Visheshan in Marathi – विशेषण म्हणजे काय ? त्याचा वापर आणि उदाहरण या संबंधी संपूर्ण माहिती या ब्लॉगपोस्ट मध्ये मिळवा. अशा विषयावर मराठी मध्ये संपूर्ण माहिती येथे मिळणार आहे. तरी खाली दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.
अनुक्रमणिका
विशेषण म्हणजे काय ? | Visheshan in Marathi
विशेषण (Visheshan in Marathi) – नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. सोप्या शब्दामध्ये सांगायचं तर नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.
वरील उदाहरणामध्ये ‘चांगली, काळा, हिरवे, पाच, त्याची, खूप‘ हे शब्द त्यांच्यापुढे येणाऱ्या नामाविषयी अधिक माहिती देतात. त्यामुळे अश्या शब्दांना विशेषण असे म्हणतात.
स्पष्टीकरण- वरील उदाहरणामध्ये “टोपी” हे नाम आहे. आणि ‘पाच’ हि संख्या आहे. आणि टोप्या विषयी पाच संख्या ही अधिक माहिती देते.
विशेषण | विशेष्य | विशेषण | विशेष्य |
चांगली | मुले | पाच | टोप्या |
काळा | कुत्रा | त्याची | पिशवी |
हिरवे | रान | खूप | लोक |
- हे सुद्धा वाचा – सर्वनाम म्हणजे काय ? आणि त्याचे प्रकार
विशेषणांचे प्रकार | visheshan che prakar –
मराठी विशेषणाचा प्रमुख सहा प्रकार पडतात. त्या सहा प्रकार च्या विशेषणांची संपूर्ण माहिती खाली दिली गेली आहे.
गुणविशेष | Gunvachak visheshan –
Gunvachak visheshan – ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखविला जातो त्यास गुणविशेष असे म्हणतात. उदा.
मोठी मुले | शूर सरदार |
आंबट बोरे | रेखीव चित्र |
शुभ्र ससा | निळासावला झरा |
संख्याविशेषण | sankhyavachak visheshan –
Sankhyavachak visheshan – ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास संख्याविशेषण असे म्हणतात.
उदा. दहा मुली, चौदा भाषा, अर्धा तास, सहस्त्र किरणे.
दहा मुली | सहस्त्र किरणे |
चौदा भाषा | अर्धा तास |
साठ रुपये | दोघे मुलगे |
- हे सुद्धा वाचा – समास म्हणजे काय ? आणि त्याचे प्रकार
संख्याविशेषणांचे ५ पोट प्रकार पडतात-
- गणनावाचक संख्याविशेषण – ज्या विशेषणांचा वापर केवळ गिनती किंवा गणना करण्यासाठी वापर केला जातो. अश्या विशेषणांना गणनावाचक संख्याविशेषण असे म्हणतात.
उदा- दहा मुली, चौदा भाषा - क्रमवाचक संख्याविशेषण- ज्या विशेषणांचा उपयोग गोष्टींचा क्रम दर्शविण्यासाठी वापर केला जातो अश्या विशेषणांना क्रमवाचक विशेषण असे म्हणतात.
उदा. पहिला वर्ग, चौथा बांगला, आठवी इयत्ता
गणनावाचक विशेषणाचे सुद्धा ३ पोटप्रकार पडतात.
(अ). पूर्णांक वाचक- (एक, दोन ….)
(ब). अपूर्णांक वाचक- (पाव, अर्धा, पाऊण, तीन पंचमांश)
(क). साकल्यवाचक – दोन्ही भाऊ, पाची पांडव, चारी बहिणी.
- आवृत्तीवाचक संख्याविशेषण – ज्या विशेषणांचा उपयोग करून संख्याची आवृत्ती स्पष्ट केली जाते अश्या विशेषणांना आवृत्तीवाचक विशेषण असे म्हणतात.
उदा. दसपट रुपये, चौपट मुले, दुहेरी रंग - पृथक्त्ववाचक संख्याविशेषण – एक एक विशेषण वेगवेगळा असा बोध करून देतात. अशा विशेषणांना पृथक्त्ववाचक संख्याविशेषण असे म्हणतात.
उदा. एकेक मुलगा, दहा-दहांचा गट. - अनिश्चित संख्याविशेषण- जी विशेषणे निश्चित अशी संख्या दाखवत नाहीत अश्या विशेषणांना अनिश्चित संख्याविशेषण असे म्हणतात.
उदा- सर्व रस्ते, थोडी मुले, काही पक्षी, इतर लोक.
सर्वनामिक विशेषण | sarvanamik visheshan–
Sarvanamik Visheshan – नामापासून तयार केलेल्या विशेषणांना नामसाधित विशेषण असे म्हणतात.
हा मनुष्य | तिच्या साड्या |
तो पक्षी | असल्या झोपड्या |
माझे पुस्तक | कोणता गाव |
नामसाधित विशेषण | Namsadhit visheshan-
Namsadhit visheshan – सर्वनामांपासून बनलेल्या अशा विशेषणांना सर्वनामिक विशेषणे किंवा सर्वनामसाधित विशेषणे असे म्हणतात.
माझ्या भावाचे कापड दुकान आहे. |
त्याचा मित्र पुस्तक विक्रेता आहे. |
रामाला फळ-भाजी फार आवडते. |
धातुसाधित विशेषण | Dhatusadhit visheshan –
Dhatusadhit visheshan -क्रियापदापासून बनवलेल्या विशेषणांना धातुसाधित विशेषण असे म्हणतात.
पिकलेला आंबा | रांगणारे मूल |
वाहती नदी | हसरी मुलगी |
बोलकी बाहुली | पेटती ज्योत |
वरील उदाहरणातील विशेषणे ही ‘ पीक, रांग, वाह, हस, बोल, पेट’ या धातूपासून बनली आहेत. अशा विशेषणांना असे धातुसाधित विशेषण म्हणतात
अव्ययसाधित विशेषण | Avyay sadhit visheshan-
Avyay sadhit visheshan – अव्ययापासून तयार झालेल्या विशेषणांना अव्ययसाधित विशेषण असे म्हणतात.
वरचा मजला | खालची माडी |
मागील दार | पुढची गल्ली |
ही विशेषणे ‘ वर, खाली, मागे, पुढे’ या अव्ययापासून तयार झालेली आहेत. म्हणून त्यांना अव्ययसाधित विशेषणे असे म्हणतात.
वर, खाली, मागे, पुढे या मूळ अव्ययांना ‘ चा, ब, इ, ल’ हे प्रत्यय लागून ही विशेषणे तयार झालेली आहेत
अधिविशेषण आणि विधिविशेषण
- विशेष्यापूर्वी येणाऱ्या विशेषणाला अधिविशेषण असे म्हणतात.
चांगला मुलगा सगळ्यांना आवडतो.
वरील उदाहरणामध्ये ” चांगला ” हे विशेषण विशेष्या आधी आले आहे त्यामुळे अश्या विशेषणाला अधिविशेषण असे म्हणतात. - कधी कधी विशेष्या नंतर विशेषण येते. अश्या वेळी त्यांना विधिविशेषण असे म्हणतात.
उदा – तो मुलगा आहे चांगला
वरील उदाहरणामध्ये ” चांगला ” हे विशेषण विशेष्या नंतर आले आहे त्यामुळे अश्या विशेषणाला विधिविशेषण असे म्हणतात.
क्रियाविशेषण | Kriyavisheshan
पुढील उदाहरणे पहा.
मुलगा चांगला खेळतो. |
मुलगी चांगली खेळते. |
ते चांगले खेळतात. |
वरील वाक्यात ” चांगला, चांगली, चांगले ” हे शब्द विशेषणे आहेत. परंतु ती विशेषणे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारी आहेत. क्रियाविशेषण हे विकारी असते. त्यामुळे ही क्रियाविशेषणे आहेत, पण क्रियाविशेषण अव्यये नाहीत.
निष्कर्ष | conclusion
Visheshan in Marathi – विशेषण बद्दल संपूर्ण माहिती वर दिली गेली आहे. वर दिली गेलेली माहीती ही पुस्तकातून घेतली गेली आहे. तरी दिल्या गेलेल्या माहीती मध्ये काही अडचण असल्यास आम्हाला कंमेंट मध्ये कळवा अथवा तुम्ही आम्हाला या mail_id करून आम्हाला मेल करू शकता आम्ही तुम्हाला २४ तासा मध्ये नक्की उत्तर देऊ.
3 thoughts on “विशेषण, प्रकार आणि उदाहरण | Visheshan in Marathi”