Akbar Birbal Story In Marathi 2023 | अकबर बिरबल गोष्टी

5/5 - (2 votes)

Akbar Birbal Story In Marathi – आज आपण या ब्लॉग पोस्ट Akbar Birbal Story In Marathi,Birbal Story In Marathi,Akbar And Birbal Story In Marathi मध्ये गोष्टी याबद्दल माहिती देणार आहोत. ह्या गोष्टी सर्व मुलांसाठी आहेत त्यांना या गोष्टीतून चांगला बोध मिळू शकतो.

अकबर बिरबल कथा मराठीत | Akbar Birbal Story In Marathi

खाली तुम्हाला Akbar Birbal Story In Marathi, Birbal Story In Marathi, Akbar And Birbal Story In Marathi उत्तम आणि मनोरंजक गोष्टी आहेत. एकदा तुम्ही वाचा तुम्हाला नक्की गोष्टी आवडतील.


शीर्षक – !!बिरबल आणि तीन बाहुल्या.!!

एकदा एक कलाकार तीन सुंदर बाहुल्या घेऊन सम्राट अकबराच्या दरबारात आला. या बाहुल्या अगदी एकसारख्या होत्या. त्या एवढ्या समान होत्या की त्यांच्यात फरक करणे खूप अवघड होते. अकबराला त्या बाहुल्या खूप आवडल्या. तो म्हणाला, ह्या बाहुल्या मला विक मी तुला चांगले पैसे देईन याचे. कलाकार म्हणाला, “जहांपनाह! या बाहुल्या विक्रीसाठी नाहीत. अर्थातच मी तुम्हाला भेट म्हणून देवू शकतो पण यापैकी कोणती बाहुली सुंदर आहे हे सांगितल्यास मी तुम्हाला देईन. ते एक विचित्र कोडे होते.अकबराने त्या बाहुल्या उचलून बारकाईने पाहिल्या. तिन्ही बाहुल्या एवढ्या सारख्या होत्या की अकबरला सुंदर कोणती ते सांगता येत नव्हते.
मग त्यांनी कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अयशस्वी झाले.अकबराने बिरबलाला बोलावून घेतले आणि म्हणाला, “हे बिरबल, तू प्रयत्न करून मला हे कोडे सोडवण्यास मदत करशील असा विश्वास आहे.
बिरबल अकबराच्या समोर नतमस्तक होऊन बाहुलीकडे जातो. त्याने प्रत्येक बाहुली हातात घेतली आणि अतिशय काळजीपूर्वक
त्यांना पाहिले. त्याने पहिल्या बाहुलीच्या कानात फुंकर मारली. हवा तिच्या दुसऱ्या कानातून बाहेर आली. मग त्याने दुसऱ्या बाहुलीच्या कानात फुंकर मारली, यावेळी हवा तिच्या तोंडातून निघली. जेव्हा बिरबलाने तिसऱ्या बाहुलीच्या कानात फुंकर मारली.तेव्हा हवा कुठूनही निघाली नाही.
बिरबल म्हणाला, ” हीच तिसरी बाहुली तिघांमध्ये सर्वोत्कृष्ट आहे.” अकबरला धक्काच बसला. तो म्हणाला, तुला हे कसं कळलं?
बिरबल म्हणाला, “महाराज!
मी पहिल्या बाहुलीच्या कानात फुंकर मारली तेव्हा ती दुसऱ्या कानातून बाहेर आली. जसे आपण
दुसऱ्याला सांगितल्यावर पुढच्याच क्षणी तो विसरतो. मी दुसऱ्या बाहुलीच्या कानात फुंकर मारली तेव्हा तिच्या तोंडातून हवा बाहेर पडली. ह्या पद्धतीने काही लोक आपले रहस्य ऐकून लगेच इतरांना सांगतात. कधीही ते लपवू शकत नाही. तिसर्‍या बाहुलीच्या कानात फुंकर मारली तेव्हा हवा कोठूनही बाहेर आली नाही. असे लोक सत्य लपवून ठेवतात. आपण कोणत्याही गोष्टीबद्दल त्यांना सांगू शकता. कलाकार म्हणाला, मी आजवर फक्त बिरबलच्या हुशारी चे कौतुंक ऐकलं होतं, आज मी नजरेने पाहिले देखील. जहाँपनाह, ही घ्या तुमची बाहुली. अकबर म्हणाला की, मला बिरबलाचा खूप अभिमान आहे.

बोध -“बिरबलची हुशारी


शीर्षक – !! हरिदास भक्ती!!

