Shabdvichar in Marathi- Shabdvichar in Marathi-(Shabdvichar in Marathi) “सुसंगत व्याकरणाच्या नियमांचा मराठीत अनुभव करा! आमच्या मराठी व्याकरण आणि भाषासंबंधित विषयांच्या विचारात, आपल्याला सरल आणि सुलभ उपयोग कसे करायचं आणि मराठीतील सजीव व्याकरण नियम अध्ययन कसे करायचं हे सांगणार आहोत. आपल्या भाषांतर कौशल्यातील वाढ करण्याच्या साधनेच्या माध्यमाने, आपल्याला मराठी भाषेच्या सुंदरतेच्या आणि सार्थकतेच्या जगात अधिक समर्थ व्हावं लागेल.”शब्दविचार म्हणजे काय ? (Shabdvichar in Marathi)त्याचा वापर आणि उदाहरण या संबंधी संपूर्ण माहिती या ब्लॉगपोस्ट मध्ये मिळवा. अशा विषयावर मराठी मध्ये संपूर्ण माहिती येथे मिळणार आहे. तरी खाली दिलेली माहिती(Shabdvichar in Marathi) कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.
अनुक्रमणिका
शब्द आणि पद | Shabdvichar in Marathi
आता आपण शब्द पाहूया. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. हे ध्वनी कागदावर लिहून दाखविताना आपण विशिष्ट चिन्हे वापरतो. ध्वनींच्या चिन्हांना आपण अक्षरे असे म्हणतो. ब. द. क ही तीन अक्षरे आहेत. हे सगळी अक्षरे क्रमाने असल्यामुळे अर्थ प्राप्त झालेला आहे. ‘बदक’ शब्द म्हणून तयार झाला आहे.(Shabdvichar in Marathi)
हे सुद्धा पहा- मराठी व्याकरण (Lingvichar in Marathi)
शब्दसमूहाला किंवा शब्दाला असा हा पूर्ण अर्थ तयार झाला,तर त्यास आपण वाक्य असे म्हणत. ‘बदक पाण्यात पोहते.’ हे वाक्य आहे. या वाक्यात तीन पदे आहेत. पद व शब्द यांत थोडा फरक आहे. ‘पाणी’ शब्द आहे. ‘पाण्यात’ हे पद आहे. वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ स्वरूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते, त्यास पद असे म्हणतात, पण व्याकरणात पदांनादेखील स्थूलमानाने शब्द असे म्हटले जाते. ‘स्वातीने’ हे पद आहे. यात मूळ शब्द ‘स्वाती’ आहे. मूळ शब्दाला व्याकरणात ‘प्रकृती’ असे म्हणतात. ‘ने’ हा प्रत्यय आहे. मूळ रूपाला शब्दाच्या म्हणजे प्रकृतीला ‘ने’ प्रत्यय लागून ‘स्वातीने’ हे ते रूप झाले त्यास आपण ‘विकृती’ असे म्हणतो.शब्दाच्या मूळ रूपाचे बदलीकरण रूप होते यास विकृती म्हंटले जाते. हेलाच आपण पद असे म्हणत असतो. शब्दांचे किंवा पदांचे उपयोग करून वाक्य बनले जाते. या शब्दांची वाक्यात कोणकोणती कार्ये असतात, त्यांचा आपण अभ्यास करू .(Shabdvichar in Marathi)
जाती
सर्वनामे
विशेषणे
क्रियापदे
क्रियाविशेषणे
शब्दयोगी अव्यय
उभयान्वयी अव्यय
केवलप्रयोगी अव्य
शब्दांच्या जाती
शब्दांच्या जाती म्हणजे वाक्यातील शब्दांच्या प्रकार. जेथे वाक्यात वापरले जातात, त्या शब्दांची कार्ये विविध प्रकारची असतात. त्या शब्दांच्या वाक्यातील कार्यानुसार, त्यांना विविध नावे दिलीत आहेत.(Shabdvichar in Marathi)
हे सुद्धा वाचा –नाम म्हणजे काय ? आणि त्याचे प्रकार
(१) वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात, त्यांना नामे असे म्हणतात. उदा. फूल, हरी, गोडी इत्यादी.
