Small story in marathi– आज आपण ह्या ब्लॉग मध्ये Small story in Marathi, Marathi bodh katha चांगल्या बघणार आहोत. लहान मुलांना लहान गोष्टी फार आवडतात आम्ही ह्या ब्लॉग मध्ये लहान मुलांना आवडेल अश्या मनोरंजक गोष्टी लिहलेले आहेत.
अनुक्रमणिका
Small story in marathi | “लोभी माकड”
एक माकड दररोज लोकांच्या वस्तीत जाऊन त्यांचे नुकसान करायचे. वाळत टाकलेले कपडे फाडायचे. घरातील खाण्याचे सामान घेऊन पळून जायचे. काही मुलांना ते चावले होते. लोक खूप कंटाळले होते. माकडाने वस्तीत हाहाकार माजवला होता. त्याला पकडण्याची सर्व मेहनत वाया गेली होती. शेवटी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन विचार केला की, माकडाला
कसे पकडायचे.
एवढ्यात माकड पकडणारा मदारी तेथे आला आणि म्हणाला, “मी माकडाला पकडू शकतो.’.” लोकांनी त्याला परवानगी दिली तो बाजारातून छोट्या तोंडाची मडकी घेऊन आला, त्याने थोडे-थोडे चणे टाकून सगळीकडे मडकी ठेवली. त्याने सांगितले, “संध्याकाळी सर्वांनी आपापल्या घराच्या आसपास जाऊन पाहा आणि माकड असेल तर मला कळवा.” एका माणसाने मदारीला माकडाची सूचना दिली.
मदारी त्याच्यासोबत गेला आणि त्याने माकडाला पकडले. लोकांनी विचारले, “चण्यामध्ये कोणती जादू होती?” तेव्हा मदारी म्हणाला, “चणे माकडाला खूप आवडतात; पण मी छोट्या तोंडाची मडकी यासाठी ठेवली की, चणे घेण्यासाठी माकड हात मडक्यात घालेल आणि मूठ भरून चणे बाहेर काढायचा प्रयत्न करेल तेव्हा त्याचे हात अडकतील.” माकड चणे-फुटाण्याच्या
लोभामुळे पकडले गेले.
Small story in marathi | “मेहनत कधी व्यर्थ जात नाही”
एक शेतकरी होता. त्याला चार मुले होती. चौघेही तरुण आणि धडधाकट; परंतु खूप आळशी होते. काही काम-धाम करत नव्हते. वडिलांच्या संपत्तीवर मौज-मस्ती करणे हेच त्यांचे काम होते. त्यांच्या या सवयी आणि आळशीपणा यांमुळे शेतकरी मोठ्या चिंतेत पडला.
तो विचार करायचा की माझ्यानंतर यांचे कसे होणार? त्यांना सुधारण्यासाठी तो युक्त्या शोधायचा. किती तरी वेळा त्याने मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याला एके दिवशी एक युक्ती सुचली. त्याने चारही मुलांना सांगितले, “बघा, तुम्हा लोकांसाठी मी आपल्या शेतात खजिना लपवून ठेवलाय. तुम्ही लोकांनी शेत खणून काढा आणि तो खजिना काढून सर्वांमध्ये वाटून घ्या.”
दुसऱ्या दिवशी पहाटेच त्या चौघांनी शेत खोदण्यास सुरुवात केली. त्यांनी पूर्ण शेत खणले; परंतु त्यांना खजिना मिळाला नाही. निराश होऊन ते आपल्या वडिलांपाशी पोहोचले. “बाबा, आम्ही पूर्ण शेत खोदून काढले. आम्हाला खजिना मिळाला नाही. तुम्ही आम्हाला खोटे तर सांगितले नाही ना?” शेतकऱ्याने उत्तर दिले, “नाही मुलांनो, मी कशाला खोटे बोलू, खजिना तर तिथेच आहे. आज जरी मिळाला नाही तरी विश्वास ठेवा, उद्या अवश्य मिळेल. कष्ट कधी वाया जात नाहीत.
तुम्ही सर्वांनी शेताची खूप छान खोदणी केली. आता माझ्याबरोबर या, आपण इथे पेरणी करू, ” मग, सर्वांनी मिळून खूप मेहनतीने शेतात गहू पेरले. त्यावर्षी पाऊस चांगला झाला आणि शेतात खूप चांगली पैदास झाली. शेतातील टवटवीत पीक बघून चौघे भाऊ खूप खूश झाले. वडिलांच्या देखरेखीत पीक कापून त्यांनी बाजारात विकले. त्यांना भरपूर संपत्ती मिळाली.
