Best Couple Ukhane in Marathi for male[2023] | मराठी उखाणे

Rate this post

Ukhane in Marathi for Male- लग्नाचा आधी स्त्री पुरुषांमध्ये मजेशीर उखाणे घेण्याचीही पहिल्यापासून परंपरा आहे. खालील ब्लॉग मध्ये बरेच Ukhane in Marathi for male म्हणजेच वरांसाठी उत्तम उखाणे दिले गेले आहेत तुम्ही पहा तुम्हाला नक्कीच आवडतील.

मराठी उखाणे वरसाठी | Ukhane in Marathi for male

आई-वडील, भाऊ बहीण,जणू गोकुळासारखे घर, …. च्या आगमनाने पडली त्यात भर.

जिंकल मला एका क्षणात, प्रथम दर्शनीच भरली, …. माझ्या मनात.

उभा होतो मळयात, नजर गेली खळयात, नवरत्नांचा हार …….. च्या गळयात.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …… च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.

काही शब्द येतात ओठातून, …… चं नाव येतं मात्र हृदयातून.

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, …….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, …..चे नाव घेतो सर्वजण ऐका
.


मराठी उखाणे वरसाठी | Ukhane in Marathi for male

निळे पाणी, निळे डोगर, हिरवे हिरवे रान, ….. चे नाव घेउन राखतो सर्वांचा मान.

बंगलौर.म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ. घास घालतो …….. बोट नको चाउस.

अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला, …. चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला.

रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात, ….. चे नाव घेतो असु द्या लक्षात.

मैत्रि आणी नात्यात नसावा स्वार्थ, …… मुळेच माझ्या जीवनाला अर्थ.

झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी, आयुष्यभर सोबत राहो …… – …… ची जोडी.

वसंतात दरवळतो फुलांचा सुवास, सौ….. सोबत सुरु केला जीवनाचा प्रवास.


मराठी उखाणे वरसाठी | Ukhane in Marathi for male

हो नाही म्हणता म्हणता, लग्नाला संमती दिली, हो नाही म्हणता म्हणता, लग्नाला संमती दिली,
आणि देवा ब्राम्हणाच्या साक्षीने, …….. माझी झाली.

उमाचा महादेव आणि सितेचा राम, ….. आलि जीवनी आता आयुषयभर आराम.

वर्षाकाठचे महिने बारा, ….या नावात सामवलाय आनंद सारा.

फुलासंगे मातीस सुवास लागे, …. नि माझे जन्मोजन्मिचे धागे.

भाजित भाजि पालक, ….. माझि मालकिन अन् मि मालक !

सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप, …… मिळाली आहे मला अनुरूप.

संतांच्या अभंगात आहे अम्रूतवाणी, …… म्हणते मधूर गाणी.

पाच बोटातुन होते कलेची निर्मीती, …….. ची व माझी जडली प्रिती.

हे सुद्धा वाचा – मराठी उखाणे


मराठी उखाणे वरसाठी | Ukhane in Marathi for male

काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, ….. चं नाव येतं मात्र थेट हृदयातून.

हिरवा श्रावण बहरलाय दरवळली माती, ….. च्या जीवनात सदैव मिळो शांती.

नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा, …..च नाव आहे लाख रुपये तोळा.

दासांचा दासबोध अनुभवाचा साठा, …… चे नाव घेतो तुमचा मान मोठा.

भाजित भाजी मेथिची, ….माझ्या प्रितीची.

मनी असे ते स्वप्नी दिस ओठी मी हे आणू कसे, …… माझी नववधू शब्दात मी हे सांगू कसे.

कोणत्याही रुढी परंपरेत आहे विद्यानाचे धागेदोरे, …… सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.


मराठी उखाणे वधूसाठी | Ukhane Marathi for female

नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू, …. चे नाव घ्यायला मी कशाला लाजू.

आता घास घेतला त्याला वेगळीच होती गोडी, …. ना घास भरवतो त्यातलीच चव थोडी.

लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …. ची माझ्या र्हुदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.

जाईजुईचा वेल पस्ररला दाट, …… बरोबर बान्धलि जिवनाचि गाठ.

ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे, …… सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे.

आंब्यात आंबा हापुस आंबा, …… चे नाव घेतो तुम्हि थोड थांबा.

वड्यात वडा बटाटावडा, …… मारला खडा, म्हणून जमला आमचा जोडा.


