Majha Swapnatil Bharat Nibandh 2023 | माझा स्वप्नातील भारत निबंध

Rate this post

Majha Swapnatil Bharat Nibandh – आज या ब्लॉग पोस्ट, Majha Swapnatil Bharat Nibandh Mazya Swapnatil Bharat Essay In Marathi मध्ये विषयी केली जाणारे माहिती पाहणार आहोत.

परिचय –

नमस्कार मित्रांनो ,आज आपण ह्या विषय वर काही माहिती देणार आहे Mazya Swapnatil Bharat Essay In Marathi ही माहिती आम्ही खालील प्रमाणे दिली आहे.

Majha Swapnatil Bharat Nibandh | माझ्या स्वप्नातील भारत निबंध

मी या राष्ट्राचा त्याहीपेक्षा या मातेचा पुत्र आहे. हे अधिक सार्थ होईल. मीया राष्ट्रासाठी काय केलंय? असा विचार करण्याइतकीही आता आपली राष्ट्रभक्ती नाही राहिली. राष्ट्रभक्ती म्हणजे केव्हा तरी येणारा बुडबुडा आहे. स्वातंत्र्यापूर्वी काय-काय मनसुबे केले होते ते पूर्णत्वाला गेले नाही. त्याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यानंतर राष्ट्राविषयीची तळमळ जवळ-जवळ नाहीशी झाली. आपलं दुर्दैव म्हणजे ‘खरा भारत स्वप्नात बांधावा लागतो आहे’ परंतु या स्वप्नाचा भंग होऊ नये एवढी माफक अपेक्षा ! वास्तवातील या भारताकडे साधा कटाक्ष टाकला तरीही कुपोषण, विषमता, दारिद्र्य, अज्ञान प्रकर्षाने दाखवतो. एकीकडे दारिद्र्याने व्यथित झालेला वर्ग तर दुसरीकडे श्रीमंतीमध्ये लोळण घेणारा वर्ग हे सर्व संपत्तीच्या केंद्रीकरणामुळे घडले.

तर पुढे श्रीमंत भारत व गरीब भारत असे दोन भारत एकाच भारतात तयार होतील. पण हे सत्य लपणार नाही की गरीब भारतावर अन्याय करुन श्रीमंत भारत अधिक श्रीमंत बनला आहे. याची इतकी चीड येते पण… मी बापूजींचा वारसदार आहे. मीसंयमाने हिंसेवर मात करीन त्यांनी केवळ साडेतीन फुटाच्या काठीवर इतिहास घडवला. म्हणून अहिंसा हा माझ्या स्वप्नमय भारताचा एक घटक राहील ! ‘जिओ और जिने दो’ हे माझ्या भारताचे ब्रीद असेल, हे ब्रीद नक्कीच सर्वांना तारणारे आहे. पाच हजार वर्षाच्या सांस्कृतिक परंपरेने पावन झालेली ही भूमी आज खरंच पावन राहिली आहे का? देवधर्म, यज्ञकांड, मंदिर उभारुन ते पावित्र्य जोपासलंय का? वैज्ञानिक प्रगतीने आज अशक्यप्राय गोष्टी शक्य करुन दाखवल्या आहेत माणूसच परंतु हीच प्रगती मानवाला काही प्रमाणात हानीकारक ठरली आहे.

हे सुद्धा वाचाFulache Atmavrutta Nibandh


माणसाला परका झाला आहे. माझ्या स्वप्नातील भारतात मात्र वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा योग्य प्रमाणात वापर करणारे सुजण खऱ्या अर्थाने भारतीय असतील. त्यामुळे विज्ञान वरदानच ठरेल. आता कुठे लागलेली यांत्रिक शेती माझ्या स्वप्नातील भारताची सर्वसामान्य बाब झालेली दिसेल. तसंच अंधश्रद्धेच उच्चाटन ही माझ्या स्वप्नातल्या भारतामध्ये झालेलं दिसेल यात तिळमात्रही शंका नाही. आजच्या या भारतात कुटुंबनियोजना बाबतीत थोडी जागरुकता आहे. पण माझ्या स्वप्नातल्या भारतात याचे परिणाम स्वरूप फलित दिसणार आहे. म्हणजे लोकसंख्या स्थिर असेल त्यामुळे गुन्हेगारी, भ्रष्टाचार यांसारख्या समस्याच प्रमाण फारच कमी होईल अशी आशा आहे. ज्याचे फार शत्रू आहेत. तोच चांगला अशी विधाने आजच्या युगात वापरतात. म्हणजे अनेक लोक चांगल्या लोकांचा विचार करतात. ही मानसिकताही मी माझ्या स्वप्नातल्या भारतामध्ये बदलणार आहे.