सम्राट अकबराला अनेक कलांची आवड होती, पण त्याला संगीताची खूप आवड होती. त्यांच्या दरबारातील एक गायक तानसेन हा होता, जो त्यांच्या संगीतामुळे सगळ्यांना ज्ञात होता.
एकदा अकबर तानसेनच्या संगीता ऐकून खूप खुश झाले आणि बादशाह अकबर तानसेनला म्हणाले, “तुम्हीगायकीचे सर्वोत्कृष्ट कलाकार आहात. तुमचे संगीत सगळ्यात खूप छान आहे.त्याची तुलना होऊ शकत नाही. तानसेनने आभारा मानले . तो कौतुक ऐकून दंग होता. तानसेन म्हणाले, “हे फक्त तुमचे मत आहे. गायकीमध्ये माझ्यापेक्षा सर्वोत्कृष्ट कलाकार आहेत. अकबर म्हणाला, तानसेन मी खूप संगीतकारांना ऐकल आहे, तुम्हाच संगीत त्यात सर्वोत्तम आहे. तानसेन म्हणाले, ‘‘माझे गुरुजी! तुम्ही त्यांच संगीत ऐका ते माझ्यापेक्षा चांगला गातात.”

अकबर अतिशय उत्सुकतेने म्हणाले, “असे असेल तर तुमच्या गुरूंचे संगीत ऐकलेच पाहिजे. मी ऐकेन तुम्ही त्यांना माझ्यासाठी संगीत गाण्याची विनंती करावी. तानसेन म्हणाले, “महाराज! स्वामी हरिदास कधी दरबारात येत नाहीत आणि ते त्यांच्या घरीच गातात. पण जर तुम्ही माझ्यासोबत त्याच्या घरी गेलात तर तुम्ही त्याचे संगीत ऐकू शकता.
“अकबर, बिरबल तानसेनसोबत गुरू हरीदासच्या घरी जातात.अकबर, हरीदासच्या घरी काही दिवस राहतात पण ते काही गात नाहीत.अकबर अधीर होत असतात. ते तानसेनला बोलावून विचारतात “गुरू हरीदास कधी गाणार?
त्यांचे संगीत न ऐकता मला राजवाड्यात परत जावे लागेल असे दिसते.” तानसेन म्हणाला- महाराज… गुरूजी तेव्हाच गातात जेव्हा त्यांना योग्य वेळ वाटते आपण धीर धरला पाहिजे.”मग एके दिवशी सकाळी अकबरला एका अतिशय शांत मधुर अश्या आवाजाने जाग येते.गुरू हरीदासगाणे गात होते. त्यांचा आवाज इतका सुमधुर आणि गोड होता की अकबर पूर्णपणे मंत्रमुग्ध झाले.अकबर तानसेनला म्हणाला, “तुम्ही बरोबर होता, तुमच्यापेक्षा त्यांचा संगीत खूप छान आहे.

अकबराने आता राजवाड्यात परतण्याचा निर्णय घेतला. अकबर बिरबलाला म्हणाले,
“बिरबल,” तानसेनचे संगीत त्याच्या इतके चांगले का नाही?
बिरबल म्हणाला, “जहानपनाह! तानसेन तुम्हाल प्रसन्न करण्यासाठी गातो आणि गुरू हरीदास देवाला प्रसन्न करण्यासाठी गातात.

बोध -“परमेश्वराची भक्ती हीच श्रेष्ठ भक्ती”

हे सुद्धा वाचा१ ते १०० अंक मराठी मध्ये


शीर्षक !!स्वर्गाची सफर!!

जेव्हापासून बिरबल बादशाह अकबराच्या दरबारात आला, तेव्हापासून अकबराच्या दरबारात काही मंत्री आनंदी नव्हते. अकबराने बिरबलाची अधिक काळजी घ्यायला सुरुवात केली होती. या प्रकरणामुळे बिरबल त्यांना आवडत नसे. ते त्याचा तिरस्कार करायला लागले. दरबारातील शाही न्हावीच्या मदतीने त्यांनी एक योजना तयार केली. न्हावी गरीब होता त्याला या दुष्ट योजनेत सहभागी व्हायचे नव्हते. परंतु त्यांनी दिलेल्या सोन्याच्या नाण्यांमुळे तो त्यांचा प्रतिकार करू शकला नाही.म्हणूनच त्याने मदत करण्याचे मान्य केले

. एके दिवशी तो अकबराच्या केस कापत होता. तर तो म्हणाला, जहांपणा! काल रात्री मला स्वप्न पडले. तुमचे पिता माझ्या स्वप्नात आले होते आणि मी आरामात आहे. तू काळजी करू नकोस असे सांगितले आहे. हे ऐकून अकबर दु:खी झाला. जेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते तेव्हा ते खूप लहान होते त्याला वडिलांची खूप आठवण यायची. तो म्हणाला, “ते अजून काय म्हणाले? मला सगळं सांग.” न्हाव्याने म्हटले, “ते म्हणाले की ते ठीक आहेत, पण त्यांना थोडा कंटाळा आला आहे. ते म्हणाले जर तुम्ही बिरबलला तिथे पाठवले तर तो त्यांना खूप आनंद देईल. ते बिरबलाची खूप प्रशंसा करत होते.

