मराठी नाम व त्याचे प्रकार | Naam in Marathi [2023]

Rate this post

Naam in Marathi- नाम म्हणजे काय ? (Naam in Marathi)त्याचा वापर आणि उदाहरण या संबंधी संपूर्ण माहिती या ब्लॉगपोस्ट मध्ये मिळवा. अशा विषयावर मराठी मध्ये संपूर्ण माहिती येथे मिळणार आहे. तरी खाली दिलेली माहिती(Naam in Marathi) कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.

नाम | Naam

शब्दांच्या जाती आठ आहेत. विकारी आणि अविकारी अशा दोन गटांत त्यांची विभागणी होते. विकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो.

नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या शब्दांच्या प्रकारांना विकारी शब्द असे म्हणतात. अविकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होत नाही. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय हे शब्दांचे प्रकार अविकारी शब्दप्रकारात मोडतात.


नाम | Naam in Marathi


पुढील वाक्ये पहा .

(१) तो झाड लावतो.
(२) आरोही, फळा पाहा.
(३) अनुराग गोष्ट ऐकतो,
(४) नदीला पूर आला.
(५) मला पुस्तक आवडते.

वरीत वाक्यांतील झाड, आरोही, फळा, अनुराग, गोष्ट, नदी, पुस्तक हे शब्द पाहा. हे शब्द वाचले की आपल्या डोळ्यांसमोर काही वस्तू येतात, व्यक्ती येतात. सामान्यतः ‘वस्तू’ हा शब्द डोळ्याने दिसणाऱ्या पदार्थाता उद्देशून वापरतो, पण व्याकरणात त्याचा अर्थ व्यापक आहे. ‘वस्तू’ या शब्दाच्या अर्थामध्ये सर्व प्रकारचे पदार्थ, प्राणी व त्यांच्या अंगी वास करणारे गुण व धर्म यांचा अंतर्भाव होतो.


हे सुद्धा वाचा – समास म्हणजे काय ? आणि त्याचे प्रकार


प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे,त्यांना व्याकरणात नामे असे म्हणतात.(Naam in Marathi) उदा. पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा, हरी, वामन, साखर, देव, स्वर्ग,अप्सरा, नंदनवन, गोडी, धैर्य,खरेपणा, औदार्य, विद्वत्ता इत्यादी.
निरनिराळ्या वस्तूंच्या पदार्थांच्या व्यक्तींच्या नावांना नाम असे म्हणतात. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर असे म्हणता येईल की, ज्यावरून एखादा प्रत्यक्ष किंवा काल्पनिक पदार्थ, प्राणी किंवा त्याचा गुणधर्म यांचा आपल्याला बोध होतो, त्याला नाम असे म्हणतात.

. ‘वास्तव अथवा मानस सृष्टीतील इंद्रियगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात, त्या शब्दांना नामे असे म्हणतात.’

नामांचे मुख्य तीन प्रकार

नामांचे मुख्य प्रकार तीन आहेत:-

सामान्यनाम

विशेषनाम

भाववाचक नाम.


१) सामान्यनाम :- एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते, त्याला सामान्यनाम असे म्हणतात. सामान्यनाम हे त्या वस्तूच्या जातीला दिलेले नाम आहे. उदा. मुलगा, लेखणी, घर, शाळा, नदी इत्यादी.
(कळप, वर्ग, सैन्य, घड, समिती ही समूहाला दिलेली नामे आहेत. यांना कोणी ‘समुदायवाचक नामे’ म्हणतात. तसेच सोने, तांबे, दूध, साखर, कापड हे संख्येशिवाय इतर परिमाणांनी मोजण्याचे पदार्थ म्हणून त्यांना कोणी पदार्थवाचक नामे असे म्हणतात. पण मराठीत या सर्वांची गणना सामान्यनामातच होते.)(Naam in Marathi)

२) विशेषनाम :- ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो. त्यास विशेषनाम असे म्हणतात.
उदा. रामा, हरी, आशा, हिमालय, गंगा, भारत. विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, सामान्यनाम हे जातिवाचक असते. विशेषनाम हे त्या व्यक्तीचे अथवा वस्तूचे स्वतःचे नाव असते; ते केवळ खुणेकरिता ठेवलेले नाव असते. सामान्यनाम हे त्या जातीतील सर्व वस्तूंत असलेल्या सामान्यपणाला दिलेले नाव असते. सामान्यनाम हे त्या जातीतील सर्व वस्तूंना लागू पडते. विशेषनाम हे एकट्याचे असते.(Naam in Marathi)

