समास आणि त्यांचे प्रकार उदाहरणासहित | Samas in Marathi

5/5 - (8 votes)

समास म्हणजे काय ?

Samas in Marathi – भाषेचा वापर करताना दोन किंवा अधिक शब्दाऐवजी आपण एकाच शब्दाचा उपयोग करतो. उदा. ‘चंद्राचा उदय ‘ असे न म्हणता आपण ‘चंद्रोदय’ असे म्हणतो.

शब्दांच्या अश्या एकत्रीकरणास समास असे म्हणतात. ‘सम+ अस ‘ या संस्कृत धातूपासून ‘समास’ हा शब्द तयार झाला. समास म्हणजेच ‘एकत्र करणे’.

शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो, त्याला “सामासिक शब्द” असे म्हणतात. आणि सामासिक शब्द समजण्यासाठी त्याची जेव्हा फोड केली जाते अश्या शब्दला “विग्रह” असे म्हणतात.

सामासिक शब्दविग्रह
वनभोजनवनातील भोजन

समासाचे प्रकार-

समासामध्ये दोन किंवा अधिक शब्द एकत्र येतात. आणि त्यामधील कोणत्या शब्दाला किंवा कोणत्या पदाला महत्व, येऊन समासाचे प्रकार ठरविण्यात आलेत.

samas in marathi

अव्ययीभाव समास | Avyavibhav Samas –

Avyayibhav samas examples in Marathi – जेव्हा समासात पहिला शब्द महत्त्वाचा असतो.या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात.

जन्म – जन्मापासून यथाशक्ती- शक्तीप्रमाणे
प्रतिदिन- प्रत्येक दिवशीप्रतिक्षण – प्रत्येक क्षणाला

वरील उदाहरणामध्ये ‘आ, यथा, प्रति‘ हे संस्कृत मधील उपसर्ग आहेत. वर दिलेल्या उदाहरणाचा विग्रह केल्यास पहिल्या शब्दास अधिक महत्व आहे. यामुळे वरील सर्व उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत.

तत्पुरुष समास | Tatpurush samas –

Tatpurush samas examples in Marathi – ज्या समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते म्हणजेच दुसरा शब्द मह्त्वाचा असतो. त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.

तोंडपाठ– तोंडाने पाठकंबरपट्टा– कंबरेला पट्टा
महादेव– महान असा देवनिष्ट– नाही इष्ट ते

तत्पुरुष समास चे प्रकार खालील प्रमाणे

(अ) विभक्ती-तत्पुरुष समास-

ज्या समासात कोणत्यातरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात. त्यास विभक्ती-तत्पुरुष समास असे म्हणतात.

सामासिकविग्रह समासआणखी उदाहरणे
दुःखप्राप्तदुःखाला प्राप्तद्वितीया तत्पुरुष कृष्णाश्रित, देशगत.
भक्तिवश भक्तीने वशतृतीया तत्पुरुषतोंडपाठ, गुणहीन, चौपट, ईश्वरनिर्मित बुद्धिजड
क्रीडांगणक्रीडेसाठी आंगणचतुर्थी तत्पुरुषगायरान, पोळपाट, वाटखर्च, मेंढवाडा, पूजाद्रव, बाइलवेडा, व्याहीभोजन
ऋणमुक्तऋणातून मुक्तपंचमी तत्पुरुषसेनानिवृत्ती, गर्भश्रीमंत, जातिभ्रष्ट, चोरभय, जन्मखोड, लंगोटीमित्र
राजपुत्रराजाचा पुत्रषष्टी तत्पुरुषदेवपूजा, राजवाडा, घोडदौड, लक्ष्मीकांत, धर्मवेड, आंबराई, भूपती
घरजावईघरातील जावईसप्तमी तत्पुरुषस्वर्गवास, पोटशूळ, वनभोजन, कूपमंडूक, घरधंदा, कलाकुशल

(आ) अलुक तत्पुरुष समास –

ज्या विभक्ती समासात पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही. त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. (अलुक – लोप न होणारे)

उदाहरण – अग्रेसर, युधिष्टिर, पंकेरूह या शब्दाच्या पहिल्या पदातील ‘अग्रे, युधी, पंके’ हि त्या त्या शब्दाच्या संस्कृतमधील सप्तमीची पदे न गालात तशीच राहिली आहेत.

