Short Stories In Marathi For Children | लहान मुलांसाठी गोष्टी

Rate this post

Short Stories In Marathi-ह्या ब्लॉग मध्ये आम्ही लहान मुलांना आवडतील त्या गोष्टी लिहलेले आहेत. लहान मुलांना नेहमी बोध दिणारे गोष्टी फार आवडतात म्हणून आज आम्ही अश्या तीन चांगल्या बोध देणाऱ्या गोष्टी ह्या ब्लॉग मध्ये लिहलेले आहेत. तुम्ही खालील दिलेले Short Stories In Marathi , Marathi Story ,Marathi Story for kids गोष्टी एकदा वाचून घ्या तुम्हाला नक्की आवडतील.

Short Stories In Marathi | शीर्षक – “ताकदवान शेजारी”

एकदा नदीला पूर आला.त्या पुरात आजूबाजूची सर्व गावे वाहून गेली. कसे बसे लोक वाचले; परंतु लोकांचे सर्व सामान पुरात वाहून गेले. त्याच पुरात मातीचा घडा आणि तांब्याचे पातेले वहात होते. तांब्याच्या पातेल्याने मातीच्या घड्याला विचारले, “अरे घड्या आपण एकाच जातीचेआहोत, तू खूप नरम मातीने बनलेला आहेस. खूप नाजूक आहेस.

जर तुला वाटत असेल तरमाझ्या जवळ ये! माझ्या जवळ तू राहिलास तर तू सुरक्षित राहशील. कडक वस्तूंपासून मी
तुझे संरक्षण करेन.” मातीचा घडा म्हणाला, “महाशय या मदतीसाठी तुला खूप धन्यवाद! पण तू विसरला आहेस की, तू खूप बलवान आहेस, जर तू हसत-हसत मला धक्का दिलास तर मी तुटून माझे तुकडे-तुकडे होतील. जर तुम्हाला खरेच माझी काळजी असेल तर माझ्यापासून दूर रहा.” असे म्हणून मातीचा घडा जोरात पुढे वाहून गेला.

हे सुद्धा वाचा – Marathi Story for kids

Short Stories In Marathi | शीर्षक – “लोचट भाऊ”

प्राचीन काळातील गोष्ट आहे. एका गावात दोन भाऊ रहात होते. मोठा भाऊ श्रीमंत होता. छोटा भाऊ सदू गरीब होता. एकदा सर्वजण नववर्षाचा आनंद साजरा करीत असताना सदूच्या घरी चूल पेटली नाही. त्याच्याकडे खायला काहीच नव्हते. थोरल्या भावाकडून तांदूळउसने आणण्यासाठी तो गेला. मोठ्या भावाने सदूला तांदूळ देण्यास नकार दिला. सदू नाराज झाला. घरी परतत असताना रस्त्यात त्याला एक म्हातारा माणूस दिसला. त्याच्या डोक्यावर जड लाकडांची मोळी होती.

त्या मोळीविक्रेत्याने सदूला विचारले की, “तू उदास का आहेस? कोणते संकट आले आहे तुझ्यावर?” सदूने त्याची दुःखद कहाणी मोळीविक्रेत्याला सांगितली. विक्रेत्याने त्याला धीर दिला. तो म्हणाला, “तू मला ही मोळी माझ्या घरापर्यंत पोहोचविण्यास मदत कर. त्याबदल्यात मी तुला अशी गोष्ट देईन की ज्याने तू श्रीमंत होशील.” सदूने तात्काळ मोळी डोक्यावर उचलली आणि तो विक्रेत्याच्या पाठोपाठ त्याच्या घरी गेला.

घरी पोहोचल्यावर विक्रेत्याने त्याला ‘मालपोवा’ हा पदार्थ दिला. “हा ‘मालपोवा’ घेऊन तू मंदिराच्या मागील जंगलात जा. तिथे तुला एक गुहा दिसेल. त्या गुहेत योगी माणसे रहातात. हे योगी बुटके आहेत. त्यांच्याकडे जादूची विद्या आहे. त्यांना मालपोवा पदार्थ खूप आवडतो. ते कोणत्याही परिस्थितीत ‘मालपोवा’ खाण्याची संधी सोडणार नाहीत. तू मालपोव्याच्या बदल्यात त्यांच्याकडे पैसे मागू नकोस.

त्यांना तू दगडी जाते माग. तू जेव्हा दगडी जाते घेऊन येशील तेव्हा मी तुला त्याचे रहस्य सांगेन.” सदू मंदिराच्या मागे धावत गेला. जंगलात पोहोचल्यावर त्याने ती गुहा शोधून काढली. गुहेतून ते बुटके योगी बाहेर ये-जा करीत होते. ते सगळे एका मोठ्या झाडाची तोडलेली फांदी ओढून आत नेण्याचा प्रयत्न करीत होते.

