Marathi Story आज आपण ह्या ब्लॉग मध्ये Marathi Short Stories बघणार आहोत. लहान मुलांना गोष्टी ऐकल्या फार आवडतात व शाळातील मुलांना पण शाळे साठी गोष्टी महत्वाच्या असतात. गोष्टी मधून आपल्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. आम्ही ह्या ब्लॉग मध्ये काही Marathi Story लिहलेला आहेत. तुम्ही एकदा वाचा तुम्हाला नक्कीच आवडेल.
अनुक्रमणिका
Marathi Story For Kids | शीर्षक -“लोभी राजा”
भरपूर वर्ष पूर्वी मिडास नावाचा एक ग्रीक राजा होता. तो राजा खूप श्रीमंत होता आणि त्याच्याकडे भरपूर सोने आणि दौलत होती . त्यांना एक मुलगी होती, जिच्यावर त्यांचे खूप प्रेम होते. एके दिवशी,मिडास फिरत असताना त्याला दिसले कि एक देवदूत अडचणी मध्ये आहे आणि त्याला मदती ची गरज आहे . त्याने देवदूत ला मदत केली आणि त्या बदल्यात तिने इच्छा मंजूर करण्यास सहमती दर्शविली.
मिडासची इच्छा होती की त्याने स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टीचे सोने होईल. त्याची इच्छा पूर्ण झाली घरी जाताना त्याने खडकांना आणि झाडांना स्पर्श केला आणि ते सोन्यात बदलले. घरी पोहोचताच त्याने उत्साहाच्या भरात आपल्या मुलीला मिठी मारली, जी सोन्यात बदलली. मिडास उद्ध्वस्त झाला होता आणि त्यांनी चांगलाच धडा शिकला होता. मिडास धडा शिकल्यावर, मिडासने देवदूताला त्याची इच्छा काढून घेण्यास सांगितले.
बोध – “लोभ असणे चांगला नाही. आपलेकडे जे काय आहे त्या मध्ये आनंदी राहा“.
- हे सुद्धा वाचा – Akbar Birbal Story In Marathi
Marathi Short Stories | शीर्षक – “सिंह आणि उंदीर”
एका जंगलात सिंह मस्त विश्रांती घेत होता, तेव्हा एक उंदीर मनोरंजनासाठी त्याच्या शरीरावर खाली ,वर ,शरीराबवती धावू लागला. सिंहाची झोप खंडित झाली आणि तो रागाने जागा झाला. सिंह रागाने उठतो आणि उंदीरला धरतो आणि खाण्यास जातो तेव्हा उंदीर सिंह ची क्षमा मागतो आणि म्हणतो की तुम्ही मला खाऊ नका सोडून दया मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही जेव्हा भविष्य मध्ये संकट मध्ये सापडल तेव्हा मी तुमची मदत करीन. उंदराच्या आत्मविश्वासावर सिंह हसला आणि त्याला मुक्त केले.
एके दिवशी शिकारींचा एक गट जंगलात येतो आणि ते लोका सिंहाला पकडतात . त्यांनी सिंह झाडाला बांधले असते . सिंह बाहेर पाडण्यासाठी प्रत्यन करत असतो आणि मोठ्याने गर्जना देत असतो. गर्जना ऐकून उंदीर तिथे येतो तर पाहतो तर काय ? सिंह जाळीत सापडला असतो. उंदीर लगीच सिंहची सुटका करण्यासाठी ती जाळी आपल्या दाताने जाळी कुर्तडतो आणि सिंहची सुटका होण्यास मदत करतो. अशा प्रकारे उंदीर आपले वचन पूर्ण करतो. आणि दोघे तिथून निघून जंगलात जातात.
बोध- “नेहमी एकमेकांशी दयाळू रहा”.
Marathi Story | शीर्षक – “श्यामचा मूर्खपणा”
रामपूर गावात श्याम नावाचा मुलगा आणि त्याचे वडील राहत होते. मेंढ्या शेतात चरत असताना, श्यामच्या वडिलांनी श्यामला त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची सूचना दिली होती .श्यामला रोज मेंढरांना गवताळ शेतात घेऊन जयायला लागत असे . श्याम ला मेंडी चरायला न्हयचा कंटाळा येत असे त्याला एकच ठिकाणी बसून फार कंटाळा येत असे .
श्याम ला एक युक्ती सुचली वेळ मजेशीर कसा घालवायचा.
श्याम झाडावर बसतो आणि मोठयाने ओरडू लागतो लांडगा आला! लांडगा आला! लांडगा आला! गावकरी श्याम चा आवाज ऐकताच त्याचामदतीसाठी आपली कामे सोडून श्यामकडे पळत पोचतात तर तिथे लांडगा वगरे काहीच आला नसतो तर श्याम ने त्यांची मस्करी केली असते. हे बघून गावकरी चिडतात आणि तिथून निघून जातात पण ह्या गोष्टी मध्ये श्यामला फार आनंद येत असतो.
दुसऱ्या दिवशी पण श्याम असच करतो मोठयाने मोठयाने ओरडू लागतो लांडगा आला! लांडगा आला! लांडगा आलापरत लोका श्यामकडे धावून जातात तर तिथे लांडगा नसतोच. गावकरीच्या लक्ष्यात येते की श्याम हे सगळे मस्करी साठी करतोय परत गावकरी तिथून निघून जातात.
पण तिसऱ्या दिवशी लांडगा खरंच येतो तेव्हा श्याम मोठयाने ओरडू लागतो लांडगा आला! लांडगा आला! लांडगा आला! गावकरीना वाटत की श्याम त्यांची मस्करी करत आहे परत त्यामुळे कोणच मदतीला जात नाही. लांडगा येतो आणि भरपूर मेंडी खाऊन जातो. अश्या प्रकारे श्याम ला चांगलीच अक्कल घडते.
