Marathi Jokes-मराठी विनोदाच्या चरमसिद्ध अंश, त्याच्या जणीकट भाषेच्या सर्व वाचनांत व विचारांत आपल्याला हसवणारा आहे. मराठी जोक्सला म्हणता आपल्या चेहऱ्यावर असे हास्यरूप पुन्हा येतो, ज्याने आपल्या सुख-समाधानाला वाढवून टाकतो. मराठी जोक्सल्या सामाजिक, राजकीय, व सांस्कृतिक विचारांकिंवा आपल्या दैनंदिन जीवनातील घडणांच्या सर्व बाजूला आहे.तर पाहूया Comedy Jokes, Marathi jokes, funny jokes in Marathi.
अनुक्रमणिका
Marathi Jokes
45 वर्षांचा सलमान खान मुलगी बघायला जातो…
त्याला पाहून मुलीची आई बेशुद्ध पडते..
शुद्धीवर आल्यावर बेशुध्द होण्याच कारण विचारलं..
तर म्हणाली..
“अग 20 वर्षांपूर्वी हा मला पण बघायला आला होता..
सलमान खान : मुझपर एक एहसान करना के मुझपर कोई एहसान ना करना…
सलमानचा ड्रायवर : मग कोर्टात सांगु का की गाडी तूच चालवत होतास ….?
सलमान खान : अरे चेष्टा करत होतो…तु लगेच सीरियस झाला
पेट्रोल आता तेव्हाच स्वस्त होइल
जेव्हा ते
चाइना वाले काढतील……
डिलिवरी च्या वेळेस ….बायको – देवा, मुलगा होऊ दे ….
नवरा – देवा, मुलगी होऊ दे प्लीज
.देव – माकडांनो गप्पा बसा , नाही तर असा आयटम बनवेल , कि तुम्ही दोघपण रडत बसाल,आणि तो टाळी वाजवेल .
Marathi Jokes
एका सभेत अत्रे ह्यांचे भाषण सुरु होते, मध्येच टवाळ माणूस
ओरडला,
”अत्रे तुम्ही कुत्रे….”
काही वेळ सर्वत्र शांतता पसरली.
.
.
अत्रे त्याला म्हणाले, “ठीक आहे. मग तुम्ही विजेचा खांब
आणि मोटारीचे टायर ! 🙂
चम्या: आयुष्यात लहान लहान गोष्टीच खूप त्रास देतात…
चिंगी : कसं काय?
चम्या: एकदा टाचणीवर बसून बघ!!!
गंप्या एका मुलीला मिनी स्कर्ट मध्ये पाहतो आणि विचारतो तुला आई ओरडत
नाही का?
ती मुलगी :- हो,
.
.
आजच ओरडली, तिचा ड्रेस घातला म्हणून…
एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं..
ती भडकली,
तीने त्याला धू धू धुतला..
अगदी लोळवला..
तो कपडे झटकत उठला..
आणि म्हणाला..
तर मग मी नाही समजू का..? 😀
तीन उंदीर गप्पा मारत असतात
पहिला उंदीर :
मी विषारी गोळ्या आरामातचघळतो.
दुसरा उंदीर : मी पिंजर्यातील पनीर
आरामात खावून बाहेर येतो.
तिसरा उंदीर उठतो आणि जायलालागतो,
पहिला आणि दुसरा उंदीर विचारतात,
काय झाल कुठे चालला?
.
.
.
. .
.
.
.
तिसरा उंदीर म्हणतो
आलोच मांजरीचा कीस घेवून… !
मी ११ वी मध्ये होतो
तेव्हा ची गोष्ट
एकदा मी एका मित्राच्या भावाच्या लग्नात
सायकलचे ब्रेक घेवुन नाचत होतो
.
.
तेवड्यात मला नवरदेवाणे जवळ बोलावले
आणि: ये हे काय करतोयस?
.
.
मी : दिसत नाय का रताळ्या
ब्रेक डांस……
Marathi Jokes
रजनीकांत: लहानपणी माझ्या घरात लाईट नव्हती,
म्हणून मी”अगरबत्ती लाऊन अभ्यास केला..!
.
मक्या : हो का ? आमच्याकडे पण लोड शेडींग असायचं,
नि अगरबत्ती पण नव्हती,
मग काय माझं एक दोस्त व्हता,
‘प्रकाश’नावाचा,
त्याला सोबत बसून अभ्यास केला,.
. पण पुढे तो पावसात भिजला नि विझला…
. … . …
रजनीकांत: मग काय केलं?. . . . . …
.
.
..मक्या : काय नाय, एक मैत्रीण पण होतो….
‘ज्योती’नावाची. ..