(२) जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामांच्या ऐवजी येतात, त्यांना सर्वनामे असे म्हणतात. उदा. मी, तू, हा, जो, कोण इत्यादी.
(३) जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात, त्यांना विशेषणे असे म्हणतात. उदा. उदा. कडू, गोड, दहा, त्याचा इत्यादी.
(४)जे शब्द वाक्याच्या अर्थाला पूर्ण करतात, त्यांना क्रियापदे म्हणतात, कारण ते क्रिया कार्ये करतात. उदा. जाईल, बसतो, आहे इत्यादी.
(५)जे शब्द क्रियापदाच्या अर्थात क्रियेच्या प्रक्रियेला अधिक माहिती सांगतात, त्यांना क्रियाविशेषणे म्हणतात, कारण ते क्रियेच्या विशेष गुणाच्या बारेमुळे आहे. उदा. काल, तिथे, फार,आज इत्यादी.
(६)जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवितात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. उदा. झाडाखाली, तिच्याकरिता, त्यासाठी इत्यादी.
(७) जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडतात, त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.उदा. व, आणि, परंतु, म्हणून इत्यादी.
(८) जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना केवलप्रयोगी अव्य म्हणतात. उदा. शाब्बास, अबब, अरेरे इत्यादी.
हे सुद्धा वाचा – समास म्हणजे काय ? आणि त्याचे प्रकार
वाक्यात येणाऱ्या शब्दांचे असे आठ प्रकार आहेत. त्यांनाच शब्दांच्या आठ जाती असे म्हणतात. शब्दांच्या आठ जाती म्हणजे शब्दांची आठ कार्ये. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवलप्रयोगी ही दिलेली नावे त्या-त्या शब्दाच्या वाक्यातील कार्याला अनुलक्षून दिलेली आहेत. एक शब्द निरनिराळ्या वाक्यांत निरनिराळी कार्ये करताना आढळतो जसे, (Shabdvichar in Marathi).
(१) दशरथाने कैकयीला दोन वर दिले. (नाम)
(२) तू त्या राजपुत्राला वर. ( क्रियापद)
(३) पक्षी झाडावर बसतो. (शब्दयोगी अव्यय)
(४) वरपिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता. (विशेषण)
वरील वाक्यात ‘वर’ हा एकच शब्द विविध कार्ये करतो म्हणून त्या शब्दाला नाम, क्रियापद, शब्दयोगी अव्यय, विशेषण अशी नावे दिलेली आहेत. क्रिकेटच्या खेळात तुम्ही पाहता ना? एकच खेळाडू क्रीडांगणावर वेगवेगळी कामे करताना आढळतो. कधी तो ‘फलंदाज’ असतो, तर कधी तो ‘गोलंदाज’ असतो. कधी तो ‘क्षेत्ररक्षकाचे’ काम करताना दिसतो. क्वचित तोच ‘यष्टिरक्षक’ ही होतो. आपल्याला ही जी नावे एका खेळाडूला देताना त्याच्या क्रीडांगणावरील विविध वेळेच्या क्रियांसाठी उद्देश्य आहे.. त्याचप्रमाणे व्याकरणातील ही आठ नावे त्या-त्या वाक्यांतील शब्दाच्या कार्याला उद्देशून असतात.
वाक्य हे शब्दांनी बनलेले असते हे खरे. पण, वाक्यात हे जे शब्द येतात ते त्यांच्या मूळ स्वरूपात जसेच्या तसे ठेवले जात नाहीत. वाक्य होण्यासाठी त्यांच्या रूपात आपण कधी-कधी बदल करतो. असा बदल सर्वच शब्दांच्या रूपात होत नाही. काही शब्दांच्या रूपात बदल केल्यात, परंतु काही शब्द मुळीच बदलत नाहीत. शब्दांच्या रूपात बदल होतो केव्हा? तर शब्दांचे लिंग किंवा वचन बदलते तेव्हा किंवा विभक्तीचे प्रत्यय लागतात तेव्हा. कोणकोणत्या जातीत बदल होत असतो ते शब्द आपण पाहणार आहोत.
