Mazi Aai Nibandh In Marathi-नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या ब्लॉग मध्ये माझी आई निबंध ह्या विषयावर थोडक्यात माहिती देणार आहोत.तुम्ही ही माहिती Majhi Aai Nibandh, Majhi Aai Nibandh In Marathi ह्यासाठी वापरू शकता.
अनुक्रमणिका
परिचय | Majhi Aai Nibandh
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी…
या जगातील सर्वांत श्रेष्ठ दैवत कोणते ? कोणते तर माणसाच्या ओठातून बाहेर पडणारा प्रथम शब्दापैकी सर्वांत मधूर शब्द आणि आपल्या हृदयाच्या मखमली कप्यात जपण्यासारखा जो एकच शब्द असतो तो म्हणजे दुसरा कोणता नसून ‘आई’ हा आहे .
‘आई हा दोन अक्षरी लहानसा शब्द अर्थाच्या दृष्टीने फार विशाल आहे. त्यात दया, प्रेम, जिव्हाळा अशा आणि कोमलतेने माधुर्य फुललेले आहे. जगात ‘आई’ हेच सर्वस्व असून ती आमच्या एकलेपणात मैत्रिण, निराशेवेळी आधारस्तंभ दुबळेपणाच्या वेळी आमची शक्ती बनते ती दया व कृपा, सुख व वरदान यांची देवता आहे. जमिनीच्या हृदयात बीज लपलेले असेल त्याचप्रमाणे आमच्या अंतःकरणात आई हा शब्द दडलेला असतो.
“प्रभु रामचंद्र म्हणतात, जननी, जन्मभूमितच स्वर्गादी गिरियार्स” खरोखर किती अचूक वर्णन आहे. आईपुढे स्वर्गाचेही महात्म्य थिट्टे पडते. कवी मोरोपंत आईचे महात्म्य सांगताना म्हणतात, इतरांनी कितीही प्रेम केले माया केली त्यांचे ‘प्रसादपर’ हे कमी असतात. तसे आईची माया कधीच आटत नाही. अगदी आपल्या कुटुंबाला ही विसरत नाही.
आई ह्या विषयावर लिहण्यासारखे खूप आहे. आई म्हणजे साक्षात देवी आहे. आई आपल्या मुलासाठी जीव देऊ शकते व जर त्याचा मुलावर कोण अन्य करत असेल तर त्याचा जीव घेऊ शकते. ह्या जगात सर्वात शक्तिशाली आई असते.
हे सुद्धा वाचा – संत एकनाथ महाराज यांची मराठी माहिती मध्ये
माझी आई | Mazi Aai Nibandh In Marathi.
आयुष्यात सकाळच्या पहिल्या चहापासून ते रात्रीचे दूध पिऊ तो पर्यंत आई काळजी घेत असे. माझ्या आई चे नाव ……….. आहे. माझ्या आई चे वय .. आहे. ते घरतली सर्व कामे करते. माझी आई मला सकाळी लवकर उठवते आणि आमच्या उठण्या पूवीच ती नेहमीच्या कामांची सुरुवात होते. माझी आई आमच्या सवाांसाठी गोड खाद्य बनवते. जरी माझी आई कामात व्यस्त्त असली तरी सर्वांसाठी वेळ काढते आणि आमचा अभ्यास घेते व आमच्या सोबत गप्पा-गोष्टी पण करते.
माझी आई खूप कष्टाळू आणि मेहनती आहे. ती सकाळपासून रात्री झोपेपयांत काम करत असते. माझी आई नेहमी घरातल्या प्रत्येक व्यक्ती साठी झटत असते. आईचा चेहरा नेहमी हसरा असतो. मी तिच्या कडून शिकलो की कठीण परिश्रम करून च माणूस यशस्वी होतो. आमच्या घरामध्ये जर कोण आजारी पडले तर माझी आई दिवस -रात्र त्याची काळजी घेते असे . माझी आई फार दयाळू आणि धार्मिक आहे .माझ्या आईने लहानपणापासून मला चांगले वळण आणि संस्कार लावले आहेत.
लहानपणी पासून च माझ्या आईने माझे संरक्षण आणि चांगले मार्गदर्शन दिले आहेमाझी आई माझी पहिली शिक्षिका आहे जिने मला जीवनाबद्दल आणि त्यातील सौंदर्याबद्दल माहिती दिली . सत्यता, प्रामाणिकपणा , त्याग आणिर प्रेम हे सर्व मी आई कडून शिकलो आहे . आमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना एकत्र ठेवणारी एकमेव सदस्य म्हणजे माझी आई आहे.
मी माझ्या आईकडून शिकलेल्या सर्वात सुंदर गोष्टींपैकी एक म्हणजे सहानुभूती. अनोळखी असो वा प्राणी, ती प्रत्येकाशी एक सामान वागते ज्यामुळे तिला ही घोस्ट फार महान बनवते . एवढेच नाही तर तिने मला गरीब-श्रीमंत, सुंदर-कुरूप असा भेद कधीच करायचा नाही म्हणून शिकवले आहे. माझ्या आईने मला “माणुसकी” हेच सर्वात मोठी श्रीमंती आहे सांगितलं आहे.
