Positive Marathi Poems On Life 2023|आयुष्यावरील मराठी कविता

5/5 - (1 vote)

Positive Marathi poems on life– आयुष्यावरील मराठी कविता खूप मनोरंजक आहे ती आपल्याला आपले ध्येय गाठण्यासाठी वेगळी ऊर्जा देते. मराठी कविता आपल्याला यश मिळविण्यासाठी प्रेरणा देते.

Positive Marathi Poems on Life| जीवनावरील सकारात्मक मराठी कविता

शीर्षक :- “जीवन असच जगायचं असत”

थोडं दुख थोडं सुख झेलायच असतं
कळी सारखं सुंदर फुलात उमलयचा असत.
जीवन असंच जगायचं असत.
वार्यासंगे भिरभिरायचं असत,
उन्हा संगे तळपायच असत पावसासंगे बरसायचं असत,
जीवन असच जगायचं असत,
अत्तरासंगे दरवळायचं असत,
भुग्यासोबत गुनगुनायचं असत,
जीवन असच जगायचं असत.
फुलपाखरा संगे फिरायचं असत,
सप्तरंगात डूबायच असत.
जीवन असंच जगायचं असत ,
भूतकाळ संगे आठवायचं असत .
वर्तमान संगे खोलायचं असत ,
जीवन असच जगायचं असत.
दुःखाला जवळ करून ,
भविष्यकाळ घडवायचा असतो,
जीवन असच जगायचं असत .


Positive Marathi Poems on Life | शीर्षक :- “जगायला शिका”

दुःख तर प्रत्येकाच्याच नशिबात लिहिलं असते.
पण प्रत्येकाच्या त्या दुःखाला सामोरे जाण्याची,
ते दुःख पचवून घेण्याची पद्धत वेगवेगळी असते.
जो व्यक्ती त्याच्या दुःखाचा जास्त विचार करतो आणि
सतत
त्या दुःखाला बिलघून राहतो त्याला त्या दुःखाचा खूप त्रास होतो.
म्हणून तू किती मोठी आहे आणि त्याची मर्यादा ठरवणे हे ही आपल्याच हातात असते.
म्हणून सर्व दुःख विसरून हे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा…
कारण हे आयुष्य आपल्याला
एकदाच मिळते आयुष्य खूप सुंदर आहे,
फक्त तुम्ही ते जगायला शिका ….


Positive Marathi Poems on Life | शीर्षक :- “जीवन”

चालणारे दोन पाय किती विसंगत
एक मागे असतो एक पुढे असतो
पुढच्या अभिमान नसतो
मागच्याला अपमान नसतो
कारण त्यांना माहिती असतं
क्षणात हे सारे बदलणार असतो
याचंच नाव जीवन असतं
याचंच नाव जीवन असतं


Positive Marathi Poems on Life | शीर्षक :- “आयुष्य कसं असतं हे कोणाला माहिती नसत”

आयुष्य कसं असतं हे कोणाला माहिती नसत!!!
पण ज्याला पण ज्याला माहित असत त्याचा जीवन नेहमी सुखी असत!!
प्रत्येक वाटेवर दुःख असत पण हे माहित असतानाही
आपली वाट काढत चालणार त्या सुखाच्या वाटेकरी असतो!!!
वाट वाट जरी चुकीची असली तरी उद्देश मात्र खरे असणे आवश्यक असते!!!
पण शक्यतो वाट अर्थात मार्ग नेहमी सत्य असला पाहिजे!!!


Positive Marathi Poems on Life | शीर्षक :- “निराश होऊ नकोस”

जर तुझा काल मनासारखा गेला नसेल
तर निराश होऊ नकोस लक्षात ठेव मित्रा
देवाने आज बनवलाय फक्त तुझ्यासाठी
पुन्हा नव्या जोमाने सुरुवात करण्यासाठी.


Positive Marathi Poems on Life | शीर्षक :- “आयुष्यात जिंकाल”

आयुष्यात जिंकाल तेव्हा असेच जिंका की जणू
विजयाची सवयच आहे,
हराल तेव्हा असे हारा की जणू सतत जिंकायचा
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे


Marathi Poem | शीर्षक :- प्रेम असतं एक –

प्रेम असते एक भावना
किशोर मनातील प्रोढ याचना
प्रेम असते मनांचा हव्यास
त्यात असतो आनंदाचा निवास..

प्रेम असते एक लाट
भावनांचं सागर जे उफाळती
प्रेम असते दोन मनांचा मिलाप
गात असतो आपलाच अलाप

प्रेम असते एक बंधन
हृदयाचे सौंदर्य वाढवणारे चंदन
प्रेम असतं मनातील अदृश्य गोंदणं
उगवतं सहजीवनी नात्यांचं चांदणं.


Marathi Poem शीर्षक :- “खरे प्रेम असावे”

खरे प्रेम असावे…..
कमळासारखे, जे पाण्याची
साथ कधीच सोडत नाही,
त्याच्याशि वाय ते कधीच
उगवत नाही….

खरे प्रेम असावे…..
गुलाबासारखे, जे कोमल
आणि सुगंधी जरी असले,
तरी काटयाची साथ कधीच
सोडत नाही….
खरे प्रेम असावे…..

आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण. .
कुठेही गेले तरी न संपणारे,
सदैव आपल्या बरोबर असणार
कारण…..
प्रेम हा काही खेळ नाही,
टाइम-पास करण्याचा तो
वेळ नाही…


Marathi Poem | शीर्षक :- “आई “

नाही कोणी का कुणाचा । बाप-लेक, मामा-भाचा,
मग अर्थ काय बेंबीचा । विश्वचक्री? ॥

आई गोंजारते मुला । कासया हा बाप-लळा,
बाईलप्रीतीच्याही कळा । कशास्तव? ॥

येतें ऊर कां भरून । जाती आतडीं तुटून,
कुणी कुणाचा लागून । नाही जर? ॥

कैसा बांधला देखावा । जननमरणांतून देवा,
कुशीकुशींत गिलावा । रक्तमांसीं? ॥

का हें बांधकाम सुंदर । फक्त नश्वरतेचेंच मखर
अथवा दर्शनी महाद्वार । मिथ्यत्वाचें? ॥

मग कोठे रे इमारत । जिचें शिल्पकाम अद्भुत,
जींत चिरंतनाचा पूत । वावरें की? ॥

जरी कुठे ऐसें धाम । ज्याच्या पायऱ्याही अनुपम
आणि चुना-विटा परम । चिरस्थायी ॥

तरी मग रोकडा सवाल । कोरिसी हाडांचा महाल,
ठेविशी त्यांत हरिचा लाल । नाशवंत ॥

वास्तुशास्त्र कां बिलोरी । योजिशी येथेच मुरारी,
घडसी वस्तीला भाडेकरी। बिलोरीच


Marathi Poem | शीर्षक :- “जगमय झालो”

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले.

हे सुद्धा वाचा – Love Poems In Marathi


Marathi Poem |शीर्षक :- “भय इथले संपत नही”

भय इथले संपत नही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते

ते झरे चंद्रसजणांचे
ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांत पुन्हा उगावाया

तो बोल मंद हलकासा
आयुष्य स्पर्शुनि गेला
सीतेच्या वनवासातिल
जणु अंगी राघव शेला

स्तोत्रांत इन्द्रिये अवघी
गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे
भय इथले संपत नाही

मराठी कविता बघायचा असतील तर Youtube लिंक वर क्लिक करा :- Love Poem In Marathi


Marathi Poem | शीर्षक :- ” एखाद्याचे नशीब”

काही गोड फुले सदा विहरती स्वगागनांच्या शिरी,
काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी
काही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि ते
एकादें फुटके नशीब म्हणुन प्रेतास शृंगारिते !

कोणी पर्वत आपुल्या शिरिं धरि हेमप्रभा शीतला,
कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला
कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,
एकाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !

झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळया पानांवरी नाचती
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !

चाले खेळ असा जगांत; बहुधा सौख्यांत सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवी यापरी
पाही कोण अशा हताश हृदया? जो तो असे आपला,
देवा ! तू तरि टाकि अश्रु वरुनी, त्यासाठी तो तापला !


Marathi Poem | शीर्षक :- जोगिया

कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग
दुमडला गालिचा, तक्‍के झुकले खाली
तबकात राहिले देठ, लवंगा, साली.

झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी अजुनी नाही नीज ?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलुनी तू दार दडपिले पाठी.

हळुवार नखलिशी पुनः मुलायम पान
निरखिसी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसी काय ते ? – गौर नितळ तव कंठी
स्वरवेल थरथरे फूल उमलते ओठी.

साधता विड्याचा घाट, उमटली तान
वर लवंग ठसता होसी कशी बेभान ?
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने
“का नीर लोचनी आज तुझ्या ग मैने ?”

त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग
हालले, साधला भाव स्वरांचा योग
घमघमे, जोगिया दंवात भिजुनी गाता
पाण्यात तरंगे अभंग वेडी गाथा.

“मी देह विकुनिया मागुन घेते मोल
जगविते प्राण हे ओपुनिया ‘अनमोल’
रक्‍तात रुजविल्या भांगेच्या मी बागा
ना पवित्र देही तिळाएवढी जागा.

शोधीत एकदा घटकेचा विश्राम
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम
सांवळा तरुण तो खराच ग वनमाली
लाविते पान… तो निघून गेला खाली.

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेहि नाहि मी मंगल त्याचे नाव
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
“मम प्रीती आहे जडली तुजवर राणी !”

नीतिचा उघडिला खुला जिथे व्यापार
बावळा तिथे हा इष्का गणितो प्यार
हासून म्हणाल्ये, “दाम वाढवा थोडा …
या पुन्हा, पान घ्या …” निघून गेला वेडा !

राहिले चुन्याचे बोट, थांबला हात
जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत
पुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला
तो कशास येईल भलत्या व्यापाराला ?

तो हाच दिवस हा, हीच तिथी, ही रात
ही अशीच होत्ये बसले परि रतिक्लांत
वळुनी न पाहता कापित अंधाराला
तो तारा तुटतो- तसा खालती गेला.

हा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान
त्या खुळ्या प्रीतीचा खुळाच हा सन्मान
ही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनी अंगे
वर्षात एकदा असा ‘जोगिया’ रंगे.


Conclusion

आम्ही ब्लॉग मध्ये दिलेली कविता एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काहीकॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.

Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

Leave a Comment