Great Subhash Chandra Bose Information In Marathi 2023

Rate this post

Subhash Chandra Bose Information In Marathi – भारताच्या स्वतंत्र लढ्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस याचा मोलाचा वाटा आहे. नेताजी हे अतिशय धाडसी नेते होते.आज आपण आपल्या पोस्ट मधून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा संपूर्ण जीवन प्रवास पाहणार आहोत. तुम्हाला पोस्ट कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.

नावसुभाष चंद्र बोस
जन्म ठिकाणकटक ओरिसा
जन्म तारीख२३ जानेवारी १८९७
वडिलांचे नावजानकीनाथ बोस
आईचे नावप्रभावती देवी
मृत्यू१८ ऑगस्ट १९४५

Subhash Chandra Bose Childhood | सुभाषचंद्र बोस यांचे बालपण

Subhash Chandra Bose Information In Marathi | सुभाषचंद्र बोस यांच्या बालपणाची माहिती खालीलप्रमाणे आहे.

सुभाष चंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ ला ओरिसा येथील कटक शहर येथे झाला.सुभाष चंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ व आईंचे नाव प्रभावती असे होते. जानकीनाथ यांना १४ मुले होती.ह्या मध्ये ६ मुली व ८ मुले होते. सुभाष चंद्र बोस ६ वे अपत्ये होते.त्यांचे वडील कटकचे प्रथितयश वकील होते. आईही अत्यंत सुशील व धार्मिक वृत्तीची होती.

Subhash Chandra Bose Education | सुभाषचंद्र बोस यांचे शिक्षण

सुभाषबाबूंचे प्राथमिक शिक्षण हे प्रॉटिस्टंट युरोपियन शाळेत झाले होते. ही शाळा ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या मार्फत चालविली जाई. तिथे ख्रिश्चन व ख्रिश्चनेतर विद्यार्थी यामध्ये भेदभाव केला जाई. हा भेदभाव सुभाषचंद्राना आवडत नसे. ह्या शाळेत ७ वर्षे काढल्यावर ते दुसऱ्या शाळेत गेले आणि तेथून ते मॅट्रिक पासझाले.

तेथून ते उच्च शिक्षणासाठी कलकत्ता येथील प्रेसिडन्सी कॉलेजात गेले. त्या कॉलेजात शिकत असताना एका इंग्रज प्राध्यापकाने ‘You black Indian’ असे एका भारतीय विद्यार्थ्याला म्हणून त्यानी त्याचा अपमान केला होता. ह्या घटनेला सुभाषबाबूंनी व इतर विद्यार्थ्यांनी विरोध केला व कॉलेजात हरताळ पाळला. पण तरीही त्या प्राध्यापकाने त्यांची क्षमा मागितली नाही म्हूणून सुभाषबाबूंना देऊन त्यांना कॉलेजातून काढून टाकले. १५ महिने ते त्यानंतर कॉलेजात प्रवेश मिळण्यासाठी फिरत होते.

अखेर कलकत्ता विद्यापीठाने परवानगी दिल्यावर सुभाषबाबू स्कॉटिश चर्च कॉलेजमधून १९१९ साली बी. ए. झाले. कॉलेजात असताना त्यांची प्रवृत्ती अध्यात्माकडे वळली. महर्षि अरविंद घोष यांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला. १९१४ साली ते गुरूच्या शोधात बाहेर पडली. पण गुरू मिळाला नाही. नंतर ते परत आले. त्यांना त्यांच्या वडिलांनी ICS होण्याकरिता इंग्लंडला पाठविले. तेथे ते ICS परीक्षा उत्तीर्ण झाले. पण त्यांनी सरकारी नोकरी करावयाची नाही असे ठरविले. आणि आपली ICS पदवी त्यांनी परत केली. कारण त्यांचे मत असे होते की, “इंग्रजांच्या राज्याशी निष्ठा ठेवून, प्रामाणिकपणे भारताची सेवा करणे हे त्यांच्या मनला पटत नव्हते .” ते भारतात परत आले.