सामान्यनामविशेषनाम
नदीगंगा, सिंधू, तापी, चंद्रभागा, नर्मदा
पर्वतहिमालय, सह्याद्री, सातपुडा
मुलगास्वाधीन, हिमांशू, लक्ष्मण, राम, हरी
मुलगीमधुरिमा, स्वागता, तारा, आशा, नलिनी
शहरनगर, पुणे, दिल्ली, मुंबई, कोल्हापूर

३) भाववाचक नाम :- ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला ‘भाववाचक नाम’ किंवा ‘धर्मवाचक नाम’ असे म्हणतात. उदा. धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इत्यादी.
पदार्थाचा गुण किंवा धर्म हा स्वतंत्र किंवा वेगळा असत नाही. तो कोणत्यातरी जड वस्तूच्या अथवा
व्यक्तीच्या आश्रयाने राहतो. भाववाचक नामांना वेगळे अस्तित्व नसते. मात्र कल्पनेने ते आहे असे मानून
त्याला नाव दिले जाते.(Naam in Marathi)

पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिती किंवा क्रिया दाखविणाऱ्या नामांना भाववाचक नामे असेच म्हणतात.
उदा. वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण हे शब्द पदार्थाची स्थिती दाखवितात. धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य
ही क्रियेला दिलेली नावे आहेत.

सामान्यनाम किंवा विशेषनाम यांनी प्रत्यक्ष किंवा काल्पनिक प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होतो. भाववाचक नामाने प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होत नसून त्यांच्यातील गुणांचा किंवा धर्माचा बोध होतो. सामान्यनामाचे अनेकवचन होऊ शकते, पण विशेषनामे आणि भाववाचक नामे ही एकवचनीच असतात. सामान्यनामे आणि विशेषनामे यांना धर्मिवाचक नामे म्हणतात. ‘धर्मी’ म्हणजे ज्यात धर्म किंवा गुण वास करतात ते.

हे सुद्धा वाचा – सर्वनाम म्हणजे काय ? आणि त्याचे प्रकार


भाववाचक नामे साधण्याचे प्रकार

सामान्यनामे व विशेषनामे यांना आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा, य, वा यांसारखे प्रत्यय लावून भाववाचक नामे कशी तयार करतात.(Naam in Marathi)

शब्दप्रत्ययभाववाचक नामइतर उदाहरणे
नवलआईनवलाईखोदाई, चपळाई, दांडगाई, धुलाई
श्रीमंतश्रीमंतीगरिबी, गोडी, लबाडी, वकिली
पाटीलकीपाटीलकीआपुलकी, भिक्षुकी
गुलामगिरीगुलामगिरीफसवेगिरी, लुच्चेगिरी
शांतताशांतताक्रूरता, नम्रता, समता
मनुष्यत्वमनुष्यत्वप्रौढत्व, मित्रत्व, शत्रुत्व
शहाणापण, पणाशहाणपण, शहाणपणादेवपण, प्रामाणिकपणा, मोठेपण
सुंदरसौंदर्यगांभीर्य, धैर्य, माधुर्य, शौर्य
गोडवागोडवाओलावा, गारवा

नामांचे कार्य करणारे इतर शब्द

नाम, सर्वनाम, विशेषण ही जी नावे शब्दांच्या जातीला दिली जातात, ती त्यांच्या त्या-त्या वाक्यातील कार्यावरून दिली जातात, हे आपण यापूर्वी पाहिले. तीच गोष्ट इथेही लक्षात ठेवावयास हवी. सामान्यनाम, विशेषनाम, भाववाचक नाम ही नावेदेखील नामांच्या विशिष्ट कार्यावरून दिली गेली आहेत. सामान्यनाम हे कधी कधी विशेषनामाचे कार्य करते, तर विशेषनाम हे कधी कधी सामान्यनामाचे कार्य करते.(Naam in Marathi)


(१) पुढील उदाहरणे पाहा.
(अ) मी आत्ताच नगहून आलो.
(आ) शेजारची तारा यंदा बी. ए. झाली.
वरील वाक्यात नगर, तारा ही मूळची सामान्यनामे आहेत. नगर- कोणतेही शहर, तारा-नक्षत्र. वरील
वाक्यांत ती विशेषनामे म्हणून वापरली आहेत.