जोशी काकूंच्या दारावर चिंटू
टकटक करतो.
जोशी काकू – कोण आहे?
चिंटू – मी
जोशी काकू – मी कोण?
चिंटू – तुम्ही जोशी काकू
जुली फणकारतच बॉसच्या केबिन बाहेर आली,
रिसेप्शनिस्ट : का ग? काय झाल?
जुली : बॉस ने विचारला ” आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का? मी म्हटल हो
रिसेप्शनिस्ट : वॉव, मग?
जुली : कसलं वॉव आणि कसलं काय, हि ५० पान दिली टाइप करायला…
झम्प्याची प्रेयसी ( फुल लाडात येऊन )
त्याला म्हणते..
..
काळे काळे ढग दाटून आले कि,
तुझी आठवण येते..
ओल्या मातीचा सुगंध आला कि,
तुझी आठवण येते..
थेंबाचा टपटप आवाज आला कि,
तुझी आठवण येते…
.
.
झंप्या लगेच तिला म्हणतो….” हा हा….माहित आहे ..माहित आहे..
तुझी छत्री अजून माझ्याकडेच आहे म्हणून..देतो तुला उद्या “
शिक्षिका – चल अल्फाबेट म्हण गोलू .
गोलू – A – – – E F G H I J K L M N O – Q R S T U V W X Y Z
.
शिक्षिका – अर्रे मुर्खा B P C D कुठंय ? ? ? !
.
.
गोलू – कालच मित्राला दिली ! 😉
शिक्षिका – बंड्या
शिक्षिका – मुलानो १ कविता पाठ केली तर मी गालाचा किस देणार ,
२ केल्या तर ओठाचा देणार .
.
.
बंड्या – बाई अंथरूण टाका माझ्या सगळ्या कविता पाठ झाल्या ! ! !
मराठी विनोद
चिंगी – जर चान्स भेटला तर माझ्याशी लग्न करशील चम्प्या??? .
.
.
.
… .
.
.
चम्प्या – जर चान्स भेटला तर लग्न करायची काय गरज आहे…
बंडू: आजोबा हे फ्यामिली प्लानिंग म्हणजे
काय?
आजोबा: (रागावून)मला माहित नाही चल
दुसरीकडे जाउन खेळ ..
.
. .
.
.
.
.
. .
.
.
.
.
. बंडू: मला माहितीये थेरड्या तुला माहित
नाही फ्यामिली प्लानिंग म्हणजे काय
तुला जर माहिती असत तर तुझ्या प्रोपरटीचे १२ हिस्से झाले नसते ..
सून सासूला म्हणाली,
‘‘तुम्ही दागिने घालू नका.
सगळे दागिने मला देऊन
टाका.’’
सासू म्हणाली, ‘‘अगं, पण मग
मी काय घालू?’’
.
.
.
सून म्हणाली,
‘‘तुम्ही सूर्यनमस्कार
घाला.
उत्तम आरोग्य हाच
खरा दागिना!!’
Comedy jokes
मुलगी bike वर
मुलगी : अरे माझ्या पप्पानी मला तुझ्या bike वर बघितले !!!! !!!
. .
. .
मुलगा : !!! काय म्हणाले मग तुला ???
.
.
.
मुलगी : काय सांगू तुला… माझ्याकडून बस चे पैसे परत घेतले , . . .
खूप strict family आहे माझी 🙂
मराठी विनोद
अमेरिकेतील एक इंजिनीअर
पुण्यात आप्पा बळवंत चौकात
येतो …
…
रस्त्यावर एक पुस्तक
पाहून
तो चक्कर येवून
पडतो ,
पुस्तकाचे नाव असते ,
.
.
.
.
‘३० दिवसात इंजिनीअर बना’ !!! 🙂
मराठी विनोद
मुलगी: तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय करतोस…???
मुलगा: मी तुझे आवडीचे चॉकलेट खातो… आणि तू काय करतेस…???
.
.
मुलगी: मी “माणिकचंद” च्या २ पुड्या खाते
हे सुद्धा वाचा – Funny jokes in Marathi
मध्यम वयाची शिक्षिका शाळेत व्याकरणातले काळ शिकवत असते….
सोप्पा प्रश्न विचारते….
सांगा, “मी सुंदर आहे…”
हा कोणता काळ आहे???
.
.
कोपरातून आवाज येतो, “भूत-काळ” भवाने
मराठी विनोद
स्त्री – हेल्लो कोण बोलताय ?
बंडू – मी बंडू बोलतोय … सर आहेत का ???
स्त्री – सर वारले आहेत … पण तू किती वेळा फोन करून हेच विचारतोस ???
