शाहू महाराज यांची माहिती | Shahu Maharaj Information in Marathi

4.7/5 - (9 votes)

shahu maharaj information in marathi | “इतिहास तू वळूनी पाहसी पाठीमागे जरा झुकवून मस्तक करशील, तयांना मानाचा मुजरा“दलितांचा कैवारी, अनाथांचा नाथ. मोठ्या दिलाचा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची माहिती आपण आज बघणार आहोत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जीवन | Rajarshi Shahu Maharaj Life

Shahu Maharaj Information in Marathi | राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जीवनाची माहिती खालील प्रमाणे आहे.
एकोणिसाव्या शतकाच्यापूर्वार्धात जे प्रबोधनपर्व सुरु झाले,त्या प्रबोधनपर्वातील एक अत्यंतमहत्त्वाचा दुवा म्हणजे राजर्षी शाहू महाराज . अवघे ४८ वर्षांचे आयुष्य शाहू महाराजांना लाभले. पण याआयुष्यातील त्यांची २८ वर्षांची कारकीर्दही सामाजिक कार्याची होती. या काळातत्यांनी समाजउन्नतीचे नवे नवे प्रयोग केले.

नावछत्रपती शाहू महाराज
जन्म२६ जुने १८७४
जन्म ठिकाणकागल, कोल्हापूर
मृत्यू६ मे १९२२ मुंबई
वडिलांचे नावश्रीमंत आबासाहेब घाटगे
आईचे नावराधाबाई
पत्नीमहाराणी लाक्षिमी बाई भोसले
राजघराणेभोसले

राजर्षी छत्रपती शाहू महाराज बालपण | Rajarshi Shahu Maharaj Baalpan

Shahu Maharaj Mahiti | राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा बालपणाचीमाहिती खालील प्रमाणे आहे.
सार्वजनिक कार्यकर्ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ ‘शाहू महाराज’ रोजी यांचा जन्म झाला. छत्रपती शाहू महाराज यांचे जन्म ठिकाण कोल्हापूरचे संस्थानिक ख्यातनाम समाजसुधारक, दलितोद्धारक,रोजी पुणे-बेंगलोर महामार्गावरील एक छोटंसे गाव म्हणजे कागल.जन्मानंतर यशवंत नाव लाभते. पण अवघ्या दहा वर्षानंतरच कोल्हापूरच्या राजमाता आनंदीबाई यानी १७ मार्च १८८७ रोजी त्यांना दत्तक घेतले आणि यशवंताचे ‘शाहू’ झाले. हेच शाहू पुढे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज झाले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण | Rajarshi Shahu Maharaj Education

Shahu Maharaj Information in Marathi | राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा शिक्षणाची माहिती खालील प्रमाणे आहे.
राजकोट येथे छत्रपती शाहू महाराज यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले .१८९० ते १८९४ या काळात सर एफ्.एम्. फ्रेजर या गार्डियनच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी भाषा, जगाचाइतिहास, राज्यकारभार इ. विषयांचा सखोल अभ्यास त्यांनी धारवाड येथे केला.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज विवाह | Rajarshi Shahu Maharaj Marriage

Rajarshi Shahu Maharaj Information in Marathi | छत्रपती शाहू महाराजांचा विवाह ची माहिती इथे दिले आहे . १८९० मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विवाह बडोद्याचे गुणाजीराव खानविलकरयांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी झाला.त्यांना १ मुलगी झाली त्यानंतर ३ अपत्ये झाली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक कार्य | Rajarshi Shahu Maharaj Social Work

Rajarshi Shahu Maharaj Information in Marathi | राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची सामाजिक कार्याची माहिती खालील प्रमाणे आहे.

  • राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनकार्याची सुरुवात होते ती इ.स. १८९४ पासून महाराजांनी दलित वर्गासाठी केलेले कार्य ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. त्या काळात दलितांची शोचनीयस्थिती पाहून त्यांना फार वाईट वाटे. दलितांच्या ठिकाणी स्वाभिमानाचे व अस्मितेचे स्फुल्ल्गि प्रज्वलित करण्यासाठी संपूर्ण भारतभर महाराजांनी व्याख्याने दिली.
  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज दलितांच्या परिषदेचे अध्यक्ष झाले. कायद्याचे विशेष अवडंबर न माजविता वर्णवर्चस्वाला गाडण्यासाठी, महाराजांनी अस्पृश्यांना मानाच्या जागा दिल्या. भर सभेत त्यांच्या हातचे पाणी पिणे, वाड्यावर नोकर ठेवणे, कोर्टात कारकून, गावात तलाठी नेमणे, वकिलीच्या अस्पृश्य सनदा देणे ही कामे त्यांनी दलितां ना दिली.
  • सरकारी खात्यात ज्या जागा रिकाम्या होतील, त्यातील ५०% जागांमध्ये मागासवर्गीय सुशिक्षित
  • तरुणांची भरती करावी, असा जाहीरनामा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी काढला.
  • दिखाऊ कार्यापेक्षा चिरस्थायी व कल्याणकारी कार्याला महाराजांनी महत्त्व दिले युरोप दौऱ्यावर असता काही धरणे पाहून राधानगरीतील धरण बांधून कोल्हापूरला एक अमोल देणगी देवून छत्रपती शाहू महाराज यांनी हरितक्रांतीच घडवून आणली. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेतकरी संघ स्थापना केली.
  • शाहूपुरी इथे १८९५ साली गुळाची मोठी व्यापारपेठ बसवण्यात अली . १९०६ साली शाहू (कापड) मिलची स्थापना केली. १९१२ ला बलभीम सहकारी सोसायटींची स्थापना केली आणि महाराष्ट्राला सहकाराचा मंत्र दिला.यामुळेच कोल्हापूरच्या गुळाने जागतिक बाजारपेठेत स्थान मिळविले.
  • १९२० साली स्वतंत्र क्षात्र जगद्गुरू धर्मपीठ सुरू करून, छत्रपती शाहू महाराज चातुर्वर्ण्य व्यवस्थेला सुरुंग लावला. बालविवाहाला आळा घालण्याचे फर्मान काढले. कामगार लढ्याला उत्तेजन दिले. अनाथांसाठी अनाथालये चालविली. वेदाभ्यासाचा अधिकार सर्व लोकांना दिला.
  • काळम्मवाडीच्या धरणाचा सुद्धा पाया छत्रपती शाहू महाराज यांनीच घालून ठेवला होता.महाराजांनी समाजातील विशिष्ट वर्गाची मक्तेदारी मोडीत काढली. बेरड,मांग, फासेपारधी या सारख्या लोकांना गुन्हेगार समजून रोज हजेरी द्यावी लागे तीपद्धत बंद केली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य | Rajarshi Shahu Maharaj Educational Work

Rajarshi Shahu Maharaj Information in Marathi | राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्याची माहिती खालील प्रमाणे आहे

  • ८ सप्टेंबर १९१७ रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहीरनामा छत्रपती शाहू महाराज यांनी काढला. १ जानेवारी १९१९ ला शिक्षण खात्याला आदेश देवून अस्पृश्यांना समानतेची वागणूक देण्यास भाग पाडले. तर ३० सप्टेंबर १९१९ रोजी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्यात.
  • बहुजन समाजातून वैदिक तयार होण्यासाठी त्यांनी १९ ऑगस्ट १९१९ रोजी ‘शिवाजी वैदिक विद्यालय’ स्थापन केले.
  • १९१३ मध्ये त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. सुधारित शेतीला प्रसार करण्यासाठी त्यांनी इन्स्टिट्यूट स्थापन केली.
  • राजर्षी शाहू महाराज कृतिशील दलितोद्धारक होते. ‘आधी केले मग सांगितले’ या भावनेने त्यांनी कार्य केले म्हणून ‘दलितांचा कनवाळू राजा’ म्हणून छत्रपती शाहू महाराज प्रसिद्धीस आले.
  • क्रीडा, कला यांचेही महाराज चाहते होते. रोममध्ये पाहिलेल्या आखाड्यांसारखे कुस्त्यांचे त्यांनी कोल्हापूरला पहिले मैदान बांधले. नाट्य, चित्रपट, संगीत या कलांनाही त्यांनी आपल्या दरबारात उदार आश्रय दिले.

छत्रपती शाहू महाराज यांची माहिती | Rajarshi Shahu Maharaj Information

Shahu Maharaj Information in Marathi | छत्रपती शाहू महाराज यांची माहिती खालील प्रमाणे आहे
महाराजांची राहणी अगदी साधी होती. राजा असतानाही शेतकऱ्यां सारखा पेहरावा करत . पंचपक्वान्नांचा
त्याग करुन शेतकऱ्यांसारखे अन्न खाणारे , पलंगाचा त्याग करुन खॉटवर, जमिनीवर झोपणारे राजर्षी शाहू महाराज . महाराज यांचा बोलण्यात देखील साधेपणा होता. सामाजिक व शैक्षणिक कार्यात केलेल्या कामामुळेच महाराजांना कानपूरच्या क्षत्रिय परिषदेत ‘राजर्षी’ ही पदवी देण्यात आली. त्यांना माणसातला राजा आणि राजातला ऋषी ऋषीतला राजा मानला जात होते.