त्यामुळे कदाचित हे विधान बदलू शकेल. भारताचा ही शत्रू उरणार नाही. तशी पाकिस्तानाबद्दल थोडी शंकाच आहे. पण भारत सर्व अज्ञात शत्रू होईल. ‘अज्ञात शत्रू भारत’ ही खऱ्या भारताची ओळख राहील.आजच्या भारताची खरी समस्या, भ्रष्टाचार हीच आहे. आणि खऱ्या भारताला तर भ्रष्टाचारांचा रागही येवू द्यायचा नाही. यात भ्रष्टाचार समूळ नष्ट करणे हे सोपं काम नाही. माझ्याखऱ्या भारतात ना ! मी पुस्तकामध्ये इतर कथाऐवजी ‘जगावं कसं अभिमानानं आणि आनंदानं कसं जगावं’ यासारखे पाठ पुस्तकात द्यायला लावेन तसेच शिक्षण पद्धतीत अनेक बदल करेन. ज्यामुळे या देशाची पिढी अभिमानाने जगू शकेल आणि सगळ्यांच आयुष्यच बदलेल.

कुसुमाग्रजांनी नटसम्राटमध्ये लिहलेलं हे वाक्य पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हे खोटं ठरेल आणि असं घडणारच याची मला खात्री आहे. माणूस दुसऱ्याकडे माणसाच्या नजरेनेच बघेल. हरवलेला माणूस परत येईल आणि माणसासाठी आंतरिक घुसमट कमी होइल. सत्यावरच्या वाहतुकीच्या कोंडीपेक्षाही मानसिक कोंडी अधिक होत आहे. अमेरिकासारख्या देशात तर वाहतुकीची कोंडीही होत नाही, याचं कारण काय असावं? हे शोधाल आणि मग उमगल की ! विचार किती मोलाचे आहेत ! लंडनसारख्या शहरात जास्तीत जास्त मार्ग जमिनीखालीआहेत. त्यामुळे शब्दाची शंकाच उरत नाही. माझ्या भारतातही पायी चालणाऱ्यांचाही विचार करेल आणि फार सोयी उपलब्ध होतील याची जबाबदारी घेईन.

हे सुद्धा वाचामाझी आई मराठी निबंध


भारत हा कृषीप्रधान देशात गणला जातो. पण हे फक्त नावापुरतेच आहे. हा देश कृषीप्रधान असून शेतकरी यांना कोणीही इतर नोकरदाराप्रमाणे किंमत देत नाही. आपल्या देशातल्या श्रीमंत शेतकरी शेतकऱ्याला एम. टी. शिवाय अधिक काहीच नाही मिळालं. जी बाकी लोकांची पोटं भरतात. त्याच्या पोटातल्या भूकेचा वणवा शांत करणारी दोन वेळची भाकरीही त्याला कधी मिळाली नाही. जिथं शेतकरी म्हणजे सर्वांत कमी दर्जाचे काम करणारे लोक म्हणतो तिथं आपण हे विसरतो की आपल्या देशाचं कृषीप्रधान नाव बदलावं लागेल. खरंच आपण आपल्या देशाचे नामकरण करावे लागेल का ? नाही माझ्या स्वप्नातला भारत हा कृषीप्रधान राहील आणि प्रत्येक शेतकरी पोटभर अन्न आणि अंगभर वस्त्रे मिळतात म्हणून समाधानी असेल.

काही शेतकऱ्यांची खाजगी विमानेही असतील. शेतकऱ्यालाही त्याच्या कष्टामुळे मासिक पगार मिळेल. माझ्या स्वप्नातील भारतातसर्वच लोक सर्वांनाच आदर करणारे आदर्श नागरिक बनतील. पूर्वीप्रमाणे भारत एक प्रबळ राष्ट्र बनेल. त्यावेळी अमेरिकाही आपल्यापुढे नतमस्तक होईल. पण हे सर्व होण्यासाठी प्रत्येकाच्या मनात एक आशेचा किरण
असलाच पाहिजे. प्रत्येकाने त्याचा मागोवा घेत स्वतःमध्ये बदल केला तर तो भारतातही बदल निश्चितच घडवू शकेल.

Conclusion | निष्कर्ष

ब्लॉग मध्ये दिलेली माहिती चा वापर खालील मुद्देसाठी वापरू शकता

  • Majha Swapnatil Bharat Nibandh.
  • Mazya Swapnatil Bharat Essay In Marathi .
  • Majhya Swapnatil Bharat.

या माहितीसाठी उपयोग करू शकता.वरील Majha Swapnatil Bharat Nibandh माहिती एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काही कॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

1 thought on “Majha Swapnatil Bharat Nibandh 2023 | माझा स्वप्नातील भारत निबंध”

Leave a Comment