वडिलांनी ती संपत्ती चौघांत बरोबर वाटून दिली आणि म्हणाले, “माझ्या बाळांनो! हाच तो खजिना जो तुमच्या मेहनतीने मिळाला आहे. मी म्हटलं होतं ना मेहनत कधी वाया ज नाही.” “बाबा! तुम्ही बरोबर सांगत होतात की माणसाला मेहनत केली पाहिजे. मेहनत केल्यावर जे धन मिळणार, ते कोणत्याही खजिन्याशिवाय कमी नाही. आम्ही आजपासून निश्चय करत
आहोत की आम्ही जीवनामध्ये कधीही मेहनतीपासून तोंड लपवणार नाही.” आपल्या मेहनतीचे धन मिळाल्याने चारही भाऊ खूप खूष झाले. आता ते आळस सोडून मेहनत करायला शिकले होते.
हे सुद्धा वाचा – Marathi Story
Small story in marathi |” कोंबड्याचा बळी”
एक म्हातारी होती. तिच्या घरी दोन नोकर होते. म्हातारी दररोज सकाळी कोंबड्याच्या बांगेने उठायची आणि तिच्या नोकरांनापण उठवायची. परंतु नोकरांना सकाळी लवकर उठणे आवडत नव्हते.
नोकर विचार करायचे की, असे काय करावे की जेणेकरून लवकर उठावेच लागणारनाही. त्यांतील एक नोकर म्हणाला, “माझ्या मते आपल्या संकटाचे कारण हा कोंबडा आहे!”एके दिवशी एका नोकराने दुसऱ्याला सांगितले, “आपण या कोंबड्याला मारून टाकू. सकाळीयाने बांग दिली नाही तर मालकीणपण लवकर उठणार नाही.
मालकीणच उठणार नाही तर आपण कसे उठणार?” दुसऱ्याला हे पटले. दोन्ही नोकरांनी त्या कोंबड्याला त्याच दिवशी
मारून टाकले. कोंबडा मेला, मग बांग कोण देणार? आता म्हातारीला सकाळी उठण्यासाठी वेळ कळेना. ती रात्री केव्हाही झोपेतून उठू लागली. ती आधीपेक्षा लवकर नोकरांना उठवू लागली आणि काम करायला लावू लागली. कोंबडा मेला; परंतु नोकरांची समस्या आधीपेक्षा जास्त वाढली. तो कोंबडा होता तेच बरे होते. नोकर त्या कोंबड्याला मारल्यानंतर पश्चाताप
करू लागले.
हे सुद्धा Youtube वर बघा – Moral Stories In Marathi
Marathi Bodh katha | “सर्वात मोठे धन”
एका राज्यामध्ये दोन मित्र रहात होते. त्यामध्ये एक शेतकरी व दुसरा व्यापारी होता. एकदा दोघांनाही एका संकटाने घेरले. शेतकऱ्याची पत्नी मरण पावली आणि व्यापाऱ्याचा व्यवसायात फार मोठा तोटा झाला. त्याची होती तेवढी सगळी संपत्ती हातातून निघून गेली.
शेतकरी त्याच्या पत्नीच्या अचानक जाण्याने दुःखी झाला. व्यापारी त्याच्या संपत्तीचाविनाश झाल्यामुळे दुःखी झाला. दोघांनीही खूप प्रयत्न केले की, कोणत्या प्रकारे झालेल्या नुकसानाची भरपाई होईल; परंतु शेतकऱ्याचे लग्न होऊ शकले नाही, व्यापाऱ्याला आर्थिक लाभ होऊ शकला नाही. शेवटी दोघांनीही राजाकडे जाण्याचा निर्णय घेतला; कारण, त्या
राज्याचा राजा खूप दयाळू होता. तो त्याच्या दारात आलेल्या याचकाला निराश होऊन पाठवत
नसे. त्या कारणाने त्या राजाची कीर्ती खूप दूर-दूरपर्यंत पोहोचली होती.
