लिंगविचार व त्याचे प्रकार | Lingvichar in Marathi Updated 2023

Rate this post

Lingvichar in Marathi-लिंगविचारम्हणजे काय ? (Lingvichar in Marathi)त्याचा वापर आणि उदाहरण या संबंधी संपूर्ण माहिती या ब्लॉगपोस्ट मध्ये मिळवा. अशा विषयावर मराठी मध्ये संपूर्ण माहिती येथे मिळणार आहे. तरी खाली दिलेली माहिती(Lingvichar in Marathi) कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.

नामे वाक्यात वापरताना त्यांच्या रूपांत कधी कधी बदल होतो.
जसे –
(१) मुलगा पुस्तक वाचतो.
(२) मुलांना खाऊ आवडतो.
(३) मुलगी गाणे गाते.
(४) मुलगे खेळ खेळतात

वरील वाक्यांत ‘मुलगा’ या शब्दाची ‘मुलगी, मुलगे, मुलांना’ अशी रूपे झालेली आहेत. नामांच्या रूपांत हा जो बदल होतो किंवा विकार होतो त्यास ‘विकरण’ असे म्हणतात. हा बदल केव्हा व कसा होतो ते आपण पाहू. ‘मुलगा’ याचे ‘मुलगी’ असे जे रूप बदलले ते त्याचे ‘लिंग’ बदलल्यामुळे, ‘मुलगे’ असे जे रूप झाले ते वचन बदलल्यामुळे, व ‘मुलांना’ असे जे रूप झाले ते विभक्ती बदलल्यामुळे. लिंग, वचन व विभक्ती यांमुळे नामाच्या रूपांत बदल होतो. त्याला नामांचे विकरण असे म्हणतात.
याना आपण क्रमाने पाहू.


लिंग (Lingvichar in Marathi)

नाम म्हणजे प्रत्यक्ष, काल्पनिक कोणत्याही वस्तूला दिलेले नाव होय. वस्तूंमध्ये आपण दोन भाग करतो.
(१) सजीव

(२) निर्जीव

सजीवांमध्ये
(१) मनुष्यप्राणी
(२) मनुष्येतर (पशू, पक्षी, कृमी, कीटक वगैरे)


मनुष्यप्राण्यांत काही पुरुष असतात, तर काही स्त्रिया असतात. इतर प्राण्यांमध्ये हा फरक आपण ‘नर’ व ‘मादी’ अशा शब्दांनी करतो. प्राणिमात्रांत पुरुष स्त्री, नर-मादी असा भेद आपण करतो तो त्यांच्या लिंगांवरून.लिंग याचा अर्थ ‘खूण’ अथवा ‘चिन्ह’ असा असतो.. प्राणिवाचक नामांतील पुरुष किंवा नरजातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुरुषलिंगी, पुंलिंगी किंवा पुल्लिंगी असे म्हणतात. जसे- चुलता, शिक्षक, घोडा, चिमणा, मुंगळा इत्यादी. स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना स्त्रीलिंगी असे म्हणतात. जसे– चुलती, शिक्षिका, घोडी, चिमणी, मुंगी इत्यादी. निर्जीव वस्तुवाचक शब्दांवरून पुरुष किंवा स्त्री यांपैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही. जसे– पुस्तक, दगड, शहर, शाई, कागद वगैरे. अशा शब्दांना खरेतर नपुंसकलिंगी असे म्हणावयास पाहिजे. मराठी भाषेच्या व्यवहारात प्रत्यक्ष असे काही होत नाही. यातील ‘दगड, कागद’ हे पुल्लिंगी, ‘दौत, शाई’ हे शब्द आपण स्त्रीलिंगी मानतो. प्राणिमात्रांचे लिंग हे वास्तविक असतात, तर निर्जीव वस्तूंचे लिंग ‘काल्पनिक’ असते.(Lingvichar in Marathi)

नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे की स्त्रीजातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात.(Lingvichar in Marathi)

मराठीत तीन लिंगे मानतात :-

(१) पुल्लिंग,

(२) स्त्रीलिंग व

(३) नपुंसकलिंग.


