सर्वनाम म्हणजे काय ? प्रकार आणि उपयोग | Sarvanam In Marathi

5/5 - (9 votes)

Sarvanam in Marathi-या लेखामध्ये सर्वनामाची व्याख्या, प्रकार आणि त्याचा उपयोग कसा करावा याचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत.सर्वनामाचे प्रकार हे यामध्ये संपूर्ण मराठी मध्ये उदाहरणासहीत सांगितले गेले आहे.

सर्वनामाची व्याख्या आणि प्रकार | Sarvanam In Marathi-

Sarvanam In Marathi

आपण बोलताना नामाच्या बदली जे शब्द वापरतो त्यांना सर्वनाम असे म्हणतात.तू ,मी,आपण ,कोण,त्यांनी, तो,जो हे सारे सर्वनामचे उदहरण आहेत. खाली दिलेल्या उदाहरणामध्ये त्याच्या स्पष्टीकरणासहित संदर्भ दिला गेला आहे.


आपण दुसऱ्या वाक्यात नाम ऐवजी “तुम्ही” चा वापर केला याना सर्वनाम असे म्हणतात. सारखे सारखे प्रत्येक जणांची नावे घेणे आणि प्रत्येकला तेच नाव घेऊन तीच आज्ञा देण्याचा बदली सर्वनाम वापरून सगळयांना एकाच वाक्यात आज्ञा दिलेले सोपे म्हणून सर्वनाम चा उपयोग केला जातो.

अशी बरीच उदहरण आहे जसे की,

१. मी आंबा खातो.
२. तुम्ही सर्वजण बाहेर थांबा.
३.तू काय करत आहेस ?
४. आपण यांचे नातेवाईक आहे का ?

नामाचा बदली सर्व येणाऱ्या विकारी शब्दांना सर्वनाम असे म्हणतात .

सर्वनाम चे प्रकार | Sarvanam in Marathi example –

सर्वनाम चे एकूण सहा प्रकार पडतात. ते सर्व प्रकार खाली उदाहरणासहित स्पष्टीकरण दिले गेले आहेत.

पुरुषवाचक सर्वनाम | Purushvachak Savarnam-

Purushvachak Savarnam in Marathi- पुरुषवाचक सर्वनाम हा एक सर्वनाम प्रकार आहे. नाम ऐवजी पुरुष उल्लेख सर्वनामांचा वापर केला जातो अश्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात.

पुरुषवाचक सर्वनाम त्याचे ३ प्रकार पडतात. खाली त्याचे संदर्भासहित उदाहरण दिले गेले आहे.
उदाहरणार्थ- माझं, तुझं, त्याच, तीच, आपलं, आमचं, तुमचं इत्यादी.

  • प्रथम पुरुषवाचक :-

जेंव्हा व्यक्ती बोलताना स्वतः चा उल्लेख करताना जी सर्वनाम वापरतो त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात.
उदा :- मी, आम्ही, आपण इत्यादी.

>> मी सुद्धा गावी येणार.
>> आम्ही इथून पुढे जाणार आहोत.
>> आपण कुठून आलात ?

  • द्वितीय पुरुषवाचक :-

जेंव्हा व्यक्ती ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लख करताना जी सर्वनाम वापरतो त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात.
उदा :- तू ,तुम्ही, त्यांनी इत्यादी

  • तृतीय पुरुषवाचक :-

जेव्हा व्यक्ती ज्यांचाविषयी बोलायचे किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्या सर्वनामने तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात.
उदा :- तो,ती,ते, त्या इत्यादी.

दर्शक सर्वनाम | Darshak Sarvanam-

Darshak Sarvnam in Marathi – जेंव्हा व्यक्ती जवळ ची किंवा लांबची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनामे वापरतो त्यांना दर्शक सर्वनामे असे म्हणतात.
उदा :- हा , हे ,ही,तो ,ते ,ती इत्यादी.

>> हा एक अतिशय हुशार मुलगा आहे.
>> तो एक सामान्य पुरुष आहे.

संबधी सर्वनाम | Sambandhi Sarvanam –

Sambandhi Sarvanam in Marathi -वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबधी सर्वनामे म्हणतात.
उदा :- जो, जी, जे; जे, ज्या, जी

> जो कोण माझ्यासोबत माझ्यासोबत येणार आहे. त्यांनी हात वरती करा.

प्रश्नार्थक सर्वनाम | Prashnarthak Sarvanam –

Prashnarthak Sarvanam in Marathi – जेव्हा व्यक्ती बोलताना अथवा लिहताना वाक्यात ज्या सर्वनामेचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी करतो त्या सर्वनामे यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात.
उदा :- कोण, काय.

>> कोण आहे का इथे ?

सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम | Samanya Sarvanam –

Samanya Sarvanam in Marathi – कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारणासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल अली आहेत हे अनिश्चितपणे सांगता येथ नाही,तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात.
उदा :- कोणी, कोणास ,इत्यादी.

>> कोणी कोणास म्हणाले.

आत्मवाचक सर्वनाम | Aatmvachak Sarvanam –

Aatmvachak Sarvanam in Marathi -स्वतः विषयी उल्लेख वापरले जाणारे सर्वनाम अश्या सर्वनामांना आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात.
उदा. मी, स्वतः

>> मी सुद्धा तुमच्या सोबत येतो.

सर्वनामचे लिंगविचार

मराठी भाषा मध्ये सर्वनामे चे मूळ ९ आहेत. पण लिंगानुसार बदलणारी सर्वनामे ३ च आहेत.
१) तो २) हा ३) जो
जसे की तो ,ती ,ते अथवा हा,ही,हे अथवा जो ,जी ,जे हे सर्व लिंगनुसार आपले रूप बदलत राहतात.


सर्वनामांचा वचनविचार

मराठी भाषा मध्ये सर्वनामे चे मूळ ९ आहेत.त्यामध्ये सर्वनामांचा वचनविचार ५ आहेत. मी ,तू ,तो ,हा ,जो हे ५ वचनविचार आहेत.

निष्कर्ष | Conclusion

Sarvanam In Marathi, Sarvanam in Marathi example – वर दिलेल्या लेखामध्ये सर्वनाम आणि त्याचे प्रकाराबद्दल दिलेली संपूर्ण माहिती कशी वाटली. हे आम्हला कंमेंट द्वारे नक्की कळवा. आणि तुम्हाला content बद्दल काही अडचण असेल तर आम्हाला रोअरमराठी [email protected] या वरती मेल करून आम्हाला कळवा. आम्ही तुम्हाला २४ तासांमध्ये नक्की उत्तर देऊ.

सर्वनाम म्हणजे काय ? सर्वनामाचे प्रकार किती ?

आपण बोलताना नामाच्या बदली जे शब्द वापरतो त्यांना सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामाचे एकूण सहा प्रमुख प्रकार पडतात.

सर्वनामाचे प्रकार कोणते?

पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम,सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम .

Sharing Is Caring:

4 thoughts on “सर्वनाम म्हणजे काय ? प्रकार आणि उपयोग | Sarvanam In Marathi”

Leave a Comment