chanakya niti adyay 2 – (chankya niti marathi )चाणक्य यांनी खूप ग्रंथांचे लेखन केले आहेत. चाणक्य यांनी लिहून ठेवलेल्या संस्कृत ग्रंथ च्या लिखाण वरून भरपूर मराठी मध्ये याचे भाषांतर केले गेले आहे. आणि त्या नुसार आता च्या या जगात भरपूर गोष्टी अजून तश्या च्या तश्या सुरु आहेत. आणि भरपूर गोष्टी त्यातून शिकण्यासारख्या आहेत. त्यामुळे काही आहे ” Chankya niti Marathi ” या लेख मध्ये त्यांचे सर्व अध्याय मराठी मध्ये हुबेहूब तसेच दिले आहेत.
खाली दिलेली सर्व श्लोक आणि त्यांचे भावार्थ हे चाणक्य नीती अध्याय – १ यातून घेतलेले आहेत.(chankya niti marathi)
अनुक्रमणिका
- 1 chanakya niti adhyay 2 | चाणक्य नीती मराठी –
- 1.1 chanakya niti adhyay 2 | चाणक्य नीती – अध्याय 2
- 1.1.1 1).स्त्रियांचे स्वभावदोष-
- 1.1.2 2) नशिबवानालाच जीवनात सुख मिळते.
- 1.1.3 3).सुख कशाला म्हणावे ?
- 1.1.4 4).चांगुलपणाची व्याख्या –
- 1.1.5 5).मित्राची योग्य परीक्षा करा –
- 1.1.6 6).बोलताना भान ठेवावे.
- 1.1.7 7).स्वतःबद्दल फार माहिती दुसऱ्याला विनाकारण देऊ नये
- 1.1.8 8).परवशात हे सर्वात वाईट जिणे.
- 1.1.9 9).जगातील सज्जनांची दुर्मिळता –
- 1.1.10 10).विद्याकॊशल्याचे महत्व –
- 1.1.11 11).मुलांना न शिकवणारे पालक च वैरीच होतात –
- 1.1.12 12).मुलांशी कसे वागावे ? –
- 1.1.13 13).विध्यार्थ्यानी वेळ अजिबात वाया घालवू नये.–
- 1.1.14 14) शरीराला धसणारी दुःखे –
- 1.1.15 15). विनाश कसा होऊ शकतो ? –
- 1.1.16 16).प्रत्येकाचे बळ वेगळे –
- 1.1.17 17). जागी हा खास स्वार्थाचा बाजार मांडला सारा –
- 1.1.18 18) काम झाले कि कुणी थांबून राहात नाही –
- 1.1.19 19). असंगाशी संग प्राणाशी गाठ –
- 1.1.20 20). नात्याप्रमाणे वागावे –
- 1.1 chanakya niti adhyay 2 | चाणक्य नीती – अध्याय 2
- 2 chanakya niti PDF Marathi | चाणक्य नीती मराठी PDF
- 3 Conclusion | निष्कर्ष –
chanakya niti adhyay 2 | चाणक्य नीती मराठी –
chanakya niti adhyay 2 | चाणक्य नीती – अध्याय 2
1).स्त्रियांचे स्वभावदोष-
अनृतं साहसं माया मूखत्वमतिलुब्धता |
अशौचत्वं निद्रयत्वं स्त्तीणां दोषा स्वभावजाः ||
भावार्थ -स्त्रिया खोटे बोलणाऱ्या असतात, त्या नको ते साहस करतात, त्याचसोबत मूर्खपणा करणे, लोभीपणा करणे, अस्वच्छ राहणे आणि स्वभावाने निर्दय असणे हे सुद्धा स्त्रियांच्या स्वभावातील दोष आहेत
2) नशिबवानालाच जीवनात सुख मिळते.