हे सुद्धा वाचाLokmanya Tilak Information In Marathi

Arrival Of Subhash Chandra Bose | सुभाषचंद्र बोस यांचे भारतात आगमन

सुभाष चंद्र बोस १९२० साली जेव्हा परत आले तेव्हा गांधींजीं चे सत्याग्रह आंदोलन चालू होते .२० जुलै १९२१ साली सुभाष चंद्र बोस आणि गांधीजी पहिली भेट झाली .सुभाष चंद्र बोस यांनी देशाची परिस्तिथी बघून त्यांनी देश स्वतंत्र करण्याचे ठरवले.त्याच प्रमाणे त्यांनी आपले निर्णय घेणास सुरवात केली.
१९२१ साली बेझवाडा येथील काँग्रेसच्या अधिवेशनात असहकार आंदोलनाचेसंचालन कसे करावयाचे ह्यासाठी सुभाषबाबूंनी एक स्वयंसेवक दल तयार केले. पण सरकारने ते बेकायदेशीर ठरविले. १९२१ साली त्यांना पकडून तुरुंगात टाकण्यात आले . हा त्यांचा पहिला तुरुंगवास होता.

Swaraj Party | स्वराज पक्ष

काही काँग्रेस नेते सोबत मतभेद झाल्यामुळे ३१ डिसेंबर १९२२ रोजी चित्तरंजन दास यांनी काँग्रेस अध्यक्ष पदी राजीनामा दिला व सुभाषचंद्र बोस , मोतीलाल नेहरू यांचा सोबत स्वराज्य पक्ष स्थापना केली.

१९२४ साली निवडणूक मध्ये स्वराज पक्षला चांगला यश मिळाले देशबंधू कलकत्ता कॉर्पोरेशनचे पहिले महापौर म्हणून निवडून आले आणि सुभाषचंद्र बोस यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. काही महिन्यांतच, सुभाषचंद्र बोस कलकत्ता कॉर्पोरेशनच्या प्रशासनाला एक नवीन दिशा आणि गती देण्यास सक्षम झाले.

1924 च्या मध्यात, स्वराज पक्ष आणि त्याचे नेते देशबंधू चित्तरंजन दास यांचा प्रभाव आणि प्रतिष्ठा नवीन उंचीवर पोहोचली. स्वराज पक्ष एकापाठोपाठ एक यश मिळवत असल्याने ब्रिटीश सरकार यापुढे प्रतीक्षा करू शकत नव्हते. अत्यंत हताश होऊन सरकारने संघटनेच्या मुळावरच प्रहार करण्याचा निर्णय घेतला आणि 25 ऑक्टोबर 1924 रोजी सुभाषचंद्र बोस यांना अटक करून रंगूनला पाठवण्यात आले. 1925 मध्ये चित्तरंजन दास यांच्या निधनाने स्वराज पक्षाचे सदस्य शांतपणे काँग्रेस पक्ष मध्ये परतले.

सायमन कमिशन भारतात १९२८ साली भारतात आले तेव्हा इंडियन काँग्रेस आक्रमक झाली व त्यांचा निषेधसाठी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आली.. कोलकात्त्यात सुभाष चंद्र बोस यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते .१९३० साली सुभाषचंद्र बोस कारावासात असताना त्यांची कोलकात्त्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यामुळेसरकारला त्यांची सुटका करणे भाग पडले.
१९३२ साली सुभाष चंद्र बोस यांना अलमोडा येथील तुरुंगात ठेवणच्या निर्णय ब्रिटिश सरकार ने घेतला होता.
अलमोडा तुरुंगात त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. डॉक्टर यांच्या सल्यानुसार सुभाष चंद्र बोस यांनी युरोप ला काही वर्षांसाठी स्थलांतर होण्याचा निर्णय घेतला.


Subhash Chandra Bose leaves for Europe | सुभाष चंद्र बोस युरोपला रवाना

१९३३ पासून १९३६ पर्यंत सुभाष चंद्र बोस यांना उपचारासाठी युरोप मध्ये थांबले .. युरोप मधील वास्तव्यात सुभाष चंद्र बोस आपल्या तब्येतीची काळजी घेतानाच, आपले देश कार्य चालू ठेवले.सुभाष चंद्र बोस यांनी इटलीचे नेते मुसोलिनी युरोप मध्ये असताना अनेकदा भेट घेतली व भारताला स्वतंत्र कसे मिळेल यावर चर्चा केली व मुसोलिनीने त्यांना सहकार्य आश्वासन ही दिले.


