chanakya niti in Marathi adhyay 1 | चाणक्य नीती मराठी अध्याय १

5/5 - (2 votes)

अनुक्रमणिका

chanakya niti in Marathi adhyay 1 | अध्याय १

chanakya niti in Marathi – chanakya niti adhyay 1 चाणक्य नीती मराठी अध्याय १ – चाणक्य नीती मराठी अध्याय १ – या अध्याय मध्ये चाणक्य यांनी लिहिलेय अध्याय १ मधील असणारे सर्व श्लोक या पोस्ट मध्ये लिहिले गेले आहेत . खाली दिलेले सर्व पोस्ट प्रथम संकृत मध्ये लिहून त्यानंतर ते मराठी मध्ये त्याच भाषांतर केले गेले आहे. (chanakya niti in Marathi)

1)जगत्पालक विष्णूची प्रार्थना –

प्रणम्य शिरसा विष्णुं त्रैलोक्याधिपतिं प्रभुम् ।
नानाशास्त्रोदधृतं वक्ष्ये राजनीतिसमुच्चयम् ॥

भावार्थ – (पृथ्वी, स्वर्ग आणि नरक ह्या ) त्रैलोक्याच्या स्वामी असलेल्या भगवान विष्णूला मी नतमस्तक होऊन वंदन करीत आहे आणि अनेक पुरातन शास्त्रामध्ये राजनीतीबद्दल जी काही तत्वे सांगितली आहेत त्याचे स्पष्टीकरण ह्या पुढील श्लोकांमधून आहे.

खास नोंद –– चाणक्य म्हणतात कि चाणक्यनीती हा माझा खास ग्रंथ आहे म्हणजे तो राजकीय मुसद्दीपनावरील एक उत्तम भाष्य आहे.

2).श्रेष्ठ मानव कोण आहे ?

अधीत्येदं यथाशास्त्रं नरो जानाति सत्तमः ।
धर्मोपदेशविख्यातं कार्याकार्य शुभाशुभम् ॥

भावार्थ – शास्त्रातून घेतलेल्या ह्या तत्वामुळे मानवाला श्रेष्ठत्व मिळून जीवनात धर्मशात्रातील कुठले नियम पाळायचे ते समजते. कुठले कार्य करायचे आणि कुठले करायचे नाही, चांगले काय आणि वाईट काय, पाप काय आणि पुण्य काय, शुभ काय आणि अशुभ काय ते ह्या शास्त्राचा अभ्यास केल्यानेच त्याला समजते.

3)सर्वज्ञ कसे व्हावे ?

तदहं सम्प्रवक्ष्यमि लोकानां हितकाम्यया ।
येन विज्ञानमात्रेण सर्वज्ञत्वं प्रपद्यते ॥

भावार्थ – म्हणूनच लोकांचे हित मनात ठेवून मी हे ज्ञान समजावून सांगत आहे. हे ज्ञान नीट समजावून घेतले तर सर्व गोष्टीबद्दल योग्य समाज निर्माण होतील होतील आणि ते जाणणारा माणूस सर्वज्ञ होईल.

4) नेहमी योग्य ठिकाणी द्यावे

मुर्खशिष्योपदेशेन दुष्टस्त्रीभरणेन च ।
दुखितैःसम्प्रयोगेण पण्डितोप्यवसीदति ॥

मूर्ख शिष्याला उपदेश देणे, तसेच दुष्ट आणि व्यभिचारिणी स्त्री चे पालनपोषण करणे, कुठल्यातरी कर्णावरून दुखी झालेल्या व्यक्तीशी व्यवहार करणे असे विद्वान पंडिताला सुद्धा कष्ट भोगावे लागतात.

5)मृत्यूची पुढील कारणे संभवू शकतात.

दुष्टा भार्या शठं मित्रं भृत्यश्र्चोत्तरदायकः ।
ससर्पे च गृहे वासो मृत्युरेव न संशयः ॥

भावार्थ – दुष्ट स्वभावाची पत्नी, धूर्त आणि फसवा मित्र, उलट उत्तरे करणारा युद्धात नोकर आणि जिथे साप असण्याची शक्यता आहे अशा घरात निवास ह्या सर्व गोष्टी म्हणजे मृत्यू येण्यासारख्याच आहेत ह्यात काहीही शंका नाही

हे सुद्धा वाचा – Sant Namdev information in Marathi

6)संकटकाळी काय करावे —

आपदर्थे धनं रक्षेद् दारान् रक्षेध्दनैरपि ।
आत्मानं सततं रक्षेद् दारैरपि धनैरपि ॥

भावार्थ – संकटकाळापासून वाचवण्यासाठी धन साठवावे, स्त्रियांचे रक्षण करण्यासाठी वेळ आली तर तर धन वापरावेही. (परंतु) स्वतःचे रक्षण मात्र सात्यत्याने करणे भाग आहे. स्वतःच्या जीवावर बेतले तर स्त्रिया आणि धनाआधी स्वतःचे रक्षण करावे.