भोज्यं भोजनशक्तिश्र्च रतिशक्तिर्वराडगना ।
विभवो दानशक्तिश्र्च नाल्पस्य तपसः फलम् ॥
भावार्थ –भोजनासाठी उत्तम जेवण मिळणे, ते पचवण्यासाठी उत्तम शक्ती असणे, सुंदर पत्नी असणे आणि असलीच तर तिच्यासोबत समागन करण्यासाठी कामवासनेची सक्ती असणे, धन मिळणे आणि धनासोबत दान देण्यासाठी कामवासनेची शक्ती असणे, धन मिळणे आणि धन सोबत दान देण्याची शक्ती असणे ह्या सर्व गोष्टी महान तप केले तरच मनुष्याला प्राप्त होतात, अन्यथा नाही.
3).सुख कशाला म्हणावे ?
यस्य पुत्रो वशीभूतो भार्या छन्दागुगामिनी ।
विभवे यश्र्च सन्तुष्टस्तस्य स्वर्ग इहैव हि ॥
भावार्थ-ज्या मानवाचा पुत्र आज्ञाधारक आहे, ज्याची पत्नी त्याच्या इच्छेनुसार वागते, जो आपल्याकडे असलेल्या धनामुळे संतुष्ट आहे अशा मानवाच्या दृष्टीने ही पृथ्वी सर्वसामान आहे.
4).चांगुलपणाची व्याख्या –
ते पुत्रा ये पितुर्भक्ताः स पिता यस्पु पोषकः ।
तन्मित्रं यस्य विश्र्वासः सा भार्या यत्र निर्वृति: ॥
भावार्थ– जे पुत्र आपल्या पित्या ची भक्ती करतात तेच खरे पुत्र असतात, जो पिता आपल्या मुलांचे योग्य भरणपोषण करतो तोच खरा पिता असतो. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो तोच खरा मित्र असतो आणि ज्या पत्नीमुळे पाटील सुख मिळते तीच पत्नी असते.
5).मित्राची योग्य परीक्षा करा –
परोक्षे कार्यहन्तारं प्रत्यक्षे प्रियवादिनम् ।
वर्जयेत्ताद्रशं मित्रं विषकुम्भं पयोमुखम् ॥
भावार्थ – जो आपल्या पाठीमागे आपले काम बिघडवण्याचा प्रयत्न करतो, तोंडावर मात्र गोड बोलतो असा मित्र कुठल्याही परिस्थितीत टाळला पाहिजे कारण मुखाशी दूध परंतु आता मात्र काळकूट जहर भरलेल्या घड्याप्रमाणें असा मित्र असतो
6).बोलताना भान ठेवावे.
न विश्र्वसेत् कुमित्रे च मित्रे चापि न विश्र्वसेत् ।
कदाचित् कुपितं मित्रं सर्व गुह्यं प्रकाशयेत् ॥
जो माणूस तुमच्याशी मैत्री असण्याचे नाटक करतो अशा ढोंगी मित्रावर कधीही विश्वास ठेवू नये. कारण मित्र अगदी खरा जरी असला तरी तो रागावला तर आपली सगळी भिंगे फोडू शकतो (आपल्या सगळ्या गुप्त गोष्टी उघड करू शकतो.)
7).स्वतःबद्दल फार माहिती दुसऱ्याला विनाकारण देऊ नये
मनसा चिन्तितं कार्य वाचा नैव प्रकाशयेत ।
मन्त्रेण रक्षयेद् गूढ कार्ये चापि नियोजयेत् ॥
जे कार्य मनात चिंतले आहे किंवा ज्या कामाचा आपण मनातल्या मनात विचार करत आहोत ते कधीही तोंडाने बोलून दाखवू नये. योग्य तर्हेने त्यावर विचार करून ते कार्य गुपित म्हणूनच राखले पाहिजे आणि त्यावर पुष्कळ विचार करून त्या विचारांचे रुंपांतर प्रत्यक्ष कार्यात केले पाहिजे.
8).परवशात हे सर्वात वाईट जिणे.
कष्टं च खलु मुर्खत्वं कष्टं च खलु यौवनम् ।
कष्टात्कतरं चैव परगेहनिवासनम् ॥
मूर्खपणा अंगी असणे कष्टाचे असते, तारुण्यसुद्धा कष्टाचेच असते. परंतु परक्याच्या घरात राहावे लागण्याइतके कष्टाचे दुसरे काहीच नसेल.