त्यांच्या दृष्टीने ते अत्यंत अवघड काम होते. सदू त्यांच्याकडे जाऊन म्हणाला, “या, मी ही फांदी आत नेतो.” फांदी खांद्यावर उचलून घेऊन सदू जात असताना अचानक त्याच्या कानावर आवाज पडला, “काका, मला वाचवा, काका मला वाचवा.” सदूने घाबरून इकडे-तिकडे पाहिले. त्याच्या पायाखाली एक अत्यंत छोटा मुलगा येणार होता. सदूने तात्काळ त्या मुलाला उचलले. तो मुलगा योग्यांच्या राज्याचा राजकुमार होता.

राजकुमाराने सदूच्याजवळील मालपोवा पाहिला. तो म्हणाला, “मला मालपोवा खायला दे. त्या बदल्यात तू मागशील ते देईन. हिरे-माणके देईन.” सदूला विक्रेत्याचे शब्द आठवले. त्याने मालपोवाच्या बदल्यात दगडी जाते मागितले. योग्यांच्या राजाने आपल्या मुलासाठी मालपोवाच्या बदल्यात जाते देण्याचे मान्य केले.

सदू जाते घेऊन निघणार एवढ्यात राजा म्हणाला, “हे बघ, हे जाते म्हणजे काही साधी गोष्ट नाही. हे जाते मौल्यवान आहे. या जात्याला उजवीकडे फिरवू लागल्यास आपण मागू ती गोष्ट जात्यातून बाहेर येत रहाते. डावीकडे फिरविल्यास वस्तू येणे बंद होईल.” सदू जाते घेऊन घरी आला. राजाने जात्याचे रहस्य सांगितल्यामुळे त्याला मोळी विक्रेत्याकडे जावे लागले नाही.
तो घरी निघाला. घरी पोहोचल्यावर आपला नवरा फक्त दगडी जाते घेऊन आलेला आहे हे पाहून सदूची पत्नी निराश झाली. ती भुकेने व्याकूळ झाली होती. सदू पत्नीला म्हणाला, “जमिनीवर एक कापड अंथर.” कापड टाकताच सदूने त्यावर जाते ठेवले आणि उजवीकडे फिरवून तांदूळ मागितले. तात्काळ जात्यातून तांदूळ बाहेर येऊ लागले. अशा प्रकारे त्याने खाण्याच्या सगळ्या वस्तू मागितल्या. त्याला सर्व वस्तू मिळाल्या.

सदू लवकरच श्रीमंत झाला. त्याने राहण्यासाठी महाल बांधला. तो थाटामाटात राहू लागला. शेजाऱ्यांना जेवणासाठी आमंत्रित करू लागला. नववर्षाचा दिवस त्याने आनंदात सगळे बघून थोरल्या भावाला आश्चर्य वाटू लागले.एवढ्यात श्रीमंत कसा झाला? यातील रहस्य शोधण्यासाठी तो एके दिवशी सदूच्या महालात जाऊन लपला. त्याने चोरून सगळे बघितले. दगडी जाते बघून त्याला आश्चर्य वाटले. जात्यातून वस्तू बाहेर येताना
बघून त्याने जाते पळवून नेण्याचे ठरविले.

एके दिवशी रात्री सद् बाहेरगावी गेला असता थोरला भाऊ महालात शिरला. त्याने रात्री जाते चोरले आणि घरी परतला. जाते घेऊन थोरला भाऊ समुद्रकिनारी पोहोचला. घरून निघताना त्याने सगळे जरूरी साहित्य बरोबर घेतले होते. दुपारी जेवण करताना त्याला मिठाची आठवण झाली. मीठ घरीच विसरल्याचे त्याच्या लक्षात आले. जाते जवळ असल्यामुळे त्याने तात्काळ जाते फिरवून मिठाची मागणी केली.

तात्काळ जात्यातून मीठ बाहेर पडायला सुरुवात झाली. मिठाचे ढिगारे तयार झाले; परंतु मीठ येणे बंद होईना. थोरल्याला मीठ बाहेर आणणे बंद करण्याचा उपाय माहीत नव्हता. मिठाच्या ढिगाऱ्याच्या ओझ्यात नाव बुडाली. नावेबरोबर थोरला भाऊ बुडून मरण पावला. काही लोक असं म्हणतात की जाते अजूनही फिरत आहे. त्यातून मीठ निघत आहे. यामुळेच समुद्राचे पाणी खारट आहे.

हे सुद्धा Youtube वर बघा – Marathi Story

Marathi Story | शीर्षक – “चतुर बगळा व खेकडा”

एकदा एका तळ्यातील सर्व जीव सकाळी ऊन मिळावे म्हणून किनाऱ्यावर आले.त्यांना त्यांचा शत्रू बगळा एका पायावर उभा राहून प्रार्थना करताना दिसला. आज त्यानेआक्रमणदेखील केले नाही.सर्वांना आश्चर्य वाटले की, बगळ्याला काय झाले. काही धाडसी मासे, कासव, खेकडेएकत्र आले व बगळ्याकडे गेले. त्यांनी बगळ्याला विचारले, “काय झाले बगळे दादा, आज खूप चिंतेत आहात?’