शब्दाची जात | पुल्लिंग | स्त्रीलिंग | अनेकवचन | विभक्ती |
१) नाम | मुलगा | मुलगी | मुलगे | मुलांना |
२) सर्वनाम | तो | ती | ते | त्यांना |
३) विशेषण | चांगला | चांगली | चांगले | चांगल्यांना |
४) क्रियापद | गातो | गाते | गातात | गाण्याने |
शब्दांच्या या चार जातींत, अर्थात लिंग, वचन, किंवा विभक्ती यांमुळे बदल होत नाही. ह्या बदल होण्याच्या व्याकरणिक शब्दाने ‘विकार’ म्हणतात.
(१) आता, उद्या, इथे, इकडे (क्रियाविशेषणे)
(२) मागे, पुढे, करिता, साठी (शब्दयोगी)
(३) आणि, अथवा, परंतु, म्हणून (उभयान्वयी)
(४) अरेरे, शाब्बास, अबब, ओहो (केवलप्रयोगी)
४ शब्दांच्या जातींत – लिंग, वचन, किंवा विभक्ती – यांच्यामुळे मूळ बदल होत नाही. पण आपल्या व्याकरणा मध्ये टाळ्या ‘विकार’ असे ओळखले जातात.शब्दांच्या आठ जातींपैकी नाम, सर्वनाम(Shabdvichar in Marathi)
क्रियापद व विशेषण ४ ‘विकारी’ आहेत, ते म्हणजे बदलणारे आहेत. क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी
व केवलप्रयोगी ही चार ‘अविकारी‘ आहेत म्हणजे त्यांच्या रूपांत बदल होत नाही. विकारी व अविकारी यांना
अनुक्रमे ‘सव्यय‘ व ‘अव्यय’ असे म्हणतात. (व्यय = खर्च, बदल)
शब्दांचा आठ जाती अश्या प्रकारे आहेत. शब्द हे दोन प्रकारे असतात एक म्हणजे विकारी(सव्यय) आणि दुसरा म्हणजे अविकारी (अव्यय). विकारी (सव्यय) मध्ये एकूण संख्या चार ची आहे जसे कि पहिले नाम दुसरे सर्वनाम तिसरे विशेषण आणि अंतिम आहे ते म्हणजे क्रिया पद. तसेच दुसऱ्या बाजूस म्हणजेच अविकारी अव्यय मध्ये पहिले क्रियाविशेषण दुसरे शब्दयोगी तिसरे उभयनावयी अंतिम आहे ते म्हणजे केवलप्रयोगी.
निष्कर्ष | conclusion
“मराठी व्याकरणाच्या नियमांच्या सुविधांच्या जगात आपल्याला सुसंगतपणे वापरण्याच्या अभ्यासाच्या माध्यमाने, आपल्याला मराठी भाषेच्या सुंदरतेच्या आणि सार्थकतेच्या जगात अधिक समर्थ व्हावं लागेल. या व्याकरणी नियमांच्या अध्ययनाच्या साधनेच्या माध्यमाने, आपल्या भाषांतर कौशल्यातील वाढ आणि भाषाच्या सहजतेच्या अनुभवाच्या आणि अद्वितीयतेच्या आनंदाच्या संकेतांची प्राप्ती होईल.” (Shabdvichar in Marathi) Shabdvichar – लिंग विषयी दिलेली संपूर्ण माहिती वर दिली गेली आहे. (Shabdvichar in Marathi)वर दिली गेलेली माहीती ही पुस्तकातून घेतली आहे. तरी दिल्या गेलेल्या माहीती मध्ये काही अडचण असल्यास आम्हाला कंमेंट मध्ये कळवा अथवा तुम्ही आम्हाला या [email protected] करून आम्हाला मेल करू शकता आम्ही तुम्हाला २४ तासा मध्ये नक्की उत्तर देऊ.(Shabdvichar in Marathi).