9).जगातील सज्जनांची दुर्मिळता –
शैले शैले न माणिक्य मौक्तिकं न गजे गजे ।
साधवो न हि सर्वत्र चन्दनं न वने वने ॥
ज्याप्रमणे प्रत्येक पर्वतावर माणिक मिळत नाही, प्रत्येक हत्तीच्या मस्तकावर मोती नसतो, प्रत्येक वनात चंदन नसते त्याचप्रमाणेच सज्जन माणसेही सर्वत्र मिळत नसतात.
10).विद्याकॊशल्याचे महत्व –
पुत्राश्र्च विविधैः शीलैर्नियोज्याः सततं बुधैः ।
नीतिज्ञा शीलसम्पन्ना भवन्ति कुलपुजिताः ॥
बुद्धिवंत लोकांनी आपल्या मुलामुलींना अनेक गुणानी सम्पन्न करावे.त्यांना पुष्कळ गुणकौशल्य शिकवावेत. कारण जे लोक नीती जाणतात आणि विविध गुणांनी संपन्न असतात त्याचीच कुळामध्ये पूजा होते.
11).मुलांना न शिकवणारे पालक च वैरीच होतात –
माता शत्रुः पिता वैरी येन बालो न पठितः ।
न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा ॥
ज्या बालकांचे मातापिता त्यांना शिक्षण देत नाहीत ते त्यांचे शत्रूच असतात. कारण हंसाच्या जमावात बगळा जसा शोभत नाही त्याचप्रमाणे चारचौघे लोक एकत्र जमले कि त्या सार्वजनिक सभेमध्ये ती मुले काहीच बोलू शकत नाहीत. त्यांची दयनीय स्थिती होते.
12).मुलांशी कसे वागावे ? –
लालनाद् बहवो दोषास्ताडनाद् बहवो गुणाः ।
तस्मात्पुत्रं च शिष्यं च ताडयेन्न तु लालयेत् ॥
फार लाड केले कि मुले बिघडतात परंतु वेळेवर रागावल्यामुळे आणि प्रसंगी शिक्षा केल्याने मुलांना वळण लागते. म्हणून पुत्रांचे आणि शिष्यांचे फार लाड करू नयेत. वेळप्रसंगी त्यांना मारावे किंवा रागवावे.
13).विध्यार्थ्यानी वेळ अजिबात वाया घालवू नये.–
श्लोकेन वा तदध्र्येन पादेनैकाक्षरेण वा ।
अबन्ध्यं दिवसं कुर्याद् दानाध्ययनकर्मभिः ॥
दिवसभरात वेदाच्या एका श्लोकाचे अध्ययन आणि मनन चिंतन करावे. ते नाही जमले तर अर्ध्या श्लोकाचे किंवा त्याच्या एका भागाचे अध्ययन करावे. त्या एका भागाचे अध्ययन करणे जमले नाही तर निदान त्यातील एका अक्षराचे तरी अध्ययन करणे आवश्यक आहे. आपला दिवस व्यर्थ न घालवणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्त्यव्य आहे.
14) शरीराला धसणारी दुःखे –
कान्तावियोगः स्वजनापमानः ऋणस्य शेषः कुनृपस्य सेवा ।
दरिद्रभावो विषमा सभा च विनाग्निनैते प्रदहन्ति कायम् ॥
प्रिय पत्नीचा वियोग, आपल्याच माणसाकडून होणार अपमान, कर्ज शिल्लक राहणे, दुष्ट राजाची सेवाचाकरी करावी लागते, कायम दरिद्री परिस्थिती राहावे लागते आणि ज्याच्याशी आपले पटत नाही अशा दुष्ट, स्वार्थी लोकांच्या सभेत बसावे लागणे ह्या सर्व गोष्टी प्रत्यक्ष आग पेटलेली नसतानाही शरीराला जळत राहतात.
15). विनाश कसा होऊ शकतो ? –
नदीतारे च ये वृक्षाः परगेहेषु कामिनी ।
मन्त्रिहीनश्र्च राजनः शीघ्र नश्यन्त्यसंशयनम् ॥
जे वुक्ष नदीच्या अगदी काठावर असतात, जी स्त्री परक्याच्या घरी जाते आणि ज्या राजापाशी चांगले मंत्रीगणच नसतात ते सर्व लवकरच विनाश पावतात.
