Best Marathi Suvichar 60+ | मराठी सुविचार

Rate this post

Marathi Suvichar -लोकं मराठी सुविचार खूप प्रमाणात इंटरनेट वर शोधात असतात तर आपण ६०+ सुविचार ह्या ब्लॉग मध्ये लिहले आहेत ते पाहून घ्या तुम्हाला नक्कीच आवडतील.

मराठी सुविचार | Marathi Suvichar

१. चांगल्या आठवणी, वाईट आठवणी पेन ड्राइव्हमध्ये ‘सेव्ह करून ठेवा व चांगल्या आठवणी मनामध्ये घट्ट खोलवर साठवून ठेवा.


२. जगात इतरांपेक्षा काहीतरी वेगळं बनायचं असेल तर चेहल्ल्याने नाही तर आपले सद्विचार व सुसंस्काराने बना.


३. जीवनात काही मिळवायचं असेल तर ते आजच मिळविण्याचा प्रयत्नकरा. कारण जीवन संधी कमी देते आणि पश्चात्ताप जास्त देते.


४. ज्यांच्याबरोबर संवाद करताना आपण आनंदी होतो व आपले नाहीसे होते तोच आपला खरा हितचिंतक होय.


५. आपला व्यवहार हा गणितातील शून्यासारखा असावा. शून्याला स्वतःची काहीच किंमत वाटत नसते पण दुसऱ्यांबरोबर त्याची मैत्री जुळल्यावर मात्र त्यांची किंमत वाढवते.


६. ऋणाबंधाची फुले कधीही कोमेजून जात नाहीत. उलट जुन्या आठवणींच्या सुगंधाने ती नेहमी दरवळत रहातात.


७. आपली स्वप्नं जेवढी मोठी असतात तेवढ्याच त्यामधील अडचणीही मोठ्या असतात आणि जेवढ्या अडचणी मोठ्या असतात तेवढेच यशही मोठे असते.


८. माणसाला कधीही अभिमान असू नये की मला कोणाचीही, कधीही गरज लागणार नाही आणि असा अहंकार असू नये की लोकांना मात्र माझी गरज लागेल.


९. आनंद ही एक अशी वस्तू आहे की ती आपल्याजवळ नसली तरीही आपण दुसऱ्याला मात्र देऊ शकतो.


१ ०. देणारा नेहमीच श्रेष्ठ असतो मग तो आधाराचा शब्द असेल किंवा समोरच्याला दिलेला मदतीचा हात असेल.


११. जगातील प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षादार असतो तो म्हणजे परमेश्वर!


मराठी सुविचार | Marathi Suvichar

१२. आपले मन आनंदी असो वा नसो पण चेहऱ्यावर नेहमी हास्य असावे. कारण सारे जग चेहरा पाहत असते, मन नाही.


१३. जीवनाच्या परीक्षेत गुण मिळत नाहीत पण लोक तुमची मनापासून आठवण काढत असतील तर तुम्ही परीक्षेत नक्कीच पास झालात.


१४. आपली बुद्धिमत्ता, आपले करियर उच्च पदावर नेऊन पोहोचवील. पण आपले जर्तन इतरांच्या मनामध्ये स्थान निर्माण करण्यास व ते टिकविण्यास मदत करील.


१५. दु:ख विसरायचे असेल तर स्वतः हसायला शिका आणि आनंद मिळवायचा असेल तर इतरांना हसवायला शिकवा.


१६. मैत्री ही कांद्यासारखी असते त्यामध्ये अनेक पदर असल्याने जीवनाला एक वेगळीच चव येते आणि मैत्री तोडायचा कुणी प्रयत्न केला तर हीच मैत्री डोळ्यात पाणी आणते.


१७. उगवतीच्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते तर त्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते.


१८. सत्य आणि स्पष्ट बोलणारी व्यक्ती कटू वाटत असली तरी ती धोकेबाज नसते. त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच.


