Best Football Information In Marathi | फुटबॉलची माहिती 2023

5/5 - (4 votes)

Football Information In Marathi

Football Information In Marathi, Football In Marathi- Football Information In Marathi फुटबॉल खेळा विषयी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिली आहे. फुटबॉल या खेळाला असोसिएशन फुटबॉल किंवा सॉकर असेहि म्हणतात. या खेळा मध्ये 11 खेळाडूंचे दोन संघ असतात, खेळाडूंनी त्यांच्या शरीराच्या फक्त पायाचा भागाचा वापर करून, त्यांचे हात वगळता, चेंडू ला विरुद्ध संघाच्या गोलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला जातो. जो संघ अधिक गोल करतो तो जिंकतो. केवळ गोलरक्षकालाच पेनल्टी क्षेत्रामध्ये चेंडू हाताळण्याची परवानगी असते.

अर्जेंटिना, इटली, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स व अनेक राष्ट्रांना फोटबॉल विषयी राष्ट्रीय प्रेम आहे .सहभागी खेळाडू आणि प्रेक्षकांच्या संख्येत फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉल हा खेळ खेळण्यासाठी मैदानापासून, शाळेचे मैदान, उद्याने किंवा समुद्रकिनारे पर्यंत जवळपास कुठेही खेळला जाऊ शकतो.

फुटबॉलची प्रशासकीय संस्था, फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (FIFA) आहे. 21 व्या शतका मध्ये अंदाजे 250 दशलक्ष फुटबॉल खेळाडू आहेत तसेच लोकांना फुटबॉल खेळ मध्ये खूप आवड आहे, 26 अब्जाहून अधिक लोक टीव्ही वरती फुटबॉल प्रीमियर स्पर्धा व विश्वचषक आजही पाहतात.

फुटबॉलचा इतिहास | History Of Football

Football Information In Marathi-फुटबॉल चा इतिहासाची माहिती खाली प्रमाणे दिली आहे.इतिहासाची पुस्तके असे सांगतात की लोकांनी हजारो वर्षांपासून मैदानात चेंडूला लाथ मारून खूप चांगला वेळ अनुभवला आहे, परंतु त्या सर्व खेळांना आज आपण फुटबॉल असे समजले जाते. फुटबॉलची सुरवात हि चीनमध्ये होते . तिसरे शतक, जेथे लष्करी नियमावलीत फुटबॉलसारख्य खेळाचा उल्लेख आहे. “हान” राजवंशाने “त्सू’ चू” नावाचा खेळ खेळला होता , ज्यामध्ये 30-40 सें.मी.च्या अंतरापासून चेंडूला लाथ मारून तो चेंडू छड्यांचा मदतीने उभे जोडलेल्या जाळ्यामध्ये जायचा व गोल असे.

फुटबॉलची उत्पत्ती | Origin Of Football


Football Information In Marathi, Football In Marathi-फुटबॉलची उत्पत्ती हि नेमकी कोटीहून झाली याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिली आहे. इंग्लंड मध्ये १०० वर्षांपूर्वी १८६३ मध्ये फुटबॉल ची उत्पत्ती १८६३ साली सुरवात झाली. असोसिएशन फुटबॉल आणि रग्बी फुटबॉल, नंतर ते विभक्त झाले व फुटबॉल असोसिएशन, या खेळासाठी पहिली अधिकृत प्रशासकीय संस्था स्थापन झाली.

१३१४ साली लंडन चा लॉर्ड मेयर यांनी फुटबॉल खेळाला वादविवादाचा कारणाने बंदी आणली होती. नंतर ८ ते १९ व्य शतकात ब्रिटीयन मध्ये खेळाचे वेगवेगळे प्रकार चालू झाले जसे असोसिएशन फुटबॉल, रग्बी फुटबॉल आणि गेलिक फुटबॉल ,या सर्व खेळांनी आज आपण खेळत असलेल्या समकालीन फुटबॉल खेळाला हातभार लावला.