Congress Party President and Resignation | काँग्रेस पक्ष अध्यक्ष आणि राजीनामा

१९३८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन हरिपुरा येथे झाले. हया अधिवेशनासाठी गांधीजींनी काँग्रेसचे
अध्यक्ष म्हणून सुभाष चंद्र बोस यांची निवड केली. हे काँग्रेसचे ५१ वे अधिवेशन होते. गांधीजी आणि बोस यांच्या मध्ये अनेक वैचारिक मतभेद होते.त्यामुळे सुभाष चंद्र बोस यांना फार अडचणी येथ होत्या.

१९३९ मध्ये, गांधीजी आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या पाठिशी असलेल्या डॉ. पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव करून सुभाषचंद्र बोस काँग्रेस अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आले. सुभाष चंद्र बोस निवडून आले होते ते गांधीजी ना आवडले नव्हते. गांधीजी ना सुभाष चंद्र बोस यांचे आक्रमक अथवा हिंसा विचारधरा मान्य नव्हते.पक्ष मध्ये अंतर्गत वाद वाढत चले होते. सुभाष चंद्र बोस यांना काँग्रेस व गांधीजी मध्ये आणि मतभेद नको व काँग्रेस च्या विचारधारा मान्य नव्हता म्हणून २९ एप्रिल १९३९ रोजी काँग्रेस अध्यक्ष पदीचा राजीनामा दिला.

हे सुद्धा वाचाDr Babasaheb Ambedkar information in Marathi

Forward Bloc Party | फॉरवर्ड ब्लॉक पार्टी

३ मे १९३९ रोजी, सुभाष चंद्र बोस सुभाष चंद्र बोस यांनी काँग्रेस मध्ये त्यांचे मतभेद होत असल्यामुळे त्यांनी स्वतःचा फॉरवर्ड ब्लॉक पक्ष ची स्थापना केली.
दुसरे महायुद्ध सुरू होणार हे जेव्हा सुभाष चंद्र बोस यांना लक्ष्यात आले तेव्हा त्यांचा पक्ष , फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी, तयारी जोरदार सुरू केली. फॉरवर्ड ब्लॉक मुळे ब्रिटिश ना काही अडचण येऊ नाही म्हणून इंग्रज सरकारने सुभाष चंद्र बोस सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. तुरंगात आमरण उपोषण चालू करून सुभाष चंद्र बोस यांनी आपली तुरंगातून सुटका करून घेतली.


Escape From India | भारतातून सुटका

ब्रिटिश सरकार सुभाष चंद्र बोस यांच्या वर नजर ठेवून होते . ब्रिटिश सरकारच्या नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाष चंद्र बोस यांनी उपाय काढला.. जानेवारी १६, १९४१ रोजी पठाणी वेशभूषेत,महमद झियाउद्दीन असे नाव धारण करून, ते पोलिसांची नजर चुकवून, घरातून निसटले व काबूलमध्ये उत्तमचंद मल्होत्रा नावाचा एक भारतीय व्यापारी राहत होते दोन महिने त्यांच्या घरी वास्तव्य करण्याचा निर्णय सुभाष चंद्र बोस यांनी केला. सुभाष चंद्र बोस काबूलहून रेल्वेने प्रवास करत, रशियाची राजधानी मॉस्को मार्गे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोचले.

Germany and Adolf Hitler’s visit | जर्मनी आणि एडॉल्फ हिल्टर ची भेट

सुभाष चंद्र बोस यांनी बर्लिन ला जाऊन जर्मनी च्या अनेक नेते ची भेट घेतली व आपण इथे येणेच मूळ कारण सांगितले जर्मनी मध्ये असतंच सुभाष चंद्र बोस यांनी स्वंतत्र संघ व आझाद हिंद रेडिओ ची सुरवात केली.२९ मार्च १९४२ साली सुभाष चंद्र बोस आणि एडॉल्फ हिटलर यांची भेट व चर्चा झली.सुभाष चंद्र बोस यांना हवी तशी मदत जर्मनी करू शक्त्त नाही हे लक्ष्यात आल्यावर त्यांनी ८ मार्च १९४३ साली इंडोनेशिया कडे रवाना झाले.