१९. एखादी गोष्ट स्वीकारण्याची हिंमत आणि सुधारण्याची इच्छा असेल तर कोणताही सामान्य माणूस निश्चितपणे प्रगतीच्या वाटेवर जाईल.


२०. नात्यांचा संबंध हात आणि डोळे यांच्यासारखा असायला हवा. हाताला जखम झाली तर डोळ्यातून अश्रू येतात आणि अश्रू आपल्या हातानीच पुसले जातात.


२१.प्रार्थना व विश्वास दोन्ही गोष्टी अदृश्य आहेत. परंतु दोन्ही गोष्टींमध्ये इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवितात.


मराठी सुविचार | Marathi Suvichar

२२. प्रवासाचा आनंद घ्यावयाचा असेल तर आपल्याजवळ सामान कमी ठेवावे व आयुष्याचा आनंद घ्यावयाचा असेल तर आपल्या अपेक्षा कमी ठेवाव्यात.


२३. माणूस सर्व जगाला फसवू शकतो, पण आपल्या मनाला फसवू शकत नाही.


२४. भीड ही भिकेची बहीण.


२५. मन व इंद्रिये ह्यांची एकाग्रता साधणे हे महानतेचे लक्षण आहे.


२६. विनाशकाले विपरीत बुद्धी.


२७. आयुष्यात चांगल्या लोकांची साथ मिळण्यासाठीसुद्धा भाग्य लागते. परमेश्वराचे स्मरण ठेवले, तर ती साथ आपोआप मिळते.


२८. आजचे अपयश हे उद्याचे यश होय!


२९. ज्या लोकांना खरे व स्पष्टपणाने बोलले असता राग येतो त्यांची मनधरणी करीत बसू नये.


३०. गरजवंताला अक्कल नसते.


३१. लोखंड हे अतिशय कठीण असते तरीही गरम केल्यावर ते वितळतेव माणूस त्याचा कसाही वापर करू शकतो. म्हणूनच माणसाने अतिशयथंडपणे सर्व गोष्टींचा विचार करावा तरच आपल्याला स्वाभिमानाने रहाता येते.


३२. समोरच्या व्यक्तीला मदत करण्याची वृत्ती ठेवावी, त्या व्यक्तीला आनंद वाटेल असे वागण्याचा प्रयत्न करावा.


३३. मातापित्यांची सेवा करणे हा जगातील श्रेष्ठ धर्म आहे.


३४. नुसती पुस्तकी विद्या व परस्वाधीन जिणे हे केव्हाही व्यर्थच होय.

.
३५. प्रारब्धाचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात.

हे सुद्धा वाचा – Quotes In Marathi


मराठी सुविचार | Marathi Suvichar

३६. वृक्षाची कर्तव्यदृष्टी आचरण करावी. वृक्ष नेहमी दुसऱ्यासाठी जगत असतात.


३७. पायाला लागलेली ठोकर सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ठोकर जगावे कसे हे शिकविते.


३८. आपल्या हातून दुसऱ्यासाठी काहीतरी केले जात असेल तर ते काम अतिशय मनापासून व निस्वार्थ बुद्धीने करा. अपयशआल्यावर सामान्य माणूस निराश होतो. पण असामान्य माणूस मात्र या अपयशाला संधी समजून अथक प्रयत्नाने प्रगतीचे शिखर गाठतो.


३९. निरर्थक विचार करीत बसल्याने जी संकटे अस्तित्वात नाहीत त्या माणूस विनाकारण आमंत्रण देतो.


४०. मोडतोड करण्यासाठी बुद्धी असावी लागत नाही परंतु तडजोड करण्यासाठी मात्र अतिशय शहाणपणाने वागावे लागते.


४१. कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरू असतो. यावेळी एवढे शिकायला मिळते की ही ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते.


४२. चुका तुमचा अनुभव वाढवितात आणि अनुभव तुमच्या चुका कमी करतात.


