क्रिकेट खेळासंबंधी संपूर्ण माहिती |Cricket information in Marathi

5/5 - (6 votes)

Cricket information in Marathi – क्रिकेट चा इतिहास आणि सुरवात कशी झाली ? इथे आपल्याला क्रिकेट बद्दल संपूर्ण माहिती मिळणार.क्रिकेट या खेळाची सुरवात ब्रिटिश काळापासून सुरवात झाली. आज आपण संपूर्ण क्रिकेट बद्दल अतिशय सोप्या भाषेमध्ये माहिती दिली गेली आहे.तुम्हाला या पोस्ट काय मिळणार आहे यासाठी तुम्ही खाली दिलेली अनुक्रमणिका पाहू शकता.

अनुक्रमणिका

क्रिकेट म्हणजे काय ? Cricket Information in Marathi

Cricket information in Marathi – क्रिकेट हा एक क्रिकेट बॅट आणि बॉल च्या मदतीने खेळाला जाणारा एक मैदानी खेळ आहे. आजकाल बऱ्यापैकी आंतरराष्ट्रीय खेळामध्ये क्रिकेट हा लोकप्रिय खेळ आहे.क्रिकेट हा खेळ पुरुष आणि महिला हे दोन्ही सुद्धा खेळू शकतात. क्रिकेट मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये क्रिकेट विश्वचषक हा एक लोकप्रिय स्पर्धा आहे. हि स्पर्धा महिला सुद्धा खेळले जातात.या खेळासाठी २ संघाची आवश्यकता असते.क्रिकेट हा खेळ इंग्लड चा राष्ट्रीय खेळ असला तरी तो खेळ आता संपूर्ण जगात खेळाला जातो.२ संघामध्ये प्रत्येकी ११ , ११ खेळाडू असतात.

क्रिकेट चा इतिहास | Cricket History

Cricket mahiti Marathi – क्रिकेट हा खेळ साधारणतः १३ व्या शतकामध्ये इंग्लंड मध्ये सुरु झाला. सुरवातीला इंग्लंड मध्ये तेथील लहान मुले झाडाची फळी ने खेळाची सुरवात केली. चेंडू म्हणून त्याकाळी दगड याचा वापर होत होता. तो वापर १७ व्या शतक पर्यंत तसाच होत राहिला. १७ व्या शतकांनंतर दगड चा वापर बंद करून चेंडू वापरात आला . आता च्या चेंडू चे आधुनिक वजन हे १५६ ग्रॅम ते १६३ ग्रॅम आहे. या बॉल चा वापर १७७४ पासून सुरवात झाली.

जुनी बात हि लाकडाची असून त्याचा आकार मात्र आताच्या हँकी च्या काठीसारखा होता. काही काळांनंतर त्याचा आकार लहान होत गेला आणि त्याचबरोबर त्याच वजन कमी होत गेलं. सुरवातीच्या काळात गोलंदाजी विकसित नसल्याने १८ व्या शतकापर्यंत फलंदाजांनी गोलंदाजी वर वर्चस्व गाजवले.

Cricket information in Marathi

क्रिकेट खेळाचे मैदान | Cricket ground information in Marathi

Cricket ground information in Marathi – क्रिकेट चे मैदान अंडाकृती असते. आणि त्या अंडाकृती मैदान च्या मधी आयताकृती क्षेत्र असते. त्या क्षेत्राला क्रिकेट खेळपट्टी (Cricket Pitch) असे म्हणतात. त्या खेळपट्टी वरून च खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी करतात.

क्रिकेट खेळासाठी वापरले जाणारे मैदान हे पुरुष आणि स्त्रीया याच्यासाठी एकाच असते. परंतु पुरुष आणि स्त्रीया यासाठी मैदान वरील षटकार साठी अंतर हे वेगळे वेगळे असते.
पुरुषांसाठी सरळ सीमा (straight boundary) चे अंतर हे कमीत कमी ७० यार्ड (६४ मीटर) आणि जास्तीत जास्त ९० यार्ड (८२.५० मीटर) त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी कमीत कमी ६५ यार्ड (५९.४५ मीटर) आणि जास्तीत जास्त ९० यार्ड (८२.४९ मीटर)असते.
पुरुषांसाठी चौरस सीमा (square boundary) कमीत कमी ६५ यार्ड (५९.४३ मीटर) जास्तीत जास्त ९० यार्ड (८२.४९ मीटर) आणि महिलांसाठी चौरस सीमा कमीत कमी ६५ यार्ड (५९.४३ मीटर) आणि जास्तीत जास्त ९० यार्ड (८२.४९ मीटर) असते.

cricket information in Marathi

क्रिकेट खेळपट्टी –

क्रिकेट खेळपट्टी चे साधारणतः लांबी अंतर ६६ यार्ड (२०.१२ मीटर) असते. आणि रुंदी २६४ सेंटीमीटर असते. क्रिकेट खेळपट्टी दोन्ही बाजूला स्टंप (stumps) असतात. एक बाजूला खेळाडू फलंदाजी आणि एक बाजूला गोलंदाजी साठी असते. स्टंप पासून १.२२ मीटर अंतरावर एक रेष असते त्याच्या आतून खेळाडू ने फलंदाजी करावयाची असते . त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला तश्याच रेषेच्या आतून खेळाडू ने गोलंदाजी करायची असते.

