श्री महालक्ष्मी स्तोत्र मराठी मध्ये |Mahalaxmi Stotra in Marathi 2

5/5 - (3 votes)

Mahalaxmi Stotra in Marathi – नमस्कार भक्तांनो आज आपण Mahalaxmi stotra in Marathi, Laxmi stotra in Marathi, महालक्ष्मी अष्टक स्तोत्र PDF संपूर्ण महालक्ष्मी स्तोत्र पाहणार आहोत. संपूर्ण महालक्ष्मी स्तोत्र मराठी मध्ये आणि त्याच बरोबर संस्कृत मध्ये पाहणार आहोत. आणि तुम्ही संपूर्ण महालक्ष्मी स्तोत्र तुम्ही PDF च्या रूपाने डाउनलोड करून घेऊ शकता.

महालक्ष्मी स्तोत्र मराठी
महालक्ष्मी स्तोत्र संस्कृत

Mahalaxmi Stotra in Marathi | महालक्ष्मी स्तोत्र

सुंदरे गुणमंदिरे करुणाकरे कमलोद्भवे |
सिद्धचारण पूजिती जनवंदिते महावैश्णवे || 1 ||

त्राहि हो मज पाही हो मज पाही हो महालक्ष्मी |
हेमभावन रत्नकोन्दण हे सिंहासन आसनी || 2 ||

एक एक विचित्र माणिक जोडिले मुकुटावरी |
त्यासि देखुनी लोपला शशि चालला गगनोदरी || 3 ||

कुण्डले श्रवणी रवि शशि मंडळासम वर्तुळे |
डोलता सुरनायकावरि हालताती चंचले || 4 ||

कंचुकी कुचमंडळावर हार चंपक रुळती |
पारिजातक शेवती बटमोगरा आणि मालती || 5 ||

पिवळा पट तो कटी तटी वेष्टिल्या बरवे परी |
सौदामिनीहुनी तेज अधिक ते शोभते उदरावरी || 6 ||

कमुकावर मन्मथे शरसज्जिल्या तैशा निर्या |
गर्जती पद पंकजी किती नुपुरे आणि घागर्या || 7 ||

इंद्र चंद्र महेंद्र नारद पाद पंकज अर्पिती |
कुंकुमागुरु कस्तूरी किती आदरे तुज चर्चिती || 8 ||

निर्जळे तुज पूजिता बहु शोभिसी कमलासनी |
किती हो तुज वर्णु मी मज पाव हो कुलस्वामिनी || 9 ||

कोटि तेहतीस देवतांसवे घेऊनी विन्झणे करी |
चामरे चिरपल्लवे तुज ढाळिती परमेश्वरी || 10 ||

नामामृत दे निरंतर याचकाप्रती गिरीसुते |
जोडुनी कर विनवितो मज पाव हो वरदेवते || 11 ||

संकटी तुज वाचुनी मज कोण रक्षिल अम्बिके |
कृष्णकेशव प्रार्थतो मज पाव हो जगदम्बिके || 12 ||

हे सुद्धा वाचा
मारुती स्तोत्र
हनुमान चालीसा

Laxmi stotra in Marathi & sanskrit | लक्ष्मी स्तोत्र संकृत

नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते |
शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तुते || 1 ||

नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरि |
सर्वपापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते || 2 ||

सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरि |
सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते || 3 ||

सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि |
मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते || 4 ||

आद्यन्तरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि |
योगजे योगसम्भूते महालक्ष्मि नमोऽस्तुते || 5 ||

स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे |
महापापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते || 6 ||

पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणि |
परमेशि जगन्मातर् महालक्ष्मि नमोऽस्तुते || 7 ||

श्वेताम्बरधरे देवि नानालङ्कारभूषिते |
जगत्स्थिते जगन्मातर् महालक्ष्मि नमोऽस्तुते || 8 ||

महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं यः पठेद्भक्तिमान्नरः |
सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा || 9 ||

एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम् |
द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्यसमन्वितः || 10 ||

त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम् |
महालक्ष्मिर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा || 11 ||

|| इति श्री महालक्ष्मीस्तव ||

[PDF] Download Mahalaxmi Stotra

तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरून PDF डाउनलोड करता येईल.

Conclusion | निष्कर्ष

आज आपण संपूर्ण महालक्ष्मी स्तोत्र वरती पाहिलं. तुम्ही वरती संपूर्ण महालक्ष्मी स्तोत्र डाउनलोड करून घेऊ शकता.

तुम्हाला संपूर्ण पोस्ट कशी वाटली आम्हाला नक्की कंमेंट मध्ये कळवा. आणि तुम्हाला पोस्ट किंवा website बद्दल काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला [email protected] या मेल वर मेल करू शकता. आम्ही तुम्हाला लवकरात लवकर उत्तर देऊ.
धन्यवाद !!

Sharing Is Caring:

Professional content writer and SEO Expert

4 thoughts on “श्री महालक्ष्मी स्तोत्र मराठी मध्ये |Mahalaxmi Stotra in Marathi 2”

Leave a Comment