माझी आई मला प्रत्येक गोष्टी मध्ये प्रोत्साहन देत असते. आईने मला माझ्या अभ्यासासोबतच इतर गोष्टी जसे खेळ,चित्रकला करायला नेहमीच प्रेरित केले.तिने मला आयुष्याच्या प्रत्येक क्षणचा आनंद घ्यायला आणि आयुष्य पूर्ण जगायला शिकवलं आहे. मी आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी कराव्यात अशी तिची इच्छा आहे. तिने बघितलेले स्वप्न मी पूर्ण करावे असे आईची इच्छा आहे.
माझ्या आईच्या मेहनतीतून आणि त्यागातून मला भरपूर शिकायला मिळाले. तिने मला एकदाच शिकवले की अपयशाने कधीही निराश होऊ नये आणि आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी अपयशाला आव्हान देत राहा. आणि एक दिवस, अपयश आपल्या यशाचा मार्ग मोकळा होतो . संकट सोबत लढणे आणि त्यावर मात करण्याची ताकद मी माझ्या आई कडून शिकलो आहे.
हे सुद्धा वाचा – राजर्षी शाहू महाराज यांचा जीवनप्रवास
आई ने कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ला बांधून ठेवते आणि प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. मी आयुष्यात काही चूक केली तरी ती मला रागावते पण त्याच वेळी ती मला समजावते आणि परिस्थितीतून बाहेर पडायला मार्ग दाखवते.
माझे आणि माझ्या आई सोबतले असलेले नाते समजावून सांगणे खूप कठीण आहे.मी माझ्या आई वर प्रेम करतो ती माझी सर्वस्वी अथवा माझ्यासाठी ती देवच आहे म्हंटले तरी चालेल.जेव्हा मला बोलता येत नव्हते आणि संवाद साधता येत नव्हते तेव्हा तिने वेळोवेळी माझी काळजी घेतली आहे . माझ्या आईबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मी मोठी झालो असलो तरी तिला माझ्या मनातला सर्व काही कळते. मी आई कडून दयाळूपणा आणि प्रेम शिकलो आहे . आई माझ्या आयुष्यातील आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक मोठमोठ्या क्षणाचा खडा-भक्कम आधारस्तंभ आहे.
माझी आई मला पूर्णपणे ओळखते . मी कधी आई शी खोटे बोल्ट असेल तर माझ्या हावभाव मुले तिला लगीच समजते की मी खोटा बोलत आहे. आई आपल्या आयुष्यातील महत्वपूर्ण भाग आहे आपल्याला स्वतःला पायावर उभे राहण्यास कायम धडपड करत असते .
माझ्या आईशिवाय मी कधीही चांगला माणूस होऊ शकणार नाही. माझी आई ही माझी सर्वात मोठी शक्ती आहे आणि जेव्हा मी आयुष्यातील सर्व चढ-उतारांमधून जातो तेव्हा माझी आई माझ्या मागे खंबीर पणे उभे असते त्यामुळे मी कधी संकट समोर घाबरत नाही.
आईकडे असलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तिचा संयम. तिच्याकडे असलेला संयम कुणालाही असणे कठीण आहे.प्रत्येक मुलाची जबाबदारी आहे की त्याने त्यांच्या आईचे कौतुक करणे आईवर प्रेम आणि आदर नेहमी आवश्यक आहे.
Majhi Aai Marathi Nibandh In 10 Lines | Majhi Aai Nibandh
माझी आई फार कष्टाळू आहे. |
प्राणिकपणा आणि नि:स्वर्तिपणा मी आई कडून शिकलो आहे |
आईचे हृदय फार कोमल असते तिला मला काय लागले अथवा मला त्रास झालेले बघवत नाही. |
माझी आई घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी फार झटत असते. |
माझी आई जेवण फार उत्तम बनवते. |
माझी आई माझी पहिली शिक्षका आहे. |
माझी आई फार दयाळू आहे. |
माझी आई फार धार्मिक आहे. |
माझी आई माझ्यासाठी संपूर्ण जग आहे. |
आई साक्षात परमेश्वर च रूप आहे . |
निष्कर्ष | Conclusion –
आम्ही दिलेली माहिती खालील विषयांसाठी तुम्ही वापरू शकता
- Mazi Aai Nibandh In Marathi.
- Majhi Aai Nibandh.
- Majhi Aai Nibandh In Marathi.
- My Mother Essay In Marathi.
- Majhi Aai.
- Majhi Aai Marathi Nibandh In 10 Lines.
- Mazi Aai Essay In Marathi.
Mazi Aai Nibandh In Marathi माहिती अन्य लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकावरून घेतली गेली आहे. वरील ब्लॉग मधील माहिती फक्त भाषण आणि शिक्षण उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिल्या गेलेल्या माहिती बद्दल काही अडचण असेल आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.
4 thoughts on “माझी आई निबंध | Best Nibandh Mazi Aai Nibandh In Marathi 2023”