(इ) उपपद तत्पुरुष समास-

या समासात दुसरे पद हे प्रधान असते त्याचप्रमाणे त्यातील दुसरी पदे धातुसाधित किंवा कृदन्ते आहेत, त्याचा स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही अशा समासास उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात.

पुढील काव्यपंक्ती पहा.
(१). शैवाले गुंतले तरि पंकज हे शोभते |
(२). गडद निळे, गडद निळे, जलद भरुनी आले

पंकज = पकांत ( चिखलात ) जन्मणारे
जलद = जल देणारे

(ई) नत्र तत्पुरुष समास –

ज्या पदाची पहिली पदे ‘अ, अन, न, ना, बे, नि, गैर’ सारख्या अभाव किंवा निषेध दर्शवणारी आहेत. अशा रीतीने ज्या तत्पुरुष समासाची पहिले पद हे नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात.

उदा. माझा निबंध अपुरा राहिला.
अजामिळ हा नास्तिक होता,

(उ) कर्मधाराय समास | Karmadharaya samas –

Karmadharaya samas examples in Marathi -ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तील म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात, तेव्हा त्यास कर्मधाराय समास असे म्हणतात.
उदा . महादेव (महान असा देव)
घनश्याम (घनासारखा श्याम)

(उ). द्विगु समास | Dvigu samas –

Dvigu samas in Marathi – ज्या कर्मधाराय समासामधील पहिले पदे हि संख्याविशेषाने असतात अश्या समासाला द्विगु समास असे म्हणतात.
उदा. (१). रामचंद्र पंचवटीत राहत होते.
(२). नवरात्रात देवीचा उत्सव असतो.

(ए). मध्यमपदलोपी समास-

सामासिक शब्दाचा विग्रह करताना पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारी मधली काही पदे लोप करावी लागतात. अश्या समासाला मध्यमपदलोपी समास असे म्हणतात.
उदा. डाळवांगे – वांगेयुक्त डाळ
>पुरणपोळी – पूर्ण भरून तयार केलेली पोळी
>लंगोटीमित्र- लंगोटी घालत असल्यापासून चा मित्र

द्वंद्व समास | Dwandwa samas-

Dwandwa samas in Marathi -ज्या समासामध्ये दोन्ही पदे किंवा दोन्ही शब्द महत्वाची असतात. अश्या वेळी त्यांना द्वंद्व समास असे म्हणतात. द्वंद्व समास हे उभयान्वयी अव्ययांनी हि पदे जोडली जातात.

राम लक्ष्मण राम आणि लक्ष्मण
पापपुण्यपाप आणि पुण्य
विटी दांडूविटी आणि दांडू

द्वंद्व समासाचे सुद्धा तीन प्रकार पडतात.

(अ) इतरेतर द्वंद्व समास

ज्या समासाचे विग्रह करतांना ‘आणि’ ‘व’ या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात.
उदा. आईबाप (आई आणि बाप),
हरिहर (हरी आणि हरी)

(आ) वैकल्पिक द्वंद्व समास

ज्या समासाचे विग्रह करतांना ‘किंवा’ ‘अथवा’ ‘वा’ या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात.
उदा- खरेखोटे ( खरे किंवा खोटे ),
तीनचार (तीन किंवा चार),
बरेवाईट (बरे किंवा वाईट)

(इ) समाहार द्वंद्व समास

ज्या समासाचे विग्रह करतांना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचा ही त्यात समावेश केला जातो . त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात.
उदा- चहापाणी (चहा, पाणी आणि इतर पदार्थ)
भाजीपाला (भाजी, पाला व मिरची, कोशिंबीर यांसारख्या इतर वस्तू)

बहुव्रीही समास | Bahuvrihi samas –

Bahuvrihi samas examples in Marathi -ज्या समासामध्ये शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो.त्यास बहुव्रीही समास असे म्हणतात.