7)संकट कुणावरही येऊ शकते

आपदर्थे धनं रक्षेच्छ्द्रीमतां कुत आपदः ।
कदाचिच्चलिता लक्ष्मीः संचितोपि विनश्यति ॥

भावार्थ – श्रीमंतावर कुठे संकट कोसळते असा विचार न करता संकटकाळासाठी धन साठवावे. कारण श्रीमंतीनीही लक्ष्यात ठेवावे की लक्ष्मी ही चंचल असते. एवढेच न्हवे तर साठवलेले धनही नष्ट होऊ शकते.

8). कुठे राहणे टाळावे ?

यस्यिन् देशे सम्मानो न वृत्तिर्नच बान्धवा: ।
नच विद्यागमः कश्र्चित् तं देश परिवर्जयेत ॥

भावार्थ – ज्या देशात कसलाही आदर सम्मान मिळत नाही, उपजीविकेचे कुठलेही साधन मिळत नाही, जिथे आपले कुटुंबीय आणि भाऊबंद नसतात तसेच जिथे राहून कुठल्याही ज्ञानाची किंवा कौश्यल्याची प्राप्ती करता येत नाही अशा देशातून निघून जाणे हेच योग्य ठरेल

9). कुठे राहणे योग्य नाही-

धनिक: श्रोत्रियो राजा नदी वैद्यस्तु पत्र्चम: ।
पत्र्च यत्र न विद्यते न तत्र दिवसं वसेत् ॥

भावार्थ – ज्या ठिकाणी श्रीमंत लोक, वेदाभ्यास करणारे ब्राह्मण,राजा, नदी आणि वैद्य ह्या पाच गोष्टी उपस्थित नसतात अशा ठिकाणी अजिबात वस्ती करू नये कारण जीवन सुखी होण्यासाठी पाच गोष्टी असाव्यात लागतात.

10).पुढील ठिकाणी निवास वर्ज्य समजावा–

लोकयात्रा भयं लज्जा दाक्षिण्यं त्यागशीलता ।
पत्र्च यत्र न विद्यन्ते न कुर्यात् तत्र् संस्थितिम् ॥

भावार्थ – ज्या ठिकाणी उपजीविका करण्याची साधने विकसित नसतात, जिथे शिक्षा होईल ह्याचे भय नसते, लोकलज्या असा काही प्रकारच नसतो, लोक स्वतःच्या कार्यात कुशल नसतात, त्यांच्यात त्याग करण्यात प्रवुर्ती नसते अशा ठिकाणीही व्यक्तीने राहू नये.

11). वेळ आली की परीक्षा होते

जानीयात् प्रेषणे भृत्यान् बान्धवान् व्यसनागमे ।
मित्रं चा पत्तिकालेषु भार्या च विभवक्षये ॥

भावार्थ – काम करायला दिले की सेवक कसा आहे हे खरोखर समजते, संकट आले की भाऊबंद कसे आहेत हे समजते, कठीण काळ आला की मित्र कसा आहे हे समजते. म्हणजेच अशा परिस्थितीच ह्या सर्वांचे खरे रूप कळते.

12) आपला खरा बंधू कसा जाणावा –

आतुरे व्यसने प्राप्ते दुर्भिक्षे शत्रु-संकटे ।
राजव्दारे श्मशाने च यस्तिष्ठति स बान्धव: ॥

भावार्थ – आपण जेव्हा कोणत्याही रोगाने जर्जर होतो किंवा दुष्काळाच्या परिस्थितीला आपल्याला सामना द्यावा लागतो, आपल्यावर शत्रू हल्ला करतो किंवा इतर संकरीत येते तेव्हा जो माणूस आपली साथ सोडत नाहीत. अगदी राजदरबारात खटला जरी उभा राहिला तरी जो तुमच्या बाजूने उभा राहतो आणि स्मशानात जायची वेळ आली तरी तुमची साथ जो सोडत नाही तो तुमचा भाऊ असतो.

