जागतिक महिला दिन भाषण मराठी | Women’s Day Speech In Marathi

5/5 - (3 votes)

Women’s Day Speech In Marathi-आज या ब्लॉग पोस्ट Women’s Day Speech In Marathi, Mahila Din Speech In Marathi,मध्ये विषयी केली जाणारे भाषण याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. आपण या भाषणाचा वापर पहिलीपासून दहावीपर्यंत करू शकता.

Women’s Day Speech In Marathi | mahila Din Speech In Marathi

नमस्कार येथे जमलेल्या आदरणीय प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य शिक्षक आणि मित्र मित्रांनो आज आपण महिला दिन साजरी करण्यासाठी आपण येथे जमलो आहे. आज मी महिला दिन वर भाषण देणार आहे.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीचा हात असतो हे आपण नेहमीच बघत आलो आहोत. ही समाज रथाचे दोन महत्त्वपूर्ण चके आहेत. . ही दोन्ही चाके जर एकसंध असतील तर समाजाचा विकास होऊ शकतो. जगभरातल्या कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, सहकार या सर्व क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या माता भगिनींना आणि स्त्री-शक्तींच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आपण ८ मार्च हा महिला दिन म्हणून आपण साजरा करतो.


आजच्या कालखंडानुसार या देशातल्या कर्तृत्ववान स्त्रियांच्याकडे पाहिलं तर स्त्रियांच्या प्रगतीचा आलेख हा उंचावत असताना आपल्याला पाहावयास मिळतो. प्राचीन कालखंडापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा आलेख पाहिला तर तो दिवसेंदिवस वाढतच चाललेला पाहायला मिळतो.


पूर्वी स्त्रियांनी मूलं जन्माला घालणे व त्यांचं पालन पोषण करणे इतकेच अधिकार मर्यादित होते. अशा कालखंडामध्ये चूल आणि मूल या दोन गोष्टीशीच स्त्रियांचा संबंध जोडला जात होता. प्राचीन काळात आपल्या देशामध्ये जर स्त्रियांच्या बाबतीत पाहिलं तर सूर्यास्तानंतर स्त्रियांनी घरातून बाहेर पडू नये असे चित्र होते. पण या देशातील काही क्रांतिकारक स्त्रियांनी या वस्तुस्थितीला छेद देण्याचे कार्य केले व यातून स्त्री स्वातंत्र्याची चळवळ खऱ्या अर्थाने पुढे आली. प्राथमिक स्तरावरती शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढत गेली. स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून समाजामध्ये स्वत:चे आगळे-वेगळे स्थान निर्माण करण्याचे पवित्र कार्य याच स्त्री शक्तीने केले. आज महिला दिन साजरा करत असताना त्याच स्त्री शक्तीच्या कार्याचा आदर्श घेतला पाहिजे. कारण स्त्री ही बरोबरीने पुरुषाच्याखांद्याला खांदा लावून समाजामध्ये कार्य करताना पाहावयास मिळते.


आज अशा कर्तबगार स्त्रियांच्या विचारांचा, आचारांचा, कृतीचा, संस्कारांचा ठेवा आपण आदर्श घेतला पाहिजे. महिला दिनाच्या निमित्ताने त्या महान स्त्रियांच्या कर्तृत्वाचा संदेश पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजचे आहे. जगभरातील कर्तृत्ववान स्त्रिया व आपल्या देशातील स्त्री शक्तीची, विचारांची ज्योत जर महिला दिनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर उद्याच्या क्रांतीची बीजे पेरणाऱ्या एका स्त्री शक्तीचा यातून उदय होऊ शकतो.


अलीकडच्या कालखंडामध्ये स्त्रियांच्या इतिहासाचे हजारो दाखले पाहावयास मिळतात. संत साहित्यामध्ये जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ, रणरागिणी ताराराणी, अहिल्यादेवी होळकर, राणी चन्नमा यांसारख्या स्त्रिया तर स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये सहभागी झालेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई, गोंडावनची राणी, उमा चक्रवर्ती, सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, इंदिरा गांधी यासारख्या कर्तबगार स्त्रियांचे दाखले आपणास पाहावयास मिळतात.

हे सुद्धा वाचाSavitribai Phule Speech In Marathi


आज आधुनिक कालखंडामध्ये जर स्त्रियांच्या कतृत्वाकडे पाहिले तर स्त्रियांच्या विकासाचा आलेख हा वाढत चाललेला पाहावयास मिळतो. आपल्या देशामध्ये पंतप्रधान, राष्ट्रपती, सभापती भूषविणाऱ्या महिला होत्या. आज स्त्रियांच्या कर्तृत्वाचा आलेख सर्व क्षेत्रामध्ये आपणास पाहायला मिळतो. ज्या सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांनी स्त्री शिक्षणासाठी आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले व महापुरुषांच्या प्रेरणेतून शिक्षणाची गंगा लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला याचीच फलश्रुती आपणास आज स्त्रियांच्या कर्तृत्वातून पाहावयास मिळते.


आज महिला दिन साजरा करत असताना सर्व स्त्री शक्तीच्या विकासासाठी स्त्रियांच्या स्वातंत्र्य आणि अधिकारप्राप्तीसाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज कला, क्रिडा, साहित्य, शिक्षण, सहकार, उद्योग या क्षेत्रामध्ये भरारी घेत असताना दिसतात. याचा आदर्श इतर महिलांनी घेतला पाहिजे.

महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रीशक्तीने एकत्र येऊन जर समाजातल्या दुर्बल महिलांना सबल बनवण्यासाठी अशिक्षितांना शिक्षित बनवण्यासाठी अज्ञान आणि अंधकारात असणाऱ्या स्त्रियांना प्रकाशात आणण्यासाठी स्त्री-शक्तीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. महिला दिनाच्या निमित्ताने समाजामध्ये सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या चांगल्या सक्षम स्त्रियांचा यथोचित गौरव समारंभाच्या माध्यमातून जर केला तर त्या ठिकाणी व इतरत्र असणाऱ्या स्त्रियांच्यापर्यंत स्त्री कर्तृत्वाचा संदेश लोकांच्यापर्यंत पोहोचेल.
महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री स्वातंत्र्याविषयी जागृती केली पाहिजे.तरच निश्चितपणे महिला पुरुषाच्याबरोबरीने कार्य करताना दिसतील. त्यांना आपण संधी देऊया, निश्चितपणे उद्याची कल्पना चावला निर्माण होईल. अशी आशा आहे.

हे सुद्धा वाचाShahu Maharaj Information In Marathi

निष्कर्ष | Conclusion

आम्ही दिलेल्या माहितीचा उपयोग तुम्ही Women’s Day Speech In Marathi, Mahila Din Speech In Marathi या भाषणसाठी उपयोग करू शकता.Women’s Day Speech In Marathi भाषण एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे. वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काही कॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

Leave a Comment