काही निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून आपण कधी-कधी बोलतो. जसे-

(१) सूर्य ढगाआड लपला.
(२) सागर एकदम खवळला.
(३) वनश्री हसू लागली.
(४) झरे नृत्य करीत होते.

अशा वाक्यांत निर्जीव वस्तूंवरही काल्पनिक पुरुषत्व किंवा स्त्रीत्व लादून आपण बोलत असतो. कधी-कधी आकार, शक्ती, कठोरपणा, राकटपणा, यांसारखे पुरुषप्राण्यांचे सर्वसामान्य गुणधर्म ज्या वस्तूंत आपणांस आढळतात, त्यांना आपण पुल्लिंगी मानतो. लहान आकार, कोमलपणा, देखणेपणा, सौम्यपणा, चांचल्य यांसारखे स्त्रीप्राण्यांत आढळून येणारे सामान्य गुणधर्म ज्या वस्तूंत आढळतात, त्यांना स्त्रीलिंगी मानतो. उदा. लोटा हे पुल्लिंगी आहे, तर लोटी हे स्त्रीलिंगी आहे ; वारा पुल्लिंगी आहे, तर झुळूक हे स्त्रीलिंगी आहे : वृक्ष पुल्लिंगी आहे, तर वेल हे स्त्रीलिंगी आहे . सूर्य, सागर, मृत्यू हे पुल्लिंगी तर वनश्री, वीज हे शब्द आपण स्त्रीलिंगी मानतो. पण हा नियम संपूर्णपणे पाळला जात नाही. त्याला पुष्कळ अपवाद आढळतात. दोरा हा दोरीपेक्षा आकाराने लहान असूनही तो पुल्लिंगी, तर दोरी स्त्रीलिंगी. ओढा हा नदीपेक्षा लहान असूनही तो पुल्लिंगी व नदी स्त्रीलिंगी.

मराठी मध्ये एकाच अर्थाचे शब्द हे ३ वेगळ्या लिंगांत आढळतात. जसे कि –
(१) रुमाल (पु.), पगडी (स्त्री.), तर पागोटे (नपुं.) (२) ग्रंथ (पु.). पोथी (स्त्री.) तर पुस्तक (नपुं.) (३) देह (पु.), काया (स्त्री.), तर शरीर (नपुं.).
हे सुद्धा वाचा – समास म्हणजे काय ? आणि त्याचे प्रकार
संस्कृत आणि इंग्रजी यांसारख्या भाषां मधून घेतले गेलेल्या काही शब्दांचे लिंग बदललेले दिसतात जसे कि –

शब्दसंस्कृतमराठी
स्वप्नपु.नपुं.
खड्गपु.नपुं.
मित्रनपुं.पु.
अश्रूनपुं.पु.
शब्दइंग्रजीमराठी
नदीपु.स्त्री.
देशस्त्री.पु.
चंद्रस्त्री.पु.
निसर्गस्त्री.पु.

मराठीतील लिंगव्यवस्था ही अत्यंत अनियमित व धरसोडीची आहे. त्याप्रमाणे काही विशिष्ट तत्त्व असे दिसत नाही. एखादा नियम सांगावा तर त्याला अपवादच जास्त.
मग मराठीतील लिंग ओळखण्याची पद्धत कोणती? प्राणिमात्रांतील पुरुष किंवा नर यांचा उल्लेख आपण ‘तो’ या शब्दाने करतो व स्त्री किंवा मादी यांचा उल्लेख आपण ‘ती’ या शब्दाने करतो. जसे- तो बाप,ती आई, तो घोडा, ती घोडी, तो पोपट, ती मैना इत्यादी.प्राण्यामध्ये एखादा नार किंवा मादी आहे हे, बरोबर सांगता येत नसेल, तर त्याला नपुंसकलिंगी समजून तेचा उल्लेख ‘ते’ या शब्दाने केला जातो. जसे- ते कुत्रे, ते वासरू, ते पाखरू. (Lingvichar in Marathi)

हे सुद्धा वाचा –नाम म्हणजे काय ? आणि त्याचे प्रकार

निर्जीव वस्तूंच्या बाबतींत काही वेळेस काल्पनिक पुरुषत्व व स्त्रीत्व लादून त्या वस्तूच्या मागे तो-ती-ते हे शब्द वापरून आपण लिंग ठरवतो. उदा.

