राहू दे
मला असे तू परत परत
सांगून जातो.


Love poem In Marathi शीर्षक :-“इतकी वर्षे झाली”

इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस..
दूर आपण झालो कधीचे..प्लीज़, आठवणींत भेटू नकोस.
झालंय ब्रेक अप तरीही,डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस..
खरेच सांगू का तुला,माझ्या मनात तू आत राहू नकोस!
यायचे आहे तर समोर ये…होऊ दे खरीखुरी भेट !
वाट पाहणाऱ्या डोळ्यांना दे….असे छान सरप्राइज स्ट्रेट…!!


Love poem In Marathi शीर्षक :-“मन तुझ्यासाठीच झुरत”

मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं


Love poem In Marathi शीर्षक :- ” हृदय”

एका मिनिटा मध्ये
७२ वेळा आपलं हृदय
धडधडत असते …………. पण
तुझे हृदय एका मिनिटात
एकदाच जरी धडधडले
तरी तू जिवंत राहू
शकशील, ………… कारण
एका मिनिटात ७१
वेळा माझे हृदय
तुझ्यासाठीच धडधडत असते .


Love poem In Marathi शीर्षक :-“माझं मन”

का कळत नाही तुला माझंही एक मन आहे
जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे
सगळं कळतयं त्याला की तु माझआ होवू शकत नाही
कारण तुलाही आता दुसऱ्या कोणाचीतरी आस आहे..


Love poem In Marathi शीर्षक – “पहिलं प्रेम मराठी कविता”

पहिलं प्रेम मराठी कविता शीर्षक :-“हृदयाची राणी”

झोप उडून गेली, आयुष्याला नवी दिशा मिळून गेली.,

प्रेमाचं रोपट हृदयात लावून गेली, नव्या विश्वाची ओळख होऊन गेली.,

कळली नाही प्रीत मनी कशी फुलली, कधी माझ्या हृदयाची राणी ती झाली.,

माझ्या मनाचं रान ती बहरून गेली, माझा सारा वसंत ती लुटून गेली.,

माझ्या भोळ्या मनाला ती गुंतवून गेली, मला कायमचा तिचा करून गेली.


पहिलं प्रेम मराठी कविता शीर्षक :- “तुझी आठवण “

का मलाच तुझी इतकी आठवण येते,
माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते,
प्रत्येक क्षण तुला मन घेऊन फिरते,
तुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते,
स्वप्नातही तुझी आठवण मला गं छळते,
बंद पापण्या असतांनाही मन तुलाच बघते,
रोज रात्री निजतांना उचकी गं लागते?
तुलाही येते आठवण तेव्हा मज कळते,
प्रेमात पडल्यावर सखे असेच गं घडते,
हे मन बावरे होऊन आठवणींच्या झुल्यावर झुलते.


पहिलं प्रेम मराठी कविता शीर्षक :-“ती आली आयुष्यात”

ती आली आयुष्यात
मी बेभान झालो,
कळले नाही कधी
मी तिच्यात गुंतलो.,
जेव्हापासून तिच्या प्रेमात
मी हरवून गेलो,
कळले नाही कसा
शब्दांशी खेळू लागलो.,
तिच्या प्रेमरंगात
मी देहभान विसरलो,
तिच्या प्रितीन पुरता
मी झपाटला गेलो.,
वेगवेगळ्या भावनांना
ती जन्म देते,
माझ्या हातून सार
ती लिहून घेते.,
माझी कविता म्हणजे
तिचा न माझा संवाद असतो,
मी फक्त तिच्यावर
वेड्यासारखं प्रेम करतो.,
कवी नाही मी
हे माझं प्रेम आहे,
चार दोन कविता करून
प्रेम थोडच थांबणार आहे.,
माझं प्रेम जगावेगळ
ते कधीच मिटणार नाही,
हे जग सोडेपर्यंत
हि भावना मनातून जाणार नाही…..


पहिलं प्रेम मराठी कविता शीर्षक :- “प्रेम म्हणतो”

तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो
,निरोप तुझा घेताना डोळ्यातअस्रु आणतो,
असे का बरे होते..
हेच का ते नाते,ज्याला आपण प्रेम म्हणतो…♥


पहिलं प्रेम मराठी कविता शीर्षक :- ” वचन “

तुझ प्रत्येक म्हणन ऐकल,
तुझ्यासाठी जगणच टाळल,
अगदी तुला विसरायचेही
तुला दिलेल प्रत्येक वचन पाळल!

हे सुद्धा वाचा – Mantra Pushpanjali In Marathi


Prem kavita in marathi शीर्षक “माझा आनंद

तुझ्या असण्यात तर माझा
आनंद जुडला आहे ,
तुझ्या डोळ्यात तर माझा
गाव वसला आहे .
तुझ्या ओठांवरचं हसु
कधीच कमी होऊ देऊ
नकोस. . . .
तुझ्या त्या हसण्यासाठीच
तर माझा हा जन्म आहे.


