Maruti stotra in Marathi | मारुती स्तोत्र मराठी

5/5 - (2 votes)

Maruti stotra in Marathi (Hanuman stotra in Marathi) – नमस्कार ! आज आपण मारुती स्तोत्र मराठी मध्ये पाहणार आहोत. तसेच तुम्ही या पोस्ट मध्ये संपूर्ण मारुती स्तोत्र Hanuman stotra PDF, Maruti stotra PDF मध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. खाली मारुती स्तोत्र संपूर्ण मराठी मध्ये वाचता येईल तुम्हाला

Maruti stotra in Marathi | मारुती स्तोत्र मराठी –

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||

महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें |
सौख्यकारी दुःखहारी, दुत वैष्णव गायका ||२||

दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा |
पाताळदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका ||४||

ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोटला पुढें |
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||

ब्रह्मांडे माईलें नेणों, आवळे दंतपंगती |
नेत्राग्नीं चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६||

पुच्छ ते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरीं |
सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७||

ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू |
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे |
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ||९||

आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती |
मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ||१०||

अणुपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे |
तयासी तुळणा कोठे, मेरू मंदार धाकुटे ||११||

ब्रह्मांडाभोवतें वेढें, वज्रपुच्छें करू शकें |
तयासी तुळणा कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||

आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा |
वाढतां वाढतां वाढें, भेदिलें शून्यमंडळा ||१३||

धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही |
पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही |
नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||

हे धरा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी |
दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळागुणें ||१६||

रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू |
रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ||१७||

॥ इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।।

Hanuman stotra PDF Download | हनुमान स्तोत्र PDF –

Hanuman stotra in Marathi –

Maruti stotra in Marathi, Hanuman stotra in Marathi, Hanuman stotra PDF खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही हनुमान चालीसा डाउनलोड करून घेऊ शकता.


हे सुद्धा वाचा
हनुमान चालीसा मराठी मध्ये | Hanuman stotra PDF Download
संपूर्ण गणपती आरती

महालक्ष्मी स्तोत्र

Conclusion | निष्कर्ष –

Maruti stotra in Marathi, Hanuman stotra in Marathi, Hanuman stotra PDF –

वर दिलेली पोस्ट तुम्हला कशी वाटली नक्की कंमेंट मध्ये कळवा. आणि तुम्हाला कन्टेन्ट मध्ये काही अडचण असेल तर आम्हाला [email protected] यावरती मेल करा आम्ही तुम्हला लवकरात लवकर उत्तर देऊ.
धन्यवाद !!

Sharing Is Caring:

Professional content writer and SEO Expert