13) हातचे सोडून पळत्यामागे लागू नका —

यो ध्रुवाणि परित्यज्य अध्रुवं परिवेषते ।
ध्रुवाणि तस्य नश्यन्ति, अध्रुव नष्टमेव च ॥

भावार्थ– हातातील अनिश्चित गोष्ट सोडून जो अनिश्चित गोष्टीच्या मागे लागतो तेव्हा जी अनिश्चित गोष्ट असते ती तर जातेच परंतु हातातील निश्चित गोष्टही जाते. (हाताचे सोडून जो पळत्याच्या मागे लागतो त्याला काहीच मिळत नाही म्हणून अतीलोभ सोडावा असे चाणक्य म्हणतात)

14).समानकुलात विवाह का करावा ? —

वरयेत् कुलजां प्राज्ञो विरुपामपि कन्यकाम् ।
रुपवतीं न नीचस्य विवाह: सद्र्शे कुले ॥

भावार्थ– कुलीन कन्या कुरूप असली तरी तिच्याशी विवाह करावा, खालच्या कुळातील कन्या रूपवती असली तरी तिच्याशी विवाह करू नये. दोन सामान दर्जा असलेल्या कुळांमध्ये विवाह झाला तर ते योग्य ठरेल.

15) विश्वास ठेवताना जपून च विश्वास ठेवावा —

नखीनां च नदीनांच श्रृड्गीणां शस्त्रपाणिनाम् ।
विश्र्वासो नैव कर्तव्य: स्त्रीषु राजकुलेषु च ॥

भावार्थ– नखे असलेल्या प्राण्यावर, नद्यांवर, शिंगे असलेल्या पशूंवर आणि शत्र धारण करण्यावर विश्वास ठेवू नये तसेच स्त्रियांवर आणि राजकुळातील माणसांवर कधीही विश्वास ठेवू नये.

16). गुण असेल तर ते जरूर घ्यावे.

विषादप्यमृतं ग्राह्मममेध्यादपि कात्र्चनम् ।
नीचादप्युत्तमा विद्या स्त्रीरत्नं दुष्कुलादपि ॥

भावार्थ– विषयामध्ये अमृत सापडले तर त्याचा स्वीकार करावा, हातही लावता येणार नाही अशा पदार्थाना सोने सापडले तर तेही स्वीकारावे, खालच्या कुळात जन्मलेल्या माणसाकडे ज्ञान असेल तर ते स्वीकारावे त्याचप्रमाणे दुर्वर्तन कुळात जर उत्तम स्त्रीरत्न निर्माण झाले असेल तर त्या स्त्रीरूपी रत्नाचाही स्वीकार करावा.

17).स्त्री पुरुषांच्या वरचढ असते.

स्त्रीणां द्विगुण आहारो बुध्दिस्तासां चतुर्गुणा ।
साहसं षड़गुण चैव कामोष्टगुण उच्यते ॥

( पुरुषांच्या तुलनेत ) स्त्रियांचा आहार दुप्पट असतो, त्यांची बुद्धी पुरुषांच्या चौपट चालते, त्यांच्या अंगी पुरुषांच्या आहे पटीने धडाडी असते आणि स्त्रियांच्या कामभावना पुरुषांच्या आठपट असते.

chanakya niti in Marathi | chanakya niti marathi pdf

chanakya niti in Marathi, chanakya niti marathi pdf तुम्हाला जर कंप्लेंट हवी असेल रे इथे क्लिक करा.
आज आपण chanakya niti adhyay १ | चाणक्य नीती अध्याय १ वरती पोस्ट पहिली तुम्हाला संपूर्ण अध्याय बघायचा असेल तर खाली चाणक्य नीतीवषयी संपूर्ण अध्याय खाली क्लिक करून पहा.

chanakya niti in Marathi Adhyay 2 | चाणक्य नीती अध्याय 2
chanakya niti in Marathi Adhyay 3 | चाणक्य नीती अध्याय 3
chanakya niti in Marathi Adhyay 4 | चाणक्य नीती अध्याय 4
chanakya niti in Marathi Adhyay 5 | चाणक्य नीती अध्याय 5
chanakya niti in Marathi Adhyay 6 | चाणक्य नीती अध्याय 6
chanakya niti in Marathi Adhyay 7 | चाणक्य नीती अध्याय 7
chanakya niti in Marathi Adhyay 8 | चाणक्य नीती अध्याय 8
chanakya niti in Marathi Adhyay 9 | चाणक्य नीती अध्याय 9
chanakya niti in Marathi Adhyay 10 | चाणक्य नीती अध्याय 10

Conclusion | निष्कर्ष –

chanakya niti in Marathi, chankya niti marathi pdf वरील पोस्ट तुम्हाला कशी वाटली तर तुम्हाला नक्की खाली कंमेंट करून नक्की कळवा , आणि हि पोस्ट माझ्या अभ्यासातून आणि पुस्तक वाचनातून लिहिलेली आहे तरी तुम्हाला काही copyright बद्दल काही अडचण असेल आम्हाला [email protected] या वर मेल करा आम्ही तुम्हला लवकरात लवकर उत्तर देऊ. धन्यवाद !

Sharing Is Caring:

Professional content writer and SEO Expert

1 thought on “chanakya niti in Marathi adhyay 1 | चाणक्य नीती मराठी अध्याय १”

Leave a Comment