letter writing in Marathi – आपल्या मनातील भावना, विचार, मते अभिव्यक्त करायचे माध्यम म्हणजे बोलणे हे सगळेच जाणतोच. पण हि अभिव्यक्ती अधिक मुद्देसूदपणे, सुसंबद्द पद्दतीने अपेक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे उत्तम माध्यम म्हणजे पत्रलेखन !!
प्रत्यक्ष बोलताना कधीतरी विषयासंदर्भात एखादा मुद्दा राहून जाण्याची शक्यता असते. परंतु पत्रलेखन करताना ते लिहिण्याआधी वैचारिक पातळीवर आपली पूर्वतयारी होत असते; त्याला वेळ मिळतो. त्यामुळे पत्रलेखन मुद्देसुत आणि नेमके होत असते.
पत्रलेखनाचे प्रामुख्याने औपचारिक (व्यावहारिक) आणि अनौपचारिक (घरगुती, कौटुंबिक इ.) असे प्रकार पडतात.
अनुक्रमणिका
अ) औपचारिक पत्र | Aupcharik patra in Marathi –
Aupcharik patra in Marathi – औपचारिक पत्रामधून आपण आपले काम करून घेण्याच्या किंवा काही माहिती मिळवण्याच्या भूमिकेत असतो. त्यामुळे औपचारिक पत्रलेखन ठरलेल्या संकेतानुसार होणे आवश्यक असते.
औपचारिक पत्रामध्ये खालील प्रकारचे पत्र असतात (Aupcharik patra lekhan in Marathi).
- निमंत्रण पत्र – (nimantran patrika)निमंत्रण पत्राद्वारे एखाद्या व्यक्तीला कोणत्या तरी निमित्ताने निमंत्रित करण्यासाठी लिहिले जाणारे पत्र
- आभार पत्र – निमंत्रण पत्राद्वारे एखाद्या व्यक्तीला कोणत्या तरी निमित्ताने निमंत्रित करण्यासाठी लिहिले जाणारे पत्र
- चौकशी पत्र – चौकशी पत्रामधून आपल्याला कोणती तरी माहिती जाणून घ्यायची असेल तर लिहिले जाणारे पत्र
- तक्रार पत्र – तक्रार पत्रातून आपल्याला होणार त्रास, अपेक्षा आपण संबधीत व्यक्तीला कळवत असतो.
- मागणी पत्र – मागणी पत्राद्वारे आपल्याला आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची आपण विनंती आपण करत असतो.
- विनंती पत्र – ज्या पत्रामधून एखादी विनंती केली जाते.त्याला विनंती पत्र असे म्हणतात.
हे सुद्दा वाचा – शब्दयोगी अव्यय त्याचे प्रकार
औपचारिक पत्राची मांडणी | letter writing in Marathi –
Aupcharik patra format- औपचारिक पत्राची मांडणी करण्यासाठी खालील काही महत्वाचे मुद्दे दिले गेले आहेत. ते सर्व खालील प्रमाणे-
1) पत्राची सुरवात उजव्या कोपऱ्यात पत्र लिहिणाऱ्याचे नाव, हुद्दा (पत्र कोणत्या नात्याने लिहीत आहोत त्याचा उल्लेख उदा- विद्यार्थीप्रमुख, सजग नागरिक इ.) व पत्ता असावा. 2) पत्त्यांनंतर योग्य तो दिनांक, ई- पत्ताही लिहावा. 3) त्यांनतर डावीकडे योग्य तो मायना असावा. संबंधीत व्यक्तीचे नाव, हुद्दा थोडक्यात पत्ता असावा. 4) विशेषनाम पत्रात असेल तरच ते लिहावे. अन्यथा प्रति, प्रेषक या ठिकाणी अ ब क असाच उल्लेख करावा. 5) औपचारिक पत्रामध्ये विषय लिहिणे आवश्यक आहे. विषय थोडक्यात लिहावा. 6) महोदय / महोदया असे लिहून पत्रलेखनाला सुरवात करावी. 7) पाल्हाळीकपणा न करता तरीही सविस्तर नेमक्या शब्दात विषयविस्तार करावा. 8) २ ते ३ परिचछेदात मुद्देसूद लेखन असावे. 9) शेवटी आपला/ आपली / कृपाभिलाषी / आज्ञार्थी यांपैकी योग्य ते संबोधन वापरून समारोप करावा.
आ) अनौपचारिक पत्र | Anopcharik patra in Marathi –
Anopcharik patra – अनौपचारिक पत्र म्हणजे घरगुती, कौटुंबिक, मित्र-मैत्रिणींना लिहिलेली पत्रे.या पत्रातून आपण आपल्या भावभावना, ख्याली, खुशाली दुसऱ्यापर्यंत पोहोचवत असतो.
- कार्यक्रम पत्रिका / पत्र -(aamantran patra)
- आभार पत्र –
- अभिनंदन / शुभेच्या पत्र –
हे सुद्दा वाचा – विशेषण म्हणजे काय ? आणि त्याचे प्रकार
अनौपचारिक पत्राची मांडणी | Anopcharik patra format-
अनौपचारिक पत्राची मांडणी करण्यासाठी खालील काही महत्वाचे मुद्दे दिले गेले आहेत. ते सर्व खालील प्रमाणे-
1) अनौपचारिक पत्र लिहिण्याचे विशिष्ट असे नियम-संकेत नाहीत. 2) उजवीकडे कोपऱ्यात दिनांक, वार, गावाचे नाव लिहावे. 3) मध्यभागी ॐ / श्री असेही लिहिण्याची प्रथा आहे 4) डावीकडे प्रिय / तीर्थरूप / आदरणीय इ. योग्य भावना लिहून पुढे व्यक्तीचे नाव लिहून पत्र लेखनाला सुरवात करता येते. 5) शेवटी व्यक्तिनुरूप नमस्कार, आशीर्वाद लिहून तुझा/ तुझी / तुमचा इ. लिहून समारोप करावा. 6) पत्रातील भाषा संवाद केल्यासारखी, गप्पा मारल्यासारखी साधी-सोपी मनमोकळी असावी. 7) वर्णनात्मक, खेळकर, दिलखुलास, आपलेपणाची असावी.
Conclusion | Marathi patra lekhan | formal letter in Marathi
आज आपण मराठी व्याकरण मधील मराठी पत्र आणि मराठी पत्रलेखन याबद्दल संपूर्ण माहिती पहिली. तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला या [email protected] यावरती मेल करू शकता. आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.
- Marathi patra lekhan
- formal letter in Marathi
1 thought on “संपूर्ण मराठी पत्रलेखन २०२३ | Letter writing in Marathi”