Azad Hind Sena | आझाद हिंद सेना

सिंगापुर मध्ये असताना सुभाष चंद्र बोस यांनी एक निर्णय घेतला कि स्वतःची सेना तयार करायची २१ ऑक्टोबर १९४३ साली नेताजींनी आझाद हिंद सेना ही संघटना रासबिहारी बोस व कॅप्टन मोहनसिंग यांचा मदतीने स्थापना केली .नेताजी आझाद हिंद सेनेचे सेनापती झाले.

सेनेत नुसते पुरुष असून चालणार नाही तर स्त्रियांचाही सहभाग असला पाहिजे. यासाठी नेताजीनी आझाद हिंद सेनेत झाशीची राणी रेजिमेंटची केली आणि त्याचे नेतृत्व हे कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांच्याकडे दिले. पारतंत्र्याच्या कालखंडातही स्त्री स्वातंत्र्याचा विचार करणारा क्रांतिकारक महापुरुष म्हणून पाहिले जाते.

सेनेत नुसते पुरुष असून चालणार नाही तर स्त्रियांचाही सहभाग असला पाहिजे. यासाठी नेताजीनी आझाद हिंद सेनेत झाशीची राणी रेजिमेंटची केली आणि त्याचे नेतृत्व हे कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांच्याकडे दिले. पारतंत्र्याच्या कालखंडातही स्त्री स्वातंत्र्याचा विचार करणारा क्रांतिकारक महापुरुष म्हणून पाहिले जाते. भारतीय जनता नीसुभाष चंद्र बोस यांचा कौशल्य व धाडस बघून त्यांना नेताजी ही पदवी दिली.


‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा’ या एका वाक्यात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, कलकत्त्यापासून सिंधपर्यंत लाखो तरुण यांनी संघटित करण्याचे कार्य केले. देशाला स्वातंत्र्य हे शांततेतून नाही तर क्रांतीच्या बळावरच मिळणार आहे हे सुभाष चंद्र बोस यांच्या लक्ष्यात आले होते.


नेताजींनी ‘जयहिंद आणि चलो दिल्ली’चा नारा दिला. १९४३ ला अंदमान निकोबार बेटे जिंकून आझाद हिंद सेना ने बेटे नाव बदलून शहीद व स्वराज्य असे केले. १९४४ साली आझाद हिंद सेनेने मावडॉक हे ठाणे जिंकून भारतीय भूमीतील पहिला विजय साजरा केला व थेट कोहिमा व इंफाळपर्यंत धडक मारली.

Death of Subhash Chandra Bose | मृत्यू

१८ ऑगस्ट १९४५ साली विमानातून रोजी टोकियोकडे जात असताना विमानाचा अपघात झाला व तिथे त्यांचे निधन झाले. पण काही इतिहासकर म्हणतात की नेताजी चा मृत्य विमानात झाला नाही ते गुणांनी बाबा म्हूणून राहत होते. भारतीय वेब सिरीयस बोस मध्ये तर नेताजी गुनामी बाबा म्हूणून राहत होते त्यांचे विमान अपघात मध्ये मृत्य झालेच नाही असे सांगितले आहे.

Conclusion | निष्कर्ष

ब्लॉग मध्ये दिलेली माहिती चा वापर खालील मुद्देसाठी वापरू शकता

  • Subhash Chandra Bose Information In Marathi.
  • Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi.
  • Subhash Chandra Bose Nibandh.
  • Subhash Chandra Bose Speech In Marathi.
  • Subhash Chandra Bose Mahiti.
  • Netaji Subhash Chandra Bose in Marathi.
  • Subhash Chandra Bose Marathi Mahiti.

या माहितीसाठी उपयोग करू शकता.वरील Subhash Chandra Bose Information In Marath,Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi माहिती एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काहीकॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.

सुभाष चंद्र बोस यांचे पूर्ण नाव काय आहे ?

सुभाष चंद्र बोस यांचे पूर्ण नाव सुभाषचंद्र जानकीनाथ बोस असे आहे.

सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू कसा झाला ?

सुभाष चंद्र बोस यांचा मृत्य विमान अपघात मध्ये झाला.

Sharing Is Caring:

Leave a Comment