Rajmata Jijau Bhashan नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या ब्लॉग मध्ये राजमाता जिजाऊ यांच्या बदल थोडक्यात माहिती देणार आहोत.तुम्ही ही माहिती Rajmata Jijau Bhashan ह्यासाठी वापरू शकता.
परिचय –
आदरणीस प्राचार्य , शिक्षक व सन्माननीय मान्यवर प्रमुख अतिथी व येथे जमलेल्या माझ्या मित्रांनो आज “राजमाता जिजाऊ जयंती” ह्या निमित्ताने आज मी राजमाता जिजाऊ यांच्यावर भाषण देणार आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी दाखवलं. राज्य हे नुसतेच शब्दावरती घडत नाही तर त्याला कणखरमनगटाची व कृतीची आवश्यकता असते. हे ज्यांनी आपल्या अमोघ वाणीतून छत्रपतींना सूचित केले त्या म्हणजे आपले राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ.
महाराष्ट्रावर एका बाजूने मोगल व दुसऱ्या बाजूने दक्षिणेकडील राजे यांच्या एकसारख्या स्वाऱ्या होऊन मराठ्यांची जी दैना होत होती, ती पाहून जिजाबाईचे मनखिन्न होत असे. राजमाता जिजाऊ यांनी देवी शिवाईला विनविले, ‘मला असा पुत्र दे की, तो ही परचक्रे निवारून मराठ्यांचे स्वतंत्र राज्य महाराष्ट्रात स्थापन करील देवीने त्यांच्या हाकेस ओ दिली. त्यांना जो मुलगा झाला, त्यांचे नाव त्यांनी ‘शिवाजी’ असे ठेवले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पालन पोषण मोठ्या लाडाने व संस्काराने जिजाऊंनी केले. शिवरायांची जडण-घडण करताना राष्ट्रमाता जिजाऊंनी गुरुस्थानी राहून शिवरायांना युद्धकला, गनिमी कावा यांचे सखोल ज्ञान दिले व यातून शिवरायांची जडण-घडण झाली. आपल्या मुलाने ‘स्वराज्य’ निर्माण करावे उपेक्षित वंचितांना न्याय द्यावा मराठ्यांचा छत्रपती व्हावा ही जिजाऊंची इच्छा होती.
राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती यांना सांगितलं की “शिवबा स्वराज्य निर्माण करायचं असेल तर सर्व मावळ्यांना एका छताखाली आणलं पाहिजे तरच स्वराज्याची निर्मिती होऊ शकते.” हे विचार शिवरायांना राजमाता जिजाऊंनी दिले..
- हे सुद्धा वाचा – लोकमान्य टिळक भाषण मराठी मध्ये
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची प्रेरणा आपल्या मातेकडूनच घेतली. मराठ्यांच्या स्वतंत्र राज्याचे चित्र त्याच्यापुढे राजमाता जिजाऊ यांनी उभे केले. या महत् कार्यासाठी आवश्यक असलेली चिकाटी, सहनशीलता, न्यायनिष्ठुरता इत्यादी गुणांची जोपासनाही त्यांनी केला . शिवाजीत सैतानाचा जुलमीपणा न येता, तो प्रजाहितदक्ष व गरिबांचा कनवाळू राजा व्हावा यासाठी त्यांनी आपल्या सर्व शक्ती वेचल्या. पुण्याच्या जहागिरीची व्यवस्था पाहतापाहताच, छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यकारभाराचे शिक्षण जिजाबाईंकडून घेतले.
प्रतापगडावर छत्रपती शिवाजीन महाराज यांनी अफजलखानाचा वध केला, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवाला केवढा धोका होता, याची जिजाबाईंना कल्पना होती. म्हणून सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडेपर्यंत राजमाता जिजाऊ एकसारखी देवीची प्रार्थना करीत बसलेल्या होत्या . छत्रपती शिवाजी यशस्वी झालेला ऐकताच त्यांना अतिशय आनंद झाला.
अफजलखानाचा वध करून छत्रपती शिवाजीमहाराजांनी जो पराक्रम केला, त्या पराक्रमाचे व विजयाचे वर्णन खेड्यापाड्यांपर्यंत पोचावे, यासाठी जिजाबाईंनी अज्ञानदास कवीकडून या प्रसंगावर पोवाडा रचवून घेतला. तो पोवाडा शाहिरांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविला. स्वराज्यसंस्थापनेच्या कामी प्रचारतंत्राचे महत्त्व आहे, हे ओळखून पोवाडा तयार करवून घेण्यात त्यांनी दाखविलेली समयसूचकता कौतुकास्पद आहे.
छत्रपती शिवरायांचा विवाह १६ मे १६४० रोजी साईबाईंशी लावून दिले. महाराणी साई यांनी शंभूराजे यांना जन्म दिला. महाराणी साई यांचे निधन लवकर झाले. राजमाता जिजाऊ यांनी शंभू राजे यांची भरपूर काळजी घेतली त्यांना कधी आईची कमी वाटू दिले नाही.
ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज संकटात येतात त्यावेळी त्यांना अचूक मार्गदर्शन करणाऱ्या जिजाऊ इतिहासात पाहाव मिळतात. रयतेचा राजा झाला पाहिजे त्यासाठी राज्यभिषेकाला शिवरायांना प्रेरणा दिली आणि शेतकऱ्यांचा कल्याणकारी राजा शिवराय सर्वसामान्यांच्या समोर उभे राहिले. शहाजी महाराज कर्नाटकच्या मोहिमेस गेले असताना २३ जानेवारी १६६४ रोजी निधन झाले.
त्यांच्या मृत्युनंतर राष्ट्रमाता जिजाऊ शहाजी राजांच्या स्वप्नातील ‘स्वराज्य निर्मितीचे’ स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले.अशा या आदर्श मातेचा मृत्यू १७ जून १६७४ रोजी झाला. ३५१ वर्षानंतरही एक आदर्श माता म्हणून सर्वसामान्यांच्या मुखामध्ये सन्मानाने आदराने, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव घेतले जाते.
- हे सुद्धा वाचा – निरोप समारंभ कार्यक्रमासाठी भाषण.
Conclusion
आम्ही दिलेली ब्लॉग ची माहिती तुम्ही खालील विषय साठी वापरू शकता
- Rajmata Jijau Bhashan.
- Jijau Jayanti Speech In Marathi.
- Jijamata Bhashan.
- Jijamata Speech In Marathi.
- Jijau Bhashan
- Rajmata Jijau Bhashan Marathi.
Rajmata Jijau Bhashan अन्य लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकावरून घेतली गेली आहे. वरील ब्लॉग मधील माहिती फक्त भाषण आणि शिक्षण उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिल्या गेलेल्या माहिती बद्दल काही अडचण असे आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून शकता आम्ही तुम्हाला 24 तासामध्ये उत्तर देऊ.
राजमाता जिजाऊ यांची जयंती कधी असते ?
राजमाता जिजाऊ यांची जयंती १२ जून ला असते.
2 thoughts on “राजमाता जिजाऊ भाषण २०२३ | Rajmata Jijau Bhashan”