1872 मध्ये, एफए कपची स्थापना झाली होती.1904 मध्ये फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन(FIFA) ची स्थापना पॅरिसमध्ये झाली होती. संस्थापक सदस्यांमध्ये फ्रान्स, बेल्जियम, स्वीडन, डेन्मार्क, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड, आणि स्पेन यांचा समावेश होता. दुसऱ्या महायुद्धानंतर, 1950 च्या दशकापर्यंत, 73 पेक्षा जास्त FIFA सदस्य झाले होते.

फुटबॉल मैदान ची लांबी रुंदी ? | Football’s Ground Length And Breadth


फुटबॉल खेळाचे मैदान 100 – 110 यार्ड लांबी आणि 70 – 80 यार्ड रुंदी असते. आयाताकृतीचा गोल मध्यभागी प्रत्येक गोल रेषांचा इथे असतो. गोलमध्ये दोन क्रॉसबार आणि 2 गोल पोस्टअसतात. गोलपोस्ट 8 यार्डच्या रुंद असते व 8 फूट उंच असते आणि त्याचा मागे जाळी लावलेली असते जी क्रॉसबार ला जोडलेली असते .

फुटबॉलचे नियम (सॉकर) | Rules Of Football Soccer

  • फुटबॉल खेळाची पूर्ण वेळ ९० मी इतकी असते त्यामध्ये ४५-४५ मिनिटांच्या दोन अर्ध्या भागांचा समावेश व मध्यंतर चा वेळेत १५ मी ची विश्रांती कालावधी असते.
  • प्रत्येक संघात किमान ११ खेळाडू असतात व 7 राखीव खेळाडू असतात. १८ यार्ड चा चौरस (पेनल्टी एरिया)मध्ये चेंडू हाताळण्याची परवानगी फक्त गोलकीपरला असते.प्रत्येक संघाला कर्णधार असतो
  • मैदान एकतर कृत्रिम किंवा नैसर्गिक गवताचे बनलेले असणे आवश्यक आहे. मैदानाचा आकार बदलू शकतो परंतु 100-130 यार्ड लांब आणि 50-100 यार्ड रुंद असणे आवश्यक आहे. खेळाचे मैदान आयताकृती आकाराने असणे आवश्यक आहे ज्यामध्ये बाहेरील सीमा, दोन सहा यार्ड बॉक्स, दोन 18 यार्ड बॉक्स आणि मध्यवर्ती वर्तुळ असला पाहिजे. दोन्ही गोल चा मध्यवर्ती वर्तुळाच्या बाहेर 12 यार्ड ठेवलेल्या पेनल्टीसाठी जागा देखील असणे आवश्यक आहे.(Football In Marathi)
  • चेंडू गोलाकार व त्याचा घेर ५८-६१ cm असणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक संघ मध्ये फक्त 7 पर्यायी खेळाडूंची नावे देता येतात.
  • .प्रत्येक संघाला ३ खेळाडू बदलण्याची परवानगी असते. तिन्ही खेळाडू बदली झाल्यानंतर जर कोणत्या खेळाडूला दुखापत झाली तर त्या संघाला १० खेळाडूंवर सामना खेळण्यास भाग पडले जाईल.
  • .खेळ मध्ये एक मुख्य पंच आणि दोन असिस्टंट पंच (लाइनमन) यांचा समावेश असतो . टाइमकीपर म्हणून काम करणे आणि फाऊल, पेनल्टी, फ्री किक, थ्रो इन यासारखे निर्णय घेणे हे पंचांचे काम आहे. निर्णया विषयी सहाय्यक पंच मुख्य पंचांचा सल्ला घेऊ शकतात. सर्व योग्य निर्णय देणे व ऑफसाइड शोधणे हे सहाय्यक पंचांचे मुख्य काम आहे.
  • ९० मिनिट नंतरही सामना बरोबरीत असेल तर १५ -१५ मिनिटांचा दोन हाफ(एक्सट्रा टाईम) म्हणजेच अधिक ३० मी दिले जातात .
  • एक्सट्रा टाईम मध्ये हि सामना बरोबरीत राहिला तर पेनल्टी शूटआउटस दिले जातात.
  • चेंडू संपूर्ण गोल रेषा ओलांडून आत गेला तरच गोल घोषित केली जाते.
  • फाऊलच्या तीव्रतेनुसार खेळाडूला पिवळे किंवा लाल कार्ड दिले जाते हे पंचांचा निर्णयावर आधारित असते.
  • पिवळे कार्ड इशारा म्हणू दिले जाते तर लाल कार्ड दिल्यास खेळाडू बाद केला जातो .दोन पिवळे कार्ड १ लाल चा समान असते. लाल कार्ड दिल्यास खेळाडू बाद केला जातो व बाहेर गेलेल्या खेळाडू चा बदल्या मध्ये अन्य कोणता हि खेळाडू बदली केला जाऊ शकत नाही.
  • चेंडू खेळताना बाहेर गेला तर थ्रो इन दिला जातो व बेस लाईनवर आक्रमण करणाऱ्या खेळाडूचा प्लेऑफ चा बाहेर गेला तर गोलकिक दिली जाते आणि बचाव करणारा असेल तर कॉर्नर किक दिली जाते.