बंडू – ऐकायला बरे वाटते ओ 🙂
अमिताभ:- हम जहासे खडे होते है, लाईन वही से शुरू होती है.
+
+
+
दादा कोंडके:- काय तुझा बाप रोकेल ची गाडी चालवायचा कि काय..?
पृथ्वी म्हणाली चंद्राला मी तुझ्यावर प्रेम करते.
. .
. .
पृथ्वी म्हणाली चंद्राला मी तुझ्यावर प्रेम करते
.
.
.
चंद्र म्हणाला
मग कशाला मरायला सूर्याभोवती फिरते !
मराठी विनोद
पुण्याच्या गर्लफ्रेंड ला बर्थडे गिफ्ट काय द्यावे!!!!
.
.
.
.
.
4-5 स्कार्फ द्या….आनंदाने उड्या मारेन
Comedy jokes
रिकाम्या जागा भरा
शिक्षक : (बाळूला)
रिकाम्या जागी योग्य शब्दभर
काचेच्या घरात
राहणार्यांनी… …………… .
बाळू : लाईट बंद करून कपडे
बदलावे……
प्रियकर (प्रेयसीला) : “दुनिया भुलाई मैने तेरे लिये” … “जन्नत सजाई मैने तेरे लिये”
.
पर तुमने क्या किया मेरे लिये?
.
.
.
.प्रेयसी : “मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये”
हे सुद्धा Youtube वर पहा– Marathi jokes
पत्नी : तू तुझ्या मित्रांना असं का सांगितलंस की, मी खूप चांगला स्वयंपाक
करते?
पती : तुझ्याशी लग्न करण्याचं काही तरी कारण त्यांना सांगायला हवं होतं ना!
मराठी विनोद
बंता : चुकी झाल्यावर माफी मागणारा माणसाला काय म्हणतात?
संता : समजदार
बंता : फारच सुंदर आणि चुकी नसताना मागानारयाला काय म्हणतात?
संता : बॉयफ्रेंड
मराठी विनोद
एकदा झंप्याला exam madhye काहिच येत नाही..
..
तो पेपर मध्ये लिहितो
..
..
“गाय हमारी माता है,
हमे कुछ नही आता है!”
..
..
त्या वर सर रीमार्क लिहितात
..
..
“बैल तुम्हारा बाप है,मार्क देना पाप है
राज ठाकरे साहेब ईफेक्ट !!
.
.
.
शिक्षकः तू नेहमी ऊशिरा का येतो? तुझे मित्र
बघ कसे वेळेवर येतात.
तुला त्यांच्याबरोबर झुंडीने यायला काय
झाले? .
.
.
विद्यार्थीः सर, झुंडीने तर कुत्रे येतात, वाघ
नेहमी एकटाच येतो.
comedy jokes
1000 मुलीँने Suicide केला..
300 कोमामध्ये आहे.
.
.
आणि,100 मुली बेशुध्द झाल्या..
.
.कारण…!!
.
.
कोणत्या तरी हरामखोराने
अफवा पसरवली की….
.
.
मिस-काँल केल्याने 20 पैसे कटतात…
मराठी वाक्याचे दोन अर्थ या विषयावर
शाळेत मराठीचा क्लास चालू होता.
बाई : हे बघा मुलांनो ,
मराठी मध्ये प्रत्येक वाक्याचे २ अर्थ काढता येतात!!
…
मन्या : बाई काढून दाखवा ना !!!!!
बाई ( लाजुन ) : खाली बस मन्या येडया !
तुझ्या या वाक्याचे देखील २
अर्थ निघतात !
मराठी विनोद
एकदा एका रिक्षात प्रेमी कीस करत होते ..!!
.
ड्रायवर त्यांना आरशातून बघत होता…
.
पुढे जाऊन त्यांचा एक्सिडेंट झाला ..
.
मग
डोक्याला त्याने हात लावला आणि म्हणाला …
.
आयचा घो मला आता समजलं टायटानिक का बुडल ते ..!!
शाळा तपासणी अधिकारी – बाळ तुझा नाव काय ?
बाळ – पांडू
शाळा तपासणी अधिकारी – बाळा पांडू नाही …. पांडुरंग बोलायचं ….(दुसऱ्या मुलाकडे बघून) ….. हा बाळ तुझा नाव काय??
दुसरा मुलगा – बंडूरंग
Conclusion
आम्ही ब्लॉग मध्ये दिलेले Comedy Jokes, Marathi jokes, funny jokes in Marathi.एकदम सोप्या पद्धतीने लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काही कॉपीराईट [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता. तुम्हाला अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.तुम्हाला अडचण असल्यास मेल करा तुम्हाला २४ तासामध्ये उत्तर दिले जाईल.