Best 50+ Quotes In Marathi | मराठी सुविचार

Rate this post

Quotes In Marathi-आज आपण ह्या ब्लॉग मध्ये Quotes In Marathi, Life Quotes In Marathi ५० पेक्षा जास्त सुविचार लिहिलेले आहेत.

मराठी सुविचार |Quotes In Marathi

१.पुस्तकांमुळे ‘मस्तक’ संपन्न होते आणि या संपन्न मस्तकापुढे सारे जग ‘नतमस्तक’ होते.


२.चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले आचरण हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे.


३.मनस्थिती जर खंबीर असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीला सामोरा जाऊ शकतो.


४.मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली स्पंदने निरपेक्ष असली की कुठल्याही नात्यांच्या धाग्यामध्ये विश्वासाचे मणी सहजपणे ओवले जातात.


५ आपल्या जीवनातील दिवसांचे महत्त्व पाहा. उत्तम दिवस आठवणीदेतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात व ते सर्व खूप काही शिकवून जातात.


६ सचोटी श्रीमंतीचे तोंड पाहत नसते. ती परिश्रमाच्या पाळण्यात हसत असते आणि समाधान हे वडिलांप्रमाणे तिला पाहून तृप्त होत असते.


७. चांगले काम करताना बदनामी झाली तर घाबरू नये. कारण बदनामीची भीती त्यांनाच असते ज्यांच्यामध्ये इतरांसाठी काम करण्याची हिंमत नसते.


८. माणसाला किती आयुष्य मिळणार आहे, कधी मृत्यू येणार आहे हा ‘नशिबाचा’ भाग असतो. पण लोकांच्या मनामध्ये जिवंत रहाणे हा ‘कर्माचा’ भाग असतो.


९ एखादा क्षण हसवितो तर एखादा क्षण रडवितो. पण या जीवनरूपी मार्गावर येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जातो.


१०. स्वतःच्या वाट्याला दुःखाचे काटे आलेले असले तरी इतरांना सुखाची फुले देत रहावे हेच मोठेपणाचे लक्षण होय.


मराठी सुविचार | Quotes In Marathi

११. योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढे गप्प रहाणे म्हणजे येणाऱ्या संकटांना दूर ठेवण्यासारखे आहे.

१२.जगातील प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो.


१३. दुःखाचा डोंगर कोसळला तरीही मन विचलित न होऊ देता धीराने मार्ग काढणे हे थोर माणसाचे लक्षण आहे.


१४. तोंडाने बोलणे कमी असेल व हातून कृती अधिक होत असेल तर यश निश्चितपणे प्राप्त होते.


१५. सोने-चांदी देऊन सुद्धा गेलेला क्षण खरेदी करू शकत नाही प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा.


१६. समोरच्या व्यक्तिमधील सद्गुण शोध व दुर्गुण मात्र स्वतःमध्येच शोधावे.


१७. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठच असते पण माया, ममता ही त्याहीपेक्षा श्रेष्ठ असते.


१८. व्याख्यात्याच्या समोर श्रोत्यांची संख्या कमी असली तरी चालेल पण त्या श्रोत्यांना व्याख्यानामध्ये मनापासून रस असला पाहिजे.


१९. आपण दुसऱ्यांना मदत करीत नसतो तर नियतीने ती मदत त्यांच्यापर्यंत पोहचविण्याकरिता आपली निवड केलेली असते.


२०. आपल्यासमोर असलेलं सुख आपण उपभोगतो कमी आणि इतरांसमोर त्याचे प्रदर्शन करतो जास्त.

हे सुद्धा वाचा – Marathi Poem


आयुष्यवरील सुविचार मराठीत | Life quotes in Marathi

२१.जीवन म्हणजे एक प्रेमळ प्रवास आहे. तो प्रवास रडत-रडत करू नका. त्याचा आस्वाद घ्या म्हणजे आपले आयुष्य आनंदमय होईल.


२२. ज्ञानी, सद्गुणी व्यक्ती दुसऱ्या कोणाशीही कोणत्याही बाबतीत स्पर्धा करायला जात नाही.


२३. काहीही आपलं नव्हतं, काहीही आपलं नाही, आणि काहीही आपलं रहाणार नाही हे आपण स्वीकारले तर जीवन जगणे सोपे होते.


२४. आयुष्याचे गणित समजून घ्यायचे असेल तर मागे वळून पहा आणि आयुष्य यशस्वी करायचे असेल तर पुढे पहा.


२५. चांगले विचार व चांगली माणसं समजण्यासाठी खूप वेळ लागतो. पण एकदा समजले की आपण त्यांना आयुष्यभर विसरत नाही.


२६. कोणी कोणाला काही द्यावे ही अपेक्षा नसते तर दोन शब्द एकमेकांशी गोड बोलावे हेच लाखमोलाचे असते.


२७. जगात एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा आपल्या हातातून निसटली की कोणत्याही उपायाने पुन्हा मिळू शकत नाही आणि ती म्हणजे आपले आयुष्य.


२८.. ज्याच्याजवळ उमेद, विश्वास व कष्ट करण्याची तयारी असते तो जीवनात कधीही अपयशी होऊ शकत नाही.


२९. अंदाज चुकीचा असू शकतो पण अनुभव कधीच चुकीचा असू शकत नाही. कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे आणि अनुभव आपल्या जीवनातील सत्य आहे.


