Comedy Jokes In Marathi | कॉमेडी जोक्स मराठीत

Rate this post

Comedy Jokes-“हसव्याच्या च्या जगात आपले स्वागत आहे! आमच्या ‘मराठी जोक्स’ च्या ब्लॉगमध्ये, आपल्याला हसवण्याच्या आणि मजाकीय कथा वाचण्याची अद्वितीय विचारे मिळेल. आपल्या दिवसाच्या आनंदाच्या निकषातल्या गोष्टींसाठी तयार रहा!” तर पाहूया Comedy Jokes, Marathi jokes, funny jokes in Marathi.

Comedy Jokes

रिक्षावाला – बोला साहेब , कुठे जाणार ?
गंपू – नवी मुंबईला.
रिक्षावाला- पण साहेब , कोणत्या क्लासने जायचं ते सांगा.
गंपू – आं…रेल्वेतला , विमानातला क्लास माहितीय. पण रिक्षातक्लास म्हणजे काय ?
रिक्षावाला – फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे चुकवून रिक्षा चालवणार. सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून रिक्षा चालवणार.
… गंपू – आणि थर्ड क्लास ?
रिक्षावाला – थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार आणि तुम्ही रिक्षा चालवायची…!


बाबा:-काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?
चंदु:-हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या…
बाबा:-ऑ…मॅडम कशा नापास होतील गाढवा?
चंदु:-हो बाबा , त्या अजुन त्याच वर्गाला शिकवतात..

नातु : हॅलो आजी. इंद्रजित बोलतो.

आजी : कोण बोलतोय? नीट ऐकु येईना.

नातु : इंद्रजित बोलतोय म्हटलं.

आजी : इंग्रजीत नको रे बाबा मराठीतच बोल


फुलटू आगरी इश्टाईल !
फुलटू आगरी इश्टाईल ! देवराम: ए बाला इक्र य. वेटर : क पाजे क तुला? देवराम : १ काॅपी कितीला ह ? वेटर : २० रुपे देवराम : तुज्या, फुर्च्या दुकानान त १ रुपेला मिलत कॉपी, तु मना क एरा समजतं क ? वेटर : डोका फोरु तुजा डोका फोरु.. ते झेरॉकचं दुकान हाय.


एके ठिकाणी एका खटारा गाडीची विक्री चालू असते….!!!

लोकं जोरजोरात बोली लावत असतात..!!

१० लाख..!!

१२ लाख..!!

१५ लाख..!!

गोलू हे ऐकून अचंबित होतो आणि विचारतो “या खटारा गाडीचे एवढे पैसे का…??”

विक्रेता : अहो या गाडीचे आत्तापर्यंत कमीत कमी १० अपघात झाले आहेत आणि प्रत्येक वेळी नेमका बायकोचाच अपघातात मृत्यू होतो…!!!

गोलू: २० लाख…!!!


बंटीच्या घरी आलेले पाहुणे जेवायला बसलेले असताना बंटीमोठ्याने म्हणाला

“आई, आपल्याकडे आजोबा, आजी आणि आत्या आले आहेत. .
.
तू तर म्हणत होतीस की म्हसोबा, सटवी आणि टवळी चरायला येणार आहेत,
.
त्यांच काय झाल ?


Comedy Jokes

अगोदर वाईन शाॅप बंद व्हायचे तेव्हा बायका खुश व्हायच्या

.
आत्ता ज्वेलर्स बंद आहेत म्हणून नवरे खुश आहेत….
वेळ प्रत्येकाची येतेच


पोरींनी Miss Call ला इतकं बदनाम केलं आहे की,
.
.
.
चुकून कधी मित्राचा Miss Call आला तरी आई म्हणते…..
‘जा बघ….तुझी राणी तुझी आठवण काढतेय


आई : बाळ तू खूप मोठा हो…

बाळ : आई मी इतका मोठा होईल की पोस्टाच्या तिकीटावर माझा फोटो राहील.

आई : बाळ इतका मोठा नको होऊ कारण लोक मागून थुका लावतात आणि पुढून बुक्क्या मारतात.


काही लोकं आपल्याच नाकात
आपलेच बोटं घालून गरागरा फिरवितात,
नाकातून बोट काढतात
आणि
बोटाकडे अश्या नजरेने पाहतात
जणू काही नाकातून एखादा मोतीच
बाहेर आलाय…!