Prem kavita in marathi शीर्षक :-“तुझ्या आठवणी म्हणजे”

तुझ्या आठवणी म्हणजे… मोरपिसाचा हळूवार स्पर्श,
तुझ्या आठवणी म्हणजे… नकळत निर्माण होणारा हर्ष,
तुझ्या आठवणी म्हणजे… स्वप्नांनी सजवलेलं एक गाव,
तुझ्या आठवणी म्हणजे… विरह सागरात हरवलेली नाव!!


Prem kavita in marathi शीर्षक आयुष्य”

तुझ्यापुढं मला हे जगच
वटतं लहान,
जिथं आहे तुझे प्रेम महान,
म्हणून्च माझं आयुष्य
तुझ्यापुढं टाकलं मी गहान.


Prem kavita in marathi शीर्षक :-“प्रेम म्हणजे तू”

तुझ्याविना प्रेमाची
कल्पनाच असह्य झाली
प्रेमाला काय महत्व?
हे तू मज शिकविले,
प्रेम म्हणजे तू
… तू म्हणजे आयुष्य.
आयुष्यात प्रेमाचा अर्थ
समजावला तुने
तुझ्या प्रेमाची आता
इतकी सवय झाली
तुझ्याशिवाय प्रेमाची
कल्पनाच असह्य झाली .


Prem kavita in marathi शीर्षक “प्रेम भागीदार”

तुझ्या प्रत्येक सुखात
भागीदार व्हायचं …
तुझ्या प्रत्येक दुखात तुझा
आधार व्हायचं …..
तुझ्या प्रत्येक श्वासातला
श्वास व्हायचं …..
तुझ्या प्रत्येक ठोक्यातील
भाग व्हायचं… …
तुझ्या मनातील वेदनांचे
मलम व्हायचेआहे…..
देवा जवळच्या प्रार्थनेतील
मागणं व्हायचं… .

तुझ्या अंधारलेल्या जीवनातील
दिवा व्हायचं… ..
तुझ्या डोळ्यातील स्वप्न व्हायचं
तुझ्या हसण्याचे कारण
व्हायचे आहे….
श्वासाच्या शेवटल्या क्षण.


Prem kavita in marathi – “प्रेम भावना

प्रेम असते एक भावना
किशोर मनातील प्रोढ याचना
प्रेम असते मनांचा हव्यास
त्यात असतो आनंदाचा निवास..

प्रेम असते एक लाट
भावनांचं सागर जे उफाळती
प्रेम असते दोन मनांचा मिलाप
गात असतो आपलाच अलाप

प्रेम असते एक बंधन
हृदयाचे सौंदर्य वाढवणारे चंदन
प्रेम असतं मनातील अदृश्य गोंदणं
उगवतं सहजीवनी नात्यांचं चांदणं.

मराठी कविता पहायचा असतील तर Youtube लिंक वर क्लिक करा :- Love Poem In Marathi


Prem kavita in marathi शीर्षक -” प्रेम म्हणजे ?


प्रेम म्हणजे ?

प्रेम म्हणजे तुला मिठीत घेण्यासाठी धावलेल्या त्या गार सरी आणि माझ्या मिठीत येण्यासाठी धावलेली तू!!

प्रेम म्हणजे ?

प्रेम म्हणजे अथांग सागराच्या किनारयावर तुझ्या सोबत चालण्याचे पाहिलेले ते स्वप्न आणि त्या स्वप्नाला प्रत्यक्षाचे स्वरूप देणारी तू!

प्रेम म्हणजे ?

प्रेम म्हणजे तुझ नाव वाचल्यावर माझ्या ओठांवर नकळत येणारे हसू आणि ते हसू येण्याचे मुख्य कारण म्हणजे तू!!

प्रेम म्हणजे ?

प्रेम म्हणजे माझ्या मोबाईवर दररोज सकाळी येणारा पहिला गुडमोर्निंगचा तुझा मेसेज आणि दररोज शेवटचा गुडनाईट मेसेज पाठवणारी तू”!

प्रेम म्हणजे ?

प्रेम म्हणजे माझ्या डायरीच्या पहिल्या पाना पासून ते शेवटच्या पाना पर्यंत असलेला तुझा ऊल्लेख आणि त्या डायरीचे कारण आणि ओळख हि तू.


शीर्षक – “प्रेम झालं

कधी इतकं प्रेम झालं….
काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलंस….
काही कळलंच नाही,
पहिल्यांदा क धी आवडलीस
हे खरंच नाही आठवत,
पण आठवण काढल्याशिवाय
आता खरंच नाही राहवत.


Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली कविता एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काहीकॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Leave a Comment