पुल्लिंगस्त्रीलिंगनपुंसकलिंग
तो वाडाती इमारतते घर
तो भातती भाकरीते वरण
तो टाकती लेखणीते पेन
तो दिवाती पणतीते तेज
हे सुद्धा पहा- मराठी व्याकरण (Lingvichar in Marathi)

वरील पद्धत मराठी भाषा जाणणाऱ्यांना ठीक आहे; पण अ-मराठी भाषकांना मराठी शब्दांचे लिंग ओळखणे कठीण जाते. अमक्या शब्दामागे ‘तो’ का लावायचा? ‘ती’ का नाही? याचे उत्तर कठीण आहे. पुल्लिंगी शब्दाच्या मागे ‘तो’ लावायचा व ‘तो’ लागतो म्हणून त्या शब्दाला पुल्लिंगी म्हणावयाचे हा मोठा विचित्र प्रकार आहे. मराठीत असे शब्द पुल्लिंगी का व असे शब्द स्त्रीलिंगी का, हे सांगणे अवघड आहे. केवळ रूढी किंवा परंपरा हेच त्याचे उत्तर.मराठी भाषा हीबोलण्यात व ऐकण्यात वारंवार उपयोग करून त्यामधील लिंगव्यवस्था जाणून घेता येते.


लिंगभेदामुळे नामांच्या रूपांत होणारा


(१) ‘आकारान्त’ पुल्लिंगी प्राणिवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप ‘ईकारान्त’ होते व त्याचे नपुंसकलिंगी
रूप ‘एकारान्त’ होते. उदा.

पु.स्त्री.नपुं.
मुलगामुलगीमुलगे
पोरगापोरगीपोरगे
पु.स्त्री.नपुं.
कुत्राकुत्रीकुत्रे
घोडाघोडीघोडे

(२) प्राणिवाचक पुल्लिंगी शब्दांस ‘ईण’ प्रत्यय लावून त्याची स्त्रीलिंगी रूपे होत.
उदा-
सुतार- सुतारीण
माळी-माळीण
वाघ- वाघीण
कुंभार-कुंभारीण
पाटील-पाटलीण
तेली-तेलीण

(३) काही प्राणिवाचक ‘अकारान्त’ पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे ‘ईकारान्त‘ होतात.
काही प्राणिवाचक ‘आकारान्त’ पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ‘ई’ प्रत्यय लागून त्यांची लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी

हंस-हंसी
वानर-वानरी
गोप-गोपी
दास-दासी
बेडूक-बेडकी

(४) काही ‘आकारान्त’ पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ‘ई’ प्रत्यय लागून त्यांची लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी रूपे बनतात. उदा.
लोटा-लोटी
खडा- खडी
गाडा -गाडी

(५) संस्कृत मधून मराठी मध्ये आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूपात ई असा प्रत्यय लावून होतात.
राजा-राज्ञी
श्रीमान -श्रीमती
भगवान -भगवती
युवा -युवती
विद्वान -विदुषी
ग्रंथकर्ता – ग्रंथकर्ती

(६) काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र रीतीने होतात. जसे
बाप-आई
वर-वधू
राजा- राणी
पती-पत्नी
भाऊ-बहीण

निष्कर्ष | conclusion


Lingvichar in Marathi – लिंग विषयी दिलेली संपूर्ण माहिती वर दिली गेली आहे. (Lingvichar in Marathi)वर दिली गेलेली माहीती ही पुस्तकातून घेतली आहे. तरी दिल्या गेलेल्या माहीती मध्ये काही अडचण असल्यास आम्हाला कंमेंट मध्ये कळवा अथवा तुम्ही आम्हाला या [email protected] करून आम्हाला मेल करू शकता आम्ही तुम्हाला २४ तासा मध्ये नक्की उत्तर देऊ.(Lingvichar in Marathi)





Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

Leave a Comment