Best Shivjayanti speech in Marathi 2024 | शिवजयंती भाषण

5/5 - (3 votes)

Shivjayanti speech in Marathi– आज आपण या ब्लॉग पोस्ट Shivjayanti speech in Marathi, shiv jayanti speech in marathi, shivaji maharaj jayanti speech in marathi या विषयी केले जाणारे भाषण पाहणर आहोत. मित्रहो आज आपल्या महाराष्ट्र मध्ये महान शासक छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणजेच शिव जयंती एकोणीस फेब्रुवारी ला करतो. महाराजांनी एक्दम कमी वया मध्ये शूरता दाखवून आपली जवाबदारी समजून स्वराज्यासाठी खूप मोठे कार्य केले.आपण ह्या भाषणचा वापर १ ली पासून १० वी पर्यंतही करू शकतो.

Shivjayanti speech in Marathi | shiv jayanti speech in marathi

सर्वात पहिला मी माझ्या परम पवित्र मातृभूमीला प्रथम नमस्कार करून व्यासपीठावरील मान्यवर,सन्माननीय व्यासपीठ, गुरुजनवर्ग तसेच उपस्थित सारे शिवभक्त आणि रसिकहो. सर्वप्रथम मला हित बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी मान्यवरांचे आभार मानतो. आज मी येथे एक सर्वात महान व्यक्ती बदल बोलणार आहे ज्यांचे संपूर्ण जगाला अभिमान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.

19 फेब्रुवारी १६३० हा तेजोमय दिवस आणि अशा या सोनेरी दिवस महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी नामक किल्ल्या मध्ये माता जिजाऊ यांच्या पोटी एका शूर सिंहाच जन्म झाला. आणि शूर सिंह म्हणजे श्रीमंत श्रीमानयोगी,लोककल्याणकारी राजे होते. जाणते राजे शासनकर्ते छत्रपती शिवाजी राजे भोसले.

शिवाजी महाराज यांचा जन्म महाराष्ट्रातील मधील पुणे जिल्ह्यातील एक शिवनेरी नामक किल्ल्या वरती झाला म्हणून त्यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज असे ठेवण्यात आले होते . त्यांच्या वडिलांचे नाव छत्रपती शहाजीराजे भोसले होते आणि त्यांचा आईचे जिजाबाई असे नाव होते.

छत्रपती शिवाजी राजे अगदी लहान पणापासूनच खूप हुशार आणि कुशल बुद्धीचे होते त्यांना माता जिजाऊंकडून अगदी वेगवेगळे शिकवण मिळाले होते. आणि पिताश्री म्हणजे छत्रपती शहाजीराजे भोसले यांचा कडून शौर्याचा वारसा मिळाला होता म्हणून बालपणीच त्यांनी विविध युद्ध कलेचे प्रशिक्षण घेतले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे तोरण मनाशी घट्ट बांधले होते. जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांचाबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरा मध्ये गुलामगिरी पूर्ण नष्ट करून स्वराजाची स्थापना करण्याची शपथ घेतली.

त्यावेळी स्वराज्याची निर्मिती करणे म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. सर्वत्र गुलामगिरी होती अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होते बहिर्जी नाईक कोंडाजी फर्जद, मुरारबाजी देशपांडे,नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे,तानाजी मालुसरे, येसाजी कंक ,वीर शिव काशीद असे अनेक शूर वीर मावळ्यांनी वरायांची साथ दिली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या चतुर आणि चाणक्य बुद्धीने व आपल्या मावळ्यांच्या साथीने समोर उभे असणाऱ्या लाढ्य शत्रूला म्हणजेच शाहिस्तेखान ,औरंगजेब, अफजल खान, सिद्धी जोहर अशा अनेक शत्रूला भारी पडले अर्थात त्यांना हरवून टाकले. माता जिजाऊंचे स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरविले. महाराजांनी शत्रुंचा नाश करुन हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून अनेक गडावरती विजयाचा भगवा फडकावला आणि स्वराज्याची स्थापना केली एवढे दिवस अंधारात असलेल्या रयतेला प्रकाशात आणण्याचे काम महाराजांनी केले.

हे सुद्धा वाचा –  राजमाता जिजाऊ भाषण

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी करण्यात आला. सुमारे तीनशे वर्षे जुलमी शासन कर्त्याच्या अन्यायाला ग्रासलेल्या,गुलामगिरीत पडलेल्या,गोरगरीब रयतेला लोककल्याणकारी, अत्याचाराने त्रासलेल्या,न्यायप्रिय असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रुपाने मिळाला.

अन्यायाविरुद्ध शिवाजी महाराजांचा लढा होता. त्यांचा लढा मुसलमानाविरुद्ध कधीच नव्हता. रयतेला त्रास देणाऱ्या शत्रूशी त्यांचा लढा होता. सर्व धर्मातील लोकांना आपले प्रजाजन मानत होते महाराज. बलाढ्य अफजलखानाचा भेटीच्या वेळी त्यांचा प्रमुख विश्वासू सेवक हा सिद्धी इब्राहीम हा एक मुसलमानच होता.

छत्रपती शिवाजी महाराज हे एक पर्यावरण प्रेमी होते. दुष्काळाच्या वेळी शेतकऱ्यांना महाराजांनी मदत करीत असत. शेतकऱ्यांचा सर्व कर माफ करत त्यांचा हिताकडे लक्ष देत असत. स्वराज्यात कोणताही भेदभाव स्वराज्यात नव्हता. सन्मान व स्त्रियांचा आदर कायम केला जात होता. शेतकऱ्यांना हि मान होता. संतांचा साधूंनाही आदर होता. आणि प्रत्येक मराठी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज आमचे राजे असल्याचा आम्हाला खूप अभिमान होता. शिवाजी महाराज हे फक्त एक राजे नव्हते तर ते स्वतंत्र नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाचे निर्मिती करणारे एक शिल्पकार होते.


Shivjayanti speech in Marathi

हे सुद्धा Youtube वर पाहू शकताShivjayanti speech in Marathi.

Conclusion shivaji maharaj jayanti speech in marathi | निष्कर्ष

आम्ही दिलेली ब्लॉग ची माहिती तुम्ही खालील विषय साठी वापरू शकता

  • Shivjayanti speech in Marathi.
  • shiv jayanti speech in Marathi
  • Chhatrapati Shivaji Maharaj jayanti speech in Marathi
  • Shiv jayanti bhashan marathi
  • shivaji maharaj jayanti speech in marathi
  • shiv jayanti bhashan

shiv jayanti bhashan


Shivjayanti speech in Marathi

Shivjayanti speech in Marathi-अन्य लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकावरून घेतली गेली आहे. वरील ब्लॉग मधील माहिती फक्त भाषण आणि शिक्षण उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिल्या गेलेल्या माहिती बद्दल काही अडचण असे आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून शकता आम्ही तुम्हाला 24 तासामध्ये उत्तर देऊ.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

Leave a Comment