भारतातील सर्वात ५ मोठे मैदान –

अ.नमैदानक्षमता
1नरेंद्र मोदी स्टेडियम१,३२,०००
2एडन गार्डन८०,०००
3रायपूर इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम६५,०००
4राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम५५,०००
5ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम५५,०००


क्रिकेट पॉवर-प्ले नियम (Power-Play Rule)

एकदिवसीय सामन्यातील पॉवर-प्ले नियम-

  • पहिला पॉवर-प्ले नियम (पहिले १ ते १० षटक)- २ पेक्षा जास्त खेळाडू ३० यार्ड च्या बाहेर नको
  • दुसरा पॉवर-प्ले नियम (पहिले ११ ते ४० षटक) – ४ पेक्षा जास्त खेळाडू ३० यार्ड च्या बाहेर नको.
  • तीसरा पॉवर-प्ले नियम (४१ ते ५०)- ५ पेक्षा जास्त खेळाडू ३० यार्ड च्या बाहेर नको.

T-20 सामन्यातील पॉवर-प्ले नियम

  • पहिला पॉवर-प्ले नियम ( पहिले १ ते ५ षटक) – T-20 सामन्यांमध्ये पहिल्या ५ षटकापर्यंत ३० यार्ड च्या बाहेर फक्त २ खेळाडू उभे राहू शकतात.
  • दुसरा पॉवर-प्ले नियम (नंतरचे ५ ते २० षटक ) – T-20 सामन्यांमध्ये ५ ओव्हर नंतर ३० यार्ड च्या बाहेर खेळाडू ला राहू शकतात.

Duckworth Lewis Rule –

Duckworth Lewis Rule (DLS) ही एक गणितीय सूत्र आहे जी हवामान किंवा इतर परिस्थितींमुळे व्यत्यय आलेल्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघासाठी लक्ष्य स्कोअरची गणना करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
लक्ष्य स्कोअर सेट करण्याची ही सर्वात अचूक पद्धत म्हणून स्वीकारली जाते.अश्या वातावरणामुळे अनिर्णित ठरलेलेस सामन्याचा निर्णय दिला जातो.

हे सुद्धा वाचा – Kabaddi Information In Marathi

क्रिकेट धावा | Cricket Runs

Six

फलंदाजाकडून मारला गेलेला चेंडू रेषेचा बाहेर गेला तर त्याला सिक्स (six) असे म्हणतात. असे झाल्यास धाव संख्यात सहा धावांची भर पडते.

Four

फलंदाजाकडून मारला गेलेला चेंडू थेट बाहेर न जात तो चेंडू मैदनावरती टप्पा पडून जातो त्यावेळी चार धावा घेतल्या जातात.

Extra Runs

क्रिकेट नियमानुसार extra runs सुद्धा असतात. ज्यावेळेस बॉल खेळपट्टीचा बाहेर पडतो किंवा बॉल फलंदाजाच्या कमरेच्या वरती बॉल आल्यास त्या फलंदाजी करणाऱ्या संघाला एक बॉल एक्सट्रा आणि एक धाव सुद्धा एक जास्त दिली जाते.

क्रिकेट मधील विकेट प्रकार | Wicket Mahiti

Cricket information in Marathi – क्रिकेट नियमानुसार फलंदाज बाद होण्याचे काही नियम आणि कारण खाली दिले आहेत.फलंदाज आशयच वेगळ्या वेगळ्या प्रकारे बाद होऊ शकतो.

Catch out ( झेल बाद )

फलंदाजाने चेंडू जर डायरेक्ट हवेमध्ये उडवला आणि तो विरुद्ध सांध्याच्या खेळाडू ने जर जमीनीला स्पर्श होण्य या आधी जर तो झेलला तर तो फलंदाज झेल बाद (Catch out)झाला असे मानले जाते.

Run-out wicket (धाव बाद)

जर दोन्ही फलंदाज बॉल ला हिट केल्यांनतर एक धाव घेण्यासाठी जेव्हा धावतात तेव्हा जर विरुद्ध संघाने त्यांना स्टंप च्या जवळ येण्याआधी बॉल जर स्टंप च्या दिशेने मारून अथवा स्टंप ला बॉल मारला तर त्यातील एक खेळाडू धाव बाद (Run out)होतो.