बोध- “मस्करी करताना आपण कोणत्या गोष्टीची मस्करी करत आहे हेचा विचार करावा”.
- हे सुद्धा वाचा – 15 August Speech In Marathi.
Marathi Ghosti | शीर्षक – “ एकता “
एका गावात सुभाष आपल्या तीन मुलांसोबत राहत होता. तिन्ही मुलगे उत्तम कामगार होते, तरीही त्यांच्यात अनेकदा भांडणे होत असत. सुभाष त्यांना एकत्र आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असत , पण ते नेहमी अयशस्वी ठरत असे .महिने गेले आणि सुभाष आजारी पडले . त्यांनी आपल्या मुलांना एकत्र राहण्याचा आग्रह केला, परंतु त्यांनी त्यांची आज्ञा मोडली. परिणामी, त्यांनी त्यांच्यातील मतभेद बाजूला ठेवून एकसंध राहण्यासाठी त्यांना व्यावहारिक धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.
सुभाष यांना त्यांचा मुलांना बोलवले आणि म्हंटले की . “मी तुम्हाला काठ्या देईन,” सुभाष म्हंटले की प्रत्येक काठी वेगळी केल्यावर तुम्हाला ती अर्धी मोडावी लागेल. “जो सर्वात लवकर काठ्या तोडतो त्याला अधिक बक्षीस मिळेल.”सुभाषने प्रत्येकाला दहा काठ्यांचा एक बंडल दिला आणि प्रत्येक काठीचे तुकडे करायला सांगितले. त्यांनी काही मिनिटांत काठ्या फोडल्या आणि ते पहिले कोणी केले यावर पुन्हा वाद घालू लागले. नंतर सुभाषने प्रत्येक मुलाच्या हातात काठ्यांचा दुसरा बंडल दिला आणि त्यांना एकत्र तोडण्याची सूचना दिली.
त्यांनी काठीचे बंडल तोडण्याचा प्रयत्न केला. सर्वोतोपरी प्रयत्न करूनही ते बंडल फोडू शकले नाहीत. “प्रिय मुलांनो,” सुभाष म्हंटले . पहा! एकाच काड्या तुकडे करणे सोपे होते, परंतु बंडल विभाजित करणे अशक्य होते! म्हणून, जोपर्यंत तुम्ही एकरूप आहात तो पर्यंत कोणीही तुम्हाला दुखवू शकत नाही.”सुभाष यांचा मुलांना समजले की आपण एकत्र असलो की आपल्याला कोणीच दुखवू व हरवू शकत नाही आणि एकत्र राहण्याची प्रतिज्ञा घेतात व तिघे भाऊ एकत्र राहू लागतात.
बोध- एकता ही शक्ती आहे.
Marathi Story | शीर्षक – शक्तिवान कोण ?
एकदा हवेला गर्व झाला. “जेव्हा मला राग येतो तेव्हा मी पृथ्वीवर हाहाकार निर्माण करते. मी खूप शक्तिशाली आहे.” असे हवेने सूर्याला सांगितले. “सूर्यदेव मी तुमच्यापेक्षा जास्त शक्तिमान आहे. मी जेव्हा जोरात वेगाने धावते तेव्हा मोठ-मोठी झाडे मला वाटते की पडतात. गरिबांची घरे मी पाडते.”
“तू शक्तिशाली आहेस, यामध्ये शंका नाही; परंतु माझ्यापेक्षा जास्त शक्तिशाली नाहीस.” या गोष्टीवरून सूर्य आणि हवेमध्ये भांडण झाले. तेव्हा तेथे नारदमुनी आले. भांडणाचे कारण विचारले तेव्हा सूर्याने संपूर्ण गोष्ट सांगितली. एवढ्यात एक माणूस शाल गुंडाळून चालला होता. नारदाची नजर त्याच्यावर पडली. नारद म्हणाले, “याचा निर्णय आताच होईल. तुमच्या दोघांमध्ये जो कोणी माणसाच्या शरीरावरील चादर काढेल तोच शक्तिशाली. हवा, तू प्रयत्न कर.’
हवा सूर्याला म्हणाली, “तुम्ही ढगात लपून बसा.” सूर्य लगेच लपून बसला. हवा संपूर्ण शक्ती लावून वाहू लागली. तो माणूस एका झाडाच्या आडोशाला बसला. हवेने खूप प्रयत्न केले; परंतु हवेला यश आले नाही. आता सूर्याची वेळ आली. सूर्यदेवाने हसून स्वत:चे तेज वाढवले. अजून थोडे तेज वाढवले. त्यामुळे त्या माणसाला खूप गरम होऊ लागले. त्याने शाल काढली. कुर्ता काढून टाकला. हे सर्व सूर्यदेवाने क्षणातच केले. हे पाहून हवेने शरमून खाली मान घातली. हवेने सूर्यदेवाची माफी मागितली. सूर्यदेवाने हवेला क्षमा केली.
निष्कर्ष –
Marathi Story अन्य लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकावरून घेतली गेली आहे. वरील ब्लॉग मधील माहिती फक्त वाचन आणि शिक्षण उपयोगासाठी दिली गेली आहे. तुम्हाला Marathi Ghosti , Marathi Short Stories कशी वाटली आम्हाला comment करून आम्हाला कळवू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला दिल्या गेलेल्या माहिती बद्दल काही अडचण असेल …आम्हाला [email protected] या मेल वर तुम्ही मेल करून शकता आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.
3 thoughts on “Interesting Marathi Story Kids 2023 | लहान मुलांसाठी कथा”