४३. संयम आणि काळ हे जगातील दोन मोठे योद्धे आहेत. माणसाने त्यांचे महत्त्व ओळखले पाहिजे.


४४. ध्येय साधण्याकरीता केवळ चांगले विचार असून उपयोग नसतो तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं मिळणं महत्त्वाचं असतं.


४५. आपले ध्येय निश्चितपणे ठरवा म्हणजे यशाचा मार्ग आपोआप सापडेल.


४६. विचार हा सर्व क्रियांचा पूर्वज आहे.


मराठी सुविचार | Suvichar Marathi

४७. आपल्या प्रगतीच्या वाटेवर चालताना दुसऱ्याच्या हक्कांवर अतिक्रमण करू नये.

४८. संसार म्हणजे क्षणिक आनंद देणारे विधात्याने बनविलेले एक खेळणे आहे.

४९. एखादी वस्तू आपल्याकडून हरविल्यावरच तिची खरी किंमत कळते.

५०. अंतःप्रेरणा हे आपले आपल्याला मिळालेले प्रेमळ मार्गदर्शन असते.

५१. धन हे सुखाचे साधन आहे साध्य नव्हे.

५२. ज्ञानार्जनाशिवाय मानवाचे जीवन हे पशूसमान होय.

५३. बाहेरील जगामध्ये सौंदर्याचा शोध घेण्यापेक्षा ते स्वतःमध्ये शोधा.

५४. जीवनात शिस्तीला महत्त्व दिले असता यशाचा मार्ग सुकर होतो.

५५. जगाला उत्तमातील उत्तम गोष्टी द्या म्हणजे तुम्हालाही उत्तमोत्तम गोष्टी लाभतील.

५६. माणसाचा उत्साह म्हणजे त्याच्या अंतरंगातील देव होय.

५७. विश्वासू मित्र लाभणे हे आपल्या जीवनातील फार मोठे भाग्याचे लक्षण आहे.

५८. सामान्य लोकांच्या चमूकडून उत्तम काम करवून घेणे म्हणजेच यशस्वी व्यवस्थापन होय.

५९. प्रत्येक अनुभव हा माणसाला काहीतरी नवीन ज्ञान देत असतो.


६०. एखाद्या वाईट गोष्टीची सवय लागणे खूपच सोपे असते पण ती सवय मोडणे अतिशय कठीण असते.


६१. असे का? कशासाठी? हे प्रश्न म्हणजे ज्ञान मिळविण्याचे मोठे साधन होय.


६२. जो नेहमी नवनवीन शिकत रहातो तो कधीच विचाराने म्हातारा होत नाही.


६३. विक्री आणि नाविन्य उद्योगधंद्याचे दोन पंख आहेत.

हे सुद्धा Youtube वर बघा – Marathi Quotes


मराठी सुविचार | Suvichar Marathi

६४. प्रत्येक दिवशी सकाळी अत्यंत उत्साहाने जगण्याची नवीन सुरूवात करावी.


६५. आपल्याला सतत पुढे पुढे जावयाचे आहे हे जीवनाचे ध्येय ठरवावे.


६६. मनस्थिती जर खंबीर असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीला सामोरा जाऊ शकतो.


६७. जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिंमत ठेवा आणि जी गोष्ट दुसऱ्याच्या मनात आहे ती गोष्ट समजून घेण्याची स्वत:मध्ये क्षमता ठेवा!


६८. प्रत्येकाने आपला चांगला दृष्टिकोन, आपले चांगले विचार, आपले चांगले वागणे आणि मनात काहीही न ठेवता मनमोकळेपणे जगणे यामध्ये जगण्याचे खरे रहस्य दडलेले आहे.


६९. आनंदी दिसणाऱ्या व्यक्तीला दुःख नसतेच असे नाही पण त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला उमगलेली असते.


निष्कर्ष | Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली सुविचार एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काहीकॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

2 thoughts on “Best Marathi Suvichar 60+ | मराठी सुविचार”

Leave a Comment