दुकानदार .काय पाहिजे

गिऱ्हाईक . मला ताकद पाहिजे हिंमत पाहिजे
अक्कल पण पाहिजे

दुकानदार .सहेबांना एक दारू चा खंबा दे
आणि मुगदाळ दे पाच वाली


Comedy Jokes

भावा तुझ्यासाठी काय पण
म्हंनारे
.
.

पासवर्ड टाकतानी तिकड बग म्हंत्यात


मुलगी आयुष्यातून गेल्यानंतर माणूस खूप यशस्वी होतो
हे आज विराट कोहलीने दाखवून दिले….
.
.
म्हणून म्हणतो मित्रानो मुलीचा नाद सोडा आणि करीयर वर ध्यान द्या


सरदार – डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही,
झोपून उठल्यावर झोप येत नाही ,
काय करू?

डॉक्टर- रात्री उठून उनात बसत जा, सगळे ठीक होईल 🙂


मुलगा रेल्वे चौकशी अधिकार्याला –
मुलगा : पुण्याला एक्सप्रेस गाड़ी कधी आहे ?

अधिकारी – २ ला

मुलगा – passenger ?

अधिकारी – ३ ला

मुलगा -लोकल ?

अधिकारी – ५ ला … पण तुम्हाला कुठे जायचे आहे ?

मुलगा – रुळावर हागायला 😉


संग्राम – देवयानी मला जरा towel देता का?

देवयानी – मी तुमच्या बापाची नौकर नाहीये , तुमचे तुम्ही घ्या

संग्राम- ठीक आहे

देवयानी – संग्राम, मी संडासला बसले आहे, माझ्या हाताला मेंदी लावली आहे , धुवायला येता का?

संग्राम – आलोच ” तुमच्या साठी काही पण”


Comedy Jokes

शिक्षक:बंडू, उठ , मला सांग 57 भागिले 8 किती?

बंडू : 7

शिक्षक : बाकि?

बंडू : बाकि काही नाही, निवांत 🙂


संताला आपला कुत्रा विकायचा होता. आणि बंता त्याला विकत घेणार होता.

बंता – हा कुत्रा विश्वासू तर आहे ना ?

संता – हो आहेना, मी याला आतापर्यंत तिनदा विकलेले आहे, पण तो एवढा विश्वासू आहे की प्रत्येक वेळी पुन्हा माझ्याजवळच परत येतो.


सरदारजी पोलिस स्टेशनमधे गेला आणि त्याने पोलिस स्टेशनमधे तक्रार नोंदवली –

सरदारजी – साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहेत

पोलिस – कोण आहे तो जो तुम्हाला धमक्या देत आहे?

सरदारजी – साहेब … टेलिफोनवाले… म्हणतात बिल नाही भरलं तर कापून टाकीन.


एका सरदाराने 1 एप्रिलला सीटी बसमधे कंडक्टरकडून 5 रुपयाचे टिकीट विकत घेतले आणि तो कंडक्टरला म्हणाला, ” एप्रिल फुल”

” कसे काय?” कंडक्टरने विचारले.

” कारण माझ्याजवळ ऑलरेडी बसचा पास आहे”


बनिया : हे केळ कसं दिलं ?

दुकानदार : 1 रुपया

बनिया : 60 पैशात देतोस का ?

दुकानदार : 60 पैशात तर फक्त याचं साल येतं.

बनिया : हे घे 40 पैसे, साल तु ठेवून घे आणि केळ मला दे.


Marathi jokes

नोकर- ‘साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, हे घ्या.’

मालक- ‘मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या’

नोकर – ‘म्हणूनच परत करीत आहे.’


न्यूटनच्या बायकोचा उखाणा :-
आईला पाहून बाळ खुदुखुदू हसलं…
आईला पाहून बाळ खुदुखुदू हसलं…
डोक्यावर पडलं सफरचंद,
तर खायचं सोडून येडं शोध लावत बसलं…!!


जीन : काय हुकुम आहे आका?

आका: माझ्या आकाउंट मध्ये ५० करोड कॅश आणि कॅतरीना सोबत लग्न करवून दे

जीन: आका……………!

हुकुम करा मस्करी नको.


गुरुजी : अकबरचा जन्म आणि मृत्यू कधी झाला?

बंडू : माहीत नाही

गुरुजी : अरे असेकाय करतोस……? पुस्तकामध्ये लिहिले आहे की १५४२ – १६०५
.
.
.
.
.
बंडू : मला वाटले की तो अकबरचा मोबाइल नंबर आहे.


