Sad Shayari Marathi-(Sad Shayari Marathi) “दु:खाच्या तरंगांच्या आवाजाच्या स्मरणात, तुमच्या ‘मराठी दु:ख सूत्र’ च्या प्रस्तावनेत स्वागत आहे. येथे, आपल्या दु:खाच्या भावना अशी शब्दांमध्ये प्रस्थापित करून, आपल्या दिलाच्या गहर्या अंगणातल्या आवाजाच्या अधिपाती वाचकांस सहभागी बनवू आणि आपल्याला त्याच्यात तळमळू द्यायला अशी संधी आहे!”
अनुक्रमणिका
Sad Shayari Marathi | दुःखी शायरी मराठी
“प्रिये मी फुले मागितली तू मला पुष्पगुच्छ दिलास
मी दगड मागितले तू मला सुंदर मूर्ती दिलीस
मी मोरपीस मागितले तू मोर दिलास
तू बहिरी आहेस कि काय?
गुलाबी थंडीत, तुझ्या कुशीत शिरावे,
काळ्याभोर केशसंभारात हात गुंफावे,
तुझ्या टपोरी डोळ्यात हरवून जावे,
देवाजवळ एकच प्रार्थना, हे सगळे खरे व्हावे
गुलाबी थंडीत दोघं,
अन हा गार गार वारा,
फक्त तुझ्या मिठीत…
दिसे स्वर्ग सारा
बर्फासारख्या थंडीमद्धे,
तुझ्या मिठीत लपावस वाटत
एका जन्माचं आयुष्य,
एका क्षणात जगावस वाटत…!!
तुझ्या मिठीत आल्यावर अस वाटत
वेळेन पण थोड थांबाव …
आणि तुझ्या माझ्या प्रेमाच हे नात..
आयुष्यभर असच राहव…..
Sad Shayari Marathi | दुःखी शायरी मराठी
झोंबते हि गार हवा
बघ कसा माझ्या तनी.
सांगु कसे साजना तुजला
मज आता लाज येते मनोमनी.
ओथंबलेला गारवा सांगुनी गेला
मज काही सारे…
तुझ्या उबदार स्पर्शालाही
भिजुनी टाकतात हे गार वारे.!!
कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.
मला आवडतो पाऊस,
गुलमोहराला फुलावणारा,
अन, तेवढ्याच मायेने,
बाभळीला हि झुलवणारा.
जसे अतूट नाते असते पाऊस आणि छत्रीचे,
तसेच काही नाते तुज माझ्या मैत्रीचे,
पाऊस येतो आणि जातो
साथ छत्रीची असू दे असेच तो सांगतो.
Sad Shayari Marathi | दुःखी शायरी मराठी
मी मुद्दामच छत्री आणत नाही,
पाऊस येणार म्हणून,
मला भिजताना पहिले,
तू छत्रीत घेणार म्हणून.
कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो……
तू दिलेल्या अश्रुना हिर्या सारखा जपेन,
तुझ्या डोळ्यात येऊ,
पाहणारा अश्रूंचा पाऊस,
तुला माझ्या डोळ्यात दिसेल.
पाऊस कधीचा पडतो,
झाडाची हलती पाने,
हलकेच मला जाग आली,
दु:खाच्या मंद स्वराने.
ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
संग प्रिये मी तुला कसे विसरू.
तू अस्स कशी पाहिलास कि वाटल,
खरच पाऊस पडायला हवा,
मी अंग चोरताना तुझा,
धिटाईचा स्पर्श घडायला हवा.
Marathi Sad Shayari | दुःखी शायरी
नसती उत्तरे द्यावी लागतात,
वेड्यासारखं वागल्यावर,
पण वेड्यासारखं वागायला होत,
पाऊस पडायला लागल्यावर.
पाऊस पडत असताना, तो मातीचा सुगंध,
आणि गार गार वारा……
मला नेहमीच आवडतात झेलायला,
मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा….
रात्री वारा सुटलेला,
आणि पाऊस पडत होता,
सहज वर पहिले तर चक्क,
चंद्र रडत होता.
आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो,
माझा वेडा चातक पक्षी इथे,
एका थेंबासाठी तरसतो
ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,
मंद-मंद असा सुवास आहे,
आजही आठवतोय तोच पाऊस,
अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे.
Marathi Sad Shayari | दुःखी शायरी
अचानक पाऊस आल्यावर
काही थेंब तुझ्या ओठांवर थांबले….
मग क्षण भर मी पाहतच राहिलो…
आणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले….
मैत्री म्हंटली की
आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं ते
खरंखुरं शहाणपण.
कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही.
मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यात श्रेष्ठं
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्टं
मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक
Marathi Sad Shayari | दुःखी शायरी
मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खऱ्या मैत्रिणी मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात
मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजून
चिंब चिंब नाहली
मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे
साथीला आता तु नाहीस,
हे ह्रदयाला कसं समजावु,
अविरत पाझरणार्या डोळ्यांना,
तु नसण्याचं शल्य कसं दाखवु…..
तुझ्या पासुन दुर होण,
माझ कोणतही पथ्य नाही….