Stumped out

खेळाडू फलंदाजी करताना जर बॉल स्टंप वर जाऊन आदळला तर तो खेळाडू स्टंप बाद (Stumped out) होतो.

Time out

खेळाडू काही वेळासाठी बाहेर जाऊ शकतो. खेळाडू काही वेळा साठी फलंदाजी मधून काही वेळासाठी बाहेर जाऊ शकतात. या नियमाला Time Out नियम असते म्हणतात.

Hit wicket

जर खेळाडू ने फलंदाजी करताना थेट स्टंप ला बॅट मारली असता त्याला हिट विकेट आऊट (Hit wicket)दिल जात.

Retired wicket

खेळाडू च्या शारीरिक दुखापती मुले किंवा काही कारणामुळे जर खेळाडू ला बाहेर जायचं असेल तर रिटायर्ड होऊ शकतो. पण एकदा खेळाडू रिटायर्ड होऊन जर मैदान च्या बाहेर गेला. तर त्याला त्या सामन्यांमध्ये परत खेळण्याची संधी दिली जात नाही.अश्या प्रकारे जर खेळाडू जर बाद होत असेल तर त्याला असे Retired wicket दिले जाते.

क्रिकेट बॉल चे प्रकार | Cricket in Marathi

खाली काही बॉल चे प्रकार खाली दिले गेले आहेत. त्यावरून ठरवले जाते कि धावसंख्यामध्ये भर पाडणार कि आणखीन एक बॉल टाकायचा

Wide Ball

जर गोलंदाजी करणाऱ्या खेळाडू जर बॉल खेळपट्टी च्या आखलेल्या रेषेच्या बाहेर जर बॉल टाकला असेल तर त्याला अजून बॉल टाकायला लागतो त्याचबरोबर त्या बाहेर टाकलेल्या बॉल साठी विरुद्ध संघाला एक धाव ज्यादा दिला जातो.

No-Ball

जर गोलंदाजाने बॉल जर फलंदाजाच्या डोक्यावरून अथवा कमरेच्या वरून टाकला जर तो नो बॉल असा गृहीत धरला जातो. त्यासाठी विरुद्ध टीम ला आणखीन एक बॉल ज्यादा दिला जातो आणि एक धाव ज्यादा दिला जातो. त्याचबरोबर पुढील जो बॉल असेल त्याला free hit दिली जाते म्हणजेच त्या बॉल खेळाडू रन आऊट शिवाय कोणत्याही दुसऱ्या पद्दतीने आऊट होऊ शकत नाही

एकदिवसीय क्रिकेट चे नियम –

एकदिवसीय क्रिकेट सामना लिमिटेड ओव्हर्स (Limited Overs Cricket) च्या प्रकारामध्ये बसतो. एकदिवसीय सामना आताच्या घडीला ५० षटकांचा असून तो २ संघामध्ये खेळाला जातो. प्रत्येकी ११ खेळाडू असतात.

एकदिवसीय सामन्यातील काही महत्वाचे नियम आणि अटी

  1. सर्वप्रथम दोन्ही संघाचे कर्णधार येऊन नाणेफेक करून आपली बाजू निवडतात. उदाहरणार्थ. A आणि B दोन संघ आहेत. दोन्ही संघांच्या कर्णधार यांच्या मध्ये नाणे फेक होऊन फलंदाजी आणि गोलंदाजी ठरवून घेतात. समजा यात A संघाने फलंदाजी घेतली. तर A संघ हा ५० षटकांमध्ये धावसंख्या तयार करतात
  2. आता A संघ प्रथम फलंदाजी करून एक धावसंख्या निश्चित करतात आणि B संघासाठी धावांचे लक्ष देतात.
  3. त्यांनतर A या संघाने दिलेली धावसंख्या B या संघाने ५० षटकांमध्ये त्या धावसंख्येपेक्षा जास्त धावा केल्यांनतर B संघ विजयी घोषित केला जातो. आणि B हा संघ त्या धावसंख्येपर्यंत जाऊ शकला नाही तर A संघ विजयी घोषित केला जातो.

एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वात फेमस लीग –

एकदिवसीय विश्वचषक (One Day World cup)- एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील सर्वात प्रसिद्ध league म्हणजे एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक (Oneday Cricket World cup). क्रिकेट विश्वचषक हा एक असा खेळ आहे की जगातील भरपूर संघ यासाठी खेळतात. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रोलिया, वेस्ट इंडिन्स, दक्षिण आफ्रिका, न्यू झेलन्ड, श्रीलंका, आयर्लंड आणि पाकिस्तान असे भरपूर संघ या स्पर्धेमध्ये भाग घेतात.
भारताने एकदिवसिय विश्वचषक स्पर्धा दोन वेळा जिंकली आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आणि २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली

T-20 क्रिकेट चे नियम –

T-20 क्रिकेट सामना लिमिटेड ओव्हर्स (Limited Overs Cricket) च्या प्रकारामध्ये बसतो. T-20 सामना हा २० षटकांचा खेळाला जातो आणि तो २ संघामध्ये खेळाला जातो. प्रत्येकी ११ खेळाडू असतात.

T-20 सामन्यातील काही महत्वाचे नियम आणि अटी

  1. सर्वप्रथम दोन्ही संघाचे कर्णधार येऊन नाणेफेक करून आपली बाजू निवडतात. उदाहरणार्थ. A आणि B दोन संघ आहेत. दोन्ही संघांच्या कर्णधार यांच्या मध्ये नाणे फेक होऊन फलंदाजी आणि गोलंदाजी ठरवून घेतात. समजा यात A संघाने फलंदाजी घेतली. फक्त या स्पर्धेमध्ये धावसंख्या उभा करण्यासाठी फक्त २० षटक च प्रत्येक संघाला असतात.
  2. A या संघाने धावसंख्या देऊन B या संघासाठी लक्ष देतात.
  3. आता B हा संघ २० षटकांमध्ये त्या धावसंख्येचा पाठलाग करतो त्यातून ज्याची धावसंख्या जास्त तो संघ विजयी

T-20 क्रिकेट मधील सर्वात फेमस लीग

T-20 विश्वचषक (T-20 World Cup)- जसा एकदिवसीय सामन्यांमध्ये विश्वचषक खेळाला जातो तश्याच पद्दतीने २० षटकं चा सुद्धा विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जातो. या स्पर्धेमध्ये सुद्धा जगातील अनेक नावाजलेले संघ भाग घेतात.
भारताने २००७ मध्ये विश्वचषक महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारताला मिळवून दिला.

IPL (Indian Premier League) – IPL ही भारतामध्ये जगातील सगळ्यात मोठी आणि प्रसिद्ध २० षटकाची स्पर्धा खेळली जाते. IPL मध्ये भारतातील Mumbai Indians, Chennai superkings, Royal challengers Bengaluru, Dehli Capitals, lakhnow supergiants, Gujrat titans, Rajstan Royal’s, Sunrises Hyderabad, Kolkata Knight riders & Panjab Kings हे संघ आहेत. यामधील Mumbai Indians हा संघ सगळ्यात यशस्वी संघ मनाला जातो कारण या संघाने एकूण ५ वेळा IPL ही स्पर्धा जिंकली आहे.

कसोटी क्रिकेट चे नियम –

कसोटी सामना सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा खेळली जाते. फक्त या स्पर्धेमध्ये अमर्यादित शतकांची मालिका असते या मध्ये दोन आंतराष्ट्रीय संघ मध्ये हि मालिका खेळली जाते.

कसोटी क्रिकेट मधील सर्वात फेमस लीग

  • बॉर्डर गावस्कर ट्रॉफी

भारतीय संघाचे कर्णधार | Indian cricket team captain

  • भारतीय पुरुष संघाचे कर्णधार- रोहित शर्मा.
  • भारतीय महिला संघाची कर्णधार- हरमनप्रीत कौर

भारतीय संघामधील काही मह्त्वाचे खेळाडू | Cricket player information in Marathi

  • कपिल देव
  • सचिन तेंडुलकर
  • महेंद्र सिंग धोनी
  • विराट कोहली
  • रोहित शर्मा

निष्कर्ष | Conclusion

Cricket information in Marathi, cricket mahiti Marathi – क्रिकेट बद्दल जी माहिती (Cricket information in Marathi) दिली गेली आहे ती सर्व पुस्तकातून घेतली गेली आहे. तुम्हाला वरील क्रिकेट बद्दल संपूर्ण माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला वरील माहिती बद्दल काही अडचण असेल तर तर आम्हाला [email protected] यावरती मेल करा. आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये नक्की उत्तर देऊ.

क्रिकेट खेळाचा शोध कोण आणि कधी लावला ?

१७ व्या शतकामध्ये नार्मन काळात क्रिकेट चा शोध लागला.

क्रिकेट मैदानाची लांबी किती असते ?

क्रिकेट मैदानाची लांबी ६० यार्ड ते ७५ यार्ड पर्यंत असते.

Sharing Is Caring:

Professional content writer and SEO Expert

2 thoughts on “क्रिकेट खेळासंबंधी संपूर्ण माहिती |Cricket information in Marathi”

Leave a Comment