अनुक्रमणिका
शब्दयोगी अव्यय | Shabd yogi Avyay definition in Marathi –
Shabd yogi Avyay definition in Marathi – मराठी वाक्यामध्ये नाम आणि सर्वनाम एखाद्या शब्दाला जोडून येतात आणि इतर वाक्यांशी त्याचा संबंध दर्शवतात. त्यांना ‘शब्दयोगी अव्यय‘ असे म्हणतात.
Avyay in Marathi – सर्वांत पहिला खालील उदाहरण वाचा-
"जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरण पसरली. साळुंकीने घरट्याबाहेर झेप घेतली. तिच्या मागोमाग तिचा जोडीदारही बाहेर पडला. याच संधीची तो मुलगा मघापासून वाट पाहत होता. त्याची आई जाईच्या मांडवाखाली फुले वेचीत होती. सांळुकी दूर हिरवीवर पिलांसाठी चार टिपत होती. "
वरील उदाहरणामध्ये ‘वर, बाहेर, ही, पासून, खाली, वर, साठी’ हे शब्द दोन किंवा अधिक वाक्य जोडण्याचे काम करतात.
- हे सुद्धा वाचा – विशेषण म्हणजे काय ? आणि त्याचे प्रकार
शब्दयोगी अव्ययाचे प्रकार | Types of Avyay in Marathi –
शब्दयोगी अव्ययांचे त्याच्या अर्थानुसार पुढील प्रकार पडतात.त्यामधील शब्दयोगी अव्ययाची काही प्रकार (Types of Avyay in Marathi) आणि उदाहरणे दिली गेली आहेत.
प्रकार | काही शब्दयोगी अव्यय |
कालवाचक | (अ) आता, पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो (आ) गतिवाचक- आतून, खालून, मधून, पर्यंत, पासून. |
स्थलवाचक | आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठायी, पाशी, नजीक, समीप, समक्ष |
करणवाचक | मुळे, योगे, करून, कडून, द्वारा, करावी, हाती. |
हेतूवाचक | साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रित्यर्थ, निमित्त्य, स्तव |
व्यक्तिरेवाचक | शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यक्तिरिक्त, परता |
तुलनवाचक | पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस |
योग्यतावाचक | योग्य, सारखा, जोगा, सम, समान, प्रमाणे, बरहुकूम. |
कैवल्यवाचक | च, मात्र, ना, पण, फक्त, केवळ |
संग्रहवाचक | सुद्धा देखील ही पण बरीक, केवळ, फक्त |
संबंधवाचक | विशी, विषयी, संबंधी. |
साहचर्यवाचक | बरोबर, सह, संगे, सकट, सहित, सवे, निशी, समवेत. |
भागवाचक | पॆकी, पोटी, आतून. |
विनिमयवाचक | बद्दल, ऐवजी, जागी, बदली. |
दिकवाचक | प्रत, प्रति, कडे, लागी. |
विरोधवाचक | विरुद्ध, वीण, उलटे, उलट |
परिणामवाचक | भर |
- हे सुद्धा वाचा – समास आणि त्याचे प्रकार
निष्कर्ष | Conclusion –
आज आपण मराठी व्याकरण मधील अव्यय आणि त्यांच्या प्रकाराबद्दल संपूर्ण माहिती पहिली. तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला या [email protected] यावरती मेल करू शकता. आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.
- Avyay Marathi
- shabdayogi Avyay in Marathi
- Marathi Avyay
- Marathi grammar Avyay
1 thought on “शब्दयोगी अव्यय त्याचे प्रकार | Avyay in Marathi”