मराठी उखाणे वधूसाठी | Ukhane Marathi for female

देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे, …. चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.

मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली, श्रीखंडाचा घास देताना …… मला चावली.

अंतरिचे गीत उमटले,शतजन्मीचे नाते जुळले, …. सह अंतरी प्रितीचे फुल फुलले (उमलले).

अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण करतो सारथ्य, …. सोबत … करतो तुम्हा सगळ्यांचे आतिथ्य.

जाईच्या वेलीला आलाय बहार, ….. ना घातला २७ फेब्रुवारीला हार.

हे सुद्धा Youtube तुम्ही वर बघा– Marathi Ukhane


मराठी उखाणे वधूसाठी | Ukhane in Marathi for female

सोनार त्याची कला दाखवतो सोन्याच्या साखळीवर, …….. चे नाव लिहिले मी माझ्या हृदयाच्या पाकळीवर.

अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना, …….. चे नाव घेण्यास शब्द काही जुळेना.

प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, शोधूनही सापडणार नाही, ….. सारखा हिरा.

स्टुलावर स्टूल बत्तीस स्टूल, …….. राव माझे एकदम ब्यूटिफुल.

केळीच्या पानावर केशरी भात, …….. च नाव घेऊन लावते मुंडावळी ला हात.

सासरची छाया, माहेरची माया, …….. राव आहेत, माझे सगळे हट्ट पुरवाया.

मंडप रंगला रंगाने हात भरला चुढ्याने, …….. नाव घेते हळदीच्या अंगाने.


मराठी उखाणे वधूसाठी | Ukhane Marathi for female

वेड्याला इंग्रजीमध्ये म्हणतात सायको, …….. रावांचे नाव घेते, बनून त्यांची बायको.

दारात अंगण, अंगणात काढली रांगोळी, …….. रावांचे नाव घेऊन, बांधते मुंडावळी

माहेर आहे प्रेमळ सासर आहे हौशी, …….. च नाव घेते लग्नाच्या दिवशी.

मोगर्‍याचा गजरा केसात साजे, …….. राव आले दारी सौभाग्य माझे.

कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून, …….. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.

द्राक्षाच्या बागेत पोपट करतो टोटो, …….. रावांच्या हातात माझाच फोटो.

आकाशात शोभतो इंद्रधनुष्याच्या पट्टा, …….. रावांचे नाव घेते पुरे आता थट्टा.

घातली मी वरमाला हसले …….. राव गाली, थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.


पारंपारिक मराठी उखाणे | Traditional ukhane in Marathi for female

वघड आहे म्हणतात महाबळेश्वर चा घाट, …….. शी बांधली लग्नाची गाठ.

सोन्याच ठेवला ताट त्याभोवती रांगोळी काढली पोरींनी , …….. रावांच नाव ऐकायला गर्दी केली पाहुण्यांनी.

सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न, …….. च्या सोबत झाले आताच माझे लग्न

साता जन्माच्या जुळल्या गाठी, …….. रावांच नाव घेते चालताना सप्तपदि

ताजमहाल बान्धायला कारागिर होते कुशल, …….. रावान्च नाव घेते तुमच्यासाथि स्पेशल

सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले, …….. रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले

परसात अंगण, अंगणात तुळस, …….. नाव घ्यायचा मला नाही आळस.

लग्नात लागतात हार आणि तुरे, …….. चे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.


पारंपारिक मराठी उखाणे |Traditional ukhane in Marathi for female

सनई आणि चौघडा, वाजे सप्तसुरात, …….. रावांचे नाव घेते, लग्नाच्या घरात

मंगलदेवी, मंगलमाता वंदन करते तुला, …….. रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, …….. रावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी

हरीश्रंद्र राजा, रोहिदास पुत्र, …….. रावांच्या नावाने घालते मंगळसूत्र

शुभमंगल प्रसंगी अक्षता पडतात माथी, …….. राव माझे जन्मसाथी

गुलाबाच्या फुलांपेक्षा नाजूक दिसते शेवंती, …….. रावांना मिळो दीर्घायुष्य हीच देवाला विनंती.

चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, …….. रावांचे नाव घेते देवापुढे

गार गार माठामधले, पाणी ताजे ताजे, …….. राव झाले माझ्या मनाचे राजे


पारंपारिक मराठी उखाणे | Traditional ukhane in Marathi for female

मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा, …….. बरोबर संसार करीन सुखाचा.