“भावांनो मी आजपासून देवाची भक्ती सुरू केली आहे. काल मला स्वप्न पडले दुष्काळ पडणार आहे, म्हणून मी देवाचे नाव घेऊन प्रार्थना करत आहे. हे तळेपण सुकणार आहे. तुम्हीलोक लवकर हे तळे सोडून दुसरीकडे निघून जा!” “तू खरे बोलत आहेस?” “हो, मी का खोटे बोलू, तुम्ही पाहातच आहातना! मी तुमची शिकारपण करत नाही आणिमी मासे खाणे सोडले आहे.” बगळ्याचे साधूपण पाहून सर्वांचा त्याच्यावर विश्वास बसला.

“बगळे दादा! जर हा तलाव सुकला तर आम्ही सगळे मरणार.” बेडूक म्हणाला, “काहीतरी उपाय सांगा.”
बगळा म्हणाला, “भावांनो, मी आज रात्री देवाशी बोलतो. मग जसे देव आज्ञा देईल तसे तुम्हाला सांगतो. ऐका किंवा नका ऐकू तुमची मर्जी.” सर्वजण बगळ्याच्या पाया पडले व निघून गेले. दुसऱ्या दिवशी बगळा म्हणाला, “तुम्ही सर्वजण जवळच्या तलावात गेलात तरवाचू शकाल?’ परंतु तेथे कसे जायचे सर्वजण चिंतेत होते.

“जर आपण भुयार खोदले तर…” एक कासव म्हणाला. “अरे भावा हे काय सोपे काम नाही?” खेकडा म्हणाला, “एवढे मोठे भुयार कोण खोदणार?” तेवढ्यात एक मासळी म्हणाली, “एक उपाय आहे. बगळे बुवा आपल्याला पाठीवर घेऊन त्या दुसऱ्या तलावात सोडतील.” हे ऐकताच बगळा म्हणाला, “मी तर म्हातारा झालो आहे. एवढे ओझे कसे उचलणार?” “तुम्ही आम्हाला एकेकाला घेऊन चला. तुम्ही तर आता साधू आहात. साधूचे काम आहे
दुसऱ्यांची मदत करणे.” सर्वजण बोलू लागले.

“आता तुम्ही जर एवढे बोलत आहात तर ठीक आहे. हे शुभ काम आपण आजपासून सुरू करू, एकेकाने माझ्या पाठीवर येऊन बसा. एक चतुर मासळी पटकन् त्याच्या पाठीवर बसली. बगळा पटकन् तिला घेऊन उडाला. अशा प्रकारे काही दिवस निघून गेले. बगळा दररोज दोन-तीन बेडूक, मासे असे घेऊन जात असे. एके दिवशी खेकड्यावर वेळ आली, खेकडा बगळ्याच्या पाठीवर बसला.

बगळा विचार करू लागला की खेकड्याचे मांस खायला मिळणार. आज मज्जा येईल. प्रवासात खेकड्याने माशांची हाडे, बेडकीचे पाय पाहिले. बगळ्याचा धूर्तपणा त्याला समजला. खेकड्याने बगळ्याची मान दाबली.
“अरे खेकडे भाऊ, काय करतोस?” बगळा ओरडू लागला. खेकडा म्हणाला, “पाखंडी बगळ्या, लगेच मला माझ्या तलावात नेऊन सोड. नाहीतर मी तुला गळा दाबून मारून टाकीन.

मला तुझा खोटेपणा समजला आहे. तू म्हातारा झालास म्हणून तुला शिकार करता येत नाही. तू या भोळ्या मासळींना फसवून मारलेस. तुला जगायचे असेल तर मला तलावात सोड नाहीतर इथेच तुला मारून टाकेन.’
“बगळ्याने खेकड्याला तलावाशेजारी आणले असता खेकड्याने त्याचा गळा दाबून बगळ्याला मारले. खेकड्याने तलावात सर्वांना बगळ्याची कथा सांगितली. सर्वांचे जीव खेकड्यामुळे वाचले. सर्वजण त्याला धन्यवाद देऊ लागले.

निष्कर्ष –

आम्ही दिलेले माहिती चा वापर तुम्ही खालील मुद्देसाठी पण वापरू शकता

  • Marathi Story
  • Marathi Story for kids
  • Moral Stories in Marathi
  • Short stories in Marathi

 Marathi Story अन्य लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकावरून घेतली गेली आहे. वरील ब्लॉग मधील माहिती फक्त वाचन आणि शिक्षण उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला marathi story for kids, , Short Stories in marathi कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिल्या गेलेल्या माहिती बद्दल काही अडचण असेल …आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.

Sharing Is Caring:

1 thought on “Short Stories In Marathi For Children | लहान मुलांसाठी गोष्टी”

Leave a Comment