फुटबॉलमधील ऑफसाइड नियम | Offside Rule In Football


जेव्हा आक्रमण करणारा खेळाडू शेवटच्या बचावपटूसमोर असतो तेव्हा त्या खेळाडू ला पास आल्यास ऑफसाइड होऊ शकते. ऑफसाइड क्षेत्रा मध्ये आक्रमक खेळाडू पास ची वाट पाहत असेल व पास आल्यास ती ऑफसाईड होऊ शकते कारण विरुद्ध संघाचा शेवटचा बचावपटूंचा हात बाहेर जाणारी हि परिस्थिती असते गोलरक्षक हा बचावखेळाडूं म्हणता येत नाही.(Football In Marathi)

जेव्हा चेंडू आक्रमण खेळाडूला खेळा जातो तेव्हा तो खेळाडू बचाव कर्त्याचा मागे असला पाहिजे जर तो पुढे असेल तर ऑफसाईड दिली जाते व बचाव करणाऱ्या संघाला फ्रीकिक दिली जाते.गोलकीपरला बचावपट्टू(डिफेंडर) म्हणून मानले जात नाही. जर चेंडू मागे खेळला गेला आणि खेळाडू शेवटच्या बचावखेळाडू समोर असेल तर ती ऑफसाइड दिली जात नाही.


हे सुद्धा वाचा- Kabaddi Information In Marathi

फुटबॉल स्पर्धा | Football Tournaments

क्र.फुटबॉल स्पर्धाचें नावनाव
1फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल अससोसिएशनFIFA
2युरोपियन चॅम्पिअनशिपUEFA
3दि कोपा अमेरिकाCONMEBOL
4आफ्रिकन कप ऑफ नेशन्सCAF
6दि आशिया कपAFC
7दि CONCACAF गोल्ड कपCONCACAF
8दि OFC नेशन कपOFC
9स्पेनLa Liga
10इटलीSerie A
11जर्मनीBundesliga

चेंडूची माहिती | Information Of Football


फुटबॉल हा चेंडू विविध आकार आणि प्रकारांसह, सॉकर चेंडू बाजारात मिळतात . तुमचा वयानुसार चेंडूची साईझ ठरते. मिनी फुटबॉल हा चेंडू स्किल बॉल जे फूटवर्क सुधारण्यासाठी वापरला जातो .४ न चा चेंडू हा ८-१२ वयोगटातील मुलांन मध्ये वापरले जाते. ५ न चा चेंडू हा सर्वात मोठा अधिकृत चेंडू आहे .(Football In Marathi)
५ न.चा हा चेंडू खास करून फुटबॉलपटूंसाठी बनविला आहे. F550 (चेंडू चा प्रकार ) चेंडू हा जाड, हलका व टिकाऊ हि आहे. चेंडूंचा कंपन्यांची नावे आदिदास, नायकी, निव्हिया , प्युमा ,रिबॉक इ.