रवाहाबरोबर तर सगळेच जातात, खरी मर्दानगी, खरं धैर्य लागतं प्रवाहाच्या उलट दिशेने जायला.
.
.
.
नेमकं हेच मला ट्रॅफिक हवालदाराला सांगायचं होतं पण येड्याने पावती फाडली.

हे सुद्धा Youtube वर पहा– Marathi jokes


Marathi jokes

धन्य तो शिकवणारा मास्तर आणि उत्तर लिहणारा पोरगा!!!
संस्कृत चे शिक्षक : तमसो-माँ ज्योतिर-गमयाँ
या ओळिचा अर्थ काय ?
.
.
.
बंड्या : तु झोपुन जा आई,
मी ज्योती च्या घरी जात आहे….
.
संस्कृत चे शिक्षक कोमात
बंड्या आपला जोमात…


आज बैलाला दारू पाजू
नका नाहीतर……
.
.
.

झिंगल बैल झिंगल बैल 


चम्प्या एका लग्नात जेवण करत होता..
झंप्या – अबे एक तास झाला..जेवतोयेस तू..अजून किती चरशील?
.
.
.
.
चम्प्या – अबे मी पण परेशानझालोय..अजून तीन तास जेवायचंय..
झंप्या – ३ तास?
चम्प्या – हि बघ पत्रिका..
जेवणाची वेळ…७ ते ११


Marathi jokes

कुणी तुमच्या घरावर पान खाऊन थुंकत असेल तर ते पुसा!”- महात्मा गांधी.•
.
“पण लक्षात ठेवा ते पुसताना त्याचीच चड्डी वापरा!”- बाळासाहेब ठाकरे.•
.
.
“आणि मग ती त्यालाच घालायला लावा..”आणी त्या चड्डी सकट त्याला पण धूवुन काढा..!!- राज ठाकरे
.
.
धुवून झाली की ती चड्डी पुन्हा बाजारात विकायला काढ़ा – शरद पवार

हे सुद्धा वाचा – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


बंडू अभ्यास करीत बसलेला असतो. पाहूणे घरी येतात , बंडू ला विचारतात ” बंडू बाबा घरी आहेत का ?”
.
.
बंडू ” मग मी काय मूर्ख आहे , जो अभ्यास करतोय ?”


आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
.
.
तुमचे डोळे पुसायला खूप जण येतील पण
..
.
.
.
.
नाकातला शेंबुड पुसायला कुणीही येत नाही…..
तेव्हा काळजी घ्या…. हिवाळा येत आहे..


उठा उठा
दिवाळी आली
.
.
.
.
.
.
बाजूवाली आयटम रांगोळी काढतेय 
तीला बघायची वेळ झाली


पेंशट: खुप पातळ संडासला होतय.
डाँक्टर:किती पातळ.
पेंशट:खुपच पातळ.
डाँक्टर:तरी साधारण किती पातळ.
पेंशट:इतके पातळ की तुम्हाला चुळ भरता येईल


Funny jokes in marathi

बायको रात्री पलंगावर पडल्या पडल्या :-
अहो आज असे काहि करा कि माझे अंग घामाघूम.
झाले पाहिजे…
.
.
.बंड्या ऊठला आणि पंखा बंद करुन परत
झोपला..

.
सुचना :- प्रतेकाला माहिती आहे
“” मी चावट विनोद टाकत नाही “”


1980 साली
IDBI बँकेने धीरुभाई अंबानी यांना कर्ज देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दर्शवला होता…
आता तेच अंबानी IDBI विकत घ्यायचे प्लानिंग करत आहेत…
जगात अशक्य असे काहीच नाही, फक्त इच्छाशक्ती हवी…
गेल्या आठवड्यात मलाही ICICI बँकेने कर्ज देण्यास नकार दिला… तीच चूक HDFC बँकेनेही केली….
आता बघूया….


Funny jokes in marathi

एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तिच पुसून टाकली आणि माणसाला विचारले..,
काय.., काही आठवते का…?
माणूस : हो., फ़क्त बायकोचं नाव
देव हसला अन म्हणाला,
Format केले पण virus नाही गेला.

Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेलेjokes एकदम सोप्या पद्धतीने लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काही कॉपीराईट [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता. तुम्हाला अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.तुम्हाला अडचण असल्यास मेल करा तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic