Marathi Story For kids तुम्हाला आज आम्ही ह्या ब्लॉग मध्ये Marathi Short Stories सांगणार आहोत. ह्या ब्लॉग मध्ये चांगल्या Marathi Story आम्ही सांगितल्या आहेत . तुम्ही एकदा वाचा तुम्हाला नक्कीच आवडेल.
अनुक्रमणिका
Marathi Short Stories | लबाड कोल्हीण
एका जंगलात चार बैल रहात होते. त्यांच्यामध्ये खूप घनिष्ठ मैत्री होती. ते चौघे नेहमी एकत्र राहायचे. एकत्र फिरायला जायचे. एकत्र चरायला जायचे. सुख-दुःखांत एकत्र राहायचे, जेव्हा जेव्हा जंगली प्राणी त्यांच्यावर हल्ला करत तेव्हा ते चौघे मिळून त्याचा सामना करत आणि त्याला पळवून लावत. याच कारणामुळे जंगलात त्या चौघांचा धाक होता. चित्ता आणि वाघ हे दोघेही बैलांवर नजर ठेवून होते.
त्यांना बैलांचे धष्टपुष्ट मांस खायचे होते; परंतु दोघेही बैलांना घाबरत होते. कोल्हा आणि लांडगे त्यांना बघून लाळ गाळत. मंथरा कोल्हीण तर सिंहाला नेहमी भडकावून द्यायची; परंतु त्या चार बैलांची एकी पाहून सिंहाचीपण त्यांच्यावर हल्ला करण्याची हिंमत होत नसे.
एकदा मंथरेने त्या चार बैलांमध्ये भांडण लावून दिले. त्यामुळे ते एक-दुसऱ्यावर नाराज झाले. त्या दिवसापासून ते वेगवेगळे रहायला लागले. ते वेगवेगळ्या रस्त्याने जंगलात चरायला जाऊ लागले. मंथरने ही गोष्ट लगेच सिंहाला जाऊन सांगितली. मंथरेला माहीत होते की ती एकटी बैलाला मारू शकत नाही;
पण तिला हे माहीत होतं की सिंहाने जर शिकार केली तर तिलापण थोडं मांस खायला मिळेल. सिंह तर खूप दिवसांपासून याच दिवसाची वाट पाहत होता. त्याने एक-एक करून सगळ्या बैलांना मारून टाकलं. मंथरेने मनसोक्त मांस खाल्लं.
Marathi Story For Kids | जशास – तसे
एक फळविक्रेता होता एक किराणादार दुकानदार त्याचा मित्र होता .फळविक्रेता त्याच्या दुकानासमोर फळांची हातगाडी लावायचा. जेव्हा तो गावाला जायला निघाला तेव्हा त्याने एक फळविक्रेता होता. एक किराणा दुकानदार त्याचा मित्र होता. फळविक्रेता त्याच्या त्याचा वजनकाटा आणि साहित्य दुकानदार मित्राजवळ ठेवले. काही दिवसांनी परत आल्यावर फळविक्रेत्याने आपला वजनकाटा आणि साहित्य दुकानदार मित्राकडे परत मागितले; परंतु दुकानदार मित्राच्या मनात पाप आले होते.
तो म्हणाला, “कसला वजनकाटा भाऊ? तो तर उंदराने खाऊन टाकला. मला वाईट वाटत आहे की मी वजनकाटा परत करू शकत नाही.’ फळविक्रेत्याला खूप राग आला. रागावर नियंत्रण ठेवत तो म्हणाला, “जाऊ दे रे मित्रा. यात तुझी काय चूक ? उंदीर तर काहीपण खाऊन टाकतात.
एके दिवशी फळविक्रेता दुकानदाराला म्हणाला, “हे बघ मी काही सामान आणायला शहरात जाणार आहे. तुलापण काही आणायचे असेल तर तुझ्या मुलाला माझ्यासोबत पाठवून दे, आम्ही उद्यापर्यंत परत येऊ.” दुकानदाराने काही महत्त्वाच्या सामानाची यादी आपल्या मुलाकडे दिली व मुलाला फळविक्रेत्याबरोबर पाठवले. दुसऱ्या दिवशी फळविक्रेता शहरातून परत आला. पण तो एकटाच परत आला.
दुकानदाराचा मुलगा त्याच्याबरोबर नव्हता. “अरे, माझा मुलगा कुठे आहे?” दुकानदाराने विचारले. “काय सांगू मित्रा! तुझ्या मुलाला एक गरुड उचलून घेऊन गेला.” फळविक्रेत्याने भोळेपणाने व दुःखाने सांगितले. “काय खोटे बोलतोस? एवढ्या मोठ्या मुलाला गरुड कसा काय उचलून नेऊ शकतो?” दुकानदाराने रागाने विचारले. फळविक्रेता त्याची झालेली फजिती पाहून हसला.
दुकानदार त्याला हसताना पाहून म्हणाला, “लवकर सांग माझा मुलगा कुठे आहे?” फळविक्रेत्याने उत्तर दिले, “दादा! जर उंदीर वजनकाटा खाऊ शकतो तर गरुड मुलाला का नाही उचलून नेऊ शकत?” हे ऐकताच दुकानदाराला त्याची चूक कळली. तो पटकन् उठला आणि दुकानाच्या मागे ठेवलेला वजनकाटा घेऊन आला आणि म्हणाला, “मला माफ कर. तुझा पितळेचा वजनकाटा पाहून माझ्या मनात पाप आले होते.”
Marathi Story | स्वाचिडी-ग्वाचिडी
एके दिवशी शेखचिल्ली आजारी पडला. तो वैद्याकडे गेला. वैद्याने त्याला औषध दिले आणि सांगितले दोन-तीन दिवस खिचडी खा. शेखचिल्लीने खिचडीचे नाव आयुष्यात पहिल्यांदाच ऐकले होते. त्याने विचार केला की विसरायला नको म्हणून शेखचिल्ली संपूर्ण रस्त्याने ‘खिचडी’ म्हणत म्हणत घरी गेला.भेटणाऱ्यांना नमस्कार करत तो ‘खिचडी-खिचडी’ म्हणत चालला होता. काही अंतर गेल्यानंतर ‘खिचडी’ शब्द शेखचिल्ली विसरला. खूप वेळानंतर काही अंतर गेल्यावर त्याला ‘खाचिडी’ शब्द आठवला. तो ‘खाचिडी-खाचिडी’ म्हणत गेला.
तेथे एका शेतकऱ्याचे शेत होते. त्याने शेखचिल्लीच्या तोंडातून ‘खाचिडी-खाचिडी’ ऐकले. शेतकऱ्याला वाटले शेखचिल्ली चिमण्यांना त्याच्या शेतातले दाणे खाण्यास सांगतो आहे. शेतकऱ्याने मागचा पुढचा विचार न करता शेखचिल्लीला बदडून काढले. “अरे भावा माझे काय चुकले?” शेखचिल्लीने विचारले. “तू माझे शेत चिमण्यांना खाण्यास सांगत आहे. तसे आता तू ‘ऊडचिमणी-ऊडचिमणी’ म्हण. नाहीतर तुला मी खूप मारेन!” शेखचिल्ली हात जोडून म्हणाला, “तू म्हणशील तसेच होईल” आणि शेखचिल्ली ‘ऊडचिमणी-ऊडचिमणी’ म्हणू लागला.
थोड्या अंतरावर एका शिकाऱ्याने जाळे पसरवले होते. त्याने शेखचिल्लीचे ‘ऊडचिमणी-ऊडचिमणी’ बोलणे ऐकले. तो शेखचिल्लीवर ओरडू लागला. शिकाऱ्याने शेखचिल्लीला चोपून काढले. आयुष्यात एवढा मार
त्याने प्रथमच खाल्ला. त्याने शिकाऱ्याला माझे काय चुकले असे विचारले. शिकारी म्हणाला, “तू ऊडचिमणी ऐवजी ‘फसचिमणी-फसचिमणी’ असे म्हण म्हणजे तुला कोणी मारणार नाही.’
शेखचिल्ली रस्त्याने ‘फसचिमणी-फसचिमणी’ म्हणत जाऊ लागला. त्याच रस्त्याने २-३ चोर चोरी करून येत होते. निर्जन रस्त्यावर ‘फसचिमणी’ म्हणताना ऐकून चोरांना वाटले की हा आपल्यालाच म्हणत आहे. त्यांनी तात्काळ त्याला झाडाला उलटा टांगून मारले. शेखचिल्ली शहाणा असता तर त्याने उपाय विसरल्याबरोबर वैद्याचे घर गाठले असते.
Marathi Story For Kids | हट्टी विद्वान
महागंगा नदीच्या किनाऱ्याजवळ एक नगर होते. नगर खूप सुंदर होते, त्या नगरात एक विद्वान रहात होता. त्याचे नाव भागमल होते. भागमलला वेदांचे खूप ज्ञान होते. यज्ञ, पूजापाठ तो करत असे. पंडित तर तो होताच; परंतु तो खूप धार्मिक आणि श्रीमंत होता. त्याच्या पत्नीचे पसरवत होती. तिला इकडचे-तिकडे सांगणे आणि भांडण लावणे हे खूप आवडायचे. त्यातच नाव शांता होते. त्याची बायको फारच विचित्र होती. तिच्या स्वभावामुळे ती सर्वत्र अशांतता तिला आनंद मिळे.
भागमलला मूलबाळ नव्हते. मूल व्हावे म्हणून तो नेहमी काळजीत असायचा. त्याला मूल होत नसल्याने असे वाटायचे की सर्व धन, पांडित्य व्यर्थ आहे. मूल व्हावे म्हणून भागमलने यज्ञ व पूजापाठ केले. शेवटी भागमल खूप निराश झाला. या चिंतेने तो खूप अशक्त झाला. त्याने घर सोडून जंगलात जाण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी सकाळीच तो जंगलात जाण्यास निघाला; परंतु त्याच्या चेहऱ्यावर नाराजी होती.
तो नगरापासून दूर गेला. रस्त्यात त्याला एक महात्मा भेटला. महात्म्याने भागमलचा उदास चेहरा पाहून त्याला विचारले, “तुम्ही खूप दुःखी दिसत आहात, कारण काय आहे?” महात्म्याची सहानुभूतिपूर्वक भाषा ऐकून भागमलला जास्तच दुःख झाले. भागमलच्या डोळ्यात पाणी आले. तो दुःखी होऊन बोलला, “अहो, माझ्याकडे धन आहे, विद्या आहे, पण मूलबाळ नाही.
मूलबाळ व्हावे म्हणून मी यज्ञ केला, व्रत केले तरीही माझी इच्छा पूर्ण झाली नाही. मूलबाळ नसल्याने मला सर्व जगात अंधार वाटू लागला आहे.” भागमलचे बोलणे ऐकून महात्म्याने त्याच्या प्रती सहानुभूती दाखवली. महात्मा विचारात गुंग झाला आणि मनातल्या मनात विचार करू लागला. महात्मा योगी होता. त्याने योगशक्तीने सर्व जाणून घेतले.
त्यांना समजले की, याला मूलबाळ का नाही. महात्म्याने विचार करून उत्तर दिले, “देवा, चिंता आणि प्रयत्न करणे व्यर्थ आहे. देवाने तुमच्या नशिबात मुलबाळाचे सुख नाही लिहिले. मग तुम्हाला मूलबाळ कसे होईल?” महात्म्याच्या बोलण्याचा परिणाम भागमलवर झाला नाही. तो म्हणाला, “काही तरी असा उपाय करा की मला मूल व्हावे. मूल नसल्याने माझे जीवन व्यर्थ आहे.”महात्मा विचार करत म्हणाले, “तुम्हाला वेदांचे ज्ञान आहे. तुम्ही यज्ञ पूजा पाठ करता म्हणून तुम्ही मोहमाया करू नका. जीवनात सुखशांती देवाच्या भक्तीने मिळेल.
सर्व चिंता सोडून स्वतःचे मन देवाच्या भक्तीत गुंतवा. कल्याण होईल आणि मिळेल.” महात्म्याचे बोलणे भागमलला समजलेच नाही. मूलबाळ व्हावे म्हणून तो अगदी मोहाच्या जाळ्यात अडकला. तो पुन्हा महात्म्याला म्हणाला, “जर तुम्ही तुमच्या योगशक्तीने मूल दिले नाही तर मी लगेच जीव देईन.” महात्मा म्हणाला, “देवा, तुम्ही हट्ट करू नका. हट्टाने आपण जी गोष्ट मिळवतो त्याने केवळ दुःख मिळते. आजपर्यंत ज्याने कोणी हट्ट केला त्याला केवळ दुःखच मिळाले.”
परंतु भागमलवर या उपदेशाचा काहीच परिणाम झाला नाही. तो मूल पाहिजे म्हणून विनंती करू लागला आणि मूल व्हावे म्हणून हट्ट करू लागला. असे झाले नाही तर मी स्वत:ला मारून टाकीन, असे म्हणून लागला. शेवटी महात्म्याने त्याला मूल होईल, असा आशीर्वाद दिला. काही काळाने भागमलच्या घरी मूल जन्मले. तो मुलगा खूप दुःख देणारा निघाला. भागमलला समजले की, हट्टाने काही मिळवू नये. त्यातून दुःखच मिळते.
- Marathi Story for kids
- Marathi Story
- Marathi short Stories
निष्कर्ष –
Marathi Story for kids अन्य लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकावरून घेतली गेली आहे. वरील ब्लॉग मधील माहिती फक्त वाचन आणि शिक्षण उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला Marathi story , Marathi Short Stories कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिल्या गेलेल्या माहिती बद्दल काही अडचण असेल …आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.
1 thought on “Marathi Story For Kids 2023 | मुलांसाठी कथा”