…….. रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा, त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा

नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे, …….रावांना शेवटी अहोच म्हणायचे.

मायामय नगरी, प्रेममय संसार, … च्या जिवावर माझ्या जीवनाचा भार.

शिक्षणाने विकसीत होते, संस्कारित जीवन, …… रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन.

काव्य आनि कविता सागर आणि सरिता, …… चे नाव घेते तुमच्या करिता.

गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर, …… च्या हातात हात देउन झाले मी निर्भर.


पारंपारिक मराठी उखाणे | Traditional ukhane in Marathi for female

वड्यात वडा बटाटावडा, …… नी मारला खडा, म्हणून जमला आमचा जोडा.

सौभाग्यकांक्षिणी करतात गौरईची पुजा, ….. चे नाव घेऊन घेते मी रजा.

श्रीक़ष्णाने लिहिली भगवतगीता, …..माझे राम तर मी त्यांची सीता.

आता घास घेतला त्याला वेगळीच होती गोडी, …..ना घास भरवते त्यातलीच चव थोडी.

बाळराजांची चाहुल दरवळला परिसर, …… च्या सहवासात माझे जीवन होईल सफल.

भारतीय नारी पतिला देते उच्च स्थान,…… चे ठेवीन सदोदित मान.

केळ् देते सोलुन, पेरु देते चिरुन्,…… च्या नावाने कुंकू लावते कोरुन्.


पारंपारिक मराठी उखाणे | Traditional ukhane in Marathi for female

अत्तराचा सुगंध दरवऴ्ला चहुकडे,….रावांच्या नावाचा लौकिक होउ दे सगळिकडे.

चिवड्यात घालतात खोब्ररयाचे काप, …… रावां समवेत ओलांडते माप.

हिरव्या शालुला जरिचे काठ, ……चे नाव घेते, सोडा माझी वाट.

सिद्धिविनायकाच्या देवळाला सोन्याचा कळस,…..याच नाव घ्यायला मला नाही आळस.

देवघ्ररात तेवतो नंदादिप समाधानाचा, ….. च नाव घेते आशिर्वाद मागते अखंङ सौभाग्याचा.

जशी आकाशात चंद्राची कोर,….. पती मिळायला माझे नशीब थोर.

संसाराचे गोड स्वप्न आजवर मी पाहिले,प्रत्यक्षात …… चे जीवनसाथी आज मी झाले.


दही,साखर,तुप,….. राव माला आवडतात खुप.

जेजुरीचा खन्डोबा तुळ्जापुरची भवानी,…… रावाची आहे मी अर्धागीनी.

फुलले गुलाब गाली,स्पर्शात (डोळ्यात) धुंद झाली प्रीती,…… ची झाले मी जन्मोजन्मीची सौभाग्यवती.

अर्जुनाला श्रीकृष्णाने केलेल्या उपदेशातून निर्माण झाला अनमोल ग्रंथ गीता,…… चे नाव घेऊन येते मी आता.

संसाराच्या सारीपटावर पडले सौभाग्याचे पान,….. चा राहो चोहीकडे मान.

जीवाभावाची ओवी आळवीन संसाराच्या प्रातःकाली,…… च्या नावावर ठरले मी आज भाग्यशाली.

नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू,…… चे नाव घ्यायला मी कशाला लाजू.


इंग्लीश मध्ये पाण्याला म्हणतात वॉटर,…… नाव घेते …… ची सिस्टर.

बारिक मणी घरभर पसरले,…… साठि माहेर विसरले.

झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी,आयुष्यभर सोबत राहो …… – …… ची जोडी.

मुंबई ते पुणे १५०कि.मी. आहे अंतर,…… हयांचं नाव घेते अगोदर,घास भरवते नंतर.

कामाची सुरवात होते श्रीगणेशापासुंन,…… नाव घेयला सुरवात केली आजपासून.

घराच्या पुढे अंगण,अंगणात सजलाय बोगनवेल ,प्रवेश करते गृहलक्ष्मी, वाजवून …… च्या घराची बेल.

पाव शेर रवा पाव शेर खवा…… चे नाव घेते हजार रुपये ठेवा.


Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली उखाणे एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काहीकॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

Leave a Comment