16).प्रत्येकाचे बळ वेगळे –
बलं विद्या च विप्राणां राज्ञां सेन्य बलं तथा ।
बल वित्तं च वैश्यानां शुद्राणां परिचर्यकम् ॥
ब्राह्मणाचे बळ म्हणजे त्याची विद्या असते, राजाचे बळ म्हणजे त्याचे सैन्य असते, व्यापाऱ्याचे बळ म्हणजे त्याची संपत्ती असते तर शूद्रांचे बळ म्हणजे त्यांची सेवावृत्ती असते.
17). जागी हा खास स्वार्थाचा बाजार मांडला सारा –
निर्धनं पुरुष वेश्या प्रजा भग्नं नृपं त्यजेत् ।
खगा वीतफलं वृक्षं भुक्त्वा चा भ्यागता गृहम् ॥
वेश्या निर्धन पुरुषाचा त्याग करते, प्रजा पराजित राजाचा त्याग करते. पक्षी फळे नसलेल्या वृक्षाचा त्याग करतात आणि भोजन झाल्यावर पाहुणे यजमानाच्या घराचा त्याग करतात.
18) काम झाले कि कुणी थांबून राहात नाही –
गृहीत्वा दक्षिणां विप्रास्त्यजन्ति यजमानकम् ।
प्राप्तविद्या गुरुं शिष्या दग्धारण्यं मृमास्तथा ॥
दक्षिणा मिळाली कि ब्राह्मण यजमानांचे घर सोडून जातात त्याचप्रमाणे विद्या मिळाली की शिष्य गुरूला आणि जाळून गेलेल्या करण्याला हरणे आणि तत्स्यम सर्व पशुपक्षी सोडून जातात.
19). असंगाशी संग प्राणाशी गाठ –
दुराचारी दुरद्रुष्टिर्दुरा वासी च दुर्जनः ।
यन्मैत्री क्रियते पुम्भिर्नरः शीध्रं विनश्यति ॥
वाईट वर्तन करणारा, वाईट नजर ठेवणारा, अस्वच्छ ठिकाणी राहणारा असा तो दुर्जन असेल त्याच्याशी जो मैत्री करतो त्याचा लवकरच सर्वनाश होतो.
20). नात्याप्रमाणे वागावे –
समाने शोभते प्रितिः राज्ञि सेवा च शोभते ।
वाणिज्यं व्यवहारेषु दिव्य स्त्री शोभते गृहे ॥
प्रेम किंवा मैत्री करायची असेल तर ती सामान दर्जाच्या व्यक्तीमध्ये शोभून दिसते. सेवाच करायची झाली तर राजाची सेवा करणे शोभून दिसते. सर्व आर्थिक व्यवहारांत व्यापार शोभून दिसतो आणि सुंदर स्त्री घरात शोभून दिसते.
chanakya niti PDF Marathi | चाणक्य नीती मराठी PDF
chanakya niti in Marathi, chanakya niti adhyay 2, chanakya niti pdf Marathi
Chankya Niti in Marathi Adhyay 1 | चाणक्य नीती मराठी अध्याय 1
Conclusion | निष्कर्ष –
Chankya niti Marathi, chankya niti in Marathi, chanakya niti in Marathi वरील तयार केलेली पोस्ट, मी माहिती पुस्तक आणि इंटरनेट वरील बाकी माहिती वरून घेतलेली आहे, वरील माहिती मध्ये याचा वापर केलेला आहे. त्यानुसार हि माहिती फक्त शालेय उपयोगासाठी याचा वापर केला तरी चालेल. आणि तुम्हाला वरील माहिती अथवा पोस्ट कशी वाटली याची नक्कीच post च्या वरी review section मध्ये रेटिंग द्या. आणि तुम्ही post किंवा website बद्दल काही सूचना असतील तर आम्हाला [email protected] या केला तरी चालेल. click here…..
1 thought on “chanakya niti adhyay 2 | चाणक्य नीती – अध्याय 2”