अकबर बिरबलाला म्हणाला, “हे बिरबल! मी तुझ्यावर खूप खुश आहे. मला तुला वडिलांच्या जवळ पाठवताना खूप वाईट वाटत आहे, ते माझ्यावर खूश नाही, पण मला माहित आहे तू तिथे जावून त्यांचं मनोरंजन करचील.” हे ऐकून बिरबल चकित झाला. नंतर त्याला कळले की ही सगळी योजना मंत्री आणि न्हावी यांची होती. त्याने त्याच्या घराच्या बाहेर एक खड्डा खोदला. जो खड्डा खणला होता, तो त्याच्या खोलीमध्ये जायचा. मग तो अकबराकडे गेला आणि म्हणाला, “मी जायला तयार आहे.” आमच्यात अशी परंपरा आहे की घराबाहेरच दफन केले जाते. मी आधीच खड्डा खणून ठेवला आहे. मी विनंती करतो की मला तिथे दफन केले जावे.” अकबरन ने बिरबल ला जिवंत दफन केलं. बिरबल बोगद्यातून आपल्या घरी आला. तीन आठवड्यांनंतर तो अकबराच्या दरबारात गेला. प्रत्येकजण बिरबलाला पाहून आश्चर्यचकित झाले. अकबर म्हणाला, “तु स्वर्गातून कधी परत आलास? माझे वडील कसे आहेत? आणि तू एवढा म्हाताऱ्या माणसासारखा का दिसतोय ?” बिरबल म्हणाला, “महाराज, तुमचे वडील ठीक आहेत. त्यांनी तुम्हाला शुभेच्छा पाठवल्या आहेत. स्वर्गात एकपण न्हावी नाही. त्यामुळे मी फारच कुरूप दिसत आहे जर तुमची आज्ञा असेल तर आपण ह्या शाही न्हाव्याला स्वर्गात पाठवू.

राजाने ताबडतोब न्हाव्याला दफन करण्याचे आदेश दिले. न्हावी अकबरच्या पाया पडला आणि माफी मागू लागला. यानंतर त्याने सर्व काही सांगितले. अकबराने ही योजना बनवणाऱ्या सर्व मंत्र्यांना पदावरून पायउतार केले आणि न्हाव्याला दहा कोडे मारण्याची शिक्षा दिली.

अकबर बिरबलाला म्हणाला, “हे बिरबल! मी तुझ्यावर खूप खुश आहे.
मला तुला वडिलांच्या जवळ पाठवताना खूप वाईट वाटत आहे, ते माझ्यावर खूश नाही, पण मला माहित आहे
तू तिथे जावून त्यांचं मनोरंजन करचील.”
हे ऐकून बिरबल चकित झाला. नंतर त्याला कळले की ही सगळी योजना मंत्री आणि न्हावी यांची होती. त्याने त्याच्या घराच्या बाहेर एक खड्डा खोदला. जो खड्डा खणला होता, तो त्याच्या खोलीमध्ये जायचा. मग तो अकबराकडे गेला आणि
म्हणाला, “मी जायला तयार आहे.” आमच्यात अशी परंपरा आहे की
घराबाहेरच दफन केले जाते. मी आधीच खड्डा खणून ठेवला आहे
मी विनंती करतो की मला तिथे दफन केले जावे.”
अकबरन ने बिरबल ला जिवंत दफन केलं. बिरबल
बोगद्यातून आपल्या घरी आला. तीन आठवड्यांनंतर तो अकबराच्या दरबारात गेला. प्रत्येकजण
बिरबलाला पाहून आश्चर्यचकित झाले. अकबर म्हणाला, “तु स्वर्गातून कधी परत आलास? माझे
वडील कसे आहेत? आणि तू एवढा म्हाताऱ्या माणसासारखा का दिसतोय ?”
बिरबल म्हणाला, “महाराज, तुमचे वडील ठीक आहेत. त्यांनी तुम्हाला शुभेच्छा
पाठवल्या आहेत. स्वर्गात एकपण न्हावी नाही. त्यामुळे मी फारच कुरूप दिसत आहे
जर तुमची आज्ञा असेल तर आपण ह्या शाही न्हाव्याला स्वर्गात पाठवू.

राजाने ताबडतोब न्हाव्याला दफन करण्याचे आदेश दिले. न्हावी अकबरच्या पाया पडला आणि माफी मागू लागला. यानंतर त्याने सर्व काही सांगितले.
अकबराने ही योजना बनवणाऱ्या सर्व मंत्र्यांना पदावरून पायउतार केले आणि न्हाव्याला दहा कोडे मारण्याची शिक्षा दिली

बोध -“कर्मांचे फळ”


निष्कर्ष | Conclusion

Akbar Birbal Story In Marathi,Birbal Story In Marathi,Akbar And Birbal Story In Marathi वरील गोष्टी तुम्ही लहान मुलांना झोपताना ,मनोरंजन बोध देण्यासाठी साठी ऐकू शकता. वरील Akbar Birbal Story In Marathi,Birbal Story In Marathi,Akbar And Birbal Story In Marathi गोष्टी आम्ही सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिले आहेत. वरील सर्व माहिती मी थोडी इंटरनेट द्वारे आणि थोडी पुस्तकांमधून घेतले आहे. त्यामुळे काही copywright ची काही अडचण असले तर तुम्ही [email protected] या ईमेल तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 तासांमध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

3 thoughts on “Akbar Birbal Story In Marathi 2023 | अकबर बिरबल गोष्टी”

Leave a Comment