३०. आयुष्यात सगळं हरलात तरी चालेल परंतु हिंमत कधीच हरू नका. कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत राहील.


३१. स्वभाव म्हणजे रंगाची पेटी, कधी कुठला रंग सांडेल आणि कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज येत नाही.


३२. जवळच्या व्यक्तीकडून जेव्हा अतिशय कटू अनुभव येतो त्यावेळी त्यामधून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात.

हे सुद्धा Youtube वर बघा – Marathi Quotes


आयुष्यवरील सुविचार मराठीत | Life quotes in Marathi

३३. एक रूपयाचे महत्त्व, किंमत ज्याला समजते तो निश्चितपणे करोडपती होतो.

३४. इतिहासाचा नुसता अभ्यास करीत बसण्यापेक्षा इतिहास घडविण्यासाठी प्रयत्न करणे हे केव्हाही चांगले.

३५ अग्नी, कर्ज आणि शत्रू यांचा समूळ नाश करावा. हे मोठे भयंकर शत्रू आहेत.

३६. आयुष्य आपल्याला सुवर्तन करण्यासाठी संधी देत असते. साध्या सोप्या भाषेमध्ये त्यालाच ‘आज’ असे म्हणतात.


३७. रक्ताच्या नात्यामध्ये नसेल एवढी ओढ मैत्रीच्या नात्यामध्ये असते आणि कशीही असली तरी मैत्री गोड असते.


३८. फिरायला गाडी, घोडा नसला तरी चालेल पण जीवन सुखी, समृद्ध करण्यासाठी मित्र व प्रेमाचा परिवार आवश्यक आहे.


३९. न मिळालेल्या गोष्टीचं दुःख करीत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यामध्ये समाधानाने जगणे हेच खरे आयुष्य होय.


४०. आयुष्याची गणितं खरंतर बोटांवर सोडविण्याइतकी सोपी असतात पण समाजभीतीचे आकडे व सुखाची हाव यामुळे सगळा हिशेब ही गणिते चुकवितात.

४१. बकुळ फुलाचे मन किती निरागस असते म्हणूनच सुकल्यावरही आपल्या गंधाला घट्ट बिलगून बसते.


४२. दुसऱ्याने मागितल्यावर देणे चांगलेच. पण दुसऱ्याला गरज असल्याचं जाणवताच न मागता देणे हे केव्हाही श्रेष्ठच आहे.


आयुष्यवरील सुविचार मराठीत | Life Quotes in Marathi


४३. कालच्या दिवसाची खंत करू नका. आजचा दिवस आनंदात जगा व उद्याची काळजी करू नका पण काळजी घेत रहा तरच तुम्ही सुखी व्हाल.


४४. दुसऱ्याच्या दु:खावर मायेने आश्वासक फुंकर घातली असता त्याची दुःख सहन करण्याची ताकद हजारपटीने वाढते.


४५. कधी कधी मैत्रीवर बसलेली धूळ फुंकर मारून उडविली तर तुमची मैत्री अधिकच दृढ होईल.


४६ भक्कम देहापेक्षा भक्कम मनाशीच शौर्याचा संबंध असतोदुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही.

४७.आनंद ही एक अशी वस्तू आहे की ती आपल्याजवळ नसली तरीही आपण दुसऱ्याला मात्र देऊ शकतो.


४८. चकाकते ते सर्व सोनं नसते.


४९. जोवरी असे पैसा तोवरी म्हणती या बसा.


५०. एखाद्या गोष्टीची काळजी करीत राहू नये तर त्या गोष्टीची काळजी घ्यावी.


५१. कामाने आपल्याला खाता कामा नाही उलट आपण कामाला खाल्ले पाहिजे, तरच यश मिळेल.


५२. सुविचारी आणि संपन्न मस्तकापुढे सारे जग नतमस्तक होते.


मराठी सुविचार | Quotes in Marathi


५३. एखाद्यावेळी आपण केलेला अंदाज ही आपल्या मनाची कल्पना असते पण एखादा अनुभव मात्र आपल्या जीवनातील मोठे सत्य असते.


५४. हाती घ्याल ते तडीस न्या.


५५. आपल्या चेहऱ्यावरील तेज हे आपल्या मनातील सुविचार किंवा कुविचार यावर अवलंबून असते.


५६. आपण स्वभावाने चांगले आहोत की वाईट आहोत याचा विचार कधीही करू नये कारण लोकांना तुमची गरज आहे तोपर्यंत तुम्ही चांगले असता व गरज संपली की वाईट समजले जाता.


५७. आपण पायी चालतो तेव्हा तो प्रवास असतो. आपण हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा असते आणि आपण देहभान हरपून चालतो तेव्हा ती पंढरीची वारी असते.


५८. आपल्याला जेवढे देवाने दिले आहे ते स्वीकारून त्यामध्ये समाधान शोधले की आपण आनंदी जीवन जगू शकतो.


५९. आपल्याला हे जमेल का असा विचार करीत वेळ घालविण्यापेक्षा करून तरी पाहूया असे म्हणून केलेली सुरूवात हेच यशाचे पहिले पाऊल.


Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली Quotes in Marathi, Life Quotes in Marathi एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काहीकॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

1 thought on “Best 50+ Quotes In Marathi | मराठी सुविचार”

Leave a Comment