समाजातील गोर-गरीब, दीनदुबळे, मागासवर्गीय, उपेक्षित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणारे शाहू महाराज होते . समाजात समता प्रस्थापित व्हावी यासाठी अनेक जुन्या प्रथांना लाथाडून त्यांचे उच्चाटन केले. जातीभेद निर्मूलन, बलुतेदारी पद्धतीवर बंदी. स्त्री शिक्षण, देवदासी प्रथेचे उच्चाटन महिला संरक्षण कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन यासारखे धाडसी निर्णय घेवून कृतीत आणले. स्वतःच्या बहिणीचा आंतर जातीय विवाह लावून देणारे शाहू महाराज काळाच्या पुढे चालत होते .

महाराजांना शिकारीचा मोठा छंद होता. शिकारीच्या छंदा इतकाच कला क्रिडेचा छंद होता. लोकजीवनाला कला क्रीडा, नाट्य, आणि संगीत या कलांचीजोड असावी असे त्यांचे मत होते. म्हणूनच त्यांनी मल्लविद्येला प्रोत्साहन देऊन अनेक मल्लांना राजाश्रय दिला. अल्लादिया खाँसारखे गानमहर्षी व बाबूराव पेंटरांसारखे चित्रमहर्षी या सारख्या कलावंताना छत्रपती शाहू महाराज यांचे छत्र लाभले. कलांची वकलावंतांची जोपासना करत असतना कोल्हापूरला त्यांनी ‘कलापूर’ करुन टाकले.

हे पण सुद्धा वाचा – Mahatma Gandhi Information In Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंध | Association with Dr. Babasaheb Ambedkar

Shahu Maharaj Information in Marathi | शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीही माहिती खालील प्रमाणे आहे.
शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख कलाकार दत्तोबा पवार यांनी करून दिली. तरुण भीमरावांच्या महान बुद्धिमत्तेमुळे आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे छत्रपती शाहू महाराज खूप प्रभावित झाले. 1917-1921 या काळात शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर अनेक वेळा भेटले आणि त्यांनी निवडक लोकांना “जातीय-आधारित आरक्षण” देऊन जाति भेदाच्या नकारात्मक गोष्टी रद्द केल्या. छत्रपती शाहू महाराज यांनी मार्च 1920 दरम्यान अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी परिषदेचे आयोजन केले होते आणि शाहू महाराज यांनी आंबेडकरांना त्या परिषदेचे अध्यक्ष केले कारण त्यांना विश्वास होता की आंबेडकर हे समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी काम करणारे नेते आहेत.

मृत्यू | Death

Shahu Maharaj Information in Marathi | शाहू महाराज यांचा मृत्यू बद्दल ची माहिती खालील प्रमाणे आहे. शाहू यांचा मृत्यू 6 मे 1922 रोजी मुंबईत, आता मुंबईत, गिरगावाजवळील खेतवाडी 13 गल्लीतील पन्हाळा लॉज नावाच्या लॉजमध्ये झाला. मात्र आता हे लॉज अस्तित्वात नाही आणि या लॉजच्या जागी निवासी इमारत आहे. अशा या युगप्रवर्तक छत्रपती शाहू महाराज यांना अवघे ४८ वर्षांचे आयुष्य लाभले.पण त्यांनी केलेले कार्य आज २१ व्या शतकातही प्रेरणादायी ठरेल.कारण ते कृतिशील सुधारक होते. त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा चिरंतन भावी पिढ्यांच्या मनात कोरला जाईल.

निष्कर्ष | Conclusion

Shahu Maharaj Information in Marathi ,Rajarshi Shahu Maharaj Information in Marathi, Shahu Maharaj Mahiti वर दिलेली सर्व माहिती पुस्तकातून घेतली गेली आहे. तरी तुम्हला वरील Shahu Maharaj Information in Marathi ,Rajarshi Shahu Maharaj Information in Marathi माहिती साठी काही अडचण असेल तर तुम्ही आम्हला [email protected] या मेल वर आम्हला ई-मेल करू शकता . आम्ही तुम्हाला २४ तासाच्या आधी आम्ही उत्तर देऊ . आणि तुम्हला आम्ही दिलेली माहिती आणि आमचा ब्लॉग कशा वाटलं हे नक्की कंमेंट मध्ये कळवा.

शाहू महाराजांचे नाव काय ?

छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंत असे होते.

शाहू महाराज जन्म ठिकाण ?

छत्रपती शाहू महाराज यांचे जन्म ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गाव होते.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

6 thoughts on “शाहू महाराज यांची माहिती | Shahu Maharaj Information in Marathi”

  1. Boost your sales and reach more customers with telemarketing. We are a team of expert telemarketers who can handle any campaign for you. Save time and money and get a free quote today. Contact us now and let us help you grow your business.
    skype : affiliate2244
    Phone : +4402032893212

    Reply

Leave a Comment