(२) पुढील उदाहरणे पाहा.
(अ) तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.
(आ) आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत.
(इ) आम्हांला आजच्या विद्यार्थ्यांत भीम हवेत.
वरील वाक्यांत कुंभकर्ण, जमदग्नी, भीम ही मूळची विशेषनामे आहेत. पण इथे कुंभकर्ण = अतिशय झोपाळू, जमदग्नी अतिशय रागीट मनुष्य व भीम सशक्त मुलगे या अर्थाने वापरली आहेत. म्हणजे मूळची विशेषनामे वरील वाक्यांत सामान्यनामांचे कार्य करतात.

(३) पुढील वाक्ये पाहा.
(अ) शांती ही माझ्या बहिणीची मुलगी.
(आ) विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला.
(इ) माधुरी उद्या मुंबईला जाईल.
वरील वाक्यांतील शांती, विश्वास, माधुरी ही गुणांना दिलेली नावे म्हणून ती मूळची भाववाचक नामे पण वरील वाक्यांत त्यांचा उपयोग विशेषनामांसारखा केला आहे.
भाववाचक नामे ही कधी कधी विशेषनामांचे कार्य करतात.

(४) पुढील वाक्ये पाहा.
(अ) आमच्या वर्गात तीन पाटील आहेत.
(आ) या गावात बरेच नारद आहेत.
(इ) माझ्या आईने सोळा सोमवार केले.
विशेषनामांचे अनेकवचन होत नाही, पण वरील वाक्यांत विशेषनामे अनेकवचनी वापरलेली दिसतील. या वाक्यांतील विशेषनामे सामान्यनामे म्हणून वापरली आहेत.


(५) पुढील वाक्ये पाहा.
(अ) शहाण्याला शब्दाचा मार.
(आ) श्रीमंतांना गर्व असतो.
(इ)जातीच्या सुंदरांना काहीही शोभते.
(ई) जगात गरिबांना मान मिळत नाही.
वरील वाक्यांत शहाणा, श्रीमंत, सुंदर, गरीब ही मूळची विशेषणे, पण इथे ती नामांसारखी वापरली
आहेत.


(६) पुढील वाक्ये पाहा.
(अ) आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली.
(आ) त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो.
(इ) हरी नापास झाल्यामुळे त्याची छी-थू झाली. वाहवा, परंतु, छी-थू ही मूळची अव्यये, पण वरील वाक्यांत ती नामाचे कार्य करतात.


(७) पुढील वाक्ये पाहा.
(अ) ज्याला कर नाही त्याला डर कसली.
(आ) गुरूजींचे वागणे मोठे प्रेमळ असते.
(इ) ते ध्यान पाहून मला हसू आले.
(ई) देणाऱ्याने देत जावे.

वरील वाक्यांतील कर, डर, वागणे, हसणे, देणारा हे शब्द; कर, डर, वाग, हस, दे या धातूंपासून तयार झालेले आहेत. त्यांना धातुसाधित नामे असे म्हणतात. धातूला णे, ऊ, अ, ण हे प्रत्यय लागून नामे तयार होतात. जसे हसणे, रडू, धाव, दळण हे धातुसाधित शब्द नामांसारखे योजता येतात.(Naam in Marathi)

वरील उदाहरणांवरून असे दिसून येईल की, सामान्यनामे, विशेषनामे व भाववाचक नामे ही एकमेकांचे कार्य करतात. तसेच विशेषणे, अव्यये, धातुसाधिते यांचा वापर नामांसारखा करण्यात येतो.

हे सुद्धा पहा- मराठी व्याकरण

निष्कर्ष | conclusion


Naam in Marathi – नाम विषयी दिलेली संपूर्ण माहिती वर दिली गेली आहे. (Naam in Marathi)वर दिली गेलेली माहीती ही पुस्तकातून घेतली आहे. तरी दिल्या गेलेल्या माहीती मध्ये काही अडचण असल्यास आम्हाला कंमेंट मध्ये कळवा अथवा तुम्ही आम्हाला या [email protected] करून आम्हाला मेल करू शकता आम्ही तुम्हाला २४ तासा मध्ये नक्की उत्तर देऊ.



Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

2 thoughts on “मराठी नाम व त्याचे प्रकार | Naam in Marathi [2023]”

Leave a Comment