पार्वतीने निळकंठास वरले.
समुद्राने पीतांबराला आपली कन्या दिली.

प्रथम उदाहरणामध्ये ‘नीलकंठ’ या सामासिक शब्दाचे विग्रह ‘निळा आहे कंठ असा तो’ असा आहे. ‘कंठ’ या शब्दावर जोर दिला जातो आणि ‘निळा’ हे त्याचे विशेषण आहे.

दुसऱ्या उदाहरणामध्ये ‘पितांबर’ म्हणजे पीत (पिळवे) असे वस्त्र. यामध्ये पितांबर चा वस्त्र असे न घेता. इथे ‘पितांबर म्हणजे विष्णू’. त्यामुळे इथे विष्णू या तिसऱ्या पदाला महत्व आहे.

बहुव्रीही समासाचे मुख्य चार प्रकार पडतात.

(अ)विभक्ती बहुव्रीही समास –

ज्या बहुव्रीही समासाच्या शेवटी एक संबंधी सर्वनाम येते.त्यास विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.
उदा. लक्ष्मीकांत – लक्ष्मीचा जो कांत तो (षष्ठी)
गजानन- गजाचे आहे आनण ज्याला तो (चतुर्थी)

(आ) नत्र बहुव्रीही समास –

ज्या बहुव्रीही समासाचे ची पदाची सुरवात नकारार्थी शब्दांनी होते. त्यास नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात.
उदा.
अनंत- नाही अंत ज्याला तो (परमेश्वर)
निरस – नाही रस ज्यात ते (काव्य)`

(इ) सहबहुव्रीही समास-

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद ‘सह’ अश्या अव्ययांनी होते. अश्या वेळी त्यास सहबहुव्रीही समास असे म्हणतात.
उदा. सादर – आदराने सहित असा जो
सहकुटुंब- कुटुंबाने सहित असा जो

(ई) प्रदीबहुव्रीही समास-

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद जर ‘प्र, परा, अप, दूर, सु, वि ‘ अशा उपसर्गानी युक्त असेल, तर त्यांना प्रदीबहुव्रीही समास असे म्हणतात.
उदा. सुलोचना, निर्धन, विरामी, दुर्गुणी

समासविषयक काही महत्वाच्या गोष्टी –

  1. एकाच सामासिक शब्दाचे अनेक प्रकारे विग्रह करता येते. अशा वेळी अर्थास अनुसरून त्याचे विग्रह करावे.
    उदा .
    असत्य– नाही सत्य ते, सत्य नसलेला (नत्र तत्पुरुष)
    असत्य – नाही सत्य त्यात असे (भाषण) (नत्र बहुव्रीही)
  2. समासातील पदे संसृकमधून आलेली असतील तर त्यांचा संधी करावा.
  3. भिन्न भाषेतील समास टाळावा.
  4. सामासिक शब्दाचे लिंग आणि वाचन हे शेवटच्या शब्दावरून ठरवितात व विभक्तीचे प्रत्यय शेवटच्या शब्दाला लावतात.
  5. द्वंद्व व तत्पुरुष समास असलेले शब्द नामे किंवा विशेषण असतात.
    • अव्ययीभाव समास असलेला शब्द क्रियाविशेषण असतो.
    • बहुव्रीही समास असलेला शब्द विशेषण असतो.

निष्कर्ष | Conclusion

आज आपण मराठी व्याकरण मधील समास आणि त्यांच्या प्रकाराबद्दल संपूर्ण माहिती पहिली. तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला या [email protected] यावरती मेल करू शकता. आम्ही तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर देऊ.

समासाचे किती प्रकार आहेत ?

समासामध्ये एकूण सहा प्रकार आहेत.

Sharing Is Caring:

Professional content writer and SEO Expert