कारण फक्त एकच की, पुन्हा एकदा प्रेमात पडुन
विरह सहन करण आता मला शक्य नाही….।।
प्रत्येक वेळी भेटीच वचन मीच मागायचं का
पहा कधीतरी स्वताहून देता आल तर…
पाखर सुद्धा भेटतात परस्परांच्या ओढीन
बघ त्यांच्या कडून काही घेता आल तर …
Marathi Sad Shayari | दुःखी शायरी
मनाला बांध घातला होता
हृदयातला पूर थोपवला होता..
पण डोळ्यांनी चुगली केली होती
अन आसवांनी दगा दिला होता..
नज़र ना लागो मला कुणाची
म्हणून तू माझी नजर काढून गेली ………
आठवणीत राहावे हे प्रेमळ क्षण
म्हणून तू गालावर माझिया काळजाचे बोट लावून गेली
अज़ून तरी मी तुला
काही निरुत्तर केले नाही….
तरीपण माझ्या प्रश्नाना
तू कधि उत्तर दिले नाही….
कधि तू कधि मी
एकमेकांशी भांडू ….
राग ओसरल्यावर मात्र
पुन्हा प्रेमाचा नवा डाव मांडू…..
Marathi Shayari | मराठी शायरी
जर तुला मला आजमवायच होत
तर फक्त तुज्या गाहिर्या डोळ्यांनी पाहायच होत….
अग मी तर असाच बेशुद्धा झालो असतो
त्यात एवढ का लोभस हसायच होत….
मी डोळे बंद करताच
तुजी आठवण तुला सोबत घेऊन येत होते…..
उघडतच डोळे निघून जातेस
म्हणून मी कायमचे डोळे मिटले होते….
आजकाल कोणाशी जास्त पटत नाही..
बोललेल कोणाला आवडत नाही..
जवळ असलेलेच मग दूर होताना..
क्षणाचाही विचार करत नाही..
बोटांना माझ्या आता
वेगळं राहायला आवडत नाही ..
तुझ्या बोटात गुंतल्या शिवाय
त्यांना ही करमत नाही ….
होती एक कोणी तिच्यासाठी झुरत होते मन माझे,
कळ्ले ना तिला कधिच काही,काय हाल झाले माझ्या मनाचे????
विस्कटले स्वप्न जे नयनी पाहिले मी,आशेवर जगणे आता….
तार तोडले तिने माझ्या मनाचे…..
हे सुद्धा वाचा – Love Quotes In Marathi
Marathi Shayari | मराठी शायरी
अशाच एका तळ्याकाठी बसली होतीस तु……
आठवणीत कोणाच्या रमली होतीस तु…………
क्षितिजकडे डोळे तुझे वाट पाही कोणाचे….
जूळ्ले तार कधी तुझ्या माझ्या मनाचे…
रात संपेना आठवनित तुझ्या, डोळ्यात आले पाणी…….
जळ्त राहिलो एकटाच मी,पेटवलेल्या तु दिव्यानी…………
नव्हती सवय मला कोणाची इतकी, कि जागुन काढीन रात्री,
आशा दाखवली तुझ्या डोळ्यांनी,पण स्वप्न अपुरेच माझ्या मनि……….
हृदयात साठवलेल्या कित्येक आठ्वणी आहेत….
पण त्या सांगताना मन गहिवरत????
कसं सांगाव हे सगळ् तुला…..
तुला नजरेसमोर पाहिलं कि मन पन अडखळ्त????
स्वप्नांच्या मागे धावु नकोस,
स्वप्न सगळीच पूर्ण होत नाहित…
उरतात ते फक्त उसासे,
अश्रु पण खाली ओघळत नाहित….
आयुष्यात झालेली जखम,
कधितरी भुलवावी लागेल……
तुलाही आता, आयुष्याची
नवीन सुरुआत करावी लागेल……..
Marathi Shayari | मराठी शायरी
नसतात कधी आठ्वणी
इतक्या जपायच्या…………
क्षणात त्या चटकन
डोळ्यात पाणी आणतात ………
हृदय काहितरी सांगतय तुला,
वाट पाहते आहेस तु कोणाचितरी……
का लपवतेस भावना तुझ्या मनात,
हो कोनाच्यातरी मनाची रानी……..
दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे
यात फरक एवढाच,
की दुखणार्या मनाला आवर घालता येत नाही ,
आणि गुलाबाला तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही……
जुळत नसतात बंधन
कधीही इतक्या सहज ….
कशी आलीस तु जिवनात माझ्या,
आता वाटते आहे ति फक्त तुझिच गरज…………..”
मराठी प्रेमाची शायरी पहायचा असतील तर Youtube लिंक वर क्लिक करा : प्रेमाची शायरी मराठी मध्ये
Conclusion
आम्ही ब्लॉग मध्ये दिलेले Sad Shayari Marathi, Marathi sad shayari, Marathi shayari एकदम सोप्या पद्धतीने लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काही copyright ची काही अडचण असेल तर तुम्ही [email protected] या ई-मेल तुम्ही मेल करू शकता तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर दिले जाईल.