जाणून घ्या टॉप  १० मराठी उखाणे 

जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र, … च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.

नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व, … आहे माझे जीवन-सर्वस्व.

अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा, …. ला घास घालतो वरण-भात-तुपाचा

दही चक्का तुप, … आवडते मला खुप.

सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, … राणी माझी घरकामाता गुंतली.

साखरेचे पोते सुईने उसवले, …. ने मला पावडर लावून फसविले.

जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर … सारथी.

हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात, … च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते, ….. रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.