शेवटी ते दोघेही राजाकडे निघाले. रस्त्यात त्यांना एक भिकारी भेटला. त्याने त्या दोघांना विचारले “अरे! तुम्ही लोक कुठे चालला आहात?” “आम्ही लोक राजाकडे आमच्या-आमच्या गरजेनुसार काही वस्तू मागण्यासाठी चाललो
आहोत. राजा खूप दानशूर आहे. तूपण चल, काही माग.” शेतकरी म्हणाला. तो भिकारी खूप प्रसन्न मनाचा होता. त्याला काहीच नको होते. तरीही तो त्या दोघांसोबत गेला.
तिघे राजापाशी पोहोचले. राजाने त्यांना येण्याचे कारण विचारले. व्यापारी म्हणाला, “महाराज माझा व्यापार बंद झाला आहे. जर तुम्ही मला एक हजार सुवर्णमुद्रा दिल्या तर मी पुन्हा व्यापार सुरू करू शकेन.” “शेतकरी दादा! तुम्हाला काय दुःख आहे?” राजाने विचारले. “राजा! माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. मला एक पत्नी देण्याची कृपा करा.” शेतकरी
म्हणाला, “ज्यामुळे शेतीकामात ती मला साथ देईल.”
भिकारी शांत होता. राजाने विचारले, “तुला काय पाहिजे?” “महाराज! इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत. या जीवनात मी खूप काही पाहिले आहे. शेवटी इच्छा बाळगणे सोडून दिले. त्यामुळे मला काही नको.” भिकारी म्हणाला. राजाला भिकाऱ्याचे हे उत्तर उद्धटपणाचे वाटले. त्याला वाटले जणू त्या भिकाऱ्याने काही न मागता आपला अपमान केला आहे. परंतु तो काहीच बोलला नाही.
राजाने व्यापाऱ्याला एक हजार सुवर्णमुद्रा आणि शेतकऱ्यास पत्नी देवून निरोप दिला. तिघांच्या जाण्यानंतर काही वेळात राजाने एका सैनिकाला बोलावले आणि आदेश दिला की, “आत्ताच येथून तीन व्यक्ती गेलेल्या आहेत. एकाकडे सुवर्णमुद्रांची पिशवी आहे. दुसऱ्यासोबतएक स्त्री आहे. तिसरी व्यक्ती रिकामी आहे. त्या तिसऱ्या व्यक्तीला पकडा आणि त्याचे शीर
कापून माझ्याकडे घेऊन या.”
तिघेही राजधानीच्या बाहेर प्रवास करताना व्यापारी थैलीच्या ओझ्याने थकला. त्याने थैली भिकाऱ्याकडे दिली आणि काही अंतरापर्यंत घेऊन जाण्यासाठी विनवणी केली. व्यापाऱ्याने त्याला ती थैली दिल्यानंतर लगेचच मागून तो सैनिक आला. त्याने रिकामे हात बघून व्यापाऱ्याचे शीर कापून राजाकडे नेले. व्यापाऱ्याचे शीर पाहून राजाला खूप दुःख झाले. तो सैनिकाला म्हणाला, “तू ओळखण्यात चूक केलीस? ज्याच्यासोबत स्त्री आहे त्याला सोडून दुसऱ्याचे शीर कापून आण.’ परंतु नियतीला काही तरी दुसरेच मान्य होते.
भिकारी, शेतकरी आणि स्त्री चालत जात होते तेव्हा अचानक शेतकरी लघुशंकेसाठी मागे थांबला. स्त्री त्या भिकाऱ्यासोबत चालत होती. इतक्यात सैनिक आला. त्याने शेतकऱ्याला एकटेच पाहिले आणि त्याचे शिर कापून राजाकडे आणले. राजा शेतकऱ्याचे शिर पाहून आश्चर्यात पडला की जे लोक मागण्यासाठी आले होते तेच मारले गेले; पण ज्याला काहीच नको होते, त्याला सुवर्णमुद्रा आणि पत्नी मिळाली. कोणीतरी खरेच सांगितले आहे. ‘तृप्त व्यक्तीला काहीही न मागताच मिळत असते. तृप्त असणेच सर्वात मोठे धन आहे. ‘
निष्कर्ष | Conclusion
आम्ही दिलेले माहितीचा वापर तुम्ही खालील विषयांसाठी वापरू शकता
- Small Story In Marathi.
- Marathi Bodh Katha.
- Marathi Story.
- Marathi Story For Kids.
आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली Small story in Marathi, Marathi Bodh Katha एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळेकाहीकॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.
1 thought on “Best Small Story In marathi 2023 | लहान मुलांचा गोष्टी”