क्रीडा उपकरणे | Sport Equipments

फुटबॉल खेळासाठी आवश्यक असते ते म्हणजे मैदान आणि फुटबॉल. खेळाडू यांना जर्सी , शॉर्ट्स, फुटबॉल बूट (स्टडस्), शिन पॅड आणि मॅचिंग स्ट्रिप्स घातलेले आढळू शकतात. गोलकीपर पॅडेड ग्लोव्हज (हातमोजे) घालतात कारण त्यांना फक्त चेंडू धरावा लागतो .

हे सुद्धा Youtube वर पहाFootball Information In Marathi

ऑलिम्पिकमध्ये फुटबॉल खेळाला आहे का? | Is Football Played In Olympics?

पुरुषांच्या ऑलिम्पिक फुटबॉलचा FIFA विश्वचषकापेक्षा मोठा इतिहास आहे कारण पॅरिस मध्ये1900 पासून खेळ जातो. लॉस एंजेलिस चा 1932 मध्ये फुटबॉल हा असा एकमेव खेळा आहे जो खेळ जात नाही. महिला स्पर्धा अटलांटा 1996 गेम्समध्ये हि फुटबॉल खेळ खेळा जातो.(Football In Marathi)

फिफा वर्ल्डकप विजेते | FIFA Worlcup Winners

विश्वचषक हि सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा आहे. प्रथम फिफा विश्वचषक ची सुरुवात १९३० साली झाली.
जेव्हा FIFA, जगातील फुटबॉल प्रशासकीय संस्था, FIFA अध्यक्ष ज्युल्स रिमेट यांचा अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय पुरुष फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.उरुग्वे मध्ये सर्वात पहिली फिफा स्पर्धा झाली होती.

साल देश
2022अर्जेंटिना
2018 फ्रान्स
2014 जर्मनी
2010 स्पेन
2006 इटली
2002 ब्राझील
1998 फ्रान्स
1994 ब्राझील
1990 जर्मनी
1986 अर्जेंटिना
1982 इटली
1978अर्जेंटिना
1974 जर्मनी
1970ब्राझील
1966 इंग्लंड
1962 ब्राझील
1958 ब्राझील
1954 जर्मनी
1950उरुग्वे
1938 इटली
1934इटली
1930उरुग्वे

निष्कर्ष | Conclusion

Football Information In Marathi, Football Information In Marathi,, Football In Marathi Football Information In Marathi दिली गेली आहे ती सर्व पुस्तकातून घेतली गेली आहे. तुम्हाला वरील फुटबॉल बद्दल संपूर्ण माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला वरील माहिती बद्दल काही अडचण असेल तर आम्हाला [email protected] यावरती मेल करा. आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये नक्की उत्तर देऊ.

FAQ

फुटबॉल कोणत्या देशाचा आहे?

१९ व्या शतकात फुटबॉल खेळाचा उगम ब्रिटन मध्ये झाला आहे.

जगप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू कोण आहे?

जगप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सी हा अर्जेन्टिना या देशाचा आहे. मेस्सी ने ८०० पेक्षा अधिक गोल केले अहेत.

फुटबॉल मध्ये किती खेळाडू असतात?

एका संघाकडे ११ तर दुसऱ्या विरोधी संघाकडेही ११ खेळाडू असतात आणि ७ राखीव खेळाडू दोनी संघाकडे समाविष्ट असतात.

फुटबॉलमध्ये ट्रेबल म्हणजे काय?

एक संघाने एकाच हंगामात ३ चषक जिंकले तर ट्रेबल झाला असे म्हणतात .त्या मध्ये राष्ट्रीय लीग स्पर्धा, मुख्य राष्ट्रीय व मुख्य महाद्वीपीय चषक त्या संघास जिंकणे आवश्यक आहे.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

Leave a Comment